आषाढी वारी नंतर पंढरीत महाद्वार काला उत्साहात संपन्न.
आषाढी वारी नंतर पंढरीत महाद्वार काला उत्साहात संपन्न,हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाद्वार काला साजरा. पंढरपूर-(प्रतिनिधी )श्री विठ्ठलाच्या पादुकांवर गुलाल व बुक्क्याची उधळण करीत हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाद्वार काला उत्साहात पार पडला. या उत्सवानंतर आषाढी यात्रेची खऱ्या अर्थाने सांगता झाली असल्याचे मानले जाते. संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजाकडून महाद्वारकाला करण्याची परंपरा आहे. गोपाळपूर चा काला झाल्यानंतर सर्व संतांच्या पालख्या पंढरीचा निरोप घेतात. यानंतर स्थानिकांचा उत्सव अर्थात महाद्वार काला करण्याची गेल्या चारशे वर्षाहून अधिक काळापासून परंपरा आहे. येथील हरिदास घराण्यातील संत पांडुरंग महाराज यांना प्रत्यक्ष श्री विठ्ठलाने दर्शन देऊन आपल्या खडावा अर्थात पादुका प्रसाद रूपाने दिला होत्या. गेल्या 11 पिढ्यापासून हा उत्सव सुरू आहे. परंपरेनुसार संत नामदेव महाराज यांच्या वंशजाची दिंडी हरिदास यांच्या घरी आल्यानंतर श्री विठ्ठलाच्या पादुका मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर पुजाऱ्यांनी बांधल्या. यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी...