कला साधना मंडळाच्या वतीने विविध पुरस्कार जाहीर, ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी यांना देण्यात येणार पंढरी कलारत्न.
कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर. पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून, दक्षिण काशी म्हणून जसे प्रसिद्ध आहे, तसेच या पंढरीला कलेचा वारसा देखील दैदिप्यमान लाभलेला आहे. अनेक शतकांची ही पुण्यभूमी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. तसेच अनेक दिग्गज कलाकार देखील या भूवैकुंठात जन्म घेतलेले आहेत. साहित्य, कला, संगीत व नाट्य या विविध क्षेत्रात अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कलासाधना जोपासली आहे. अशा कलाकारांना गेली १८ वर्ष हा पुरस्कार देण्यात येत असतो. या वर्षीचा पंढरी कलारत्न पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार विवेकजी घळसासी यांना मा. आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत, सोलापूरचे दाते पंचांगकर्ते श्री. मोहनजी दाते यांच्या शुभहस्ते प्रदान केला जाणार आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये भरघोस यश प्राप्त करुन सहाय्यक महसूल यापदी निवड झाल्याबद्दल कु. सोनिया शरद कागदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विषयात सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल कु. प्रतीक्षा भा...