Posts

Showing posts from September, 2024

मुलांना वाढविताना कोणतेही लेबल लावू नका,._डॉ सौ शेरॉन भोपटकर.तुलना करू नका

Image
 मुलांना वाढविताना कोणतेही लेबल लावू नका, तुलना करू नका. डॉ सौ शेरॉन भोपटकर. प्रतिनिधी पंढरपूर _आपला मुलगा सराईत पणें मोबाईल हाताळतो,ही गर्व करण्याची, अभिमानाची बाब नसून ती एक धोक्याची घंटा आहे, मुलांना वाढविताना कोणतेही लेबल लावू नका, किंवा तुलना करू नका असे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉ सौ शेरॉन तेजस भोपटकर यांनी केले. शिशु विहार व आदर्श प्राथमिक विद्यालयात माँटेसरी दीन व संस्थापिका कै. कुसुमताई आराध्ये यांचा दहावा स्मृतिदिन कऱण्यात आला.यावेळी बाल मानसशास्त्र आणि पालकांची भूमिका, या विषयावर व्याख्यान गुरुवार दिनांक २६रोजी आयोजित करण्यात आले आहे. यावेळी डॉ तेजस भोपटकर, ॲड ज्ञानेश आराध्ये, , सदस्या सौ रेखा उंबरकर, श्रीमती भालेराव,आदर्श प्राथमिक मुख्याधापिका सौ राजश्री घंटी, शिशु विहार मुख्याध्यापिका आदिती देशमुख,डॉ मैत्रेयी केसकर , श्री संत आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ शेरॉन तेजस भोपटकर म्हणाल्या,   वाढत्या वयात मुलांचा विविध स्तरावर विकास होत असतो, बौद्धिक, शारीरिक विकास होत असताना आपण आपल्या भावनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मुलांचा विकास होत असताना विविध ...

मुलांना वाढविताना कोणतेही लेबल लावू नका, तुलना करू नका._डॉ सौ शेरॉन भोपटकर.

Image
 मुलांना वाढविताना कोणतेही लेबल लावू नका, तुलना करू नका. डॉ सौ शेरॉन भोपटकर. प्रतिनिधी पंढरपूर _आपला मुलगा सराईत पणें मोबाईल हाताळतो,ही गर्व करण्याची, अभिमानाची बाब नसून ती एक धोक्याची घंटा आहे, मुलांना वाढविताना कोणतेही लेबल लावू नका, किंवा तुलना करू नका असे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉ सौ शेरॉन तेजस भोपटकर यांनी केले. शिशु विहार व आदर्श प्राथमिक विद्यालयात माँटेसरी दीन व संस्थापिका कै. कुसुमताई आराध्ये यांचा दहावा स्मृतिदिन कऱण्यात आला.यावेळी बाल मानसशास्त्र आणि पालकांची भूमिका, या विषयावर व्याख्यान गुरुवार दिनांक २६रोजी आयोजित करण्यात आले आहे. यावेळी डॉ तेजस भोपटकर, ॲड ज्ञानेश आराध्ये, ,मुख्याध्यापिका सौ रेखा उंबरकर (मंगळवेढेकर) डॉ मैत्रेयी केसकर आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ शेरॉन तेजस भोपटकर म्हणाल्या,   वाढत्या वयात मुलांचा विविध स्तरावर विकास होत असतो, बौद्धिक, शारीरिक विकास होत असताना आपण आपल्या भावनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मुलांचा विकास होत असताना विविध स्पर्धा, वक्तृत्व, आदि स्पर्धात भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. आजकाल ची मुले मो...

शारदीय नवरात्रौत्सव निमीत्त पंढरीत संगीत महोत्सवाचे आयोजन.

Image
 श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाचे आयोजन पंढरपूर(प्रतिनिधी )- श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर वतीने श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवात आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कलाकारांची उपस्थिती असणार आहे.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि  सदस्य, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेल्या  श्री.रुक्मिणी नवरात्र  संगीत महोत्सव रात्री ७:३० ते १०:०० या वेळेत श्री संत तुकाराम भवन येथे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार   ४ ऑक्टोबर रोजी  भारतरत्न पं.भिमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांचे गायन ,शनिवार ५ ऑक्टोबर रोजी ख्यातनाम गायक पं.शौनक अभिषेकी महोत्सवात यांचा स्वराभिषेक ,रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी ओंकार कला अकादमी चेन्नई व अतुल खांडेकर यांचे गायन, सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी वैष्णवी मगर यांचे अभंगगायन ,मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी उस्ताद रशीद खान यांचे शिष्य कृष्णा बोंगाणे यांचा दुमदुमली प...

नेहा झिरपे बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय.

Image
 स्वेरीच्या नेहा झिरपे या बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय स्वेरीचे तंत्रशिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात देखील यश पंढरपूर- (प्रतिनीधी)गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट ही संस्था शिक्षणात विविध प्रयोग राबवून विद्यार्थ्यांना गुणवत्तेला अधिक परिपक्व बनवत आहे हे सर्वश्रुत आहे. आता स्वेरी ही तंत्रशिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण करत आहे. हे मागील काही वर्षांपासून विविध क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून दिसून येत आहे.        पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत बेलाटी येथील बी.एम.आय.टी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आयोजिलेल्या विद्यापीठस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या नेहा सुरेश झिरपे यांनी ७० मुलींमधून तृतीय क्रमांक पटकावला. साऊथ झोनसाठी होणाऱ्या स्पर्धेसाठी नेहा झिरपे आता पात्र ठरल्या आहेत. तसेच त्यांना क्रीडा महोत्सवामध्ये सुद्धा सहभाग होण्याची संधी मिळाली आहे. या विजयामुळ...

भा ज पा जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे यांच्या सतर्कतेने गुमास्ता सोसायटी मधील रहिवासी भयमुक्त.

Image
 एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व, विशेष पोलीस महानिरीक्षक  सुनिल फुलारी यांची तत्परता, पोलीसांनी दाखविली कार्यक्षमता.  पंढरपूर (प्रतिनिधी)_ पंढरपूर येथील जुना कासेगाव रस्त्यावरील गुमास्ता सहकारी गृह निर्माण संस्थेत दरोडोखोर शिरत असल्याने येथील रहिवासी रोजच दहशतीच्या सावटाखाली जगत होते, गेल्या दोन दिवसापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता, हे चोरटे झाडीत लपून बसत, आणि संधीची वाट बघत असायचे. मात्र याबाबत भा ज पा महिला आघाडी मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ प्राजक्ता बेणारे यांना या सोसायटीत होणाऱ्या चोऱ्यांची तसेच रहिवाश्यांच्या  हतबलतेची  माहिती मिळताच त्यांनी त्वरित  त्यांनी स्थानिक पोलिसांना ही माहिती देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून डॉ प्राजक्ता बेणारे यांनी थेट विशेष पोलिस महानिरीक्षक  सुनिल फुलारी कोल्हापूर महापरिक्षेत्र यांनाच फोन केला, व याबाबत सविस्तर माहिती देऊन गांभीर्य स्पष्ट केले, यानंतर त्वरीत हालचाली होऊन तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी गुमास्ता सहकारी सोसायटी गाठली, आणि झाडीत लपून बसलेले चोर पो...

आणि वीरशैव मंडळाच्या वतीने महीला उद्योजकांसाठी दिवाळीत पंढरपूर एक्स्पो.

Image
 पंढरीत दिवाळीची खरेदी एकाच छताखाली दिवाळीनिमित्त मनसे आणि वीरशैव महिला मंडळ यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम. पंढरपूर /प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आद्य वीरशैव महिला मंडळ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील महिला उद्योजकांसाठी पंढरपूर मध्ये भव्य असा एक्सपो घेऊन दिवाळीची खरेदी एकाच छताखाली करता यावी.  या हेतूने दिवाळीनिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम येथील टिळक स्मारक मैदानावर दिनांक १९,२० ऑक्टोबर २०२४ रोजी भरवण्यात आला आहे.  यामध्ये भाग घेणाऱ्या महिला उद्योजकांसाठी मोफत स्टॉल व स्टॉल उभारण्यासाठी विना व्याज कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी स्टॉलची बुकिंग करावी असे आवाहन मनसे नेते दिलीपबापू धोत्रे आणि डॉक्टर शोभा कराळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी मनसेचे पदाधिकारी व आद्य वीरशैव महिला मंडळाचे अध्यक्ष डॉ. सौ.शोभा कराळे, सौ.सुवर्णा स्वामी, सौ.आरती पावले, सौ.कविता पावले, सौ. विशालाक्षी पावले, सौ.संजीवनी ठीगळे, सौ.मनीषा वासकर, सौ.अनुराधा स्वामी उपस्थित होत्या.  पंढरपूर-मंग...

पंढरपूर पोलीसांनी बारा लाख १०हजार रू. किमतीचे चोरीचे सोने जप्त केले,

Image
 पंढरपूर शहर पोलिसांची दमदार कामगीरी,  बारा लाख १० हजार किमतीचे   १८तोळे सोने, चोरीचा ऐवज जप्त  दोन चोरट्याना जेरबंद करण्यात यश .  पंढरपूर(प्रतिनिधी )_ पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने जबरीने सोनसाखळी चोरी करणा-या दोन चोरांकडून अंदाजे १२ लाख १० हजार किंमतीचा (अंदाजे १८ तोळे सोने) मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. सदर कामगीरी पंढरपूर शहर पोलीसांनी  अतुल कुलकर्णी पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण,  प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांचे सुचनेप्रमाणे सोलापुर जिल्हयातील जबरी चोरीस प्रतिबंध करणेच्या आदेशान्वये डॉ अर्जुन भोसले, सहा पोलीस उपअधिक्षक पंढरपुर विभाग पंढरपुर . विश्वजीत घोडके वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली  केली. पंढरपुर येथे दिनांक २८ ऑगस्ट रोजी फिर्यादी डॉ. सौ. मैत्रेयी मंदार केसकर वय ४५ वर्षे रा. शाकुंतल नगर, इसबावी, पंढरपूर यांच्या अंगावर चटणी टाकुन त्यांना ढकलुन देवून गळयातील ४४.६६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोठे गंठण काळे मनी व सोन्याच्या वाटी असलेले बळजबरीने हिसकावुन तोडून जबरी ...

विचारात सकारात्मकता असल्यास व्यक्ती प्रफुल्लित होतो._ब्रह्मकुमार पियुषभाई.

Image
 विचारात सकारात्मकता असल्यास व्यक्ती प्रफुल्लित होतो                                                                                  -ब्रह्मकुमार पियुषभाई स्वेरीत ‘निसर्ग, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न पंढरपूर-(प्रतिनिधी )‘कोणतेही कार्य करताना चेहऱ्यावर हास्य ठेवणे आवश्यक आहे. चेहऱ्यावरील हास्यामुळे आपली कामे अधिक सहजपणे होतात तसेच कामाचा कितीही ताण-तणाव असू द्या परंतु जर मनाची एकाग्रता अभंग ठेवली तर हाती घेतलेले काम पूर्णत्वाकडे झुकते. कोणतेही काम करताना आपल्या चेहऱ्यावर उत्साह असावा तसेच विचारात सकारात्मकता ठेवल्यास व्यक्ती अजून प्रफुल्लित होतो.’ असे प्रतिपादन ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाचे ब्रह्मकुमार पियुषभाई यांनी केले.           गोपाळपूर ( ता. पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या खुल्या रंगमंचावर ‘न...

एक हजार कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप.

Image
 पंढरीत 1000 कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वाटप... पंढरपूर प्रतिनिधी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सक्रिय जीवित नोंद असणा-या कामगारांना गृहोपयोगी साहित्य संचाचे वाटप सत्यशोधक कामगार संघटनेच्या माध्यमातून पंढरपुरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे करण्यात आले. यावेळेस संचाचे वाटप माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी परिचारकांनी संबोधित करताना कामगारांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कामगारांचा घरकुल प्रश्न प्राधान्याने सोडवून, पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेची घरे कामगारांना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार. कामगारांना शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य, सामाजिक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार. सामाजिक कार्य करताना उपेक्षित, वंचितांसाठी काम करणे महत्वाचे असल्याचे सांगितले. यावेळेस रवी सर्वगोड, प्रदीप परकाळे, शाहू सर्वगोड,  किशोर कदम, समाधान भोसले, सतीश सर्वगोड, सिध्दनाथ सांवत, राजेंद्र सर्वगोड, लक्ष्मण बंगाळे, तुकाराम मोळावडे, शरद सोनवणे, अमोल पाटील,गणेश सर्वगोड, स्वप्नील कांबळे, सुरज स...

रांजणी येथे चारित्र्याच्या संशयावरून महिलेवर कोयत्याने वार.

Image
 रांझणीत  चारित्र्याच्या संशयावरून महिलेवर कोयत्याने वार, आरोपी नवरा आणि दिरास अटक.   पंढरपूर (प्रतिनिधी)_ पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथे पतीनेच चारित्र्याच्या संशयावरून  कोयत्याने वार केल्याने महिला  गंभीर जखमी झालीआहे, तिच्या पाठीवर, पोटावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केलें आहे. रांझणी येथील सुप्रसिध्द महादेव मंदीराच्या  पायरीवरच सागर पवार यांनी मारले    सोमवारी (दि.२३) सायंकाळी  साडेपाच वाजण्याच्या सुमारास  रांझणी येथील श्री महादेव मंदिरासमोर घडली. ऊर्मिला सागर पवार (वय ३५, रा. आंबे, ता.पंढरपूर) असे जखमी महिलेचे नांव आहे. रांजणी येथे ऊर्मिला यांचा दीर भेटला, तेव्हा त्यांच्यात भांडणं झाले, हे समजल्यावरून सागर चिडला होता.  राग मनात धरून त्याने ऊर्मिला हिच्यावर कोयत्याने वार केले. याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, ऊर्मिला ही आंबे येथील रहिवाशी असून गेल्या कांही दिवसांपासून ती रांझणी येथे राहत होती. या कारणावरून पती सागर पवार हा चिडून होता. दरम्यान, सोमवारी सायंकाळी रांझणी गावात बाज़ार असल्याने परिसरातील ग्रामस्थ,...

स्काय वॉक आणि दर्शन मंडप यासाठी १३०कोटी रू निधी मंजूर._आ.समाधान आवताडे.

Image
 *१३० कोटींच्या दर्शन मंडपास शिखर समितीची मंजुरी  : आ. समाधान आवताडे यांची माहिती* *तिरुपतीच्या धर्तीवर टोकन दर्शन सोय होणार : ६ हजार भाविकांसाठी वातानुकूलित दर्शन मंडप* पंढरपूर  येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी १३० कोटी रुपयांच्या  दर्शन मंडप आणि स्काय वॉक आराखड्यास तीर्थक्षेत विकास आराखडा शिखर समितीने मंजुरी दिली आहे, लवकरच या आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल. हा दर्शन मंडप उभा राहिल्यानंतर टोकन दर्शन सुविधा सुरु करण्यात येईल. ६ हजार भाविकांची सोय होणार आहे, अशी माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली.  यासंदर्भात अधिक माहिती देताना आ.आवताडे म्हणाले कि, तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थतीतीत बैठक संपन्न झाली. या बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित  होते.  या बैठकीत बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या दर्शन मं...

पंढरपूर येथील तुळशी माळेचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केले कौतुक.

Image
  वर्धा येथे पी एम विश्वकर्मा योजना अंतर्गत भव्य मेळावा संपन्न. पंढरपूर येथील युवकांच्या तुळशीमाळेची पाहणी करून केले कौतुक. पंढरपूर (प्रतिनिधी) पी एम विश्वकर्मा योजना अंतर्गत वर्धा येथे भारतातील विविध पारंपारिक कारागीर यांना चालना मिळावी  व आर्थिक उन्नती व्हावी म्हणून  भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व इतर मंत्री मंडळ उपस्थित होते. या शिबिरामध्ये पंढरपूर नगर परिषदेचे वतीने विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणी केलेले स्वप्नील टमटम ,विशाल वाडेकर,नितीन पानकर ,अनिल इंदापूरकर,निरंजन पानकर  हे उपस्थित होते  देश विदेशात व संपूर्ण महाराष्ट्रात श्री विठ्ठलाच्या कृपा आशीर्वाद मिळावा या सदभावनेने अनेक भाविक भक्ती भावनेने  तुळशीची पवित्र माळ गळ्यात घालतात त्या तुळशीच्या माळा तयार करणेचे काम पंढरपुरातील काशी कापडी समाज करतो त्यामुळे या तुळशी माळ करणारे कारागीर यांना या शिबिरासाठी निमंत्रित करण्यात आले होते व या मेळाव्यात  त्याचा स्टॉल लावण्यात आला होता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमं...

श्री माताजी निर्मला देवी विद्या प्रशालेत स्वसंरक्षण प्रशिक्षण.

Image
 श्री माताजी निर्मलादेवी प्राथ. उच्च प्राथमिक विद्या मंदिर, येथे स्व संरक्षण प्रशिक्षण. पंढरपूर(प्रतिनिधी )_ पंढरपूर येथील योद्धा गुरुकुल फाउंडेशन  तर्फे श्री योगेश भोसले  व पृथ्वीजीत कांबळे यांनी श्री माताजी निर्मलादेवी  प्राथमिक विद्या मंदिर येथे मुलांना व मुलींना स्वसंरक्षण कसे करावे याबद्दल प्रात्यक्षिक करून दाखवले."आज सर्वांना आपल्या स्वतःच्या संरक्षणाची गरज आहे. जीवनात कॊणताही वाईट प्रसंग आला तरी धाडसाने सामोरे जाऊन लढणे गरजेचे आहे. माणसाचं मन आणि मनगट बलशाली असल्यास कोणत्याही प्रसंगाचा सामना करू शकतो असे"  योगेश भोसले म्हणाले.आजच्या सरावात इ.१ली ते ७ वी विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षणाचे धडे घेतले आणि सराव मध्ये ७ वी वर्गातील मुलींनी भाग घेतला. मुख्याध्यापक  संतोष कवडे म्हणाले " आज आपण घेतलेल्या प्रशिक्षणाचा मित्रांसोबत शाळेत किंवा खेळात करू नका. गरज असल्यावर कठीण प्रसंगी याचा वापर करावा." हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भोसले सर,मुजावर सर, आगावणे सर, टापरे सर, सौ. खडतरे मॅडम, सौ. गावडे मॅडम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार महेश भोसले सर यांनी मानले....

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे केले ऑनलाईन उद्घाटन.

Image
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रा’चे ऑनलाइन उदघाटन . ‘स्वेरी’ हे पंढरपूर तालुक्यातील एकमेव कौशल्य विकास केंद्र पंढरपूर(प्रतिनिधी)– कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रा' च्या अनुषंगाने आज वर्ध्यात भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी विविध विकास कार्याचे उदघाटन केले. या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद स्वेरीतील विद्यार्थ्यांनी घेतला. मा. पंतप्रधान मोदी यांनी  शिक्षण विषयक नवीन योजना, समृद्धीपूरक उपक्रम व धोरणासंबंधी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.           स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ आणि पदवी अभियांत्रिकीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वेरीच्या अभियांत्रिकी (पदवी व पदविका) महाविद्यालयात या थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध...

मुरडीचा कानोला.

Image
 *मुरडीचा कानोला* गेले तीन चार दिवस चाललेली धांदल काल संध्याकाळी शांत झाली.. काल माहेरवाशीण गौराई आपल्या घरी गेल्या. त्यांच्या आगमनाची तयारी,  स्थापना, पूजन आणि विसर्जन या सगळ्या गोष्टींमुळे घरात नुसतं चैतन्य भरून राहिलं होतं. त्यांच्या साठी करंज्या, लाडू, पुरणपोळी, खीर, साखरभात अशी पक्वान्ने, सोळा चटण्या, कोशिंबिरी, भाज्या, वाटली डाळ, वडे भजी कढी कटाची आमटी असा परिपूर्ण स्वयंपाक करून,  नैवेद्य दाखवून, सवाष्ण, ब्राह्मण आणि घरच्या सगळ्यांना आग्रहाने पोटभर जेवायला घालून, तृप्त होऊन दमलेली घरची लक्ष्मी.. संध्याकाळी हळदी कुंकवाला आलेल्या बायका, गौरी गणपतीच्या निमित्ताने आलेले अभ्यागत,  परगावाहून आलेली घरची मंडळी असं सारं उत्साही वातावरण गेल्या चार दिवसांत भोवताली होतं.. गप्पा गोष्टी करत कामं उरकली जात होती. आणि पाहता पाहता पाहुण्या म्हणून आलेल्या माहेरवाशीणींचा जाण्याचा दिवस उगवला. सकाळपासून उगाच डोळे भरून आले. संध्याकाळी आरती करताना नैवेद्यासाठी मुरडीचा कानोला ठेवताना गळ्यात आवंढा दाटला..गौराईसाठी करंज्या करताना शेवटच्या चार करंज्या आवर्जून मुरडीच्या करायच्या आजच्या नैव...

सहकार गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न.

Image
 सहकार गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर. प्रतिनिधी पंढरपूर -पंढरपूर शहरातील समाज सेवेसाठी तत्पर असणारे सहकार गणेशोत्सवात मंडळाच्या वतीने रविवार दि 8सप्टेंबर रोजी प्रदक्षिणा रोड येथील राजपूत मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिर उत्साहात घेण्यात आले. यावेळी 151उत्साही युवकांनी रक्तदान केले. यावेळी सहकार गणेशोत्सवात मंडळाचे अध्यक्ष युवराज लखेरी, उपाध्यक्ष सुयोग अंबिके, युवा नेते ओंकार जोशी, प्रथमेश सासवडे, प्रवीण मोरे, हणमंत पालकर, सोमनाथ जाधव, कौस्तुभ कुलकर्णी, शुभम ताकभाते, सागर पाठक, सुमेर काळे,, कृष्णा जव्हेरी   मंडळाचे पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते. सहकार गणेशोत्सव मंडळाने गेल्या बावीस वर्षात विविध सामाजिक उपक्रम,महाआरती , ऐतिहासीक देखावे, भव्य मिरवणूक , शिस्तबध्द ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक, सर्वांत जास्त  कार्यकर्ते असणारे मंडळ  असा लौकिक प्राप्त केला आहे. सहकार गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज शुक्रवार दी 13सप्टेंबर रोजी सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. संपादक. चैतन्य उत्पात.

पंढरपूर साठी तेरा एम एल डी क्षमतेचा मलनिस्सरण प्रकल्प मंजूर. आ. समाधान आवताडे.

Image
 *पंढरपूरसाठी १३ एम एल डी क्षमतेच्या मलनिस्सारण प्रकल्पास मान्यता : आ. समाधान आवताडे* *१२२ कोटींचा प्रकल्प : ११० कोटींचे अनुदान : ७ दिवसात निविदा ९१ दिवसात काम सुरु होणार* पंढरपूर  पंढरपूर शहरासाठी १३ एम एल डी क्षमतेच्या मलनिस्सारण प्रकल्पास  राज्य शासनाने गुरुवार ( दि. १२ ) रोजी मंजुरी  दिली असून १२२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामध्ये १०९. ९० कोटी रुपये शासनाचे अनुदान असेल तर २२ कोटी रुपये पंढरपूर नगरपरिषदेचा हिस्सा असणार आहे. येत्या ७ दिवसात या कामाची निविदा निघणार असून ३ महिन्यात काम सुरु  होईल, दोन वर्षात काम पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंढरपूर शहरातील सांडपाणी आणि मैला मिश्रित पाणी चंद्रभागेला येण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे, अशी माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली आहे.  गुरुवारी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने या प्रकल्पास प्रशासकीय मान्यतेचा अध्यादेश काढला आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना आ. समाधान आवताडे पुढे म्हणाले कि, पंढरपूर शहराची सध्याची मलनिःसारण यंत्रणा अपुरी ठरत असल्याने शहरातील सांडपाणी आणि मैलामिश्रित पाणी चंद्रभा...

कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने फौजी चित्रपटाच्या प्रीमियर शो चे आयोजन, श्रीकांत बडवे यांची महत्वपूर्ण भूमिका.

Image
 कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने फौजी चित्रपटाचा प्रीमियर शो, पंढरीचे कलावंत श्रीकांत बडवे यांची महत्वपूर्ण भूमिका. पंढरपूर प्रतिनिधी -कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने कै. मेजर कु़णालजी गोसावी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ "फौजी" या चित्रपटाच्या प्रिमियर शोचे आयोजन!  सर्वत्र प्रसारीत होणाऱ्या जवानांच्या आयुष्यावर चित्रीत करण्यात आलेल्या, फौजी या चित्रपटाच्या प्रिमियर शो चे आयोजन शुक्रवार दि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वा डिव्हीपी स्क्वेअर पंढरपूर येथे शहीद मेजर कै. कुणाल गोसावी यांना आदरांजली म्हणून कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतिने, फौजी या चित्रपटाच्या प्रिमियर शोचे आयोजन करण्यात आले आहे.  सुरुवातीला  शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या प्रतिमेचे पूजन युटोपियन शुगरचे चेअरमन उमेशजी परिचारक  व  कै. शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे पिताश्री मुन्नागीर गोसावी व त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच बारामती येथील निवृत्त सैनिक महेश जी पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.              सदर चित्रपट फौजी या चित्रपटाचे दिग्दर्शन घनश्...

काणे ज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजने बरोबरच सर्व शासकीय योजना उपलब्ध. डॉ सुरेंद्र काणे, डॉ सौ वर्षा काणे.

Image
 डॉ काणेज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य बरोबरच सर्व शासकीय योजना उपलब्ध.डॉ सुरेंद्र काणे, डॉ सौ वर्षा काणे.  प्रतिनिधी  पंढरपूर- पंढरपूर येथील डॉ काणेज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जनआरोग्य  योजना बरोबरच सर्व प्रकारच्या शासकीय योजना सुरू करण्यात आल्या असून या विविध योजनांचा लाभ गोरगरीब रुग्णांनी घेऊन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा अशी माहिती डॉ सुरेंद्र काणे आणि डॉ सौ वर्षा काणे यांनी दिली. ते म्हणाले, आता पंढरपूर येथील रुग्णांना विविध उपचारासाठी सोलापूर,सांगली, पुणे,मिरज, कोल्हापूर येथे जाण्याची जाण्याची गरज नाही,पंढरपूर येथील डॉ काणे ज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये  महात्मा ज्योतिराव  फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना, तसेच सर्व योजनांचे वैद्यकीय अनुदान, पॉलिसी, कॅशलेस सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये मेंदू,मणका विकार,कॅन्सर,किडनी, हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया, म्हणजे पायापासून ते डोक्यापर...

स्वेरीमधील चार विद्यार्थ्यांची चिलर्स किर्लोस्कर कंपनीत निवड.

Image
 स्वेरीच्या चार विद्यार्थ्यांची ‘किर्लोस्कर चिलर्स’ या नामांकित कंपनीत निवड पंढरपूरः प्रतिनीधी -‘किर्लोस्कर चिलर्स’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागातील चार विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.         ‘किर्लोस्कर चिलर्स’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या प्रियांका शंकर देवमारे, मानसी नितीन चव्हाण, शुभम ज्ञानेश्वर तोडकरी व सुधीर राजकुमार राऊत या चार विद्यार्थ्यांची  निवड केली. ‘किर्लोस्कर चिलर्स’ ही कंपनी २० वर्षांपेक्षा अधिक जुनी आहे. ही कंपनी प्रामुख्याने एचव्हीएसी अँड आर या क्षेत्रात कार्यरत आहे. किर्लोस्कर या नामांकित ग्रुप मधील ही एक कंपनी आहे. स्वेरीचे माजी विद्यार्थी देखील या कंपनीत कार्यरत आहेत. अशा नामवंत कंपनीत स्वेरीचे विद्यार्थी रुजू होतात, हे देखील विशेष म...