रांजणी येथे चारित्र्याच्या संशयावरून महिलेवर कोयत्याने वार.
रांझणीत चारित्र्याच्या संशयावरून महिलेवर कोयत्याने वार,
आरोपी नवरा आणि दिरास अटक.
पंढरपूर (प्रतिनिधी)_
पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथे पतीनेच चारित्र्याच्या संशयावरून
कोयत्याने वार केल्याने महिला गंभीर जखमी झालीआहे,
तिच्या पाठीवर, पोटावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केलें आहे.
रांझणी येथील सुप्रसिध्द महादेव मंदीराच्या पायरीवरच सागर पवार यांनी मारले
सोमवारी (दि.२३) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास रांझणी येथील श्री महादेव मंदिरासमोर घडली. ऊर्मिला सागर पवार (वय ३५, रा. आंबे, ता.पंढरपूर) असे जखमी महिलेचे नांव आहे.
रांजणी येथे ऊर्मिला यांचा दीर भेटला, तेव्हा त्यांच्यात भांडणं झाले, हे समजल्यावरून सागर चिडला होता. राग मनात धरून त्याने ऊर्मिला हिच्यावर कोयत्याने वार केले.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, ऊर्मिला ही आंबे येथील रहिवाशी असून गेल्या कांही दिवसांपासून ती रांझणी येथे राहत होती. या कारणावरून पती सागर पवार हा चिडून होता. दरम्यान, सोमवारी सायंकाळी रांझणी गावात बाज़ार असल्याने परिसरातील ग्रामस्थ, विक्रेते येत होते. यात ऊर्मिला ही श्री महादेव मंदिरासमोर आलेली होती. त्या ठिकाणी पती सागर पवार याने येऊन ऊर्मिला हिच्यावर कोयत्याने
हल्ला चढविला.
या घटनेत ऊर्मिला हिच्या दोन्ही हातांवर, छातीवर, मानेवर वार झाल्याने गंभीर जखमी होऊन ती खाली पडली. यादरम्यान, हल्लेखोर पसार झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. भर बाज़ार दिवशी आणि वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या घटनेमुळे ग्रामस्थ, बाज़ारकरू हादरून गेले. याविषयी माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तालुका पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी घटनास्थळी भेट दिली. ऊर्मिला हिस तातडीनेसोलापूर येथील छत्रपती सर्वोपचार रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. हल्लेखोराच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरा यासंदर्भात गुन्हा दाखल झाला असुन पोलीसांनी दिर आणि नवरा दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस निरिक्षक मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी विश्वास पाटील आधिक तपास करीत आहेत.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment