स्वेरीत डिप्लोमा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ.
डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरूवात स्वेरीच्या डिप्लोमा महाविद्यालयात सदर सुविधा उपलब्ध पंढरपूरः प्रतिनिधी ‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६४३७ ची मान्यता मिळाली असून बुधवार, दि. २९ मे २०२४ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया मंगळवार, दि. २५ जून २०२४ पर्यंत चालणार आहे,’ अशी माहिती डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी दिली. सन २०२४-२५ करीता डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रे, कागदपत्रांची तपासणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा.संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांचे अधिकृत केंद्र (एफ.सी.क्र.-६४३७) म्हणून स्वेरीच्या डिप्लोमा महाविद्यालयास मान्यता दिली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रा...