मानवसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रिद जोपासणारे पंढरपूरचे डॉ. काणे दांपत्य.
मानवसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे पंढरपूरचे काणे डॉक्टर
फक्त पंढरपूरच नाही तर सोलापूर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित नाव म्हणजे डॉ.काणे! त्याचे कारण म्हणजे त्यांची रुग्णसेवेची तब्बल सत्याऐंशी वर्षांची गौरवशाली परंपरा! सध्या तिसरी पिढी वैद्यकीय सेवा बजावत असली तरी चौथी पिढीही हळूहळू याच क्षेत्रात स्थिरावतेय. विशेष म्हणजे या चारही पिढ्यानी 'रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा' हे ब्रीद उराशी बाळगत याच भावनेने वैद्यकीय सेवा केली आहे.
अध्यात्म आणि आरोग्य यांचा संबंध असतो, मानवाचे जसे विचार किंवा आचरण असले त्याप्रमाणे त्याच्या शरीरावर परिणाम होत असतात.
डॉ काणेज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दिनांक 2मे रोजी सायंकाळी सहा वाजता ह भ प चैतन्य महाराज देगुलर कर यांचे आरोग्य आणि अध्यात्म, या विषयावर व्याख्यान डॉ काणेज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नवीन कराड नाका, टाकळी येथे आयोजित करण्यात आले आहे.
मानवतेची सेवा करणारे समर्पित वैदयकीय व्यावसायिक म्हणजे पंढरपुरचे डॉक्टर काणे हे समीकरणच बनले आहे.
कै.डॉ.वामन विष्णु काणे हे पंढरपुरातील पहिले एमबीबीएस डॉक्टर! त्यांनी पंढरपूरात पहिले खाजगी रुग्णालय सुरु केले. पुढे त्यांचेच पुत्र कै.डॉ.श्रीपाद वामन काणे यांनीही पंढरपुरकरांच्या वैदयकीय सेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले. त्यानंतर काणे कुटुंबियांची तिसरी पिढी डॉ.सुरेंद्र आणि डॉ.वर्षा काणे यांनीही पंढरपुरच्या वैदयकीय क्षेत्रांत सेवा बजावताना आपला एक वेगळाच ठसा उमटवला आहे. आता चौथी पिढीही सुध्दा हयाच व्यवसायात नशीब आजमावत आहे.
सर्वोत्तम उपचार पंढरपुरात देणारे डॉ.काणे दांपत्य
डॉ.सुरेंद्र आणि डॉ.वर्षा काणे उच्छशिक्षित जोडप्याने आपल्या ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग आपल्या गावाच्या पंचक्रोशीतील मातीतील माणसांसाठी करण्याचे ठरविले. आपल्या पदव्युत्तर पदवी नंतर सोनोग्राफी, एंडोस्कोपी, लाप्रोस्कोपी, वंद्यत्व उपचार आणि टेस्ट ट्यूब बेबीचे प्रशिक्षण पुणे, मुंबई, चेन्नई, कोची, कोलकत्ता पासून ते अगदी थेट साता समुद्रापलीकडील जर्मनी आणि लंडन पर्यंत जाऊन मिळवले. तेव्हा अशा उपचार पद्धतीची सोय पंढरपुरात नव्हती. अशा वेळी त्यांनी असा विचार केला की, जगातील कोणत्याही माणसांच्या शरिरचनेत जर तसूभरही फरक नाही तर केवळ भौगोलिक फरकामुळे आणि आर्थिक निकशावर आधारित आपल्या मायभूमितील म्हणजे पंढरपुरातील रुग्णांनी सर्वोत्तम उपलब्ध उपचारांपसून वंचित का राहावे? आणि म्हणूनच डॉ.काणे यांनी अपार मेहनत घेतली आणि पंढरपूरात अल्प दरातील पाहिले सोनोग्राफी सेंटर, पहिले एन्डोस्कोपी सेंटर, पहिले व्हिडिडियोलॅप्रोस्कॉपी सेंटर, ऍडव्हान्सड मायक्रोसर्जरी सेंटर अणि पहिले टेस्ट ट्यूब बेबी सेंटर त्यांनी सुरु केले. त्याचबरोबर पहिले एन्डोस्कोपिक युरॉलॉजी सेंटर, पुरुष वंध्यत्वावरील अत्याधुनिक उपचार ॲन्ड्रॉलॉजी सेंटरही डॉ. वर्षा काणे यांनी सुरू केले. यामुळे अनेक रुग्णांची सोय झाली. व्यवसाय स्थिरावल्यावरसुध्दा आपले ज्ञान वैदयकीय क्षेत्रातील प्रगतीबरोबर अपडेट करणे तितकेच महत्वाचे असते याची जाणीव असलेल्या डॉ.काणे दांपत्यानी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात दिल्ली, बंगळुर, पाटणा, अहमदाबाद आणि परदेशातील यूरोप, लंडनपर्यंत जाऊन अनेक स्त्रीरोग व वंध्यत्व अधिवेशनात सहभाग नोंदवला. शोधनिबंध सादर केले. चर्चासत्रात सक्रीय सहभाग घेतला. गायत्री हायटेक हॉस्पितल आणि रिसर्च सेंटरमधील त्यांचे टेस्ट ट्यूब बेबी सेंटर अत्याधुनिक व परिपूर्ण असल्याने भारतातल्या फार थोड्या टेस्ट ट्युब बेबी सेंटरना मिळणारे राष्ट्रिय नामांकन अ क्रेडेशन देखिल डॉ. काणे यांच्या सेंटरला मिळाले आहे.
वंध्यत्वावर मात करत अनेकांना मातृत्व बहाल
वांझ हा शब्द खूप दुःखद अणि वेदनादायी आहे. ज्या स्त्रिच्या किंवा जोडप्याच्या नशिबी अपत्यसुख सहजासहजी मिळत नही त्यांना हे दुःख आभाळाएवढे वाटणे साहजिकच आहे. केवळ हे दोघेच नव्हे तर त्यांच्या सासर माहेरची कुटुंबे सुखी करण्याचे, त्या जोडप्यला 'माय-बाप' होण्याचे परम सुख मिळवून देण्याचे कार्य डॉ.काणे यांच्या सेंटर मध्ये चालू आहे. वंध्यत्वावर आत्यंत साध्या, सोप्या, थोडक्या उपचारांपासून कौन्सिलिंगपासून ते क्लिस्ट, प्रगत उपचारापर्यंत सर्व उपचार इथे उपलब्ध आहेत. ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे त्यांना उपचार दिले जातात. यातून अपत्य न होणाऱ्या अनेक महिलांना डॉ.काणे यांच्यामुळे मातृत्व मिळाले आहे. गेल्या 20 वर्षाच्या रुग्ण सेवेबद्दल अणि इथल्या रुग्णांच्या प्रतिसदाबद्दल, सहकार्यबबद्दल डॉक्टर समाधानी आहेत. त्यांचे टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरु झाले तेव्हा संपुर्ण सातारा, सांगली, विजापूर जिल्ह्यात एकही सेंटर नव्हते. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढिने जसा वारकरी धाव घेतो तसेच अपत्यप्राप्तीच्या आशेने सोलापुर जिल्ह्यातूनच नव्हे तर जिल्ह्याच्या सिमेबाहेरुनही सांगली, सातारा, विजापुर, बागलकोट, गुलबर्गा या कर्नाटक राज्यातूनही कित्येक अपत्यहीन जोडपी पंढरपूरात येऊन आपले सुखनिधान घेऊन आनंदाने परतली आहेत. आपल्या डॉक्टरी व्यवसायाच्या माध्यमांतून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यचे अणि त्यांच्या आयुष्यात आनंद मिळवून देण्याच्या या कार्याबद्दल डॉ.सुरेंद्र आणि डॉ.वर्षा काणे पती-पत्नी कृतार्थ भावना व्यक्त करतात.
सामाजिक कार्यातही काणे डॉक्टरांचे योगदान
डॉ.सुरेंद्र काणे हे पंढरपूर गायनकोलोजिस्टस सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष आहेत. भारत विकास परिषद पंढरपुरचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. डॉ.काणे मेडिकल
असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष आणि असिस्टन्ट गव्हर्नरच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक सामाजिक केली आहेत. डॉ.वर्षा काणे IMA पंढरपूर, वुमन्स विंगच्या संस्थापक अध्यक्षा, मिशन पिंक हेल्थच्या महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी, इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा, महिला मंडळ पंढरपूरच्या सचिवा, सावरकर प्रेमी मंडळ, मतिमंद मूकबधिर विद्यालय, गणेश रुग्ण सेवा मंडळाच्या जेष्ठ सदस्या आहेत. ह्या सर्व संस्थांच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्षे डॉक्टर काणे दांपत्य समाज सेवा अविरत करत आहेत. मोफत जयपूर फूट उपक्रम, गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची Pap smear ने तपासणी, स्तनाच्या कॅन्सर साठी मेमोग्राफ़ी, हाडातील केल्शियमची तपासणी, रक्तातील हीमोग्लोबिनची तपासणी, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर ची तपासणी असे अनेक उपक्रम डॉक्टरांनी मोफत घेतले आहेत. अनेक शाळांमधून मुला-मुलींसाठी वयात येताना होणारे बदल आणि घ्यावयाची काळजी यावर व्याख्यानाद्वारे प्रबोधन करत आहेत. शाळा, महाविद्यालये, अनाथाश्रम, बालकाश्रम, रिमांड होम, वृद्धाश्रम, मतिमंद, मूक बधीर, अंध, अपंग विद्यालयात, एचआयव्ही बाधितांच्या मुलांसाठी कार्यरत असलेल्या पालवी संस्थेत वरील प्रमाणे अनेक सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येतात. समाजसेवी संस्थांच्या गरजेप्रमाणे त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय, सतरंजी, मोठी पातेली, भांडीकुंडी, संगणक, माईक सिस्टम, औषध गोळ्या वाटप केलेल्या आहेत. पंढरपूरात दोन वेळा आलेल्या भीषण पुरात त्यांनी दहा हजारापेक्षा अधिक पुरग्रस्तांना मोफत अन्न आणि वैद्यकीय औषध वाटप केले आहे. याबद्दल तत्कालीन प्रांताधिकारी यांनी डॉ.सुरेंद्र काणे यांचा यथोचित सन्मान देखील केला होता.
ठळक मुद्दे
* डॉ.काणे दांपत्याची 1994 च्या डिसेंबरमध्ये 'गायत्री हायटेक हॉस्पिटल अॅड रिसर्च सेंटर 'च्या माध्यमातून वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात.
* संपुर्ण भारतात हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या सेंटर मधील सुविधा डॉ. काणे यांनी पंढरपूरात आणल्या.
* डॉ.काणे यांच्यामुळे पंढरपुरचे नाव भारताच्या वंध्यत्व उपचाराच्या नकाशात
* चेन्नई येथील अधिवेशनात डॉ.काणे यांना व्यंधत्व या विषयावरील 'नॅशनल फेलोशिप' व अनेक पुरस्कारांनी सन्मानित.
* पंढरपूरात डॉ. काणे यांच्या 'गायत्री हॉस्पिटल'चा यशस्वी रौप्य महोत्सव.
* रुग्णांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पंढरपूरात सुसज्ज शंभर खाटांचे एक मल्टीस्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी अत्यंत अद्ययावत असे हॉस्पिटल त्यानी उभारले आहे.
* नूतन सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मेडिसिन, ऑर्थोपेडीक, नेत्र रोग, ईएनटी,कॅन्सर सर्जरी यासह अतिदक्षता विभाग, आय.सी.यु., डायलीसीस, कॅथलाब, अँजिओग्राफ़ी, अँजीओप्लास्टी, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, टेस्ट ट्यूब सेंटर, एक्स रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय, पँथोलोजी, टूडी ईको, टीएमटी, ईईजीईएमजी, आदीची सोय आहे.गेल्या वर्षभरात अनेक गंभीर रूग्ण दाखल होऊन, यशस्वी उपचार घेऊन समाधानी झाले आहेत.
....
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment