संशोधन कार्यात विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यावश्यक. डॉ सत्यनारायण.
संशोधन कार्यात विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यावश्यक - वैज्ञानिक डॉ.बी. सत्यनारायण स्वेरीमध्ये ‘पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन २०२४’ साजरा पंढरपूर- प्रतिनिधी-‘इस्रोच्या ‘चांद्रयान-३’ या ऐतिहासिक मोहीमेमुळे जगाबरोबरच भारतातील युवा संशोधकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडला आहे. नवअभियंते व विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि स्वप्नांच्या पुर्ततेसाठी परिश्रम घ्यावेत. देशाच्या अंतराळ संशोधनामध्ये योगदान देण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रेरित असणे गरजेचे आहे. एकूणच संशोधन कार्यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेणे व त्यायोगे देशाच्या विकासाला हातभार लावणे अत्यावश्यक आहे.’ असे प्रतिपादन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई येथील प्रख्यात वैज्ञानिक अधिकारी डॉ.बी. सत्यनारायण यांनी केले. आयट्रिपलई, आयआयसी आणि एलाइट फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील ...