Posts

Showing posts from October, 2024

दीपावली निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सुवर्ण अलंकार.

Image
 दीपावली २०२४ निमित्त श्री विठ्ठलास  व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान, पंढरपूर ( प्रतिनिधी) वसुबारस पासून दीपावली महोत्सवास सुरवात झाली आहे. या निमित्त दुपारी पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे वसुबारस पासून ते दिवाळी पाडवा पर्यन्त श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.           श्री विठ्ठलास सोने पगडी, कौस्तुभ मणी, दंडपेठया जोड मोठा, हिऱ्याचे कंगन जोड, शिरपेच लहान, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, मारवाडी पेठांचा मोत्यांचा हार, मत्स्य जोड, तोडे जोड, तुळशीची माळ एक पदरी, बाजीराव कंठी इ. व श्री रुक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवामनी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मी हार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादि अलंकार परिधान करणत्यात आलेले आहेत.             तसेच दिपावलीत वसुबारस, दिवाळी पाडवा, नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुकाराम भव...

अभिजीत पाटील यांनी माढा मतदारसंघातून दाखल केला अर्ज.

Image
 *३० वर्षाच्या अन्यायाविरोधात माढ्यात परिवर्तनाची लाट* (माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत भरला अभिजीत पाटलांनी अर्ज) हजारो लोकांच्या साक्षीने अभिजीत पाटलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज पंढरपूर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून माढा मतदारसंघांमधून अभिजीत पाटील यांनी काल अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदे यांनी गेल्या तीस वर्षात सत्ता असूनही विकास न केल्याने उमेदवारीसाठी पवार साहेबांचे उंबरे झिजवण्याची वेळ आली. मात्र त्यांना तरीही संधी मिळाली नाही. गेल्या तीस वर्षांत सत्ताधारी लोकांनी केलेल्या अन्यायाच्या विरोधात माढ्यात असंतोषाची लाट असून लवकरच माढ्यामध्ये परिवर्तन होणार असल्याचे अभिजीत पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले.त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते -पाटील तसेच माळशिरस मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, बप्पा देशमुख, ज्योतीताई कुलकर्णी, मदन पाटील, भग...

लक्ष्मी टाकळी येथे घरगुती वादातून मित्रानेच केला मित्राचा खून.

Image
 लक्ष्मी टाकळी येथे घरगुती वादातून मित्रानेच केला मित्राचा खून.  पंढरपूर.(प्रतिनिधी)_  पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे घरगुती वादातून मित्रानेच आपल्या मित्राचा चिडून जाऊन चाकूने भोसकून खून केल्याची घटना सोमवार दि २८रोजी घडली. मित्राने जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर दोघात कडाक्याचे भांडणं झाले, यात चाकूने मारहाण करत मित्राचा खून केल्याने उडाली खळबळ याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी मयत सिद्धेश्वर मच्छिंद्र पवार वय ३९ वर्षे राहणार देवकाते मळा टाकळी रोड हा आपला मित्र औदुंबर गाढवे यांच्या घरासमोर  सोमवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास गेला असता त्या ठिकाणी मयत सिद्धेश्वर पवार व आरोपी औदुंबर गाढवे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. यावेळी या बाचाबाची ची घरगुती कारण असल्याने जाब विचारताना भांडणात रूपांतर होऊन आरोपीने पवार वर चाकूने हल्ला केला या हल्यात सिद्धेश्वर पवार हा मयत झाला. या घटनेची माहिती मयताची पत्नी हीने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात देऊन गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सध्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाल्याची माह...

कला साधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने किल्ला स्पर्धेचे आयोजन.

Image
 कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने  दीपावली निमित्त किल्ला स्पर्धांचे आयोजन. पंढरपूर(प्रतिनिधी ) गेली सतरा वर्षे पंढरीत कार्यरत असणाऱ्या कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने यावर्षी  छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व इतिहासाचा प्रसार व प्रचार व्हावा या विचारातून भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.           सदर स्पर्धा  शालेय व खुल्या अशा दोन गटात घेतल्या जाणार आहेत. रोख रक्कम, संस्थेचे मानचिन्ह, सहभाग प्रमाण पत्र असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. सदर स्पर्धेच्या प्रवेशपत्रिकेसाठी महाजन फूड्स, ९८३४४४४६११,अरिहंत ऑप्टीशियन्स-९४२२६४७६०४ ज्ञानेश्वर मोरे, गोपाळपूर -९०११५७७६७७ राजकुमार आटकळे,- भक्ती मार्ग- ९४२२३८०७१७,राजेंद्र माळी, गणेश नगर-९८२२८७८१७१ अक्षय बडवे, पांडुरंग भवन-८३०८०६१११, महेश देशपांडे सर सिंहगड इंजि. कॉलेज कोर्टी-९५५ २५१०९३३, अमरसिंह चव्हाण, क्रांतीसिंह नाना पाटील चौक - ९८२२३६९२९२रणजीत पवार समता नगर-  ९६८९७८९६२१, अभिराज बडवे, बडवे गल्ली मंडई परिसर ९०२८७२११११, राजकुमार शहा नवी पेठ - ९४२२४४६५५०,प्रा. राजेंद्र मोरे केबीपी...

पंढरीत भा ज पा ने बस स्थानकावर साधला महिलांशी सुसंवाद.

Image
 पंढरीत बसस्थानकावर भा ज पा पदाधिकाऱ्यांनी साधला महिलांशी सुसंवाद.  पंढरपूर(प्रतिनिधी )_ पंढरपूर येथील भा ज पा  पक्षाच्या वतीने पंढरपूर एसटी स्टँड या ठिकाणी जिल्हा कार्यकारणी व शहर कार्यकारणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने महिलांशी अर्ध्या तिकीटा च्या योजने संदर्भात विचार विनिमय केला . आणि त्यांच्याकडून महायुतीच्या कामाच्या संदर्भात समाधानी आहे का नाही हा विचार विनिमय केला त्यावेळी महिला ह्या अतिशय खुश आहेत अर्ध्या तिकिटामुळे अनेक महिलांना आज त्यांच्या इच्छित स्थळी वेगाने जाता येते असा आनंद त्यांनी व्यक्त केला आणि महायुती सरकारला निवडून देण्याचे आश्वासन दिले या वेळी जिल्हाध्यक्ष डॉ प्राजक्ता गोपाळ बेणारे शहराध्यक्ष ज्योती शेटे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष सुवर्ण  कुरणावळ भारतीय बचत पार्टी महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष भाग्यश्री काकडे जिल्हाचिटणीस अंजना जाधव यांनी प्रवाशांशी संवाद साधला. संपादक. चैतन्य उत्पात.

समाधान आवताडे साधेपणाने विधानसभा निवडणुक अर्ज दाखल करणार.

Image
 भाजपा-महायुतीचे उमेदवार आ. समाधान आवताडे आज दि.२८ भरणार उमेदवारी अर्ज  पंढरपूर  (प्रतिनिधी-) भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार समाधान महादेव आवताडे हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज आज दुपारी १.३०वाजता युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक तसेच मोजक्या ज्येष्ठ सहकाऱ्यांसमवेत भरणार असल्याची माहिती जनसंपर्क कार्यालय यांच्याकडून देण्यात आली आहे. विद्यमान आ समाधान आवताडे यांचे सासरे बाळासाहेब श्रीहरी नाडे यांचे परवा निधन झाल्याने आ आवताडे यांचा कोणत्याही प्रकारे शक्तीप्रदर्शन अथवा रॅली न करता साध्या पद्धतीने अर्ज भरण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आ आवताडे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक विकास कामे मार्गी लागल्याने भारतीय जनता पार्टी व महायुतीने त्यांना या मतदारसंघात दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे नियोजित निवडणूकी साठी ते आपला उमेदवारी अर्ज पंढरपूर येथे संबंधित निवडणूक अधिकारी यांचेकडे सादर करणार आहेत. त्यामुळे भाजपा व महायुतीच्या सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात तसेच गावात मतदारांशी संपर्क ठेवून आ आवताड...

पंढरपूर मतदार संघात निवडणुकीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण.

Image
 पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण         पंढरपूर (दि.27):-   252 पंढरपूर विधानसभा मतदार संघात  निवडणुकीसाठी  नियुक्त अधिकारी, कर्मचारी  यांना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती  252 पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी  दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने दाते मंगल कार्यालय, पंढरपूर व लोटस  इग्लिश मिडीयम स्कुल, पंढरपूर येथे निवडणुक नियुक्त  1 हजार 185  अधिकारी कर्मचारी यांना  प्रथम  प्रशिक्षण देण्यात आले. नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दृकश्राव्य पद्धतीने चलत चित्रफितीद्वारे माहिती देण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी मार्गदर्शन केले  निवडणूक प्रक्रिया पार पाडताना कोणतीही चूक होऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक आयोगाने...

पंढरपूर येथे दीड लाख रुपये किमतीची अवैध गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त.

Image
 पंढरपूर येथे दीड लाख रुपये किमतीची अवैध गोवा बनावटीची  विदेशी दारू जप्त. ऐन निवडणूक काळात  प्रकार उघडकीस आल्याने  शहरात खळबळ.  पंढरपूर(प्रतिनिधी )_पंढरपूर येथे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना इसबावी येथे एक लाख ४९हजार रूपये किंमत असलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या बाटल्या सापडल्याने हा सर्व साठा शहर पोलीसांनी जप्त केला आहे. अवैध  व्यवसायांवर मोठया प्रमाणात कारवाई करण्याचे आदेशान्वये सहा पोलीस उप अधीक्षक डॉ अर्जुन भोसले, , वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके  यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर कारवाई कऱण्यात आली. लखन मुकेश अभंगराव रा. सहयाद्री नगर इसबावी, पंढरपुर,  याचे घराचे खोली मध्ये विदेशी बनावटीची फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी उपलब्ध असलेला दारू साठा आढळुन आला. हा अवैध मद्य साठा विक्री  करण्याचे तयारीत तो  असल्याबाबत माहीती मिळाले नंतर  लखन मुकेश अभंगराव रा. सहयाद्री नगर इसबावी, पंढरपुर,  याचे घराचे खोली मध्ये जावुन पाहीले असता अमोल करकंबकर रा. जुनी पेठ, पंढरपुर  यांच्या  कडील मद्यसाठा  दिसुन...

चोरीला गेलेली बोलेरो जीप चोवीस तासात शोधून मालकाच्या ताब्यात.

Image
 नदी घाटावरून चोरी झालेली बोलेरो जीप २४तासात शोधली.  पंढरपूर(प्रतिनिधी)_ तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये ग्रामीण भागातून तसेच इतर ठिकाणाहून दहाव्याचा विधी करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या बोलेरो वाहनाची चोरी  झाली, याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहिती मिळवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासात वाहनासह आरोपीला ताब्यात घेतले. सदरचा आरोपी हा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील असून त्यांच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी पंढरपुर शहर पोलीस ठाणेस दिनांक २३ ऑक्टोबर रोजी फिर्यादी कीसन विठ्ठल गायकवाड वय-४१ वर्ष, व्यवसाय शेती, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणेस येवून फिर्याद दिली की फिर्यादी हे त्यांचे कुटूंबासह नातेवाईकांच्या १०व्याचे विधी करीता त्यांची बोलेरो गाडी नंबर एम एच ४५ ए ८१११ ही दिनांक - २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वा ते सकाळी ८.०० वा दरम्यान पंढरपुर येथील दत्त घाट जवळील दत्त मंदीरासमोरील बोळात लॉक करून लावलेली होती. व ते दहाव्याचा विधी ...

विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही.

Image
 पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी ४१ नामनिर्देशन पत्राची विक्री विधानसभा निवडणुकीसाठी अधिसुचना जारी: २९ ऑक्टोबरपर्यंत स्वीकारले जाणार अर्ज.        पंढरपूर(प्रतिनिधी )_ पंढरपूर विधानसभा निवडणुकीची अधिसूचना मंगळवार दि. २२ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. तर नामनिर्देशन पत्र विक्री व स्विकृती देखील सुरु करण्यात आलेली आहे. २५२ पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी मंगळवार दिनांक  दि.२२ ऑक्टोबर २०२४ रोजी २९ जणांनी ४१  नामनिर्देशनपत्र पत्र खरेदी केले असून, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.                 महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना मंगळवार (दि.२२) जारी करण्यात आली आहे. या दिवसापासूनच  मतदारसंघांत उमेदवारी अर्ज विक्री करण्यात येत असून अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. उम...

नटराज भरतनाट्य क्लासेस तर्फे जास्तीत जास्त शास्त्रीय नृत्यांगना होवोत,_प्रा. कैलाश करांडे.

Image
 सौ. लक्ष्मी बडवे संचलीत नटराज भरतनाट्यम क्लासेसच्या वतीने  जास्तीतजास्त शास्त्रीय नृत्यांगना घडाव्यात! ..... डॉ. कैलाश करांडे  पंढरपूर (प्रतिनिधी)-      यावर्षी नवरात्रीचे औचित्य साधून प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सहकार्याने, सौ. लक्ष्मीताई बडवे यांच्या वतीने नृत्य आराधना हा शास्त्रीय नृत्य कलाविष्कार तुकाराम भवन येथे संपन्न झाला.            सुरुवातीला पंढरीतील नामवंत सिंहगड इंजिनियरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे,  निवेदिका सौ.  अर्चना पुजारी मॅडम, विठ्ठल रुक्मिणी समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब,व्यवस्थापक मनोज श्रोत्री,  अभिनेते व कलासाधना सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत महाजन बडवे व नटराज भरतनाट्य क्लासेसच्या संस्थापिका सौ. लक्ष्मीताई बडवे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.         यावेळी डॉ. करांडे बोलत होते. गेली दोन दशके पंढरीस अविरतपणे सुरु असलेल्या नटराज भरतनाट्यम या संस्थेने विशारद, अलंकार य...

भा ज पा महीला आघाडी मोर्चा जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे यांना मातृशोक.

Image
 भा ज पा जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे यांना मातृशोक.  पंढरपूर , प्रतिनिधी - पंढरपूर येथील भा ज पा महीला आघाडी मोर्चा जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे यांच्या मातोश्री श्रीमती पुष्पा गोपाळराव बेणारे यांचे गुरुवार दिनांक 10ऑक्टोबर रोजी सकाळी साडे आठ वाजता वार्धक्याने निधन झाले, त्यांचे वय 72होते, श्रीमती पुष्पा बेणारे या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या,  मायाळू स्वभावाच्या होत्या, संत साहित्याचा मोठा अभ्यास त्यांचा होता, संत साहित्यावर दिवंगत डॉ गोपाळराव बेणारे यांनी अनेक पुस्तके लिहिली, संत साहित्यावर लिखाण केले, यात पुष्पाताई बेणारे यांनी खूप मोलाची मदत केली,  पतीच्या अकाली निधनानंतर अचानक कोसळलेल्या संकटावर मात करून त्यांनी कुणाचीही साथ नसताना संसाराचा गाडा पुढे नेला, एकुलत्या एक मुलीला डॉ केले, अनेक कठीण प्रसंगात मोलाची साथ देऊन खंबीर भूमिका घेतली, श्रीमती पुष्पा बेणारे या उत्तम गृहिणी , सुगरण होत्या, पै पाहूणे, डॉ प्राजक्ता यांचे सर्व मित्र मैत्रीणीना उत्तमोत्तम चविष्ट, पौष्टिक पदार्थ खाऊ  घालत, षडरीपुपसून दूर राहून एखाद्या संतासारखे निष्पृह , निस्वार्थ जीवन ...

पंढरीत भक्तनिवास नावाने बोगस बुकिंग घेणाऱ्यावर गून्हा दाखल.

Image
 श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाच्या नावे बोगस बुकिंग घेणाऱ्यावर तक्रार दाखल... कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके. पंढरपूर ( प्रतिनिधी) श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाच्या नावे खोल्या बुकींग करून भाविकांची आर्थीक फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीची तक्रार पंढरपूर शहर पोलिस ठाणे येथे दाखल करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सर्व्हे नं ५९ येथे श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास आहे. या भक्त निवासामध्ये खोली बुकींग साठी https://yatradham.org या संकेतस्थळावरून ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. तसेच ऑफलाईन पध्दतीने काऊंटर बुकींग सुविधा देखील आहे. तथापि, श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाचे नावाने https://shrivitthalrukminibhaktaniwas.in/ असे बोगस (फेक) संकेतस्थळ (वेबसाईट) तयार करून त्यावरील मो.९०४५०३३७१९ वरून खोल्या बुकींग केल्या जातात असे सांगुन भाविकांचे पैसे स्विकारले आहेत. तसेच त्यांना त्याची पावती दिली गेली आहे, दि.०६ ऑक्टोबर पासुन अशा भाविकांनी भक्तनिवास येथील दुरध्वनी वर संपर्क केला असता, सदर बाब निदर्शनास आली आहे. तसेच काह...

कार आणि ट्रक धडकेत दोघे ठार, तीन जखमी.

Image
 *कार-ट्रकच्या धडकेत दोघे ठार* तुळजाभवानीचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला    तिघे जखमी, मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील  सांगोला (प्रतिनिधि) तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना भाविकांच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या कारची पाठीमागून माल ट्रकला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात  दोघेजण जागीच ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना  सोमवार दि.७ ऑक्टोंबर रोजी पहाटे ४ वा.च्या सुमारास सोलापूर - सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास जवळ ता. सांगोला येथे घडला. अपघातातील मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. सुखदेव बामणे वय ४० व नैनेश कोरे वय ३१ दोघेही रा. नांदणी जि. कोल्हापूर अशी मृतांची नावे आहेत तर अनिल शिवानंद कोरे  वय ४२,रा.नांदणी ,सुधीर चौगुले वय ३५ रा.वडगाव ,सुरज विभुते वय २१ रा.कोठली हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून , त्यांच्यावर सांगोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर महामार्ग पोलीस पथक व   सांगोला पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी , कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघात स्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त कार रोड वरुन बाजू...

दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी पुन्हा एकदा समाधान आवताडे यांना निवडून द्या._ उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
 *दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी पुन्हा एकदा अवताडे यांना आशीर्वाद द्या- देवेंद्र फडणवीस* मंगळवेढा/प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाने पोटनिवडणुकीमध्ये माझ्या शब्दाला मान देऊन समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठवलं मी मतदार संघाला दिलेल्या शब्दाप्रमाणे  सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला आणि मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला निधीही दिला मी जे बोलतो ते करतोच समाधान आवताडे यांनी मोठ्या प्रमाणात या मतदारसंघाला निधी मंजूर करून घेतला आहे हा विकासाचा रथ यापुढे असाच सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा समाधान आवताडे यांच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन राज्याची उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंधळगाव येथे बोलताना केले ते मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते या उद्घाटन प्रसंगी पंढरपूर एमआयडीसी, कर्जाळ कात्राळ ते नॅशनल हायवे रस्ता व तामदर्डी बंधारा या कामाचे उद्घाटन डिजिटल प्रणाली द्वारे करण्यात आले.                यावेळी व्यासपीठावर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन ...

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्या वतीने नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी.

Image
 मंदिर समितीच्या वतीने नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी         -व्यवस्थापक मनोज श्रोत्री. पंढरपूर (प्रतिनीधी) प्रतिवर्षीप्रमाणे दि. 03 ते 18 ऑक्टोंबर या कालावधीत नवरात्र उत्सव संपन्न होत असून, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवतांच्या मंदिरात आवश्यक ते नियोजन करून तसेच सर्व प्रथा व परंपरांचे  पालन करुन  श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.  मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाची तयारी केली असून,  त्या अनुषंगाने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील स्वच्छता, दर्शनरांग सुलभ व द्रुतगतीने चालविण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती व इतर आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सव कालावधीत सभामंडप येथे भजन, किर्तन, गोंधळ, पंचसुक्त पवमान अभिषेक, रूक्मिणी स्वयंवर कथा, रूक्मिणी स्वंयंवर सामुदायिक ग्रंथ पारायण व महिला भजनी मंडळाची भजने संपन्न होणार  असल्याचे व्यवस्थापक श्री श्रोत्री यांनी स...