आषाढी वारी अनुषंगाने पालखी प्रमुखांच्या सर्व सुचनांचे पालन करण्यात येणार._जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद.
आषाढी वारीच्या अनुषंगाने पालखी सोहळा प्रमुखांच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी वारीपूर्वी करण्यात येणार - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद *सर्व संबंधित यंत्रणांनी पालखी तळांवर मुरुमाचे साठे, रोलर व जेसीबीची व्यवस्था करून ठेवावी पंढरपूर, दि. 26: - आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी होणार असून, आषाढी यात्रा सोहळ्याच्या अनुषंगाने यापुर्वी पालखी मार्ग, तळ व रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पालखी सोहळा प्रमुखांकडून काही मागण्या व सूचना करण्यात आलेल्या होत्या, त्या सूचनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांकडून काही पालखी मार्ग व तळासंबंधी नव...