अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई, १७होड्या नष्ट, १ट्रॅक्टर जप्त.
अवैध वाळू वाहतुकीवर महसूल व पोलीस प्रशासनाची कारवाई १७ होड्या नष्ट , एक ट्रॅक्टर जप्त पंढरपूर (प्रतिनिधी) _ अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाव्दारे तसेच पंढरपूर पोलीस यांनी संयुक्तपणे पंढरपूर येथील भीमा नदीपात्रात वाळू चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या १७ लाकडी होड्या कटरच्या साह्याने नष्ट केल्या तर अवैध वाळू उत्खनन करण्यासाठी वापरण्यात ट्रॅक्टर यारीसह जप्त करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली. पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इतापे व तहसिलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी पंढरपूर येथील भीमा नदी पात्...