Posts

Showing posts from October, 2025

पंढरपूर येथे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कपीजी की रसोई, या हॉटेल चे उद्घाटन.

Image
 पंढरपूर येथे  दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कपीजी की रसोई या हॉटेल चे उद्घाटन.  पंढरपूर (प्रतिनिधी )_भारताची दक्षिण काशी पंढरपूर येथे कपिजी की रसोई या नवीन हॉटेल रेस्टॉरंट चे उद्घाटन पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सद्गुरू वेणाभारती, कृष्णामयी, पांडुरंग कृष्णाजी बडवे, हभप मदन महाराज हरिदास, कीर्तनकार मनोहर उर्फ छबुकाका उत्पात , रा. पा कटेकर  आदी मान्यवर उपस्थित होते. आ. आवताडे म्हणाले, भाविकांच्या सोयीसुविधेसाठी अतिशय सात्विक, रुचकर आणि आरोग्यदायी पदार्थ असणे ही काळाची गरज होती, ही बाब कपिजी की रसोई या हॉटेल रेस्टॉरंट ने परिपूर्ण केली आहे. येथील सर्व पदार्थ स्वादिष्ट आणि आरोग्यदायी आहेत. आ प्रशांत परिचारक यांनी या आगळ्यावेगळ्या कार्याला शुभेच्छा दिल्या.पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांची उत्तम सोय होत असल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. सद्गुरू वेणाभारती यांनी सांगितले पंढरपूर येथे हे कार्य सुरू केले आहे या कार्याला विश्व विधाता साक्षात श्री विठ्ठल रुक्मिणी यांचा आशीर्वाद लाभला आहे क...

दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नाशिक येथील सुप्रसिद्ध कपिजी की रसोई, या हॉटेल रेस्टॉरंट चे उद्घाटन.

Image
 दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नाशिक येथील सुप्रसिद्ध कपिकुल हॉटेल रेस्टॉरंट चे उद्घाटन.   पंढरपूर(प्रतिनिधी )_प्रभू श्रीराम यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या नाशिक येथील सुप्रसिद्ध कपिजी की रसोई, हे हॉटेल कम रेस्टॉरंट, कपिकुल शॉपी चे भव्य उद्घाटन दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बुधवार दि २२ऑक्टोबर रोजी  सायंकाळी पाच वाजता श्री कपिकुल सिद्धपीठमचे पीठाधीश्वर श्री महंत सद्गुरू वेणाभारती यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख पाहुणे आ. समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, ह भ प मदन महाराज हरिदास, पांडुरंग कृ बडवे, मनोहर उर्फ छबुकाका उत्पात यांच्या हस्ते चौफाळा येथील राजनरेंद्र बडवे कॉम्प्लेक्स , इंदिरा गांधी भाजी मार्केट समोर येथे होणार आहे. कपिकुल सिद्धपीठमचे साधक यांनी बनविलेले शुद्ध, सात्विक व आरोग्यदायी, चविष्ट पदार्थ या हॉटेल कम रसोई मध्ये उपलब्ध होणार आहेत अशी माहिती श्रीकृष्णमयी यांनी दिली. वेगळ्या चवीचा चहा,बनमस्का, ग्रील सँडविच,पावभाजी, मिल्कशेक कॉम्बो, नाशिक येथील सुप्रसिद्ध मिसळ, आमरस पुरी,वडापाव, सर्वरोग प्रतिकारक, उष्णता कमी करणारे आरोग्यदायी पेय सुवर्ण...

दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नाशिक येथील सुप्रसिद्ध कपिजी की रसोई या हॉटेल, रेस्टॉरंट चे उद्घाटन.

Image
 दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नाशिक येथील सुप्रसिद्ध कपिकुल हॉटेल रेस्टॉरंट चे उद्घाटन. पंढरपूर ( प्रतिनिधी)प्रभू श्रीराम यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या नाशिक येथील सुप्रसिद्ध कपिजी की रसोई, हे हॉटेल कम रेस्टॉरंट, कपिकुल शॉपी चे भव्य उद्घाटन दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बुधवार दि २२ऑक्टोबर रोजी श्री कपिकुल सिद्धपीठमचे उत्तराधिकारी श्री महंत सद्गुरू वेणाभारती यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख पाहुणे आ. समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, ह भ प मदन महाराज हरिदास, पांडुरंग कृ बडवे, मनोहर उर्फ छबुकाका उत्पात यांच्या हस्ते चौफाळा येथील राजनरेंद्र बडवे कॉम्प्लेक्स , इंदिरा गांधी भाजी मार्केट समोर येथे संपन्न होणार आहे. कपिकुल सिद्धपीठमचे साधक यांनी बनविलेले शुद्ध, सात्विक व आरोग्यदायी, चविष्ट पदार्थ या हॉटेल कम रसोई मध्ये उपलब्ध होणार आहेत अशी माहिती श्रीकृष्णमयी यांनी दिली. वेगळ्या चवीचा चहा,बनमस्का, ग्रील सँडविच,पावभाजी, मिल्कशेक कॉम्बो, नाशिक येथील सुप्रसिद्ध मिसळ, आमरस पुरी,वडापाव, सर्वरोग प्रतिकारक, उष्णता कमी करणारे आरोग्यदायी पेय सुवर्णरस, सीतकल्प प्रोटीन शेक...

पंढरीतील रेडीमेड फराळ साता समुद्रापार,

Image
 पंढरीतील तयार दिवाळी फराळला विदेशातून मागणी, ट्रम्प टेरिफ मुळे अमेरिकेत फराळ पाठविणे अशक्य. चैतन्य उत्पात पंढरपूर भारतीय लोकांसाठी दीपावली सण म्हणजे आनंदाचा, दिव्यांचा तेजोमय सण, पण दिवाळी सर्वांच्या कायम लक्षात राहते. ती खुसखुशीत गोडधोड फराळ आणि नानाविध मिष्टान्न यामुळेच. पंढरीत तयार होणाऱ्या फराळाला वेगळी, विशिष्ठ चव असल्याने विदेशात असणारे भारतीयही तयार फराळाला पसंती देत आहेत. फराळामध्ये गत वर्षापेक्षा यंदा २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पूर्वीसारखा साग्र संगीत फराळ आता बनत नाही. कारण महिलावर्ग, गृहिणीकडे तेवढा वेळ नाही. पुणे-मुंबई सारखाच दिवाळी फराळ विकत घेण्याचा ट्रेण्ड आता पंढरपूर शहरातही रुजत आहे. गावातील अनेक महिला, बचतगटातील महिला सदस्य दिवाळी फराळ तयार करून व्यवसाय करीत आहेत. पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे वर्षभर केटरिंग व्यवसाय उत्तम सुरू असतो. कॅटरिंग व्यवसायातील आचारी दिवाळीत मोठ्या प्रमाणात पदार्थ तयार करून व्यवसाय करीत आहेत. यामुळे गरीब, गरजू महिला, कर्मचारी यांनाही ऐन सणासुदीत चांगली कमाई होत आहे. पंढरीतील दिवाळीचा फराळ आता सातासमुद्रापार गेला असून , इंग्लं...

कॉरिडॉर हा मंदिर परिसरातील स्थानिक लोकांवर तिसरा आघात असून तो रद्द झाला नाही तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही._ ह भ प वडगावकर महाराज

Image
 कॉरिडॉर हा मंदिर परिसरातील लोकांवर तिसरा आघात आहे, तो रद्द झाला नाही तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, _वडगावकर महाराज. पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर येथील संभाव्य कॉरिडॉर करण्याआधी राज्यकर्त्यांनी मंदिर परिसरातील संभाव्य बाधितांशी चर्चा केली पाहिजे, या भागातील स्थानिक लोकांवर हा तिसरा आघात असून आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन  तीर्थक्षेत्र बचाव कृती समिती आयोजित सभेत शिवतीर्थ येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष वडगावकर महाराज यांनी केले, यावेळी व्यासपीठावर शंकर महाराज गलगलकर, अध्यक्ष वडगावकर महाराज, कृती समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर, डॉ प्राजक्ता बेणारे, व्यंकटेश गलगलकर, अँड आशुतोष बडवे, रामकृष्ण महाराज वीर, अरविंद बेनारे , आदित्य फत्तेपूरकर, शिरवळकर महाराज, आदी मान्यवर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले अगोदर मास्टर प्लॅन केला, त्यानंतर टेंपल ऍक्ट आणून बडवे उत्पात, सेवाधारी यांची देवळातील सेवा काढून घेतली मंदिराचे सरकारी करण केले आणि आता घरेदारे उध्वस्त करण्यात येत आहेत. आणि अजून पुढे भविष्यात प्राधिकरणाचा धोका आहे, कॉरिडॉर चे पाच टप्पे असून मंदिर परिसरातील स्थानि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीपूर येथे कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण संपन्न.

Image
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण गाळपाचा शुभारंभ. पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात सीबीजी उत्पादन प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू - मुख्यमंत्री पंढरपूर (प्रतिनिधी)कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सीबीजी प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न करावा. केंद्र सरकार देशातील १५ साखर कारखान्यांना यासाठी मदत करणार असून त्यात या कारखान्याचा समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर (ता. माळशिरस) येथे सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, कारखान्याच्या १० हजार टन विस्तारीकरण गाळप, पोटॅश निर्मिती प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रशांत परिचारक आदी उप...

कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये, वाचन प्रेरणा दीन, उत्साहात संपन्न.

Image
 कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये "वाचन प्रेरणा दिन" उत्साहात संपन्न. पंढरपूर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांसाठी विविध पुस्तकांचे व ग्रंथांचे प्रदर्शन. प्रतिनिधी पंढरपूर   श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे येथे भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये विविध पुस्तकांचे व ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.  यावेळी प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध पुस्तके वाचनासाठी प्रोत्साहित केले. तसेच वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञानसंपन्न व माहितीसमृद्ध समाजाची घडण, व्यक्तिमत्त्व विकास, साहित्य विकास आणि भाषाविकास यांसाठी वाचन संस्कृतीचा विस्तार आणि विकास करणे अत्यावश्यक आहे असे सांगून त्यांनी  दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या आणि ठाम आत्मविश्वास असणाऱ्या डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू विद्यार्थ्या...

स्वेरीमध्ये स्मार्ट इंडिया हॅकेथॉन, स्पर्धा यशस्वीपणे संपन्न.

Image
                                                                                         विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रगल्भ विचार मांडणे गरजेचे                                                                           -डायरेक्टर सुरज शर्मा स्वेरीमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२५’ ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न  पंढरपूर – (प्रतिनिधी )‘शैक्षणिक प्रणाली आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील अंतर कमी करणे, विचार आणि कल्पना यांना प्रत्यक्ष साकार करण्याची संधी मिळवणे हेच या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे प्रमुख उद्दीष्ट आहे. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान घेणे पुरेसे नाही तर त्यांन...

कला साधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन.

Image
  कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने  दीपावली निमित्त किल्ला स्पर्धांचे आयोजन! पंढरपूर (प्रतिनिधी) गेली आठरा वर्षे पंढरीत कार्यरत असणाऱ्या कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने यावर्षी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व इतिहासाचा प्रसार व प्रचार व्हावा या उदात्त हेतूने भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.           सदर स्पर्धा शालेय व खुल्या अशा दोन गटात घेतल्या जाणार आहेत. शालेय गट इयत्ता पहिली ते दहावी असा असून दुसरा गट इयत्ता ११वीते पुढे असा राहील. दोन्ही गटात प्रथम क्रमांकास रोख रुपये ३००० +, संस्थेचे मानचिन्ह, दुस-या क्रमांकास रुपये २०००+संस्थेचे मानचिन्ह, तिसऱ्या क्रमांकास १०००रुपये + संस्थेचे मानचिन्ह व प्रत्येक सहभागींना सहभागी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. दि २० ते २३ पर्यंत सदर स्पर्धा संपन्न होणार आहे.       तरी ज्यांना ज्यांना स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी    https://forms.gle/gx1YDTTq7tA988Te9   ही लिंक ओपन करुन किंवा हा    क्यूआर कोड स्कॅन करुन ऑनलाईन फॉर्म भरावे. सदर कार्यक्रम यशस...

कला साधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन.

Image
 पंढरपूर (प्रतिनिधी) कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने  दीपावली निमित्त किल्ला स्पर्धांचे आयोजन! गेली आठरा वर्षे पंढरीत कार्यरत असणाऱ्या कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने यावर्षी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व इतिहासाचा प्रसार व प्रचार व्हावा या उदात्त हेतूने भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.           सदर स्पर्धा शालेय व खुल्या अशा दोन गटात घेतल्या जाणार आहेत. शालेय गट इयत्ता पहिली ते दहावी असा असून दुसरा गट इयत्ता ११वीते पुढे असा राहील. दोन्ही गटात प्रथम क्रमांकास रोख रुपये ३००० +, संस्थेचे मानचिन्ह, दुस-या क्रमांकास रुपये २०००+संस्थेचे मानचिन्ह, तिसऱ्या क्रमांकास १०००रुपये + संस्थेचे मानचिन्ह व प्रत्येक सहभागींना सहभागी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. दि २० ते २३ पर्यंत सदर स्पर्धा संपन्न होणार आहे.       तरी ज्यांना ज्यांना स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी    https://forms.gle/gx1YDTTq7tA988Te9   ही लिंक ओपन करुन किंवा हा    क्यूआर कोड स्कॅन करुन ऑनलाईन फॉर्म भरावे. सदर कार्यक्रम यशस्...

कर्मयोगी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीपूर येथे होणार.

Image
 श्रीपूर येथील श्री पांडुरंग साखर कारखाना येथे कर्मयोगी  सुधाकर पंत परिचारक यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते तसेच सहकार क्षेत्रातील डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या बुधवार दि.१५रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे.  श्रीपुर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना या ठिकाणी स्वर्गीय कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण होणार असून सर्व शेतकरी, सभासद कार्यकर्ते तसेच स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक प्रेमी हे उपस्थित राहणार आहेत. सोलापूर जिल्ह्याला तसेच महाराष्ट्राला लाभलेले विठुरायाच्या नगरीतील संत म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी शेतकरी कष्टकरी तसेच कामगार यांच्या कल्याणासाठी व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपले कार्य केले. कित्येक कुटुंबाचे कल्याण केले. आर्थिक डबघाईला आलेले साखर कारखाने आर्थिक सं...

भीमक तनया.

Image
 *भीमक तनया*  *रुक्मिणीच्या दारी* *हळदीकुंकवाचा सडा* *परिमळ दरवळतो* *भिजला माझा चुडा* रूक्मिणी मातेच्या दारी सडा टाकताना आपोआप या ओळी स्फुरल्या!!  आईसाहेब रूक्मिणी माता आमची कुलदेवता! आमच्या उत्पात घराण्यात तिचे पूजन अर्चन करणे हा  आमचा कुळधर्म कुळाचार आहे. नित्य तिची सेवा करणे हे आमचे निधान आहे. तरीही नवरात्र महोत्सवात तिची विशेष पद्धतीने अर्चना आम्ही करतो. त्यासाठी प्रत्येकांनी अश्विन शुद्ध प्रतिपदा ते कोजागरी पौर्णिमा असे दिवस निवडून घेतले आहेत. आमच्या कडे अश्विन शुद्ध त्रयोदशी हा दिवस आला आहे.. त्यादिवशी रूक्मिणी मातेचे सर्व उपचार आम्ही करतो. सुरूवात होते ती सडा टाकण्या पासून!! तिच्या अंगणात हळदीकुंकवाचा सडा टाकतात. चांदीच्या सुबक घंगाळात हळदीकुंकू पाण्यात कालवून चांदीच्या तांब्याने सडा टाकताना एक वेगळीच अनुभूती मिळते. नंतर तिची महापूजा. महापूजेच्यावेळी पंचामृतात तिचं खुलून दिसणारं स्वयंभू रूप पाहून मनात आनंदाच्या उर्मी दाटून येतात. तिचं लोभस रूप डोळ्यात साठवताना काय करू आणि काय नको असं होऊन जातं. मग तिची अष्टके, ध्यान, श्रीसूक्त पठण करताना अष्ट सात्विक भाव दाटून...

कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये, मेंटल हेल्थ अँड सुसाइड प्रिव्हेन्शन"या विषयावर व्याख्यान.

Image
 कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये "मेंटल हेल्थ अँड सुसाईड प्रिव्हेन्शन" वर व्याख्यान संपन्न.  आपल्या मन:स्वास्थ्याविषयी सजग राहा - लायन डॉ. शेरॉन भोपटकर, लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम चा पुढाकार.  पंढरपूर (प्रतिनिधी)  श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे येथे दिनांक ८ ऑक्टोबर रोजी "मेंटल हेल्थ अँड सुसाईड प्रिव्हेन्शन " या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. पंढरपूर येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ लायन डॉक्टर शेरॉन भोपटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील हे अध्यक्षस्थानी होते.   ०४ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर मेंटल हेल्थ अँड वेल बिइंगया मेंटल हेल्थ सप्ताहा अंतर्गत  लायन्स इंटरनॅशनल क्लब पंढरपूर ड्रीम यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य, आत्महत्येची कारणे व आत्महत्या रोखण्यासाठीचे उपाय या विषयावर लायन डॉक्टर शेरॉन यांनी विशेष मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या मागे अनेक कारणे आहेत.  मनाचे अस्वास्थ्य, स्वभाव दोष, व्यसनाधीनता, नातेसंबंधातील तणाव, मोबाई...

भारत विकास परिषदेच्या वतीने माढा व मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत.

Image
 भारत विकास परिषदेच्या वतीने माढा आणि मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू वस्त्रे यांची मदत, चारशे वाड्या वस्तीवर पोहोचली मदत. पंढरपूर (प्रतिनिधी) सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच भरीव योगदान असलेल्या भारत विकास परिषद पंढरपूर या संस्थेच्या वतीने मोहोळ आणि माढा तालुक्यात पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू, वस्त्रे, तसेच ईतर जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्या. *"हरवली वाट दिशा अंधारल्या दाही.…. ववाळुनी उधळतो जीव मायबापा…...... वनवा ह्यो उरी पेटला.... खेळ मांडला..."* --- या "गुरू ठाकुरांच्या" ओळी परवा अनुभवायला मिळाल्या.  प्रसंग आपतग्रस्तानपर्यंत मदत पोहोचविण्याचा होता. मोहोळ तालुक्यातील एका छोट्याशा वस्तीवर ज्याच्यापुढं सीना-भोगावतीच्या प्रचंड पुरामुळे वस्त्या वाहून गेल्या होत्या... पुढच्या गावाला जायचा रस्ताही पाण्याखाली गेला तिथला..! संध्याकाळची वेळ होती... तिथली शेवटची मदत दिली की.. भारत विकास परिषदेचे स्वयंसेवक पंढरपूरचा रस्ता धरणार होतो. अंधार पडायच्या आत... "तुम्ही पाच-दहा लोकांना प्रत्यक्ष मदत देऊन बाकीची मदतींची पोती या वस्तीवर ठेवा ... जम...

यशोगाथा "गीता प्रेस गोरखपूरची"या श्री विद्याधर ताठे लिखीत ग्रंथास ठाणे साहित्य संघाचा साहित्य पुरस्कार.

Image
 विद्याधर ताठे लिखित 'यशोगाथा गीता प्रेस गोरखपूरची' ग्रंथास ठाणे ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य पुरस्कार' पंढरपूर (प्रतिनिधी ) थोर ग्रंथकार, 'महाराष्ट्र सारस्वत'कार वि.ल. भावे यांनी १३० वर्षापूर्वी स्थापन केलेल्या 'ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय' या साहित्यसंस्थेचे २०२४चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार रविवार दि.५ ऑक्टोबर रोजी, प्रसिद्ध कादंबरीकार कवयित्री नीरजा यांच्या हस्ते, महाराष्ट्र शासन ग्रंथालय संचालनालयाचे उपसंचालक श्री प्रशांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभपूर्वक वितरण करण्यात आले. त्यामध्ये इतिहास विभागात, यंदाचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणून ज्येष्ठ पत्रकार, संपादक, संतसाहित्याचे अभ्यासक, लेखक  पंढरपूर चे सुपुत्र श्री विद्याधर ताठे लिखित 'यशोगाथा गीता प्रेस गोरखपूरची' या ग्रंथास पुरस्कार प्रदान करण्यात आला. ठाण्याच्याच परममित्र प्रकाशन संस्थेने हा ग्रंथ प्रकाशित केला असून रा.स्व. संघाचे माजी सरकार्यवाह मा. भय्याजी जोशी यांची या ग्रंथास प्रस्तावना लाभलेली आहे. उत्तर प्रदेशातील थोर संत गोरक्षनाथांची नगरी गोरखपूर येथे इ.स. १९२३ साली स्थापन झाले...

स्वेरी कॉलेज मध्ये महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी.

Image
 आत्मनिर्भरतेसाठी अभियांत्रिकीचा वापर आवश्यक                                                                        - व्हाईस प्रेसिडेंट, इनोव्हेशन श्रीकांत देव स्वेरीत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी पंढरपूर-(प्रतिनिधी )‘गांधीवादी अभियांत्रिकी पद्धतीचा वापर करून आपण आपल्या गावाला, देशाला, समाजाला आत्मनिर्भर बनवू शकतो. विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी अभ्यासाचा व ज्ञानाचा वापर आत्मनिर्भर बनविण्यासाठी करावा कारण आत्मनिर्भरतेसाठी अभियांत्रिकीचा वापर करणे आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन पुण्याच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या इनोव्हेशन विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट श्रीकांत देव यांनी केले.         गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५६ वी तर भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची...

श्री विठ्ठल भक्तांच्या भुकेची काळजी असणारा सुरज.

Image
 श्री विठ्ठलभक्तांच्या भुकेची काळजी असणारा सुरज, हटके, पदार्थांनी अल्पावधीत लोकप्रिय. पंढरपूर (प्रतिनिधी)तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे रात्री उशिरा गावात येणाऱ्या भाविकांची पोटपूजा करून एका अर्थाने श्री विठ्ठलाच्या भाविकांची गैरसोय दूर करण्याचे पवित्र कार्य पंढरपूर येथील युवक सुरज गणपत कदम हा युवक करीत आहे, ज्या वयात समवयस्क मुले तारुण्याची झिंग अनुभवत मनसोक्त बॅचलर लाईफ  एन्जॉय करत असताना लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडलेला सुरज कदम अनोख्या व हटके अशा पदार्थांनी पंढरी नगरीत रात्री अपरात्री येणाऱ्या भाविकांची सोय करीत आहे, गावात मंदिर परिसर आणि स्टेशन रोड या भागात अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आहेत पण रात्री अकरा वाजता ती बंद होतात, दक्षिण काशी पंढरपूर येथे वेळी अवेळी अनेक भाविक येत असतात, पण भोजन मिळत नसल्याने उपाशीच झोपावे लागते , अशा लोकांना सुरज याचे फिरते रेस्टॉरंट म्हणजे वरदानच आहे, चौफळा येथील पारिजात बुक स्टोअर समोर सुरज कदम रोज रात्री नऊ वाजता आपले फिरते रेस्टॉरंट घेऊन येतो, मोटारसायकल मागे ट्रॉली किचन असून अनोखे जुगाड केले आहे, त्यातच सिलेंडर,शेगडी, पाण्याचा जार, ग्र...

कार्तिकी वारीमध्ये भाविकांच्या सोयीसुविधेसाठी प्राधान्य द्यावे. प्रांताधिकारी सचिन इथापे.

Image
 कार्तिकी यात्रा: अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी                                                                                        -प्रांताधिकारी सचिन इथापे *वारी कालावधीत वारकरी, भाविकांच्या सोयी सुविधांना प्राधान्य. पंढरपूर,( प्रतिनिधी):- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी सुमारे ८ ते १० लाख भाविक येतात. अतिवृष्टीमुळे  शहरातील व शहरात येणाऱ्या रस्त्यांवर  खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळे  निर्माण  होत आहेत. येणाऱ्या वारकरी भाविकांना तसेच नागरिकांना वाहतुकीबाबतची समस्या निर्माण होऊ नये यासाठी पंढरपूर नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामे करावीत  अशा सूचना  प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.           ...