Posts

Showing posts from July, 2025

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?

Image
 *सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?*                                                                         आज १ आँगस्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी ज्यांनी इंग्रज सरकार वर दैनिक केसरी मधून वरील लेख लिहून टिकेची झोड उठवली होती.आज देखील तीच परिस्थिती उद्भवली आहे.लोकमान्यांनी लिहिलेल्या लेखाचा मथळा होता "राज्य चालविणे म्हणजे सूड उगवणे नव्हे" त्याच धर्तीवर" विकास करणे म्हणजे घरं दारे पाडून शहर भकास करणे नव्हे " असे म्हणावे लागेल आज काल काँरीडाँर, विकास आराखडा, मास्टर प्लॅन व डीपी च्या धसक्यामुळे पंढरपूरातील मंदिर परिसरातील नागरीकांची झोप उडाली आहे.मंदिर परीसरात राहणारी जनता वारंवार येणाऱ्या संकटामुळे सतत अस्वस्थ झाली आहे.१९७३ चा पंढरपूर देवस्थान कायदा हा मंदिर परिसरातील बडवे उत्पात सेवाधारी यांचे परंपरागत हक्क नष्ट करणारा कायदा आला.या कायद्यातील तरतुदी नुसार कोणतीही नुकसानभरपाई न देता मंदिरांव...

श्रीयाळ शेठ.

Image
 *श्रियाळ शेठ* सणांचा उत्सव असणारा महिना म्हणजे श्रावण!! श्रावणातल्या प्रत्येक दिवसाची काही ना काही महती आहे. कथा कहाणी आहे. त्यामुळे श्रावण रोज काहीतरी नवीन घेऊन येतो. नागपंचमीला नाग देवतेचे पूजन केल्यावर दुसऱ्या दिवशी श्रियाळ षष्ठी येते. हा दिवस श्रियाळ राजा आणि राणी चांगुणा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जातो. हा श्रियाळ राजा अतिशय दानशूर होता. शंकराचा निस्सीम भक्त होता. आमच्या कडे पंढरपूरला या दिवशी खूप मोठा उत्सव असतो. पूर्वी देवळात रूक्मिणीमातेच्या सभामंडपात चंद्रभागेचे पाणी आणि नदीतल्या गाळाच्या मातीपासून तयार केलेली सुबक सुंदर गौर चांगुणा श्रियाळ राजा सह बसवली जायची. हत्ती वर बसलेली गौर खूप देखणी दिसायची. गावातील महिला, मुली गौरीचे दर्शन घ्यायला यायच्या. सभामंडपात फेर धरून गाणी म्हणायच्या. मेंदीभरले हात, नव्या बांगड्या, ठेवणीतल्या साड्या, भेटलेल्या मैत्रीणी आणि समोर तेजस्वी गौर अगदी उत्साही वातावरण असायचे. संध्याकाळी वाजतगाजत श्रियाळ राजा सह गौरीची मिरवणूक निघायची. चंद्रभागेत तिचे विसर्जन व्हायचे.  श्रियाळ षष्ठीची आणखी एक अशी कथा आहे. सहाशे सातशे वर्षांपूर्वी कर्न...

राजकारण आणि समाजकारण यांचा योग्य समन्वय साधणारे हरहुन्नरी व्यक्तिमत्व श्री उमेश मालक परिचारक.

Image
 राजकारण आणि समाजकारण यांचा योग्य समन्वय साधणारे  हरहुन्नरी नेतृत्व-उमेश मालक परिचारक. संख्यात्मक राजकारणाच्या बाजारात गुणात्मक राजकारण आणि समाजकारण यांच्या योग्य समन्वय साधणारे हरहुन्नरी जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे श्री उमेश मालक परिचारक. दि.२९जुलै रोजी उमेश त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त सदर लेखप्रपंच  घरातूनच राजकारण आणि समाजकारण यांचा वारसा लाभलेले उमेश मालक यांनी मोठ्या मालकांसोबत अनेक लोक पाहिले, राजकारणात कायम सावली सारखी साथ त्यांनी मोठे मालक माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना दिली.तसेच माजी आमदार, मोठे बंधू  प्रशांत मालक परिचारक यांनाही राजकीय कारकिर्दीत खूप मोठी साथ दिली. रामाच्या पाठीशी जसा लक्ष्मण होता तद्वतच उमेश मालकांनी कर्तव्य पार पाडले. विविध राजकीय घडामोडी , निवडणुका यशस्वी पणें हाताळल्या,परिचारक घराण्यातील रिअल किंगमेकर, म्हणणे उमेश मालक. निवडणुका जिंकल्याचा आनंद कार्यकर्ते नेहमीच उत्साहात साजरा करतात. पण ते जिंकण्याचे कसब असणारे, त्यासाठी लागणारी मेहनत, बुद्धिमत्ता पणाला लावणारे उमेश मालक नेहमीच शांत असतात. मी पणाचा अजिबात लवलेश नसलेले उमेश मालक फा...

विसरू नका मज.

Image
 *विसरू नका मज*  अध्यात्मिक क्षेत्रातील एक नवल म्हणजे परमात्मा श्रीविठ्ठल!! जगाचा नियंता असणाऱ्या भगवंताचे स्वरूप कोणाला ठाऊक आहे? अगदी देवांनाही नाही!! *न मे विदुः सुरगणः प्रभावं न महर्षयः।*  *अहमादिर्ही देवानां महर्षीणांच सर्वशः।।* भगवंत म्हणतात माझी उत्पत्ती देवगणांनाही ठाऊक नाही आणि मोठमोठ्या ऋषींनाही ठाऊक नाही. असा हा योगियांदुर्लभ परमेश्वर! त्याला भक्तासाठी विठ्ठल व्हावं लागलं..तो श्रद्धेचा, करुणेचा, मानवतेचा, दया, क्षमा, शांतीचा, आत्मिक प्रेमाचा सर्वोच्च विकास आहे! निर्गुण निराकार परमेश्वर भक्तासाठी सगुण साकार झाला आणि त्याचे वेड साऱ्यांना लागले. जो तेथे गेला तो त्याच्या प्रेम पाशात अडकला. त्याच्या मुखाकडे एकदा पाहिलं की माणूस स्वतःचा राहत नाही. तो आपल्या हृदयाची कधी चोरी करतो याचा पत्ताच लागत नाही इतकी विलक्षण ताकद या विठ्ठल मूर्तीत आहे. तो आपल्या हृदयाची चोरी करतो म्हणूनच तो अगदी आपलाच वाटतो. आपण आणि उच्च पातळीवर असणारा देव ही द्वैतभावनात संपून जाते. भक्त या पंढरीच्या चोराला पकडायचे ऐवजी त्याचेच होऊन जातात. देव आपल्यातलाच एक आहे हे मान्य केल्याने त्याच्याविषयी धा...

पंढरपूर येथे चंद्रभागा नदीत बुडून तीन महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू.

Image
 पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत बुडून तीन महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू, दर्शनाआधीच काळाची झडप  : प्रतिनिधी, पंढरपूर _ पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात.   शनिवार दि.१९रोजी सकाळी ७ वाजता चंद्रभागा नदीच्या काठावर असलेल्या पुंडलिक मंदिराजवळील प्रवाहात जालना जिल्ह्यातील तीन महिला भाविक बुडाल्या, यातील दोन महिलांचे मृतदेह सापडले असून एक महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे. अनेक भाविक दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीत जाऊन स्नान करतात. चंद्रभागा नदीत उजनी धरणातून पाणी सोडले आहे. यामुळे नदीच्या पात्रात पाणी मोठ्या प्रमाणावर आहे. नदीच्या पात्रात स्नानासाठी गेलेल्या तीन महिला भाविकांचा शनिवारी सकाळी बुडून मृत्यू झाला आहे.  उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे. विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविक शनिवारी सकाळी चंद्रभागेत स्नानासाठी उतरल्या होत्या. जालना जिल्ह्यातील भोकरधन येथे राहणा-या दोन महिला आणि एक अनोळखी महिला नदीत उतरली. त्या महिलांना पाण्याचा अंदाज ...

कर्मयोगी कॉलेज च्या शिरपेचात मानाचा तुरा, डॉ अभय उत्पात यांची विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड.

Image
 *कर्मयोगीच्या शिरपेचात मानाचा तुरा*. *डॉ. अभय उत्पात यांची विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती. पंढरपूर (प्रतिनिधी) कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अभय उत्पात यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशात्र विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर (बोर्ड ऑफ स्टडीज) सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशात्र विद्यापीठामधील ( DBATU ) मेकॅनिकल इंजिनियरिंग, प्रॉडक्शन इंजिनियरिंग व ऑटोमोबाइल इंजिनियरिंग या तीन अभ्यास मंडळावर प्रा. डॉ. अभय उत्पात यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशात्र विद्यापीठामधे महाराष्ट्रातील जवळपास शंभरहून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये संलग्न आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या तंत्र विद्यापीठात कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या डॉ. अभय उत्पात यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे औद्योगिक क्षेत्र व शैक्षणिक अभ्यासक्रम यामधील दरी कमी करून औद्योगिक क्षेत्राला पूरक असा अभियांत्रिकी अभ्यासक्रम आमलात आणण्याची संधी मिळाली...

वन्य प्राण्यांना उत्तम दर्जाचे पाणवठे बांधून देण्याची आ. आवताडे यांची मागणी.

Image
 वन्यजीवांना उत्तम दर्जाचे पाणवठे बांधून देण्याची आ समाधान आवताडे यांची मागणी. पंढरपूर  प्रतिनिधी-महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, वन्यजीवांसाठी पाणी पिण्याची योग्य सुव्यवस्था करण्याकरिता हे पाणवठे वनविभागाच्या हद्दीत उभारण्यात येऊन ते कायमस्वरूपी टिकण्यासाठी सरकार तालुकास्तरीय समितीची स्थापना करणार आहे का? याबाबत आमदार आवताडे यांनी उपप्रश्न उपस्थित करून सभागृहाचे व मंत्री महोदयांचे लक्ष वेधले.  सदर मागणी मांडताना आ आवताडे यांनी सांगितले की, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मंगळवेढा तालुका पाण्याअभावी दुष्काळी तालुका म्हणून गणला जातो. अगदी जानेवारीपासूनच नागरिकांना व जनावरांना पाण्याच्या शोधात मोठी भटकंती करावी लागत असते. अशा परिस्थितीमध्ये तालुक्यातील मारोळी येथे दोन तरस प्राणी पाण्यासाठी जंगला बाहेर आले असता नाहक त्रासापोटी भयभीत झालेल्या नागरिकांनी हल्ला होण्याच्या भीतीपोटी त्यातील एक तरस ठार केला.त्यातील एकाला आपला प्राण अनेक जंगलातील हरीण, मोर तसेच इतर सदर वन्यजीव प्राणी पिण्याच्या पाण्याच्या शोधात सर्वदूर फिरत असतात त्यामुळे त्यांचा आकस्मित अप...

पंढरपूर की गुंडापूर.

Image
 आमच्या पंढरपुरामध्ये काय स्वस्त आहे?  माणसांचा जीव!  काल संध्याकाळी कुंभार गल्ली या ठिकाणी एका घरामध्ये आई आणि मुलाची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या झाल्यानंतर संपूर्ण पंढरपूर मध्ये खळबळ उडाली  अशा पद्धतीने आई आणि मुलाला मारून टाकणं मला वाटतं पंढरपुरातील ही पहिलीच घटना असावी  यामागे कारण काय आहेत हा विषय आत्ता होऊ शकत नाही  ज्यांनी कुणी हे कृत्य केलं असेल ते सापडल्यानंतरच त्या कारणाची मीमांसा होणार आहे  वास्तविक बऱ्याच वेळा पुरुषां पुरुषांच्या मध्ये वाद होऊन खुनाचे प्रकार घडत असतात  पण यामध्ये एका आईचा म्हणजेच एका महिलेचा जीव गेलेला आहे ही सगळ्यात दुर्दैवी घटना आहे  तसं पंढरपूरमध्ये गुन्हेगारी जगत हे कुणालाच नवीन नाहीये  80 च्या दशकामध्ये एक टोळी युद्धाला तत्कालीन महासंचालक अरविंद इनामदार तेरकर साहेब कुलकर्णी साहेब यांनी संपवल होतं  त्यानंतर डीवायएसपी म्हणून ट्रेनिंग संपल्या संपल्या पंढरपूरची जबाबदारी तत्कालीन अधिकारी डॉक्टर श्री भूषण कुमार उपाध्याय यांनी घेतली, साहेबांनी पंढरपूर वरती एवढा वचक बसवला होता की साहेब पोलीस स्टेशन मधूनच चाल...

आषाढी वारी मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला मिळाले १०कोटी ८४लाख रुपयांचे उत्पन्न.

Image
 श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास आषाढी यात्रेत 10 कोटी 84 लाखाचे उत्पन्न, पंढरपूर दि.12 :- आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी 10 कोटी 84 लाख रुपयांचे दान केले तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर  यांनी दिली. यंदा आषाढी यात्रा कालावधीत दर्शनरांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर समितीने केल्या होत्या. आषाढ शुध्द 01 (दिनांक 26 जून) ते आषाढ शुध्द 15 (दिनांक 10 जुलै) या कालावधीत  भाविकांनी  श्रींच्या चरणाजवळ  7505291 रुपये अर्पण, 28833569 रुपये देणगी, 9404340 रुपये लाडू प्रसाद विक्री, 4541458 रुपये भक्तनिवास, 14471348 रुपये हुंडीपेटी, 3245682 रूपये परिवार देवता तसेच 25961768 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोब...

प्रक्षाळपूजा

Image
 *प्रक्षाळपूजा* आज प्रक्षाळपूजा!! त्यानिमित्ताने आठवणींचे काही जुने क्षण भोवताली रेंगाळू लागले...  लहानपणी अनुभवलेले हे क्षण अत्तराच्या फाया प्रमाणे आहेत. फायात बुडालेले अत्तर कालमानाप्रमाणे उडून गेले पण आठवणींचा सुगंध मात्र आजही दरवळतो आहे!!        काल्याचा प्रसाद घेतल्यावर पंढरीची वारी सुफळ संपूर्ण होते.  पालख्या परतीच्या प्रवासाला लागतात.  *पंढरीहुनि गावा जाता। खंती वाटे पंढरीनाथा।* सारेजण आपापल्या गावाला निघाल्यामुळे देवाला वाईट वाटतं आहे. निळोबाराय म्हणतात *निळा म्हणे पंढरीनाथा। चला गावा आमुच्या आता।*  असे देव आणि भक्त दोघेही सद्गदित होऊन एकमेकांचा निरोप घेतात.    वारी सुफळ संपूर्ण झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतो. विठुराया सुद्धा रात्रंदिवस भक्तांना दर्शन देऊन थकून गेलेला आहे. आता त्याला विश्रांतीची नितांत गरज आहे. त्यासाठी प्रक्षाळ पूजेचे आयोजन केले जाते. इतके दिवस रात्रंदिवस लाखो वारकऱ्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे. त्यामुळे देऊळ घाण झालेले आहे. गाभाऱ्यासह संपूर्ण देऊळ धुऊन विठ्ठलाचे उष्णोदकाने अंग शेकवून त्याला...

पंढरपूर येथील डी वाय एस पी डॉ अर्जुन भोसले यांची बदली, नूतन डी वाय एस पी पदी प्रशांत डगले.

Image
 पंढरपूर येथील उप विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांची बदली, नूतन डी वाय एस पी म्हणून प्रशांत डगले रुजू होणार. प्रतिनिधी पंढरपूर _पंढरपूर येथील उप विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांची बदली झाली असून नूतन उप विभागीय पोलीस अधिकारी जागी प्रशांत डगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर या तालुक्याचा पदभार ते पाहत होते. गृह विभागाने बदलीचा आदेश जारी केला आहे. यामुळे पंढरपूर तालुक्याला नवीन डी वाय एस पी मिळाला असून डगले  यांच्यासमोर तालुक्यातील वाळू तस्करी, अवैध दारू,. मावा, गुटखा वाहतूक, विक्री रोखण्याचे आव्हान असणार आहे, याप्रमाणेच पंढरपूर शहरातील गँगवॉर, भुरटी दादागिरी, महिला व मुलींची छेडछाड रोखण्याचे आव्हान असणार आहे. नूतन पोलीस अधिकारी कसा वचक बसवतील याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे. संपादक. चैतन्य उत्पात.

आवताडे शुगर चे रोलर पूजन उत्साहात संपन्न.

Image
 आवताडे शुगरचे रोलर पूजन संपन्न.  पंढरपूर  प्रतिनिधी- चालू गळीत हंगामात पावसाने लवकर सुरुवात केल्याने उसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होणार असल्याने हंगाम मोठा होणार आहे त्यामुळे सर्वांनी मिळून एक दिलाने येणारा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडा असा कार्यमंत्र आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे यांनी कारखान्याच्या रोलर पूजन वेळी बोलताना कारखाना प्रशासनाला दिला. आवताडे उद्योग समूह संचलित आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा.लि.नंदूर या साखर कारखान्याचा या गळीत हंगाम 2025-26 हंगामातील रोलर पूजन कारखान्याचे चेअरमन श्री संजय आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाले.  ते बोलताना पुढे म्हणाले की पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून या साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून तीन गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. कोणत्याही साखर कारखान्याच्या यशस्वी वाटचालीमध्ये महत्वपूर्ण असणाऱ्या शेतकरी व ऊस उत्पादकांच्या जीवनामध्ये आर्थिक मार्गाने सुबत्ता आणण्यासाठी आम्ही सार्वजनिक प्रयत्नवादी राहणार आहे. गळीत हंगाम 2025...

सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश विनय उत्पात यांची पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ तक्रार निवारण समितीवर अध्यक्षपदी निवड.

Image
 विनय उत्पात यांची पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ तक्रार निवारण समितीवर अध्यक्षपदी निवड.  पंढरपूर(प्रतिनिधी)_सेवानिवृत्त माजी जिल्हा न्यायाधीश विनय पांडुरंग उत्पात यांची पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ  तक्रार निवारण समितीवर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रभारी कुलसचिव प्रा डॉ ज्योती भाकरे यांनी माजी जिल्हा न्यायाधीश विनय पांडुरंग उत्पात यांना लेखी पत्र देऊन नियुक्ती करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. श्री विनय उत्पात हे मूळचे पंढरपूरकर असून सध्या पुणे येथे वास्तव्यास आहेत. १९८३साली त्यांनी एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होऊन न्यायाधीश झाले. त्यांनी परांडा, कोल्हापूर, इचलकरंजी,अहिल्यानगर,उमरगा, सातारा , नांदेड याठिकाणी सेवा मी, निवृत्त झाल्यानंतर ग्राहक पंचायत समिती चे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या निवडीनंतर पंढरपूर येथील उत्पात समाजातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. विनय उत्पात यांची थोरली मुलगी अवनी या लातूर येथे  न्यायाधीश असून आत्मजा आणि अनुजा या दोन्ही मुली सी ए असून पुणे येथे  प्रॅक्टिस करत आहेत. संपादक. चैतन...

महाद्वार काला.

Image
 *महाद्वार काला* पाणी भरलेल्या डोळ्यांनी माऊलींना वेशीपर्यंत सोडवून आल्यावर एक उदासीनता वातावरणात भरून राहते. इतके दिवस रंगलेला हा सोहळा कधी संपला हे कळत नाही.. दिवस कसे अत्तरासारखे भराभर उडून गेले असे वाटते!! गोपाळपूरचा काला झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 'महाद्वार काला' होतो. शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. विठ्ठलाच्या सात सेवाधाऱ्यांपैकी एक सेवाधारी म्हणजे हरिदास. देवळात कीर्तन करणे, महापूजेच्या वेळी  टाळ वाजवून अभंग म्हणणे ही सेवा त्यांच्याकडे आहे. पूर्वी पंढरपुरात प्राचीन वेशी होत्या. त्यातील एक म्हणजे 'हरिदास वेस'. देवळाकडून हरिदास वेशी कडे जाताना हरिदासांचा सुंदर वाडा आहे.हा 'काल्याचा वाडा' म्हणून प्रसिद्ध आहे. प्राचीन काळात 'कान्ह्या हरीदास' नावाचे थोर विठ्ठलभक्त होऊन गेले. ते देवळात पहाटे देवाच्या काकड्याला पदे म्हणत असत. त्यांचे *अनुपम्य नगर पंढरपूर*  हा अभंग प्रसिद्ध आहे. आज देखील या अभंगानेच विठ्ठलाला जागविले जाते. त्यांच्या वंशातील पांडुरंग महाराजांना विठ्ठलाने प्रसन्न होऊन आपल्या पादुका दिल्या. पांडुरंग महाराज बालपणापासून विठ्ठल भक्...

फॅबटेक फाउंडेशन व भाऊसाहेब रूपनर यांच्या वतीने पत्रकार बांधवांना रेनकोट वाटप.

Image
 *फॅबटेक फाउंडेशन व भाऊसाहेब रूपनर यांच्या वतीने पत्रकार बांधवांना रेनकोट वाटप.* पंढरपूर (प्रतिनिधी)  शिक्षणक्षेत्र आणि साखर उद्योगात अल्पावधीत उत्तुंग यश प्राप्त केलेल्या फॅबटेक या संस्थेच्या वतीने पंढरपूर येथे पत्रकार सुरक्षा समिती यांच्या सहकार्याने रेनकोट वाटप करण्यात आले. शिक्षण सम्राट, उद्योगरत्न फॅबटेक फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष चेअरमन भाऊसाहेब रूपनर आणि व्हॉईस चेअरमन सूरज रूपनर यांच्या सुयोग्य नियोजनाने कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, त्यांच्या कामाला वेळेचे बंधन नसते, कोणत्या वेळेला कॅमेरा, मोबाईल घेऊन एखादी बातमी कव्हर करायला जावे लागेल हे सांगता येत नाही. ऊन, वारा,पाऊस अशा कशाचीही पर्वा न करता तसेच विपरीत नैसर्गिक वातावरण असूनही त्या ठिकाणी जाऊन वार्तांकन करण्यासाठी  जावे लागते. यामुळे पत्रकारांना अत्यंत आवश्यक असणाऱ्या रेनकोट ची गरज रूपनर यांनी पूर्ण केली.  समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले फॅबटेक फाउंडेशनचे चेअरमन भाऊसाहेब रूपनर व व्हॉईस चेअरमन सूरज रूपनर अनेक उपक्रमातून समाजसेवा करीत असतात, अनेक गोरगरीब लोकांचे कर्जावरील ...

गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता.

Image
 *गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता* *पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु पंढरपूर,दि.10 :- गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपूरात मानाच्या पालख्यांसह सर्व संताच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदीरात आल्या. मानाच्या पालख्याने श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास सुरु केला.  पोर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथे मानाची अंमळनेरकर महाराजांची दिंडी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे 5.00 वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली. त्यानंतर भजन झाले. तर शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखीचे पहाटे 4.00 वाजता गोपाळपूरात आगमन झाले. पहाटेपासूनच एकामागोमाग एक अशा विविध सुमारे 450 संतांच्या दिंड्या, पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या. सकाळी 9.00 च्या सुमारास जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांची तर 10.00 च्या सुमारास संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालख...

पांडुरंग भवन येथे पोलिस बांधव, पत्रकार यांना मिष्टान्न मेजवानी.

Image
 *पंढरीतील आषाढी वारीत अविरत कष्ट घेणा-या पोलीस बांधवांचा व पत्रकार बंधूंना मिष्टान्नाची मेजवानी देऊन,श्रीपांडुरंग अन्नछत्र मंडळाच्या वतीने गौरव. पंढरपूर (प्रतिनिधी) प्रतिवर्षी आषाढी यात्रेत अहोरात्र कष्ट करुन, घरापासून लांब असणाऱ्या पोलीस बांधवांना यात्रेची सांगता सुखद व्हावी या उदात्त हेतूने, श्रीपांडुरंग अन्नछत्र मंडळाचे वतीने अध्यक्ष श्री अनिरुद्ध बडवे पाटील व त्यांचे चिरंजीव अक्षय बडवे पाटील यांच्या वतीने मोफत मिष्टान्नाची मेजवानी देण्यात येते.        पंढरीतील श्री पांडुरंग भवन येथे आषाढी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ११ ते ४ यावेळेत हा उपक्रम मागील १० वर्षा पासून संपन्न करण्यात येतो.  सामाजिक ऋण फेडण्यासाठी कटीबद्ध असणाऱ्या पितापुत्रांचे या सामाजिक योगदानाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.         यावर्षी देखील रविवार दि १० रोजी या उपक्रमाची सुरुवात सर्व पत्रकार बंधू यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली असल्याची माहिती मंडळाचे सचीव अक्षय बडवे यांनी विषद केली.  याप्रसंगी आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी विरेंद...

नऊ लाखापेक्षा जास्त भाविकांनी घेतला आरोग्यसेवेचा लाभ.

Image
 *‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’* *सार्वजनिक आरोग्य विभागाने वारी मार्गावर पुरविली ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा*  *विविध माध्यमांतून आरोग्य जनजागृती* पंढरपूर (दि.०८)- आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या उपक्रमांतर्गत ९ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य विभागाने ९ लाख २३ हजार ५०९ वारकऱ्यांना आतापर्यंत आरोग्य सेवा पुरविली असून, परतीच्या वारीमध्येही दि. 10 जुलैपर्यंत विभागामार्फत वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. पालखी मार्गावर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमार्फत आतापर्यंत एकूण १,११४ वारकऱ्यांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविण्यात आलेली आहे. त्यामुळे या वारकऱ्यांना...

गोपाळकाला गोड झाला गोपाळाने गोड केला.

Image
 *गोपाळ काला गोड झाला*  आज गुरूपौर्णिमा.. ज्येष्ठ वद्य अष्टमी पासून सुरू झालेला हा वारीचा सोहळा आज संपन्न होईल. आषाढी एकादशी भक्तीमय वातावरणात पार पडल्यावर पौर्णिमेला गोपाळपूरला काल्याचा कार्यक्रम होतो. पंढरपूरच्या दक्षिणेस असलेल्या गोपाळपूर येथे पुष्पावती नदीच्या काठी एका टेकडीवर गोपाळ कृष्णाचे अतिशय सुंदर भव्य मंदिर आहे. या मंदिरातील गोपाळ कृष्णाची खूप सुंदर मूर्ती आहे. मूर्तीचा चेहरा अगदी हुबेहूब विठ्ठलाच्या चेहऱ्यासारखा आहे. ही देहुडा चरणी उभं राहून वेणू वाजवणारी गोपाळ कृष्णाची मूर्ती आहे.  *देहुडाचरणी वाजवितो वेणू।* *गोपिका रमण स्वामी माझा।*  मूर्तीच्या मागे गाई आहेत. या मंदिराच्या आवारात श्रीकृष्णाचे सासरे भीमक राजाचे  मंदिर आहे. जनाबाईचे गुहा आहे. त्यामध्ये जनाबाईचा संसार, दळण दळायचे  जाते आहे. याच जात्यावर बसून श्री विठ्ठलाने जनाबाईंबरोबर दळण दळले होते असे म्हणतात. यशोदेच्या दधिमंथनाची जागा आहे. हे मंदिर जिथे आहे तिथे श्रीकृष्ण द्वारकेवरून गाईगुरांसह आला होता. इथेच त्याने गाई गुरे खेळविली. गोपाळांसह सहभोजन केलं. या प्रसंगाची आठवण म्हणून आषाढी पौर्णि...

अनुपम्य नगर पंढरपूर.

Image
 *अनुपम्य नगर पंढरपूर* सकलांचे माहेर पंढरपूर!! आणि त्यांची माऊली विठाबाई!! ती इतकी प्रेमाने ओतःप्रोत भरलेली आहे की भेटायला येणाऱ्या प्रत्येक भक्ताची ती जातीने काळजी घेते.  ज्येष्ठ वद्य अष्टमी पासून सुरू  झालेला हा वारीचा सोहळा आता अंतिम टप्प्यात आला आहे. आषाढी एकादशी हा वारीचा मुख्य दिवस!! या दिवशी विठ्ठलाला भेटायला भक्तांची अभूतपूर्व मांदियाळी जमते. प्रचंड गर्दीमुळे प्रत्येकाला दर्शन घडत नाही. त्यामुळे त्या ज्या भाविकांना एकादशीला मंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्य झाले नाही त्यांची काळजी विठू माऊलीला असते. त्यांना भेटण्यासाठी स्वतः विठ्ठल राही रखुमाईसह नगर प्रदक्षिणेला निघतो. देवाचा रथ खाजगीवाले यांच्या वाड्यात ठेवलेला असतो. आता तो वाडा माहेश्वरी धर्मशाळा म्हणून ओळखला जातो. तिथे नगर प्रदक्षिणा निघण्याआधी चक्री कीर्तन होते. दुपारी एक वाजता रथ प्रदिक्षणेस निघतो. रथामध्ये श्रीविठ्ठल, राही, रूक्मिणी विराजमान होतात. रथावर बडवे, नातू, देवधर यांचे वंशज बसलेले असतात. रथ हाताने ओढला जातो. रथ ओढायचा मान वडारी समाजाचा आहे. त्यांनी हात लावल्याशिवाय रथ ओढला जात नाही. ज्या भाविकांना मंदिरा...

वारीचा शीणवटा घालविण्यासाठी स्थानिकांची मनोरंजन नगरीकडे धाव, भाविकांसह स्थानिक लोकांची मोठी गर्दी.

Image
 वारीचा शीणवटा घालविण्यासाठी    स्थानिकांची   मिनी एस्सेल वर्ल्ड कडे धाव, मनोरंजन नगरीतून होते लाखोंची उलाढाल. पंढरपूर (प्रतिनिधी) यंदाच्या वर्षी मे महिन्यापासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने आषाढी वारी उत्तम भरली आहे. अंदाजे १८ते २०लाख भाविक आले आहेत. आषाढी वारीमध्ये बाल गोपाळासह अनेकाचे आकर्षण असलेले मिनी एस्सेल वर्ल्ड पंढरी नगरीत अवतरले असून ही मायावी अद्‌भूत मनोरंजननगरी हजारो भाविकांची पावले आपसूकच वळवत आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये ही मायावी नगरी येते. उंचच उंच आकाशपाळणा है सर्वांत आकर्षणाचा बिंदू असतो. इलेक्ट्रिक जनरेटरच्या शक्तीवर गोलगोल फिरणारा आकाशपाळणा जेव्हा उंचावर जातो त्यावेळी आसमंतातून  स्वप्ननगरी पंढरपूर शहराने सौंदर्य अलौकिक असते. रात्रीच्या वेळी तर पंढरी नगरीचा नजारा काही वेगळाच असतो, हा आकाशपाळणा वेगाने खाली येतो तेव्हा पोटात गोळा येऊन अनेक नवखे घाबरून ओरडायला जागतात, आनंद, जोश, अनोजे थ्रिल अशा त्रिवेणी संगमाचा अनुभव माविकासह शहरवासीय अनुभवत आहेत. खिशाला परवडेल अशा माफक दरात विविध राईड्स असल्यानं गरीब, सर्वसामान्य ते अगदी श्...

बा विठ्ठला, बळीराजाला सुखी समाधानी ठेव, _मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
 *बा विठ्ठला... बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे* *आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न* पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले.      आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी श्री कैलास दामु उगले, सौ. कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री  पंकज भोयर, सौ. अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्ञानेश्वर महाराज पालखीचे स्वागत.

Image
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन  पंढरपूर, दि. ५ (प्रतिनिधी):- आषाढी शुद्ध एकादशी निमित्ताने वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले. श्री. फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला.  टाळ मृदंगआणि विठू माऊलीच्या गजरात वातावरण भक्तीरसात न्हाऊन निघाले. प्रारंभी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे श्री माऊलींची प्रतिमा देऊन स्वागत केले. वाखरी येथे जिल्हा प्रशासनाने वारकरी, भाविक यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणीदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.  वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.  यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर, अभिजित पाटील, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस विशेष महानिरीक्षक सुनी...

बाजीराव विहीर येथे पार पडले गोल आणि उभे रिंगण.

Image
 बाजीराव विहीर येथे पार पडले उभे आणि गोल रिंगण लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा *वाखरी मुक्कामी पालखी सोहळा विसावला पंढरपूर(दि.०४) :-आषाढी यात्रेकरीता पंढरपूच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गोल  व तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण शुक्रवारी बाजीराव विहिरीच्या जवळ रंगले.  आनंदाने वारकरी विठू नामाच्या जयघोषात नृत्यमध्ये तल्लीन झाले होते. बाजीराव विहीर परिसरात  रिंगणाचा सोहळा वारकर्‍यांनी अनुभवला. रिंगण सोहळ्याचा आनंद महामार्गाच्या उड्डाणपुलावरुन भाविकांना घेता आला. या भव्यदिव्य रिंगण सोहळ्यामुळे शेकडो किलोमीटर अंतर पायी आलेल्या वारकर्‍यांचा शीण गेला.        आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी राज्यासह, देशाच्या विविध भागातून निघालेल्या संतांच्या पालख्या शुक्रवारी वाखरीत दाखल झाल्या. तत्पुर्वी, दुपारी 1 वाजता भंडीशेगाव येथून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवला. त्यापूर्वी संत सोपान काका यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे निघाला. त्यानंतर पिराची कुरोली येथून ...