पंढरपूर येथे चंद्रभागा नदीत बुडून तीन महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू.


 पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत बुडून तीन महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू,

दर्शनाआधीच काळाची झडप 

: प्रतिनिधी, पंढरपूर _


पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात.  

शनिवार दि.१९रोजी सकाळी ७ वाजता चंद्रभागा नदीच्या काठावर असलेल्या पुंडलिक मंदिराजवळील प्रवाहात जालना जिल्ह्यातील तीन महिला भाविक बुडाल्या, यातील दोन महिलांचे मृतदेह सापडले असून एक महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे.

अनेक भाविक दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीत जाऊन स्नान करतात. चंद्रभागा नदीत उजनी धरणातून पाणी सोडले आहे. यामुळे नदीच्या पात्रात पाणी मोठ्या प्रमाणावर आहे. नदीच्या पात्रात स्नानासाठी गेलेल्या तीन महिला भाविकांचा शनिवारी सकाळी बुडून मृत्यू झाला आहे.  उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे.


विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविक शनिवारी सकाळी चंद्रभागेत स्नानासाठी उतरल्या होत्या. जालना जिल्ह्यातील भोकरधन येथे राहणा-या दोन महिला आणि एक अनोळखी महिला नदीत उतरली. त्या महिलांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे चंद्रभागेत त्या बुडाल्या. पुंडलिक मंदिराजवळ ही घटना घडली. त्या महिला पाण्यात बुडत असल्याचे इतर महिलांच्या लक्षात आले. त्यामुळे मदतीसाठी आरडाओरड सुरू केली.

दोन्ही महिला जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावातील आहेत.

धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह वेगाने सुरू आहे. या प्रवाहात तिन्ही महिला बुडाल्या. त्यात सुनीता सपकाळ (वय ४३) आणि संगीता सपकाळ (वय ४०) या दोन महिला जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आहेत. तसेच एका महिलेची ओळख पटली नाही. चंद्रभागा नदीवर असलेल्या कोळी बांधवांनी या बुडालेल्या महिलांचे मृतदेह बाहेर काढले. तिस-या महिलेचा शोध सुरू आहे. घटनास्थळी बचाव पथकही आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मागील गेल्या सहा महिन्यात चंद्रभागा नदीच्या पात्रात दहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून केवळ आषाढी यात्रेचा कालावधी सोडल्यास नदीपात्र कधीही सुरक्षित नसते, अनेकदा होडीचालक असलेल्या कोळी बांधवांनी भाविकांचे प्राण वाचविले आहेत.

सध्या उजनी धरणाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने हजारो क्युसेक्स पाणी चंद्रभागा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे.

चौकट.

आषाढी वारी काळात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने रेस्क्यु टीम भाविकांचे प्राण वाचविण्यासाठी तैनात केली होती, मात्र दि१०जुलै पासून रेस्क्यु टीम बंद करण्यात आली होती,

यात्रा काळात या लोकांनी सुमारे ५०बुडणाऱ्या भाविकांचे प्राण वाचवले होते आज ही टीम असली असती तर ही दुर्दैवी घटना घडली नसती.

चौकट २

चंद्रभागा नदीच्या पात्रात पुंडलिक मंदिराजवळ यापूर्वीही अनेक भाविक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मरण पावले आहेत,

हे ठिकाणच अत्यंत धोकादायक असून याठिकाणी भाविकांनी स्नान करण्यास जाऊच नये, यासाठी ब्यारेगेटींग 

केले पाहिजे, स्पष्ट सूचना फलक लावण्यात यावेत.

संपादक.

चैतन्य उत्पात.


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.