मुळचे पंढरपूर येथील डॉ दिनेश अंमळनेरकर यांची, महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस, या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड.
डॉ. दिनेश अमळनेरकर यांची 'महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस' संस्थेच्या अध्यक्षपदी निवड (विद्याधर ताठे यांजकडून ) पुणे : विज्ञान प्रसार आणि तंत्रज्ञान विषयक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या व्यापक हेतूने १९७६ साली स्थापन झालेल्या 'महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस' या संस्थेच्या अध्क्षपदी, मटेरियल सायन्स क्षेत्रतील विख्यात वैज्ञानिक डॉ. दिनेश पुंडलिक अमळनेरकर यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. होमी सेठना यांच्या सारख्या दिग्गज वैज्ञानिकांनी भूषवलेल्या अध्यक्षपदी डॉ. दिनेश अमळनेरकर यांची निवड सर्वानुमते एकमाने झाली असून विज्ञानक्षेत्रातील अनेकांनी या निवडीचे सार्थ निवड म्हणत डॉ. अमळनेकर यांचे अभिनंदन केले आहे. डॉ. दिनेश अमळनेरकर हे मूळचे पंढरपूरचे असून मटेरियल सायन्स क्षेत्रातील एक ख्यातनाम संशोधक आहेत. 'नॅनो टेक्नॉलॉजी' आणि 'इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल' या विषयातील एक जागतिक तज्ज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. सी-मेट (सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी) या नामवंत संस्थेचे माजी महासंचालक म्हणून डॉ. अमळनेरकर यांचे योगदान विज्ञानक्षेत्रात सर्...