खास निवडणूक कार्यकर्त्यांसाठी स्पेशल कार्यकर्ता थाळी चे आयोजन.
नगरपालिका निवडणुकीचे निमित्ताने स्पेशल कार्यकर्ता थाळी, केटरर्सचा अनोखा उपक्रम,
पंढरपूर(प्रतिनिधी )_पंढरपूर येथे अत्यंत चुरशीत आणि जोषपूर्ण वातावरणात नगरपालिका निवडणूक पार पडली,
निकाल तब्बल १८दिवसांनी लांबल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे त्यातच समाधान केटरर्स यांनी स्पेशल कार्यकर्ता खुश थाळीचे आयोजन केले असून गोड पदार्थसह भोजन थाळीचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ ५९रुपयात थाळी असणार आहे.
शुद्ध शाकाहारी भोजन असणार आहे या निवडणुकाच्या निकालावरून गावात गल्ली बोळात , उपनगरात युवकांच्या गटात विविध पैजा लागल्या आहेत,
पाच हजार रुपये ते मित्रांना पार्टी, दर रविवारी जेवण असे वातावरण तापले आहे, या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे,
शहरात एकूण सात प्रभाग हे संवेदनशील असून निकाल जाहीर होताच परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.
आता सर्व पंढरपूरकर नागरिकांना उद्याच्या निकालाची प्रतीक्षा लागली असून चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत असतो तसेच
लोक आतुर झाले आहेत,
केवळ पंढरपूर शहर नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात उत्कंठा वाढली आहे.
समाधान केटरर्स चे संचालक महेश दुरुगकर यांनी ही अनोखी ऑफर सुरू केली आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment