पंढरपूर येथे युवकाची अत्यंत निर्घृण हत्या, पाय घराच्या दारावर टांगण्यात आला.
पंढरपूर येथे युवकाची अत्यंत निर्घृण हत्या,
मृतदेह रेल्वे पुलावर टाकून एक पाय घराच्या दारावर टांगण्यात आला.
प्रतिनिधी पंढरपूर _पंढरपूर शहरात धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी खुनाची घटना घडली असून या अत्यंत निर्घृणपणे केलेल्या हत्येने शहर व परिसरात दहशतीचे, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खुनाची ही घटना मंगळवारी दी.१६रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
अनिलनगर भागातील रोहित मधुकर कोरे (वय २४,रा. अनिलनगर झोपडपट्टी)याचा त्याच परिसरात राहणाऱ्या काही युवकांशी सोमवारी रात्री वाद झाला होता, हे भांडण सुमारे दोन महिन्यांपासून सुरू होते, रोहित याने मद्य प्राशन केले होते, सोमवारी रात्री साडे आठ वाजता भांडणे झाली,
तेव्हा काही युवकांनी त्याला जिवानिशी ठार मारण्याची धमकी दिली होती.यावर रोहित याने घरच्या लोकांना ही भांडणे वाढण्याची शक्यता बोलून दाखवली होती,
पुन्हा रात्री साडे अकरा वाजता काही युवक भांडणे मिटवायची आहेत असे सांगत त्याला घरातून घेऊन गेले आणि पुन्हा त्याला दारू पाजली,
रोहित रात्रभर घरी आलाच नाही, त्याला नदीजवळ रेल्वे पुलावर नेऊन मारहाण करण्यात आली आणि मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देण्यात आला, तर त्याचा उजवा पाय कापून चक्क मावशीच्या घरात दारावर टांगण्यात आला होता, या भीषण हत्याकांडाने पंढरी हादरली असून रोहित याची आई आणि नातेवाईक यांनी जोपर्यंत हत्येतील गुन्हेगारांना पकडत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाहीत असे बजावले आहे,
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे तपास करीत आहेत.
चौकट.
अनिलनगर परिसर हा गुन्हेगारी व अवैध व्यवसायाचा भाग असून या परिसरात दररोज भांडणे, मारामारी होत असून काही महिन्यापूर्वी एका कुरिअर सेवकाचा आणि त्याच्या आईची घरात घुसून कोयत्याने
वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती, या घटनेतील संशयित आरोपी तब्बल सहा महिन्यांनी इंस्टाग्राम वर करण्यात आलेल्या एका पोस्ट मुळे सापडले होते.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment