ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.


 उदय निरगुडकर यांच्या प्रेरणादाई मार्गदर्शनाने विद्यार्थी भारावले. पंढरपूर येथील प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूट मध्ये पार पडला गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा तसेच इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम.

 पंढरपूर (प्रतिनिधी)_

 ज्येष्ठ पत्रकार व 'झी चोवीस तास' तसेच 'न्यूज १८ लोकमत' चे माजी मुख्य संपादक  उदय निरगुडकर यांनी  पंढरपूर येथील प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूट येथील विद्यार्थ्यांना अभ्यास, यश आणि करिअरविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाराष्ट्र नॉलेज सेंटर सोलापूर चे . रविराज पवार तसेच महाराष्ट्र नॉलेज सेंटर पुणे चे  सचिन शिंदे यांची देखील उपस्थिती लाभली.


या प्रसंगी उदय निरगुडकर यांच्या हस्ते विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवणारे पंढरपूर चे तीन विद्यार्थी चि. रुद्र अभय उत्पात, चि. मिहिर मकरंद बडवे व चि. अथर्व अमित वाडेकर तसेच प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूट चे इयत्ता बारावीमध्ये पंढरपूर केंद्रातून प्रथम क्रमांक मिळवणारे चि. अक्षय सिद्धेश्वर घाडगे, जेईई मेन्स २०२६ परीक्षेत ९९.३०% गुण मिळवून पंढरपूरात प्रथम क्रमांक मिळवणारी कु. वैभवी पांडुरंग कोळी व जेईई मेन्स २०२६ परीक्षेत ९७.३१% गुण मिळवून क्लासमध्ये द्वितीय क्रमांक मिळवणारे चि. ईशान गणेश बाळेकर व अन्य गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.


या प्रसंगी 

 उदय निरगुडकर यांनी प्रा. परिचारक सरांच्या बद्दल बोलतांना " एका शिक्षकाने शिक्षणाचा उ‌द्योग न होऊ देता शिक्षण हे त्याच्या आदर्शा सकट कस चालवाव याचा आदर्श आपण पंढरपूर येथे निर्माण केला आहे." असे गौरवोद्‌गार काढले व प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूटचे कौतुक केले.

व्याख्यानादरम्यान श्री. उदय निरगुडकर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन, सातत्य, आत्मविश्वास आणि यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेला "गुरुमंत्र" दिला. त्याग व स्वयंशिस्त यांच्यामुळे आयुष्यात मोठे यश मिळते हे त्यांनी सानिया नेहवाल, सचिन तेंडुलकर अशा मान्यवरांच्या उदाहरणातून अतिशय सोप्या शब्दांत उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले व आपल्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यांच्या अनुभवपूर्ण, प्रभावी व प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थी भारावून गेले.

या मार्गदर्शनाचा मोठा लाभ झाल्याची भावना क्लासमधील विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी व्यक्त केली.

संपादक.

चैतन्य उत्पात.


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.