Posts

Showing posts from June, 2026

पंढरपूर येथे जलतरण स्पर्धेचे आयोजन.

Image
 पंढरपूर येथे जलतरण स्पर्धेचे आयोजन. प्रतिनिधी पंढरपूर _पंढरपूर येथील पद्मावती जलतरण तलाव व परदेशी स्विमिंग अकादमी यांच्या वतीने रविवार दि.२१जून रोजी भव्य जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी केवळ आधार कार्ड लागणार आहे, ५ते ८, ८ते १२, १२ते १६तसेच १६वर्षावरील मुले, मुली या जलतरण स्पर्धेत सहभागी होऊ शकतात अशी माहिती परदेशी स्विमिंग अकादमी चे प्रमुख गणेशसिंह परदेशी, आणि सत्यजीत परदेशी यांनी दिली आहे. स्पर्धा सकाळी दहा वाजता सुरू होणार असून आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत, या स्पर्धेचे उद्घाटन न  पा मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. संपादक. चैतन्य उत्पात.

नीट परीक्षा इच्छुकांसाठी लक्ष परीक्षेवरच केंद्रित.

Image
 #NEET इच्छुकांसाठी, लक्ष परीक्षेवरच केंद्रित राहिले पाहिजे दरवर्षी, लाखो विद्यार्थी NEET परीक्षेच्या तयारीसाठी महिने, आणि अनेकदा तर वर्षे, कठोर परिश्रम करतात. ही देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक आहे आणि अनेक तरुणांसाठी, डॉक्टर बनण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असते. अशा नाजूक टप्प्यावर, विद्यार्थ्यांनी आपले प्राथमिक उद्दिष्ट नजरेआड होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. सोशल मीडियावरील मोहिमा, राजकीय वादविवाद, आंदोलनांची हाक आणि परस्परविरोधी मतप्रवाह सहजपणे लक्ष विचलित करू शकतात आणि चिंता निर्माण करू शकतात. प्रत्येक नागरिकाला आपली मते मांडण्याचा आणि सार्वजनिक चर्चेत भाग घेण्याचा अधिकार असला तरी, इच्छुक विद्यार्थ्यांनी हे ओळखले पाहिजे की त्यांची तात्काळ जबाबदारी त्यांच्या स्वतःच्या भविष्याप्रती आहे. एखाद्या मोठ्या परीक्षेच्या आधीचे आठवडे विचलित करणाऱ्या गोष्टींमध्ये अडकण्याची वेळ नसते. NEET मधील यश हे तयारी, शिस्त, उजळणी आणि मानसिक एकाग्रतेवर अवलंबून असेल, ऑनलाइन वादविवाद किंवा राजकीय एकत्रीकरणावर नाही. विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे ...

पंढरपूर येथील सहाय्यक दिग्दर्शक सागर जाधव यांचा घबाडकुंड चित्रपट प्रदर्शित झाला.

Image
 पंढरपूर येथील सहाय्यक दिग्दर्शक सागर जाधव यांचा हॉरर , सस्पेन्स घबाडकुंड, सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर, युवा दिग्दर्शक सागर जाधव यांचे होत आहे अभिनंदन. प्रतिनिधी पंढरपूर _पंढरपूर येथील युवा,सर्जनशील सहाय्यक दिग्दर्शक सागर जाधव यांचा घबाडकुंड हा मराठी सस्पेन्स, हॉरर , कॉमेडी मराठी चित्रपट शुक्रवार दी १९जून रोजी महाराष्ट्र राज्यात प्रदर्शित होत असून पंढरपूर सारख्या ग्रामीण भागातून एक उदयोन्मुख युवा दिग्दर्शक सोलापूर जिल्ह्याचे नाव उंचीवर नेत असल्याने पंढरपूर शहरात सागर जाधव या युवकाचे कौतुक होत आहे, सागर जाधव यांना बालपणा पासूनच सिने क्षेत्राचे आकर्षण आणि औत्सुक्य होते, सागर यांनी बाहुबली १, वेदात वीर दौडले सात, एलिझाबेथ एकादशी, रिंगण, जिगरिया (हिंदी)कन्यारत्न आदी सिनेमात अभिनय केला आहे मात्र सहाय्यक दिग्दर्शक म्हणून,घबाडकुंड, हा पहिलाच चित्रपट असल्याचे सागर यांनी सांगितले, या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील हे असून पुणे येथील लोणी काळभोर परिसरातील डोंगराळ भागात, निबीड जंगलात या सिनेमाचे सलग चित्रीकरण करण्यात आले आहे. या चित्रपटात संदीप पाठक, देवदत्त नागे, शशांक शेंडे, प्रा...

पंढरपूर येथे युवकाची अत्यंत निर्घृण हत्या, पाय घराच्या दारावर टांगण्यात आला.

Image
 पंढरपूर येथे युवकाची अत्यंत निर्घृण हत्या, मृतदेह रेल्वे पुलावर टाकून एक पाय घराच्या दारावर टांगण्यात आला. प्रतिनिधी पंढरपूर _पंढरपूर शहरात धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी खुनाची घटना घडली असून या अत्यंत निर्घृणपणे केलेल्या हत्येने शहर व परिसरात दहशतीचे, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खुनाची ही घटना मंगळवारी दी.१६रोजी सकाळी उघडकीस आली आहे. अनिलनगर भागातील रोहित मधुकर कोरे (वय २४,रा. अनिलनगर झोपडपट्टी)याचा त्याच परिसरात राहणाऱ्या काही युवकांशी सोमवारी रात्री वाद झाला होता, हे भांडण सुमारे दोन महिन्यांपासून सुरू होते, रोहित याने मद्य प्राशन केले होते, सोमवारी रात्री साडे आठ वाजता भांडणे झाली, तेव्हा काही युवकांनी त्याला जिवानिशी ठार मारण्याची धमकी दिली होती.यावर रोहित याने घरच्या लोकांना ही भांडणे वाढण्याची शक्यता बोलून दाखवली होती, पुन्हा रात्री साडे अकरा वाजता काही युवक भांडणे मिटवायची आहेत असे सांगत त्याला घरातून घेऊन गेले आणि पुन्हा त्याला दारू पाजली, रोहित रात्रभर घरी आलाच नाही, त्याला नदीजवळ रेल्वे पुलावर नेऊन मारहाण करण्यात आली आणि मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देण्यात आला, ...

अधिक महिन्यात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास९कोटी ४६लाख रुपये उत्पन्न.

Image
 श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास अधिकमासात ९ कोटी ४६ लाखांचे उत्पन्न, पंढरपूर, दि. १६ : अधिकमास कालावधीत राज्यासह परराज्यातून लाखो भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे हजेरी लावत मोठ्या श्रद्धेने रोख देणगी तसेच सोने-चांदीचे दागिने अर्पण केले. विविध माध्यमांतून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीस एकूण रु. ९,४६,२८,२३३ इतके उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. दि. १७ मे ते १५ जून या अधिकमास कालावधीत भाविकांकडून श्रींच्या चरणी रु. ८१,७२,६७९ अर्पण करण्यात आले. याशिवाय देणगीद्वारे रु. २,०३,५५,१८०, लाडू प्रसाद विक्रीतून रु. ७२,३३,७००, भक्तनिवासातून रु. १,२५,५६,७२३, पूजाविधीमधून रु. ११,०३,४२७, हुंडीपेटीतून रु. २,५३,८२,३४४, सोने-चांदी अर्पणातून रु. १,७८,४३,१६७, तसेच फोटो विक्री, महावस्त्रे, शेणखत, गोमूत्र, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन आदी विविध माध्यमांतून रु. १९,८१,०१३ इतके उत्पन्न प्राप्त झाले. तुलनात्मकदृष्ट्या, सन २०२३ च्या अधिकमासात श्रींच्या चरणी रु. ७३,९५,३५३, देणगी रु. १,५२,९०,३३५, लाडू प्रसाद विक्री रु. ८७...

संवर्धन व विकास करण्यासाठी पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दि.२३व २४रोजी पूर्णपणे बंद राहणार.

Image
 पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार दिनांक २२ ते २४ जून दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे संवर्धन होणार, सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती.  दिनांक २३ व २४ जून रोजी मंदिर दर्शनासाठी राहणार बंद  पंढरपूर, (प्रतिनिधी): श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), राज्य पुरातत्त्व विभाग तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकत्याच दि.११ जून रोजी एस कार्तिकेयन, जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध तज्ज्ञ, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, स्थानिक महाराज मंडळी, मंदिर समितीचे पदाधिकारी, सल्लागार परिषद सदस्य आणि संबंधित अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली होती. प्राप्त तांत्रिक मार्गदर्शन आणि शिफारशींच्या आधारे दिनांक २२ ते २४ जून या कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे संवर्धनाचे काम करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांन...

भारत विकास परिषदेचा दायित्व आणि पदग्रहण समारंभ संपन्न.

Image
 भारत विकास परिषदेचा दायित्व व पदग्रहण समारंभ संपन्न. प्रतिनिधी पंढरपूर _पंढरपूर येथे  भारत विकास परिषद शाखा पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र दायित्व व पदग्रहण कार्यक्रम येथील हॉटेल राधेश के बी पी कॉलेज चौक येथे आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाली. बुधवार  दि. १० जून रोजी सायंकाळी साडे सहा वाजता एकूण सभासद  दायित्व ग्रहण सोहळा झाला, यावेळी व्यासपीठावर  प्रमुख अतिथी मा. श्री. विनय खटावकर विश्वस्त, दिव्यांग केंद्र, पुणे यांच्या हस्ते  प्रमुख पाहुणे सौ. सुजाता खटावकर को-ऑर्डिनेटर, भाविप पॅथॉलॉजी लॅब, पुणे, भारत विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेंद्र काणे,यांच्या प्रमुख उपस्थितीत  कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अॅड. मिलिंद कुलकर्णी व्हा. चेअरमन, सोलापूर जनता सहकारी बैंक यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात सौ माधुरी जोशी यांच्या वंदे मातरम ने झाली. सौ. स्मिता कोंर्टीकर यांची नूतन अध्यक्ष  म्हणून पुन्हा दुसऱ्या वर्षी निवड करण्यात आली.  श्री. महावीर गांधी नूतन उपाध्यक्ष, सचिव  श्री मिलिंद वाघ, उपसचिव श्री मंदार केसकर, खजिनदार श्री ...

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती संवर्धनाबाबत तज्ञांकडून निरीक्षण , होणार संवर्धन.

Image
 श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती  संवर्धनाबाबत तज्ज्ञांकडून निरीक्षण; भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणामार्फत होणार संवर्धन. पुढील आठवड्यात बैठक घेऊन होणार अंतिम निर्णय – जिल्हाधिकारी  कार्तिकेयन एस. पंढरपूर, (प्रतिनिधी): श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूळ मूर्तीचे स्वरूप बदलू नये तसेच मूर्ती संवर्धनाबाबतची‌ प्रक्रिया दीर्घकालीन टिकावी यासाठी मूर्ती संवर्धन तज्ज्ञांकडून निरीक्षण करून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणामार्फत  संवर्धन करण्यात येणार आहे .याबाबत पुढील आठवड्यात  बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी  सांगितले.     श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या संवर्धनासंदर्भात मंदिर समिती, सल्लागार परिषद, स्थानिक महाराज मंडळी तसेच पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक दिनांक ५ जून रोजी दुपारी १२.३० वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास येथे जिल्हाधिकारी तथा सल्लागार परिषदेचे पदसिद्ध सदस्य एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींना झीज होत असल्याने...