Posts

Showing posts from June, 2024

राज्य उत्पादन शुल्क विभागाची हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर कारवाई, सव्वा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त.

Image
 *राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्ट्यांवर जिल्हाभरात छापे*  दोन मोटरसायकलींसह सव्वा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त. प्रतिनिधी पंढरपूर  राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी जिल्हाभरात राबविलेल्या मोहिमेत हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर धडक कारवाई करत वीस गुन्ह्यात 520 लिटर हातभट्टी दारू, 21 हजार 280 लिटर रसायनासह दोन वाहने असा नऊ लाख 18 हजार 602 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.  सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती व विक्री ठिकाणांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून शनिवारी राबविलेल्या विशेष मोहिमेत जिल्हाभरातील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. भरारी पथकाने सोलापूर शहरातील बेडरपूल हद्दीत अर्जुन प्रकाश जाधव वय 23 वर्षे राहणार मुळेगाव तांडा याला मोटरसायकल क्रमांक MH13 CN 4511 वरून मध्ये शंभर लिटर दारूची वाहतूक करताना पकडले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी मुळेगाव तांडा येथे सामूहिक छापा टाकला असता त्या ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणांवरून चौदा हजार चारशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश करण्यात आले. प्रभारी निरीक्...

डॉ मोहन ठाकरे यांना केंद्रीय ऊर्जा विभागाच्या संशोधन विभागाकडून पुरस्कार.

Image
 स्वेरीच्या डॉ. मोहन ठाकरे यांना केंद्रीय ऊर्जा विभागाकडून संशोधन पुरस्कार प्राप्त पंढरपूर-प्रतिनीधी गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. मोहन  पुरुषोत्तम ठाकरे यांना विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट संशोधनाबद्दल दिल्ली येथील केंद्रीय ऊर्जा मंत्रालया अंतर्गत असलेल्या विद्युत विभागाच्या वतीने प्रतिष्ठेचा संशोधन पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ३८ व्या भारतीय अभियांत्रिकी संमेलनाच्या जबलपूर (मध्य प्रदेश) मधील हॉटेल रॉयल ऑर्बिट मध्ये झालेल्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रदान करण्यात आला.          स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या  डॉ. ठाकरे यांच्या ‘इंटरलाइन पॉवर फ्लो कंट्रोलर (आयपीएफसी)’ दीर्घ प्रसारण लाईन्समध्ये तैनात करणे आणि त्याचा डिस्टन्स रिलेसवर होणारा परिणाम’ या शीर्षकाच्या पुरस्कार विजेत्या पेपरला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांच्या या संशोधनाने विद्युत अभियांत्रिकी क्षेत्राला मौल्यवान योग...

मंगळवेढा बस स्थानकाच्या सुधारणेसाठी दोन कोटी 28लाखाच्या कामाचा शुभारंभ.

Image
 *मंगळवेढा बस स्थानकाच्या सुधारणेसाठी मंजूर दोन कोटी 28 लाखाच्या कामाचा आज शुभारंभ* *आ आवताडेंच्या हस्ते होणार भूमिपूजन* प्रतिनिधी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या निधीतून मंगळवेढा तालुक्यातील एसटी स्टँडच्या सुधारण्यासाठी दोन कोटी 28 लाख रुपये आमदार समाधान आवताडे यांनी मंजूर करून आणले असून त्यामधून परिसर सुधारणा करणे,काँक्रिटीकरण करणे या कामाचा शुभारंभ रविवारी सकाळी नऊ वाजता होणार असुन या कार्यकर्त्यांनी सकाळी नऊ वाजता मंगळवेढा बसस्थानक येथे उपस्थित राहण्याचे आवाहन बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी आमदार समाधान आवताडे यांनी बसस्थानकात भेट देऊन बस स्थानकाची परिस्थिती जाणून घेतली होती त्यावेळी बस स्थानकातील अवस्था पाहून त्यांनी आगार प्रमुखांना दुरुस्ती व स्वच्छतेसाठीचा प्रस्ताव तयार करून देण्यास सांगितले होते त्यानुसार बस स्थानकाच्या सुधारण्यासाठी प्रस्ताव तयार करून मंगळवेढा आगार प्रमुखांनी आमदार आवताडे यांचे मार्फत शासनास सादर केला होता, त्यानुसार बस स्थानक परिसर काँक्रिटीकरण करणे व परिसराची सुधारणा करणे या कामासाठी दोन कोटी 28 लाख रुपये...

मंदिर समितीच्या वतीने भक्त निवास येथे भाविकांसाठी उपहारगृह.

Image
 श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथील उपहारगृह मंदिर समिती मार्फत सुरू                                                                                        कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके. भाविकांना मिळणार माफक दरात उत्तम भोजन.                 पंढरपूर (प्रतिनिधी) श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंढरपूर शहरात भक्ती मार्गावर सुसज्ज अशा श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाची उभारणी करण्यात आली आहे. या भक्तनिवासामध्ये उपहारगृहाची देखील निर्मिती करण्यात आली आहे. सदरचे उपहारगृह चालविण्यास देणेकामी ई लिलाव राबविण्यात आला होता. तथापि, सदर ई लिलावातील सर्व लिलावधारकांनी माघार घेतल्याने, सदरचे उपहारगृह मंदिर समिती मार्फत प्रायोगित तत्वावर चालविण्याचा निर्णय मंदिर सम...

आ. आवताडे यांच्या सूचनेनसार मंत्रिमंडळात दूध दराबाबत बैठक.

Image
 आमदार आवताडे यांच्या मागणीनुसार दूध दराबाबत शनीवारी मंत्रालयात बैठक . पंढरपूर प्रतिनिधी - नुकतीच दोन दिवसांपूर्वी आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील दूध संस्था चालक व उत्पादकांशी विचार विनिमय बैठक घेत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व या दुध दरवाढीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून तुमच्या सर्व मागण्या त्यांच्यासमोर मांडणार असे आश्वासन दिले होते त्यानुसार आमदार आवताडे यांनी गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन उत्पादक शेतकरी व संस्थाचालकांच्या मागण्यांचे पत्र संबंधित मंत्र्यांना दिले असता या दुध दरवाढ प्रश्नी तात्काळ बैठक लावण्याचे आदेश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी महसूल मंत्री तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिल्यानंतर दुग्धविकास मंत्र्यांनी शनिवारी सायंकाळी पाच वाजता त्यांच्या दालनात बैठक आयोजित केली असल्याची माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली. आमदार समाधान आवताडे यांनी मंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मागील तीन महिन्यात तापमानात झालेल...

आमदार समाधान आवताडे यांना तालिका अध्यक्षपदाची संधी.

Image
 *आ. समाधान आवताडे यांना तालिका अध्यक्ष पदाची संधी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह . पंढरपूर/ प्रतिनिधी पंढरपूर-मंगळवेढ्याचे भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांचे पावसाळी अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी तालिका अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांच्या या निवडीने मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे पहिल्यांदाच पोटनिवडणुकीमध्ये निवडून गेलेले आमदार समाधान आवताडे यांना स्व. आमदार भारत भालके नंतर तालिका अध्यक्ष पदाचा मान मिळाला आहे त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात केलेले काम पाहून  पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.             विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन  सुरू झाले आहे.विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षांची तालिका अध्यक्ष म्हणून पाच जणांची निवड केल्याची घोषणा करण्यात आले.                                                                  ...

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई.

Image
 अवैध वाळू वाहतुकीवर  महसूल प्रशासनाची कारवाई                                                                       पंढरपूर प्रतिनिधी:-  अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी  विरोधात  पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या  भरारी पथकाव्दारे पंढरपूर येथील  चंद्रभागा  नदीपात्रात वाळू चोरीसाठी वापरण्यात येणारे 4 तराफे नष्ट केले तर शिरढोण येथे वाळू उपसा करत असताना   एक जेसीबी नष्ट करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे  यांनी दिली. पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध  वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इतापे व तहसिलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पंढरपूर येथील चंद्रभागा नदी पात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे सुमारे द...

पंढरपूर भा ज पा च्या वतीने खा. ओवेसीं यांच्या निषेधार्थ आंदोलन.

Image
 भा ज पा च्या वतीने असुद्दिन ओवेसी यांच्या निषेधार्थ आंदोलन, प्रतिनिधी पंढरपूर -भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर च्या वतीने आज श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हैदराबादचे एम आय एम पक्षाचे नवनिर्वाचित खासदार असुद्दीन ओवेसी यांनी काल शपथ घेताना जय पिलिस्थिन चा नारा दिला त्याच्या  निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ओविसी मुर्दाबाद चे नारे दिले व त्यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी केली. प्रथमता हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले.  यावेळेस माजी शहराध्यक्ष शिरीष कटेकर धीरज म्हमाने (शहर संघटक भाजपा)संदीप माने (जिल्हा उपाध्यक्ष भाजपा) बादलसिंह ठाकुर (जिल्हा चिटणीस भाजपा) पिराजी धोत्रे(जिल्हा उपाध्यक्ष भाजपा)  कुमार बंदपट्टे(कामगार आघाडी शहराध्यक्ष)  नितीन धोत्रे (पंचायतराज शहराध्यक्ष) दत्तात्रय शिंदे(पंचायत राज जिल्हा उपाध्यक्ष) नितीनजी करंडे (जिल्हा सचिव भाजपा) प्राजक्ता बेणारे(जि...

पंढरपूर उप जिल्हा रुग्णालय विस्तरिकरणाचा शुभारंभ आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या हस्ते संपन्न.

Image
 देशाच्या विकासात आरोग्य विभागाचे भरीव योगदान                                                     - सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत                    पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीकरण कामाचे आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन            पंढरपूर, दि. 24: पंढरपूर शहराची लोकसंख्या, शहरात येणाऱ्या भाविकांची दररोजची संख्या, लक्षात घेता. नागरिकांना व भाविकांना  चांगली आरोग्य सुविधा मिळावी. जागेवरच उपचार मिळावेत म्हणून उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे 100 खाटांच्या रुग्णालयाचे 200 खाटांच्या रुग्णालयात विस्तारिकरण करण्यात येत आहे. यामुळे येथे उपचाराकरीता येणार्‍या रुग्णांची, भाविकांची आरोग्य सेवा करण्याची संधी मिळत आहे. आरोग्य विभागाने कोरोना काळात चांगले काम केले आहे. चांगल्या कामाची देशासह संपुर्ण जगाने दखल घेतली आहे. आरोग्य विभागाने माता सुरक्षा घर सुरक्षा अ...

आषाढी वारीत मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन.

Image
 आषाढी यात्रेदरम्यान ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’                                                       सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत           मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन : पालखी सोहळा प्रस्थानापासून आरोग्य यंत्रणा कार्यरत            पंढरपूर, दि. 24: आषाढी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी, भाविक येतात. येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ह्या संकल्पनेवर आधारित वारी कालावधीत प्रत्येक भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ह्यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथके मागविण्यात येणार आहेत. तसेव पालखी सोहळा प्रस्थानापासून वारकरी भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत राहणार असल्याचे सार्वजनिक...

आषाढी वारीत भक्तिसागर येथे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.

Image
 आषाढी यात्रा सोहळा;  पालखी, दिंडीधारकांनी आगाऊ प्लॉटसची मागणी नोंदवावी भक्तीसागर येथे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य राहील पंढरपूर :-  आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा दि. 17 जुलै रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने जिल्हा प्रशासन नियोजनाच्या बैठक घेत कामाला लागले आहे. आषाढी यात्रेत येणार्‍या शेकडो दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तीसागर (65 एकर) येथे जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या ठिकाणी 497 मोफत प्लॉटस भाविकांना तंबू, राहुट्या उभारुन वास्तव्य करण्यासाठी देण्यात येत आहेत. प्रथम येणार्‍या पालखी, दिंडी धारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.         चैत्री, कार्तिकी,आषाढी, माघी या वर्षभरातील महत्वाच्या चार यात्रांना लाखोंच्या संख्येने भाविक येतात. आषाढी यात्रा ही सर्वात मोठी यात्रा असते. या यात्रेला शेकडो संतांच्या पालख्या मजल दरमजल करत पंढरपूरला येतात. सद्याआषाढी यात्रा सोहळ्यासाठी  अनेक संतांच्या पालख्या, दिंड्यांचे प्रस्थान झाले आहे तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या पालख्यांच्या प्रस्थान होणार आहे. या य...

आषाढी वारी पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी 5जुलै च्या आत सर्व कामे पुर्ण करावीत.- डॉ नीलम गोऱ्हे.

Image
 आषाढीवारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संबधित विभागांनी सर्व कामे 5 जुलै पर्यत पुर्ण करावीत.                                                                           -विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे.            पंढरपूर प्रतिनिधीं,  - आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. पालखी सोहळ्यासोबत येणा-या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर तसेच यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात व परिसरात सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांना कोणतीही अडचण येऊ याची दक्षता घेवून संबधित विभागांनी सर्व कामे दि.5 जुलै     पर्यत पुर्ण करावीत अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिल्या.                    ...

आषाढी वारीत आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य द्यावे.- अनिरुद्ध जेवळीकर.

Image
 आषाढीवारीत भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य द्यावे                                                                             नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुध्द जेवळीकर                                         अत्यावश्यक सुविधांची कामे  30 जून पर्यत पुर्ण करावीत              पंढरपूर, प्रतिनीधी - आषाढी यात्रा कालावधी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पालखी सोहळ्यासोबत राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यांतून लाखो वारकरी भाविक येतात. वारी कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य देवून आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच अत्यावश्यक सुविधांची कामे  30 जून पर्यत पुर्ण करावीत अशा सुचना नगर विकास विभाग...

आषाढी एकादशी शासकिय. महापुजेसाठी मानाच्या पालख्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रण.

Image
 *आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मानाच्या पालख्यांच्या प्रतिनिधीना निमंत्रण ;*  कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती.  पंढरपूर (ता.17):- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा बुधवार दिनांक 17 जुलै, 2024 रोजी  संपन्न होणार असून, या दिवशी पहाटे 2.20 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक  करण्यात येणार आहे. या महापूजेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच इतर मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकारी, मंदिर समितीचे व सल्लागार परिषदेचे पदाधिकारी उपस्थित असतात.  आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय यांनी नियोजन आढावा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मानाच्या पालखीच्या विश्वस्तांनी शासकीय महापूजेसाठी मंदिर समितीकडून निमंत्रण मिळावे अशी मागणी केली होती. त्यावर मंदीर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी त्यांची मागणी मान्य करून, या प्रमुख 10 मानाच्या पालख्यांना प्रत्येकी दोन निमंत्रण पत्रिका देऊन सन्मानपूर्वक शासकीय महापूजेला आमंत्रित करण्...

आषाढी यात्रा सोहळ्यासाठी प्रशासनाचे कालबध्द नियोजन.- जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर.

Image
 आषाढी यात्रा सोहळ्यासाठी प्रशासनाचे कालबध्द नियोजन                                                          -अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर              पंढरपूर, दि. 20: -आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. पालखी सोहळ्यासोबत येणा-या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर कोणतीही अडचण येऊ नये तसेच वारी कालावधीत  येणाऱ्या भाविकांना चांगल्या दर्जाच्या सेवा सुविधा पुरवल्या जातील यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागाचे कालबद्ध नियोजन तयार करण्यात आले आहे. या नियोजनानुसारच कालमर्यादेत सर्व विभागांनी समन्वय राखून काम करावे अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर यांनी दिल्या.            आषाढी वारी पूर्व नियोजनाबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्य...

आषाढी वारीसाठी अप्पर जिल्हाधि कालबध्द नियोजन.कारी ठाकूर यांचे

Image
 आषाढी यात्रा सोहळ्यासाठी प्रशासनाचे कालबध्द नियोजन                                                          -अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर              पंढरपूर, दि. 20: -आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. पालखी सोहळ्यासोबत येणा-या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर कोणतीही अडचण येऊ नये तसेच वारी कालावधीत  येणाऱ्या भाविकांना चांगल्या दर्जाच्या सेवा सुविधा पुरवल्या जातील यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागाचे कालबद्ध नियोजन तयार करण्यात आले आहे. या नियोजनानुसारच कालमर्यादेत सर्व विभागांनी समन्वय राखून काम करावे अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर यांनी दिल्या.            आषाढी वारी पूर्व नियोजनाबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्य...

पंढरपूर नगरपालिका समोर युवक काँगेस चे आंदोलन.

Image
 पंढरपूर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप शिंदे यांनी पंढरपुरातील चोरी गेलेल्या स्वच्छतागृहांसाठी केले आंदोलन पंढरपूर नगरपालिकेने दिले लेखी आश्वासन पंढरपूर- पंढरपूर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप शिंदे यांच्या वतीने  सहा महिन्यापूर्वी पंढरपुरातील चोरी गेलेल्या मुताऱ्या (स्वच्छतागृह) याच्याबद्दल पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव साहेब यांना निवेदन देण्यात आले होते त्यावेळेस जाधव साहेबांनी बर बघू दोन महिन्यांमध्ये करतो असं आश्वासन दिले होते मात्र दोन महिन्यानंतर अनेकदा गेलो तेव्हा अजून सांगितले एक महिन्यांमध्ये करतो असं सहा महिने त्यांनी आम्हाला गाजर दाखवायचं काम केले त्याचा निषेध म्हणून पंढरपूर शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदिप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार दिनांक १९ जून रोजी झोपेचे सोंग घेणाऱ्या नगरपालिका प्रशासनाला जाग करण्यासाठी अनोख्या पध्दतीने आंदोलन करत हलगी व बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले यावेळी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळवजकर यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी स्वरूपात एक महिन्यांमध्ये  काम करतो असं सांगितले मग आंदोलन मागे घेण्यात आले . या ...

तिर्थोदक तृप्तीचे, माझे वसंतकाका.

Image
 तिर्थोदक तृप्तीचे--वसंत काका माझे....⛳⛳ देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे | गोरटे कीं सावळे या मोल नाही फारसे || देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती | वाळवंटातूनसुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती || देखणे ते हात ज्यांना निर्मितीची डोहळे || मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळा || देखणी ती जीवने जी तृप्तीची तिर्थोदके | चांदणे ज्यातून वाहे शुद्ध पार्यासारखे || देखणा देहान्त जो तो सागरी सुर्यास्तसा | अग्नीची पेरून जातो रात्रगर्भी वारसा || कविवर्य बा.भ.बोरकरांच्या कविते मधील या काव्यपंक्ती ज्यांच्या जीवनास तंतोतंत लागू होतात ते माझे सर्वात धाकटे चुलते वै.वसंतराव भगवान उत्पात तथा आमचा बाळकाका दि.१४-६-२०२४ रोजी अचानकच आपल्या वयाच्या ७९ व्या वर्षी इहलोकीची संपंन्न जीवनयात्रा आटोपून अनंताचे प्रवासास निघून गेला. ``चिठ्ठी ना कोई संदेस''   माणूस किती जगला या पेक्षा तो कसा जगला याला फार महत्व आहे.असे म्हणतात किं,जन्म आणि मृत्यु  ईश्वराने आपल्या स्वतःच्या हातात ठेवले आहेत.आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे.परंतु मिळालेले जीवन कसे जगायचे हे मात्र माणसाच्या हातात आहे.आणि तेच जीवन उत्तम पणे जगले आणि जीव...

उत्साही वातावरणात श्री रूक्मिणी विद्यालयात पाठ्यपुस्तकांचे वाटप.

Image
 उत्साही वातावरणात विद्यार्थी स्वागत व पाठ्यपुस्तक वाटप. पंढरपूर प्रतिनिधी - श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित अक्षरनंदन प्राथमिक विद्यामंदिर इसबावी पंढरपूर येथे,,संस्थेच्या सचिवा तथा मार्गदर्शक सौ सूनेत्राताई पवार सो. यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आज शाळेचा पहिला दिवस अतिशय सुंदर वातावरणात साजरा करण्यात आल. आज 15 जून शाळेचा पहिला दिवस,,,अतिशय आनंदाचा नवनवीन मित्रांना व जून्या  मित्रांना भेटण्याचा ,,,या ओढीनेच आज प्रशालेतील वातावरण अतिशय उस्ताही,आनंदाचे  नवीन पुस्तक मिळणार या ओढीचे होते.आजच्या दिवशी भरगच्च भरलेल्या व  कित्येक दिवस शांत शांत असणाऱ्या शाळेत, मुलांचा गोंधळ ऐकून कसे मनाला आनंद वाटत होते.एकमेकांना व शिक्षकांना भेटणारी मुले आपला वर्ग बदल झाल्याचा आनंद व इतरांना केव्हा सांगू अशी ईच्छा बाळगणारे सवंगडी किती छान वाटत होते.प्रशालेच्या वतीने रांगोळी  व स्वागत बोर्ड लिहून फुगे देवून स्वागत करण्यात आले.यावेळी मुलांना काही शाळेविषयी मार्गदर्शक सूचना देवून पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.सहशिक्षक श्री सुसेन गरड सर यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मा...

आदर्श प्राथमिक विद्यालयात पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक वितरण संपन्न.

Image
 आदर्श प्राथमिक विद्यालयात, पहिल्याच दिवशी पाठयपुस्तक वितरण कार्यक्रम . पंढरपूर प्रतिनिधी- शाळेच्या पहिल्याच दिवशी शनिवार दिनांक 15 जून रोजी आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे ढोल पथकाच्या गजरात फुले उधळून औक्षण करून स्वागत करण्यात आले. शाळेबाहेर फुग्यांची सजावट,रांगोळ्या,पानाफुलांच्या कमानी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.पाठय पुस्तक वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री.चिंतामणी उत्पात,संस्थेचे सचिव ऍड. ज्ञानेश आराध्ये, सदस्य प्रशांत कुलकर्णी सर,रेखाताई भालेराव,शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्या,शिशुविहारच्या मुख्याध्यापिका आदिती देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्व विद्यार्थ्यांना शासनातर्फे देण्यात येणारी पाठयपुस्तके मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आली.संस्थेच्या संस्थापिका कै. कुसुमताई आराध्ये आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ.राजश्री घंटी यांनी प्रास्ताविक केले. सौ.सप्ताश्व व सौ.लोणारकर यांनी इशस्तवन सादर केले. सौ.गोरे यांनी पाहुण्यांचा परिचय केला तर सौ.रानडे यांनी आभार म...

धाब्यावर दारू पिणाऱ्या ग्राहकांना व हॉटेल चालकांना कायद्याचा झटका.

Image
 *धाब्यांवर दारु पिणे पडले महागात* 2 हॉटेलचालकांसह 3 मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल मा. न्यायालयाने ठोठावला 59 हजारांचा दंड. पंढरपूर प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी शुक्रवारी सोलापूर शहर परिसरातील दोन धाब्यांवर टाकलेल्या धाडीत मा. न्यायालयाने दोन हॉटेल चालकांसह तीन मद्यपी ग्राहकांना   एकोणसाठ हजार रुपयांचा दंड ठोठावला.   सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी (ता. 14 जून) सायंकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरिक्षक अंजली सरवदे यांच्या पथकाने सोलापूर-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर बाळे  (ता. उत्तर सोलापूर) परिसरातील हॉटेल मनोरमा या ठिकाणी छापा टाकला असता धाबा चालक विश्राम मूलचंद यादव, वय 35 वर्षे हा ग्राहकांना धाब्यामध्ये दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचे दिसून आले. या कारवाईत सुनील शंकर भोसले, वय 44 वर्षे रा. ढोमणे नगर बाळे व विशाल सुरेश जेधे वय 35 वर्षे रा. पद्मावती नगर बाळे या मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या तीन बाटल्या व इम्पेरियल ब्लू व्हिस्कीच्या चार बाटल्...

आषाढी वारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन.

Image
 आषाढीवारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सुक्ष्म नियोजन                                                                  -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मानाच्या पालखी सोहळ्यासोबत नोडल अधिकाऱ्यांची  करण्यात येणार नेमणूक                    पंढरपूर, दि. 12: - आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. पालखी सोहळ्यासोबत येणा-या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर कोणतीही अडचण येऊ नये तसेच आषाढीवारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर आवश्यक सुविधा तत्काळ मिळाव्यात यासाठी  नोडल अधिकाऱ्यांची (वर्ग-1) नेमणूक करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगि...

पंढरपूर येथे घोड्यावरून लाडू वाटत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी चे स्वागत.

Image
 पंढरीत घोड्यावरून बुंदीचे लाडू वाटत साजरा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा  शपथविधी. प्रतिनीधी पंढरपूर - भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शहर कार्यकारणी सर्व शहराचे पदाधिकारी युवा मोर्चा यांच्या वतीने नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असल्याने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोड्यावरून बुंदीचे लाडू वाटत जल्लोष कऱण्यात आला. त्यांच्या शपथविधीच्या निमित्ताने जल्लोष करून एकमेकाला बुंदीचा लाडू भरून आनंद व्यक्त केला. यावेळी पंढरीचे ज्येष्ठ पत्रकार .विलास  उत्पात  तसेच भा ज् पा महीला मोर्चा आघाडी जिल्हाध्यक्षा  डॉ.प्राजक्ता बेणारे,  महीला आघाडी शहरध्यक्षा  डॉ.जोती शेटे सौ.सुजाता वगरे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, सौ.सुप्रिया काकडे जिल्हा सरचिटणीस त्याचबरोबर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख महिला मोर्चा, सौ.शिल्पा म्हमाने शहर उपाध्यक्ष महिला मोर्चा सौ.मेघा मोळक, संघटन सरचिटणीस पंढरपूर शहर, सौ.सुवर्णा कुरणावळ उपाध्यक्ष पंढरपूर शहर, सौ.संगीता कुरणावळ सरचिटणीस पंढरपूर शहर भारतीय जनता पार्...