Posts

पंढरपूर येथे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कपीजी की रसोई, या हॉटेल चे उद्घाटन.

Image
 पंढरपूर येथे  दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कपीजी की रसोई या हॉटेल चे उद्घाटन.  पंढरपूर (प्रतिनिधी )_भारताची दक्षिण काशी पंढरपूर येथे कपिजी की रसोई या नवीन हॉटेल रेस्टॉरंट चे उद्घाटन पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सद्गुरू वेणाभारती, कृष्णामयी, पांडुरंग कृष्णाजी बडवे, हभप मदन महाराज हरिदास, कीर्तनकार मनोहर उर्फ छबुकाका उत्पात , रा. पा कटेकर  आदी मान्यवर उपस्थित होते. आ. आवताडे म्हणाले, भाविकांच्या सोयीसुविधेसाठी अतिशय सात्विक, रुचकर आणि आरोग्यदायी पदार्थ असणे ही काळाची गरज होती, ही बाब कपिजी की रसोई या हॉटेल रेस्टॉरंट ने परिपूर्ण केली आहे. येथील सर्व पदार्थ स्वादिष्ट आणि आरोग्यदायी आहेत. आ प्रशांत परिचारक यांनी या आगळ्यावेगळ्या कार्याला शुभेच्छा दिल्या.पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांची उत्तम सोय होत असल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. सद्गुरू वेणाभारती यांनी सांगितले पंढरपूर येथे हे कार्य सुरू केले आहे या कार्याला विश्व विधाता साक्षात श्री विठ्ठल रुक्मिणी यांचा आशीर्वाद लाभला आहे क...

दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नाशिक येथील सुप्रसिद्ध कपिजी की रसोई, या हॉटेल रेस्टॉरंट चे उद्घाटन.

Image
 दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नाशिक येथील सुप्रसिद्ध कपिकुल हॉटेल रेस्टॉरंट चे उद्घाटन.   पंढरपूर(प्रतिनिधी )_प्रभू श्रीराम यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या नाशिक येथील सुप्रसिद्ध कपिजी की रसोई, हे हॉटेल कम रेस्टॉरंट, कपिकुल शॉपी चे भव्य उद्घाटन दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बुधवार दि २२ऑक्टोबर रोजी  सायंकाळी पाच वाजता श्री कपिकुल सिद्धपीठमचे पीठाधीश्वर श्री महंत सद्गुरू वेणाभारती यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख पाहुणे आ. समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, ह भ प मदन महाराज हरिदास, पांडुरंग कृ बडवे, मनोहर उर्फ छबुकाका उत्पात यांच्या हस्ते चौफाळा येथील राजनरेंद्र बडवे कॉम्प्लेक्स , इंदिरा गांधी भाजी मार्केट समोर येथे होणार आहे. कपिकुल सिद्धपीठमचे साधक यांनी बनविलेले शुद्ध, सात्विक व आरोग्यदायी, चविष्ट पदार्थ या हॉटेल कम रसोई मध्ये उपलब्ध होणार आहेत अशी माहिती श्रीकृष्णमयी यांनी दिली. वेगळ्या चवीचा चहा,बनमस्का, ग्रील सँडविच,पावभाजी, मिल्कशेक कॉम्बो, नाशिक येथील सुप्रसिद्ध मिसळ, आमरस पुरी,वडापाव, सर्वरोग प्रतिकारक, उष्णता कमी करणारे आरोग्यदायी पेय सुवर्ण...

दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नाशिक येथील सुप्रसिद्ध कपिजी की रसोई या हॉटेल, रेस्टॉरंट चे उद्घाटन.

Image
 दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नाशिक येथील सुप्रसिद्ध कपिकुल हॉटेल रेस्टॉरंट चे उद्घाटन. पंढरपूर ( प्रतिनिधी)प्रभू श्रीराम यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या नाशिक येथील सुप्रसिद्ध कपिजी की रसोई, हे हॉटेल कम रेस्टॉरंट, कपिकुल शॉपी चे भव्य उद्घाटन दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बुधवार दि २२ऑक्टोबर रोजी श्री कपिकुल सिद्धपीठमचे उत्तराधिकारी श्री महंत सद्गुरू वेणाभारती यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख पाहुणे आ. समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, ह भ प मदन महाराज हरिदास, पांडुरंग कृ बडवे, मनोहर उर्फ छबुकाका उत्पात यांच्या हस्ते चौफाळा येथील राजनरेंद्र बडवे कॉम्प्लेक्स , इंदिरा गांधी भाजी मार्केट समोर येथे संपन्न होणार आहे. कपिकुल सिद्धपीठमचे साधक यांनी बनविलेले शुद्ध, सात्विक व आरोग्यदायी, चविष्ट पदार्थ या हॉटेल कम रसोई मध्ये उपलब्ध होणार आहेत अशी माहिती श्रीकृष्णमयी यांनी दिली. वेगळ्या चवीचा चहा,बनमस्का, ग्रील सँडविच,पावभाजी, मिल्कशेक कॉम्बो, नाशिक येथील सुप्रसिद्ध मिसळ, आमरस पुरी,वडापाव, सर्वरोग प्रतिकारक, उष्णता कमी करणारे आरोग्यदायी पेय सुवर्णरस, सीतकल्प प्रोटीन शेक...

पंढरीतील रेडीमेड फराळ साता समुद्रापार,

Image
 पंढरीतील तयार दिवाळी फराळला विदेशातून मागणी, ट्रम्प टेरिफ मुळे अमेरिकेत फराळ पाठविणे अशक्य. चैतन्य उत्पात पंढरपूर भारतीय लोकांसाठी दीपावली सण म्हणजे आनंदाचा, दिव्यांचा तेजोमय सण, पण दिवाळी सर्वांच्या कायम लक्षात राहते. ती खुसखुशीत गोडधोड फराळ आणि नानाविध मिष्टान्न यामुळेच. पंढरीत तयार होणाऱ्या फराळाला वेगळी, विशिष्ठ चव असल्याने विदेशात असणारे भारतीयही तयार फराळाला पसंती देत आहेत. फराळामध्ये गत वर्षापेक्षा यंदा २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पूर्वीसारखा साग्र संगीत फराळ आता बनत नाही. कारण महिलावर्ग, गृहिणीकडे तेवढा वेळ नाही. पुणे-मुंबई सारखाच दिवाळी फराळ विकत घेण्याचा ट्रेण्ड आता पंढरपूर शहरातही रुजत आहे. गावातील अनेक महिला, बचतगटातील महिला सदस्य दिवाळी फराळ तयार करून व्यवसाय करीत आहेत. पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे वर्षभर केटरिंग व्यवसाय उत्तम सुरू असतो. कॅटरिंग व्यवसायातील आचारी दिवाळीत मोठ्या प्रमाणात पदार्थ तयार करून व्यवसाय करीत आहेत. यामुळे गरीब, गरजू महिला, कर्मचारी यांनाही ऐन सणासुदीत चांगली कमाई होत आहे. पंढरीतील दिवाळीचा फराळ आता सातासमुद्रापार गेला असून , इंग्लं...

कॉरिडॉर हा मंदिर परिसरातील स्थानिक लोकांवर तिसरा आघात असून तो रद्द झाला नाही तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही._ ह भ प वडगावकर महाराज

Image
 कॉरिडॉर हा मंदिर परिसरातील लोकांवर तिसरा आघात आहे, तो रद्द झाला नाही तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, _वडगावकर महाराज. पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर येथील संभाव्य कॉरिडॉर करण्याआधी राज्यकर्त्यांनी मंदिर परिसरातील संभाव्य बाधितांशी चर्चा केली पाहिजे, या भागातील स्थानिक लोकांवर हा तिसरा आघात असून आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन  तीर्थक्षेत्र बचाव कृती समिती आयोजित सभेत शिवतीर्थ येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष वडगावकर महाराज यांनी केले, यावेळी व्यासपीठावर शंकर महाराज गलगलकर, अध्यक्ष वडगावकर महाराज, कृती समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर, डॉ प्राजक्ता बेणारे, व्यंकटेश गलगलकर, अँड आशुतोष बडवे, रामकृष्ण महाराज वीर, अरविंद बेनारे , आदित्य फत्तेपूरकर, शिरवळकर महाराज, आदी मान्यवर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले अगोदर मास्टर प्लॅन केला, त्यानंतर टेंपल ऍक्ट आणून बडवे उत्पात, सेवाधारी यांची देवळातील सेवा काढून घेतली मंदिराचे सरकारी करण केले आणि आता घरेदारे उध्वस्त करण्यात येत आहेत. आणि अजून पुढे भविष्यात प्राधिकरणाचा धोका आहे, कॉरिडॉर चे पाच टप्पे असून मंदिर परिसरातील स्थानि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीपूर येथे कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण संपन्न.

Image
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण गाळपाचा शुभारंभ. पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात सीबीजी उत्पादन प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू - मुख्यमंत्री पंढरपूर (प्रतिनिधी)कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सीबीजी प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न करावा. केंद्र सरकार देशातील १५ साखर कारखान्यांना यासाठी मदत करणार असून त्यात या कारखान्याचा समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर (ता. माळशिरस) येथे सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, कारखान्याच्या १० हजार टन विस्तारीकरण गाळप, पोटॅश निर्मिती प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रशांत परिचारक आदी उप...

कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये, वाचन प्रेरणा दीन, उत्साहात संपन्न.

Image
 कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये "वाचन प्रेरणा दिन" उत्साहात संपन्न. पंढरपूर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांसाठी विविध पुस्तकांचे व ग्रंथांचे प्रदर्शन. प्रतिनिधी पंढरपूर   श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे येथे भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये विविध पुस्तकांचे व ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.  यावेळी प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध पुस्तके वाचनासाठी प्रोत्साहित केले. तसेच वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञानसंपन्न व माहितीसमृद्ध समाजाची घडण, व्यक्तिमत्त्व विकास, साहित्य विकास आणि भाषाविकास यांसाठी वाचन संस्कृतीचा विस्तार आणि विकास करणे अत्यावश्यक आहे असे सांगून त्यांनी  दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या आणि ठाम आत्मविश्वास असणाऱ्या डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू विद्यार्थ्या...