कर्मयोगी पब्लिक स्कूलचे क्रीडा भारती स्पर्धेमध्ये घवघवीत यश.


कर्मयोगी पब्लिक स्कूलचे क्रीडा भारती स्पर्धेमध्ये घवघवीत यश

पंढरपूर (प्रतिनिधी)

 रविवार दिनांक ८ फेब्रुवारी  रोजी क्रीडा भारती पंढरपूर तर्फे घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये कर्मयोगी पब्लिक स्कूल पंढरपूर च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. ही स्पर्धा एमआयटी विश्वशांती गुरुकुल वाखरी येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये सोलापूर पुणे दौंड मंगळवेढा सांगोला बार्शी येथील वीस शाळा सहभागी झाल्या होत्या. यामध्ये सुमारे एकूण ६०० स्पर्धक सहभागी झाले होते. 

स्पर्धेचे प्रमुख पाहुणे एमआयटी गुरुकुल पंढरपूर चे प्रोजेक्ट डायरेक्टर कर्नल साहेब, प्राचार्य श्री शिवाजीराव गवळी उपस्थित होते.

 तसेच प्रांत मंत्री ज्ञानेश्वर मॅकल, कर्मयोगी पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री सिबा नारायण दास, सोलापूर क्रीडा भारती जिल्हा मंत्री रवी ओहोळ व क्रीडा भारती पंढरपूर तालुका मंत्री दत्तात्रय शिरसट उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी सुरेख कवायत संचलन सादर केले व त्यानंतर वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धां पार पडल्या. यामध्ये कबड्डी, हॉलीबॉल, मैदानी बॅडमिंटन, बुद्धिबळ


, तायक्वांदो,कराटे, जलतरण, क्रिकेट, योगासन या स्पर्धांना सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये कर्मयोगी पब्लिक स्कूल शेळवे यांच्या खेळाडूंनी विविध विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये खालील प्रमाणे यश संपादन केले.

1. आर्यन शिरसट (8 वी ) वयोगट 14 क्रमांक-थाळीफेकप्रथम 

2. गणेश देठे (आठवी) थाळीफेकद्वितीय 

3. तोषीत भुसनर (8 वी) 200 मीटर धावणे प्रथम 

4. सृष्टी नागणे (8वी) थाळीफेक प्रथम 

5. प्रगती सावंत (8वी) थाळीफेक द्वितीय 

6. कल्याणी होळकर (8वी) 200 मीटर प्रथम 

7. हर्षदा लेझे (7वी) गोळा फेक द्वितीय क्रमांक 

8. अर्पिता लोकरे (7वी) गोळा फेक तृतीय क्रमांक 

9. सृष्टी शिंदे (7वी) 200 मीटर धावणे प्रथम 

10. सिद्धी नागटिळक (7वी)200 मीटर धावणे तृतीय क्रमांक 

11. संचिता लोकरे (6वी) गोळा फेक प्रथम क्रमांक 

12. प्रणाली बागल (5वी)100 मीटर धावणे प्रथम क्रमांक 

13. दिग्विजा पवार(5वी) गोळा फेक द्वितीय क्रमांक 

14. सार्थक साळुंखे (7वी) 200 मीटर धावणे प्रथम क्रमांक 

15. स्वरा असबे (5वी) गोळा फेक द्वितीय क्रमांक 

  तसेच सांगी खेळामध्ये 

14 वर्षा खालील मुले क्रिकेट -प्रथम क्रमांक 

14 वर्षा खालील मुले कबड्डी द्वितीय क्रमांक 

17 वर्षाखालील मुले कबड्डी प्रथम क्रमांक 

17 वर्षाखालील मुले हॉलीबॉल तृतीय क्रमांक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले. 

 श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, रजिस्ट्रार गणेश वाळके, मुख्याध्यापक सीबा नारायण दास तसेच शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

या विद्यार्थ्यांना पब्लिक स्कूलचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय शिरसट यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले..

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.