Posts

Showing posts from October, 2023

पंढरीत सहजयोग महोत्सव, सात देशातील २ हजार साधक राहणार उपस्थित.

Image
 पंढरीत सहज योग महोत्सव  सात देशातील २हजार साधक राहणार उपस्थित. पंढरपूर -  ( प्रतिनिधी)जगभरात सहज योग च्या माध्यमातून मानवी जीवनात परिवर्तन घडविणाऱ्या श्री माताजी निर्मला देवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त पंढरपूर येथे दि. १ ते ४नोव्हेंबर सहज योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यास सात देशातील २हजार साधक उपस्थित राहणार आहेत. याबाबत येथील सहज योग साधकांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यास कुमार कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, बाबासाहेब लवटे, युवराज कोळी, सचिन वाघमारे, सांगली येथील शशिकांत कुंभोजकर आदी उपस्थित होते. श्री माताजी निर्मला देवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त देशभरातील प्रमुख शहरात सहज योग महोत्सव आयोजित करण्यात आले आहेत महाराष्ट्रात तीर्थक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी सदर महोत्सव होत असून यास भारतातील तसेच रशिया, फ्रान्स, कझिकस्तान, नेपाळ, अमेरिका आदी देशातील जवळपास २ हजार साधक उपस्थित राहणार आहेत. यामध्ये दि. १नोव्हेंबर रोजी कार रॅली होणार आहे. दि. २ रोजी संत तुकाराम भवन येथे सायंकाळी ५:३० वाजता भजन संध्या, दि. ३ नोव्हेंबर रोजी टिळक स्मारक मैदानात सायंकाळी ...

म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा हिस्सा पूर्ण क्षमतेने द्या.- आ. समाधान आवताडे.

Image
 म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा मंगळवेढेकरांचा हिस्सा पूर्ण क्षमतेने द्या - आ आवताडे  पंढरपूर  प्रतिनिधी -   म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद, पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर बु, सलगर खु, बावची, पौट, आसबेवाडी, लवंगी, शिवणगी, येळगी, सोड्डी, हुलजंती या १९ गावांना १२७० एमसीएफटी एवढे पाणी मंजूर असताना केवळ ८० एमसीएफटी म्हणजेच फक्त ६ टक्के पाणी या गावांना आजपर्यंत देण्यात आले आहे. या योजनेतील पूर्ण पाण्याची मागणी केली असता केवळ वेळोवेळी विविध तांत्रिक कारणांचा आधार घेऊन  पाणीवाटपाचा हा कोणता न्याय करण्यात येत आहे ? असा खडा सवाल आ आवताडे यांनी कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित केला. कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन कालवा सल्लागार समितीची बैठक व सन २०२३-२४ मधील रब्बी व उन्हाळी हंगामातील म्हैसाळ  उपसा सिंचन पाणी नियोजन संदर्भात राज्याचे कामगारमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुरेश खाडे...

ाण्याचा पूर्ण हिस्सा मंगळवेढेकराना द्या. आ. समाधान आवताडे.

Image
 म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा मंगळवेढेकरांचा हिस्सा पूर्ण क्षमतेने द्या - आ आवताडे  पंढरपूर  प्रतिनिधी -   म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद, पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर बु, सलगर खु, बावची, पौट, आसबेवाडी, लवंगी, शिवणगी, येळगी, सोड्डी, हुलजंती या १९ गावांना १२७० एमसीएफटी एवढे पाणी मंजूर असताना केवळ ८० एमसीएफटी म्हणजेच फक्त ६ टक्के पाणी या गावांना आजपर्यंत देण्यात आले आहे. या योजनेतील पूर्ण पाण्याची मागणी केली असता केवळ वेळोवेळी विविध तांत्रिक कारणांचा आधार घेऊन  पाणीवाटपाचा हा कोणता न्याय करण्यात येत आहे ? असा खडा सवाल आ आवताडे यांनी कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित केला. कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन कालवा सल्लागार समितीची बैठक व सन २०२३-२४ मधील रब्बी व उन्हाळी हंगामातील म्हैसाळ  उपसा सिंचन पाणी नियोजन संदर्भात राज्याचे कामगारमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुरेश खाडे...

वारी कालावधीत भाविकांना ईतर सोयी सुविधा सह जलद व सुलभ दर्शन व्हावे.- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद.

Image
 वारी कालावधीत भाविकांना सोयी-सुविधांसह सुलभ व जलद दर्शनाबाबत नियोजन करावे                                                                   जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद           पंढरपूर, (प्रतिनिधी )कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. कार्तिकी शुध्द एकादशी गुरूवार, दिनांक २३नोव्हेंबर, २०२३ रोजी असून, यात्रा कालावधी दि.१४ ते २७ नोव्हेंबर असा राहणार आहे. या कालावधीत यात्रा सुमारे ८ ते १० लाख भाविक येतात. येणाऱ्या वारकरी, भाविकांना आवश्यक सोयी सुविधां बरोबरच सुलभ व जलद दर्शन  व्हावे यासाठी  योग्य नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.                   कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे बैठ...

वारी कालावधीत भाविकांना ईतर सोयी सुविधा सह जलद व सुलभ दर्शन vhave- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद.

Image
 वारी कालावधीत भाविकांना सोयी-सुविधांसह सुलभ व जलद दर्शनाबाबत नियोजन करावे                                                                   जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद           पंढरपूर, (प्रतिनिधी )कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. कार्तिकी शुध्द एकादशी गुरूवार, दिनांक २३नोव्हेंबर, २०२३ रोजी असून, यात्रा कालावधी दि.१४ ते २७ नोव्हेंबर असा राहणार आहे. या कालावधीत यात्रा सुमारे ८ ते १० लाख भाविक येतात. येणाऱ्या वारकरी, भाविकांना आवश्यक सोयी सुविधां बरोबरच सुलभ व जलद दर्शन  व्हावे यासाठी  योग्य नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.                   कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे बैठ...

अभिजीत पाटील यांनी फोडली उसदराची कोंडी, पहिली उचल २५५०रू.

Image
 *श्री विठ्ठल कारखान्याची पहिली उचल २५५०रू. उचल जाहीर*  *शेतकऱ्याचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी विठ्ठल कारखाना कटिबद्ध* - चेअरमन अभिजीत पाटील. *अभिजीत पाटलांनी फोडली ऊस दराची कोंडी* *विठ्ठल कारखान्यामुळेच सर्व कारखान्यांना अधिक दर द्यावा लागतोय* - चेअरमन अभिजीत पाटील   पंढरपूर(प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील अर्थवाहिनी म्हणून बघितल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ४२वा गळीत हंगामाचा शुभारंभ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मनोरमा सहकारी बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी शोभाताई मोरे, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे मा.सदस्य अविनाश महागांवकर, जकराया साखर कारखान्याचे चेअरमन बिराप्पा जाधव व कारखान्याचे जेष्ठ सभासद हरी पाटील, खंडू सुरवसे, सुखदेव हाके, औदुंबर पोरे, वसंत वाघ, दगडू भोसले, बब्रुवान भोसले आदी मान्यवरांच्या तसेच पंढरपूरचे समाजसेवक संतोष भाऊ नेहतराव, धनंजय नाना कोताळकर, नगरसेवक प्रताप गंगेकर, महादेव धोत्रे, निलेश आंबरे, लखन चौगुले, बालाजी मलपे, शिवाजी मस्के, ऋषिकेश भालेराव, काकासाहेब पवार, आदित्य फत्तेपूरकर, नागेश गंगेकर, सुध...

आ. समाधान आवताडे यांची संवेदनशीलता, पंढरीत होत आहे कौतुक.

Image
 आमदार समाधान आवताडे यांच्यातील संवेदनशीलतेचे पंढरपूरकरांनी केले कौतुक . पंढरपूर  (प्रतिनिधी) : काल  छत्रपती शिवाजी महाराज यांचे अत्यंत विश्वासू अंगरक्षक जिवाजी महाले यांच्या ३८८व्या जयंती निमित्त सकल नाभिक समाज वतीने कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पंढरपूर - मंगळवेढा आमदार समाधान दादा आवताडे यांनी आपली लोकप्रियता आणि जनसामान्य जनते असणारी संवेदनशीलता दाखवून दिली आहे.  माणसातला देवमाणूस कसा असतो हे आमदार साहेबांनी दाखवून दिले   हिंदवी स्वराज्य भुषण शिवाजी काशिद यांच्या जयंती निमित्त ऐन मिरवणुकीतच नाभिक समाजातील युवक कै.गणेश माने ह्या युवकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले .त्यामुळे कै.गणेश माने यांना सकल नाभिक समाज च्या वतीने त्यांच्या मुलीला आर्थिक मदत म्हणून सकल नाभिक समाजाच्या वतीने बंधू या नात्याने २५ हजार रु. त्यांच्या मुलीच्या नावाने फिक्स डिपॉझिट करण्यात आली. त्यावेळी समाधान दादा आवताडे यांच्या हस्ते ती पुस्तक कू.अनुश्री गणेश माने यांना देण्यात आली नाभिक समाजाची आत्मियता पाहुन दादांनी स्वतः च्या जवळचे अजून रक्कम म्हणून २५ हजार रु .त्याच्यात वाढवून स...

आ. आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली २ ग्रामपंचायत व ६ सदस्य बिनविरोध.

Image
 आमदार आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली मंगळवेढा तालुक्यातील दोन ग्रामपंचायत व सहा सदस्य बिनविरोध. पंढरपूर  प्रतिनिधी - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा तालुक्यातील  हिवरगाव व ब्रह्मपुरी या ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध तर खडकी, लक्ष्मी दहिवडी आणि नंदूर अशा तीन ग्रामपंचायत संस्थामध्ये सहा सदस्य बिनविरोध झाल्याने तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर आमदार आवताडे यांचे वर्चस्व पुनश्च सिद्ध झाले आहे. मंगळवेढा तालुक्यातील होऊ घातलेल्या २७ ग्रामपंचायती पैकी अर्ज काढून घेण्याच्या शेवटच्या दिवशी हिवरगाव, ब्रह्मपुरी या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध तर लक्ष्मी दहिवडी ग्रामपंचायत मध्ये आमदार आवताडे गटाच्या चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तसेच नंदुर आणि खडकीचे प्रत्येकी एक ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत संस्थांवर पकड आणखी घट्ट करुन आमदार समाधान आवताडे यांनी सर्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दमदार सुरुवात केली. बिनविरोध निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा व लोकनियुक्त सरपंच यांचा जन...

कार्तिकी वारी नियोजनासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील दि ३ नोव्हेंबर रोजी घेणार आढावा बैठक.

Image
 पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  कार्तिकी यात्रा नियोजनाचा दुरदृष्य प्रणालीद्वारे घेतला आढावा.  पंढरपूर येथे ३ नोव्हेंबर रोजी संभाव्य दौऱ्याप्रसंगी आढावा बैठक घेण्यात येणार   पंढरपूर (प्रतिनिधी) :- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. कार्तिकी शुध्द एकादशी गुरूवार, दिनांक २३नोव्हेंबर, २०२३रोजी असून, यात्रा कालावधी दि.२४ते २७ नोव्हेंबर असा राहणार आहे. या यात्रा कालावधीत सुमारे २० ते १२लाख वारकरी, भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना सुरक्षा व आवश्यक सोयी सुविधांच्या उपलब्धता च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व मंदिरे समितीने केलेल्या नियोजनाचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे आज घेतला.       यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदीर समितीचे  कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके दुरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.        यावेळी कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने मंदीर समिती व प्रशासनाकडून वारकरी भाविकांना देण्यात ये...

पंढरपूर न प कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी निदर्शने.

Image
 पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्या  वतीने नगर पालिका कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांबाबत निदर्शने. पंढरपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य नगरपंचायत नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यासाठी ३० ऑक्टोंबर २०२३ रोजी बेमुदत आमरण उपोषण  करण्याचा निर्णय राज्य संघर्ष समितीने घेतलेला आहे . महाराष्ट्रातील नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी दिनांक २० मार्च २०२३ रोजी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व सर्व सचिवांसह मीटिंग झाली होती . या मीटिंगमध्ये अनेक निर्णय होऊन  सुद्धा अद्यापपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे मा आयुकत तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांचे कार्यालया समोर पाच हजार नगरपरिषद कर्मचाऱ्यांसह  बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय राज्याचे कामगार नेते डॉ.डी एल कराड, अँड. सुरेश ठाकूर, डी.पी शिंदे, रामगोपाल मिश्रा, संतोष पवार, अनिल जाधव, अँड.सुनिल वाळूजकर यांच्या नेतृत्वाखाली  घेण्यात आला आहे . त्यास अनुसरून आज या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्...

भारतीय परंपरेचा ऱ्हास रोखण्यासाठी पुणे ते पंढरपूर सायकल वारी.

Image
 भारतीय परंपरा चा ऱ्हास रोखण्यासाठी पुणे ते पंढरपूर, सायकल वारी. प्रतिनिधी. पंढरपूर -धार्मिक कार्यक्रम हिंदूच्या विविध सण, उत्सवात परंपरा जपण्याचा नावाखाली होणारे बीभत्स प्रकार व संस्कृतीचा ऱ्हास रोखण्यासाठी पुणे ते पंढरपूर, पंढरीची वारी, सायकल वारी, हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी दि २१ ऑक्टोबर रोजी पहाटे पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून या सायकल वारी ची सुरुवात झाली. यावेळी नंदकुमार एकबोटे, ह भ प निंबाळकर महाराज उपस्थित होते. पुणे ते पंढरपूर या अंतरा दरम्यान वारी मार्गावर येणाऱ्या सर्व गावात थांबून भारतीय सण, परंपरा उत्सवांचे विकृतीकरण थांबविण्यासाठी जनजागृती करण्यात आली. या काही वर्षात हिंदू सण परंपरा साजरे करताना अनेक गैरप्रकार घडताना दिसत आहेत. दहीहंडी उत्सवात तोकड्या कपड्यातील मुलींचा नंगानाच, अश्लील शब्द असलेली हिंदी गाणी,गणेशोत्सवात दारू पिऊन बीभत्स नाच, मोठ्या आवाजातील डॉल्बी स्टिरीओ असे  अनेक गैरप्रकार होत आहेत. महापुरुषांच्या  जयंतीत  डॉल्बीवरील  कर्णकर्कश  संगीताने पंढरपूर येथील दोन युवकांचा हृदयविका...

भारतीय परंपरेचा ऱ्हास रोखण्यासाठी पुणे ते पंढरपूर सायकल वारी.

Image
 भारतीय परंपरा चा ऱ्हास रोखण्यासाठी पुणे ते पंढरपूर, सायकल वारी. प्रतिनिधी. पंढरपूर -धार्मिक कार्यक्रम हिंदूच्या विविध सण, उत्सवात परंपरा जपण्याचा नावाखाली होणारे बीभत्स प्रकार व संस्कृतीचा ऱ्हास रोखण्यासाठी पुणे ते पंढरपूर, पंढरीची वारी, सायकल वारी, हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी दि २१ ऑक्टोबर रोजी पहाटे पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून या सायकल वारी ची सुरुवात झाली. यावेळी नंदकुमार एकबोटे, ह भ प निंबाळकर महाराज उपस्थित होते. पुणे ते पंढरपूर या अंतरा दरम्यान वारी मार्गावर येणाऱ्या सर्व गावात थांबून भारतीय सण, परंपरा उत्सवांचे विकृतीकरण थांबविण्यासाठी जनजागृती करण्यात आली. या काही वर्षात हिंदू सण परंपरा साजरे करताना अनेक गैरप्रकार घडताना दिसत आहेत. दहीहंडी उत्सवात तोकड्या कपड्यातील मुलींचा नंगानाच, अश्लील शब्द असलेली हिंदी गाणी,गणेशोत्सवात दारू पिऊन बीभत्स नाच, मोठ्या आवाजातील डॉल्बी स्टिरीओ असे  अनेक गैरप्रकार होत आहेत. महापुरुषांच्या  जयंतीत  डॉल्बीवरील  कर्णकर्कश  संगीताने पंढरपूर येथील दोन युवकांचा हृदयविका...

सौ लक्ष्मी बडवे संचालित नटराज भरतनाट्यम यांच्या वतीने वसुधैव कुटुंबकम, शास्त्रीय नृत्याविष्कार.

Image
 सौ. लक्ष्मी बडवे संचलीत नटराज भरतनाट्यम क्लासेसच्या वतीने " वसुधैव कुटुंबकम"या शास्त्रीय नृत्याविष्कार कार्यक्रम संपन्न. पंढरपूर (प्रतिनिधी)      शारदीय नवरात्रौत्सव औचित्य साधून प्रतिवर्षी प्रमाणेच याहीवर्षी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सहकार्याने सौ. लक्ष्मीताई बडवे यांच्या वतीने वसुधैव कुटुंबकम हा शास्त्रीय नृत्य कलाविष्कार तुकाराम भवन येथे संपन्न झाला.            सुरुवातीला पंढरीतील नामवंत स्त्री रोग तज्ञ डॉ. वर्षाताई काणे, डॉक्टर प्रसाद कुलकर्णी, अभिनेते व कलासाधना सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत महाजन बडवे व नटराज भरतनाट्य क्लासेसच्या संस्थापिका लक्ष्मीताई बडवे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.         गणेश वंदना या नृत्याविष्काराने सुरु झालेल्या या कार्यक्रमात अनेक कलाविष्कार सादर झाले. त्यापैकी पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे, स्त्री शक्तीचा आलेख मांडणारा वंदेमातरम तर जातीपातींच्या पेक्षा राष्ट्र मोठे हे सांगणारा माणसानी माणसाशी माणसासम ...

श्रीनाथ बचतगटाच्या सौजन्याने भंडीशेगाव जि प शाळेस आर ओ वॉटर प्लॅन्ट

Image
 श्रीनाथ बचतगटाच्या सौजन्याने जि.प.प्रा. भंडीशेगाव शाळेस आरओ वॉटर प्लॅन्ट  भेट  पंढरपूर( प्रतिनिधी)भंडीशेगाव येथील श्रीनाथ बचतगटाने सामाजिक बांधीलकी जपत जिल्हा परिषद भंडीशेगाव  शाळेस वॉटर प्लॅन्ट भेट देऊन नवा आदर्श निर्माण केला.या वेळी झालल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष संतोषजी माने तर प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या सरपंच मनिषाताई यलमार,या होत्या.           या वेळी श्रीनाथ बचतगटाचे अध्यक्ष मनोहर यलमार यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेतील चिमुकल्यांसाठी निर्धोक पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे भाग्य लाभल्याचे व यापुढेही बचतगटाच्या माध्यमातून शाळेस मदत करण्याचे आश्वासन दिले. बचतगटाचे सदस्य राहुल लाडे यांनी मनोगतातून बचतगटाचा हेतू हा विधायक सामाजिक कार्य करण्याचा असून  चिमुकल्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून खरा आनंद गवसल्याचे सांगितले.        भंडीशेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख खाडे सर , शा. व्य.स. चे अध्यक्ष संतोष माने यांनी मनोगतातून बचत गटातील सर्वांच्या कौतुकास्पद कार्यास शुभेच्छा दिल्या .    यावेळी ...

सांगोला साखर कारखान्यात बॉयलर व मोळी पूजन संपन्न.

Image
 *सांगोला साखर कारखान्याचे बॉयलर व मोळीपूजन शुभारंभ उत्साहात संपन्न* *४लाख मे.टन गाळप करण्याचे उद्दिष्ट* - अभिजीत पाटील *कामगारांना दिवाळी सणासाठी १५ दिवसांचा पगार बोनस जाहीर* - अभिजीत पाटील  *पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना न्याय देऊ* - अभिजीत पाटील पंढरपूर (प्रतिनिधी) धाराशिव साखर कारखाना युनिट ४ सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना वाकी-शिवणे या कारखान्याच्या सन २०२३-२४-या ९वा गाळप  हंगामाचा  बॉयलर अग्निप्रदीपन व मोळी पूजन समारंभ  ह.भ.प.ज्ञानेश्वर (माऊली) पवार महाराज तसेच सांगोलाचे आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, शेकापचे नेते डॉ.बाबासाहेब देशमुख, युवा नेते डाॅ.अनिकेत भाई देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न  करण्यात आला . तसेच सौ.प्राजक्ता व धनंजय सुभाष पाटील (गादेगाव) व सौ.प्रियांका व श्री.अभिजीत शहाजी नलवडे( शिरबावी) यांच्या शुभहस्ते सत्यनारायण व महापूजा करण्यात आली.       बारा वर्षे बंद अवस्थेत असलेला सांगोला साखर कारखाना पुन्हा गतवैभवास प्राप्त करण्यासाठी धाराशिव साखर कारखान्याचे संचालक कर्मचारी अधिकारी त...

विविध मागण्यासाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा.

Image
 विविध मागण्यासाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा.  पंढरपूर -(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य नगरपंचायत नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यासाठी दि ३०ऑक्टोंबर २०२३ रोजी बेमुदत आमरण उपोषण  करण्याचा निर्णय राज्य संघर्ष समितीने घेतलेला आहे.   यासाठी राज्यातील सर्व कामगार संघटना एकत्रित करून राज्य संघर्ष समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.  महाराष्ट्रातील नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी दिनांक २० मार्च २०२३ रोजी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सर्व सचिवांसह मीटिंग झाली होती.  या मीटिंगमध्ये अनेक निर्णय होऊन  सुद्धा अद्यापपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे मा आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांचे कार्यालया समोर पाच हजार नगरपरिषद कर्मचाऱ्यांसह  बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय राज्याचे कामगार नेते डॉ.डी एल कराड, अँड. सुरेश ठाकूर, डी.पी शिंदे, रामगोपाल मिश्रा, संतोष पवार, अनिल जाधव, अँड.सुनिल वाळूजकर यांच्या नेतृत्व...

राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार पंढरपूर दौऱ्यावर.

Image
 *खासदार श्री.शरद पवार पंढरपूर दौर्‍यावर* *(महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची पहिली बैठक पंढरपूरात)* *(आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार घेणार मविआ कार्यकर्त्यांची बैठक)* *(शरद पवार काय मंत्र देणार याकडे सर्वांचेच लागले लक्ष)* प्रतिनिधी पंढरपूर :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार श्री.शरदचंद्रजी पवार साहेब, माजी मंत्री श्री.सुशीलकुमार शिंदे, शिवसेना तसेच शेकाप पक्ष, मित्र पक्षांसोबत जिल्हातील अनेक नेते यांच्या उपस्थितीत श्रीयश पॅलेस, पंढरपूर येथे दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ रोजी १२वा. महाविकास आघाडीची महाराष्ट्रातील पहिली बैठक संपन्न होणार आहे.. सदर दौऱ्यात सकाळी १०:०० वाजता कापसेवाडी, ता.माढा येथे द्राक्ष बागायतदार मेळाव्यास श्री.शरद पवार साहेब मार्गदर्शन करतील नतंर हेलिकॉप्टरने १२ वाजता पंढरपूर श्रीयश पॅलेस माहविकास आघाडी बैठक होईल. १ः३० वाजता पंढरपूरचे नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर यांच्या घरी भोजन, दुपारी २ वाजता श्रीक्षेत्र पंढरपूर मंदिरात पांडुरंगाचे दर्शन, २ः३० वाजता ट्युलिप हॉस्पिटल लोकार्पण व ३ः३० वाजता हेलिकॉप्टरने परत पुण्याला रवाना असे कार्यक्रमांचे नियोज...

संशयी नवऱ्याचा बायकोनेच घेतला जीव. नदीत टाकला मृतदेह.

Image
 बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पोत्यात बांधून नदीत टाकला मृतदेह. प्रतिनिधी, पंढरपूर -पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील भीमा नदीच्या बंधाऱ्यात एका  युवकाचे पोत्यात बांधलेले प्रेत आढळल्याने खळबळ उडाली होती, या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता संदीप याची बायको शीतल आणि नातेवाईक मंगेश अंबादास पडळकर (रा.कासेगाव, ता. पंढरपूर) यांनीच संदीप आपली बायको शीतल हिच्यावर संशय घेऊन मारहाण करीत असल्याने त्याचा गळा दाबून ठार केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुरुवार दि.१९ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भीमा नदीच्या पात्रात गुरसाळे बंधाऱ्यात संदीप अर्जुन माने( वय,३४, रा. बामणी, ता सांगोला, हल्ली रा.कासेगाव, ता . पंढरपूर) याचा बारदाना पोत्यात बांधलेला मृतदेह सापडला.होता. ग्रामस्थांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली होती. विशेष म्हणजे आरोपी असलेल्या शीतल हिनेच आपला पती राजस्थान येथे जातो, असे सांगून गायब झाला असल्याची तक्रार दिली होती. संदीप माने आपली पत्नी शीतल हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत असे. या प्रकरणी आरोपी पत्नी शीतल व नातेवाईक मंगेश पडळकर यांनी ४ दिवसांची पोली...

तिसंगी तलाव भरून घेणार. आ. समाधान आवताडे.

Image
 *तिसंगी तलाव भरून घेणार-आ समाधान आवताडे* १०नोव्हेंबर ला आवर्तन सुटणार*  पंढरपूर (प्रतिनिधी ) वीर भाटगर धरणातून नीरा उजवा कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार असून त्या लाभक्षेत्रातील ९ गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे अशी माहिती आ समाधान आवताडे यांनी बोलताना दिली  रब्बी हंगाम २०२३-२४ मधील खडकवासला, पवना,भामा, आसखेड, चासकमान प्रकल्प तसेच नीरा उजवा व डावा कालवा प्रकल्प सल्लागार समिती सदस्यांची व सिंचन पाण्याचे नियोजन या सदर संदर्भात विचारविनिमय बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री मा.ना.श्री.अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व विधान परिषद माजी सभापती श्री.रामराजे नाईक निंबाळकर यांच्या व शासकीय व अशासकीय सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.  यामध्ये निरा भाटघरचे पाणी वितरिका क्रमांक ७ मधून उंबरगाव-बोहाळी-कोर्टी या ओढ्याला पाणी सोडण्यात यावे जेणेकरून जवळच्या गावातील पाणी पुरवठा होत असणाऱ्या विहीरीस पाणी वाढून पिण्यास पाणी उपलब्ध होईल व रांझणी येथील पाझर तलाव भरून घेणे गरजेचे आहे .टेल टू हेड प्रमाणे तसेच D3मधून पाणी वित...

मंगळवेढा तालुक्यातील गावांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यासाठी आ. आवताडे यांची मुख्यमंत्र्यांशी भेट.

Image
 मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करण्यासाठी आमदार अवताडे मुख्यमंत्र्याच्या भेटीला. दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश होणार.. मुख्यमंत्र्याचे आश्वासन पंढरपूर (प्रतिनिधी) ट्रिगर च्या आधारे निकष लावून नुकतीच दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर झाली आहे या यादीमधून सात ऑक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयातील निकषानुसार मंगळवेढा तालुक्याचे नाव वगळल्याचे दिसून येत आहे तरी मंगळवेढा तालुका हा आवर्षण प्रवण तालुका आहे मोठ्या प्रमाणावर पावसाचा खंड पडल्याने हंगाम वाया गेला आहे ५०  टक्के पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे त्यामुळे तात्काळ दुष्काळ यादीमध्ये तालुक्याचा समावेश करावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांना सूचना देऊन अहवाल मागवून घेतला आहे अशी माहिती आमदार समाधान आवताडे यांनी बोलताना दिली.  आ आवताडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रामध्ये असे म्हटले आहे की मंगळवेढा तालुक्यामध्ये सध्या चाऱ्याची परिस्थिती गंभीर झाली असून मिळत त्या भावाने ...

पंढरपूर न पा सी ओ पदी डॉ प्रशांत जाधव, माळी यांची बदली.

Image
 पंढरपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी डॉ. प्रशांत जाधव यांनी कार्यभार स्वीकारला. पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहा. आयुक्त डॉ. प्रशांत जाधव यांनी आज पंढरपूर नगर परिषदेचा कार्यभार स्वीकारला यानिमित्त पंढरपूर नगर परिषदेच्या  सर्व विभाग प्रमुखच्या  वतीने नूतन मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांचा सत्कार उपमुख्याधिकारी अँड.सुनील वाळूजकर यांच्या  हस्ते करण्यात आला,  यावेळी नगर अभियंता प्रवीण बैले,नेताजी  पवार.अभियंता सोमेश धट,सुहास झिंगे, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, कर अधिकारी  सुप्रिया शिंदे, कार्यालय अधीक्षक जानबा कांबळे, जनसंपर्क अधिकारी अस्मिता निकम, पाणी  पुरवठा अभियंता राजकुमार काळे, अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले, विद्युत अभियंता राजकुमार सपाटे, मुख्य लेखापाल अभिलाषा नेरे, बाजीराव जाधव, चिदानंद सर्वगोड,गणेश धारूरकर,अनिल अभंगराव, राहुल शिंगाडे, कृष्णात जगताप,प्रीतम येळे,संतोष शिरसागर, ऋषी अधटराव,संजय माने,संतोष कसबे,योगेश काळे,त...

स्वेरी मध्ये, अँडवांसड इंडस्ट्रिअल अँ, या विषयावर कार्यशाळा.टोमेशन

Image
 स्वेरीमध्ये ‘अॅडव्हान्स्ड इंडस्ट्रीयल अॅटोमेशन’ या विषयावर कार्यशाळा संपन्न ‘स्वेरी’ व ‘इंडवेल ऑटोमेशन, मंगळूर’ यांच्यामध्ये सामंजस्य करार पंढरपूर-(प्रतिनिधी )गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड अँण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या  विभागाच्या वतीने दि.२५ सप्टेंबर २०२३ ते ०५ ऑक्टोबर २०२३ या  दरम्यान 'अॅडव्हान्स्ड इंडस्ट्रीयल अॅटोमेशन’ या विषयावर दहा दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.            स्वेरी नेहमीच विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली, स्वेरीच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या सहकार्याने व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या अभ्यासपूर्ण कार्यशाळेत विभागाच्या अंति...

श्री एकनाथी भागवत गजारुढ ग्रंथदिंडी सोहळा उत्साहात संपन्न.

Image
 श्री एकनाथी भागवत ग्रंथाचा वैभवशाली गजारुढ ग्रंथ दिंडी सोहळा संपन्न .               पंढरपूर(प्रतिनिधी) पंढरीत आज भव्य दिव्य असा श्री एकनाथी भागवत गजारुढ ग्रंथ दिंडी सोहळा संपन्न झाला.  वारकरी संप्रदायातील आधाराचा स्तंभ ('खांब') अशी ओळख असणारा 'श्री एकनाथी भागवत ' ग्रंथ. हा श्री संत एकनाथ महाराज लिखीत श्रीमद् भागवत ग्रंथाच्या एकादश स्कंधावरील प्राकृत ग्रंथ . श्रीज्ञानेश्वरी श्रीतुकाराम गाथा व एकनाथी भागवत हे वारकरी संप्रदायात प्रस्थानत्रयी ग्रंथ मानले जातात. यातील एकनाथी भागवत ग्रंथास या वर्षी (शके १९४५) ४५० वर्षे पूर्ण होत आहेत.तर एकनाथ महाराजांच्या जलसमाधीस ४२५ वर्षे पूर्ण होत आहेत. ज्यावेळी हा ग्रंथ स्वतः संत एकनाथ महाराज यांनी श्रीकाशी येथे लिहून पुर्ण केला त्यावेळी तेथील विद्वानांनी प्राकृत भाषेतील या अलौकीक ग्रंथाचा वैभवशाली सन्मान करण्यासाठी काशीक्षेत्रात या ग्रंथाची हत्तीवरुन गौरव मिरवणूक काढली होती. याच गोष्टीची पुनरावृत्ती आज पंढरपूर येथे झाली.वारकरी संप्रदायासाठी काशीक्षेत्राहूनही महान अशा पंढरी क्षेत्रात आज नवरात्र प्रारंभी हा सोह...

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी अभिजीत पाटील यांचे मोठे योगदान.

Image
 मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी चेअरमन अभिजीत पाटील यांचे मोठ योगदान कार्यकर्त्यांना सभेला जाण्यासाठी शेकडो वाहने अन् रस्त्यात अल्पोपहाराची केली होती सोय पंढरपूर प्रतिनीधी/-  मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे भव्य सभा आयोजीत केली होती. त्या सभेसाठी पंढरपूर आणि मंगळवेढा भागातून हजारो कार्यकर्ते गेले होते. त्या कार्यकर्त्यांना लागणाऱ्या वाहनासाठी डिझेलची व्यवस्था धाराशिव (उस्मानाबाद) येथील धाराशिव साखर कारखान्यावर आणि हजारो कार्यकर्त्यांच्या अल्पोपहराचीही व्यवस्था विठ्ठलचे चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्याचे धाडशी नेते अभिजीत पाटील यांनी केली होती. चेअरमन  अभिजीत पाटील यांच्यावतीने धाराशिव साखर कारखाना येथे अंतरवली सराटी येथील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी या भागातून जाणाऱ्या जवळपास ५०हजार  कार्यकर्त्यांना चहा नास्था ची सोय करून दिली होती. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जवळपास 535 गाड्यांना डिझेल टाकून देण्याची भूमिकाही मराठा समाजाचा प्रतिनीधी म्हणून केली आहे. त्यामुळे पंढरपूर ...

आवताडे शुगर अँड डिस्टलिरीज चा अग्नी प्रदीपन सोहळा.

Image
 आवताडे शुगर अँण्ड डिस्टिलरीज प्रा.लि. चा आज द्वितीय अग्निप्रदीपन सोहळा  पंढरपूर प्रतिनिधी  आवताडे उद्योग समूहातील आवताडे शुगर अँण्ड डिस्टिलरीज प्रा. लि. नंदूर या साखर कारखान्याचा द्वितीय गाळप हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन सोहळा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते आज सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी घटस्थापना या शुभमुहूर्तावर कारखाना कार्यस्थळावर संपन्न होणार असल्याची माहिती चेअरमन संजय आवताडे यांनी दिली आहे. त्याचबरोबर सदर कार्यक्रमाप्रसंगी होम हवन व सत्यनारायण पूजा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. आवताडे शुगरने गतवर्षी प्रथम हंगामामध्ये अतिशय नियोजनबद्ध व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासत यशस्वीपणे प्रथम हंगाम पार पाडला. अगदी त्याच धर्तीवर आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली यावर्षी सुद्धा यशस्वी गाळपाचा मानस डोळ्यासमोर ठेवून हा अग्निप्रदीपन सोहळा सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन संजय अवताडे यांनी केले आहे. संपादक. चैतन्य उत...

पंढरीत ऐतिहासिक एकनाथी भागवत प्रजारुढ ग्रंथ दिंडी सोहळा.

Image
 पंढरीत ऐतिहासिक एकनाथी भागवत गजारुढ ग्रंथ दिंडी सोहळा. पंढरपूर : (प्रतिनिधी) वारकरी संप्रदाय परंपरेतील थोर संत शांतीब्रह्म श्रीएकनाथमहाराज यांच्या जलसमाधीस ४२५ वर्षे तर एकनाथी भागवत ग्रंथास ४५० वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत योगाप्रित्यर्थ ४५० वर्षांपूर्वी नाथमहाराज व ‘भागवत ग्रंथाचा सन्मान’ पवित्र काशीक्षेत्री विद्वानांच्या उपस्थितीत झाला. गजारुढ दिंडी सोहळ्याने अर्थात हत्तीवर ग्रंथ मिरवणूक करुन गौरव झाला होता. त्याच पद्धतीने व त्याच स्मृती जागवण्यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे अश्‍विन शुद्ध १ शके १९४५ घटस्थापना नवरात्रारंभ या शुभदिनी रविवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक ९वा. ग्रंथकौस्तुभ श्रीएकनाथी भागवत गजारुढ ‘ग्रंथ’ दिंडी सोहळा  होणार आहे. ह्या दिंडी सोहळ्याची सुरुवात श्रीसंत नामदेवमहाराज पायरी पासून होऊन संपूर्ण प्रदक्षिणा मार्गे निघेल.           या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती तथा आशिर्वाद श्रीसंत एकनाथमहाराजांचे विद्यमान वंशजांसह सकलसंतांचे वंशज, पंढरपूर येथील सर्व मान्यवर फडकरी, मठाधिपती, संस्थानिक, सर्व वारकरी शिक्षण संस्था सर्व वारकरी संघटन...

लेक लाडकी या योजनेमुळे राज्य सरकारचे शारदीय नवरात्र निमित्त स्त्री शक्तीला नमन.

Image
 लेक लाडकी, या योजनेमुळे राज्य सरकारचे शारदीय नवरात्र निमित्ताने स्त्री शक्तीला नमन.  पंढरपूर (प्रतिनिधी) राज्याच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली लेक लाडकी योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याने महिला सक्षमीकरणाच्या महाराष्ट्राच्या परंपरेत मानाचा नवा तुरा खोवला गेला आहे. केवळ कागदी धोरणे आणि वारेमाप घोषणा करण्याची परंपरा मोडीत काढून घोषणांची अंमलबजावणी करणाऱ्या महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील असंख्य गरीब कुटुंबांतील मुलींचे भविष्य उजळणार आहे, असा विश्वास भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा   डॉ प्राजक्ता बेणारे. यांनी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्तमंत्री या नात्याने राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ‘लेक लाडकी’ योजनेचा तपशील जाहीर केला होता. आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या पूर्वसंध्येस आणि दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही योजना जारी करून देवेंद्र फडणवीस यांनी या संकल्पाची पूर्तता केली आहे, असे त्या म्हणाल्या. मुलींच्या सक्षमीकरणासाठी आण...

अभिजीत पाटील यांना राज्य शासनाचा आदर्श चेअरमन पुरस्कार.

Image
 अभिजीत पाटील यांना महाराष्ट्राच्या सहकार मंत्र्यांकडून आदर्श चेअरमन पुरस्कार प्रदान. आदर्श चेअरमन पुरस्कार हा श्री विठ्ठल कारखान्याच्या सभासदांना समर्पित.  पंढरपूर(प्रतिनिधी) भारत कृषी आणि सहकार प्रधान देश म्हणून ओळखला जातो शेती व सहकार माध्यमातून देशाच्या विकासाला चालना मिळाली आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील एक युवा उद्योजक ज्यांनी अल्पवधीन काळामध्ये सहकार क्षेत्रामध्ये उंच गरुड भरारी घेतली. कोणाच्या दुसऱ्या लाटे मध्ये प्रकल्प बंद करून देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशावरून आपल्या धाराशिव साखर कारखान्यामध्ये देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभा करून लाखो जणांना जीवदान दिले. बारा वर्षे बंद असलेला सांगोला सहकारी साखर कारखाना अवघ्या ३५दिवसात सुरू करून आपल्या कामाची चुणूक दाखवली तसेच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना तीन वर्ष बंद अवस्थेत असताना उत्कृष्ट नियोजन व कामाची सचोटी लावून यशस्वी गाळप केले याच अनुषंगाने चेअरमन अध्यक्ष अभिजीत पाटील यांना दैनिक नवराष्ट्रने आदर्श चेअरमन पुरस्कार म्हणून घोषित केले आहे. मुंबई येथील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे दिनांक १२ऑक्टोबर रोजी दैनिक नव...

आ. समाधान आवताडे यांच्या संवेदनशिलतेचे पंढरीत कौतुक.

Image
 आमदार समाधान आवताडे यांच्यातील संवेदनशीलतेचे पंढरपूरकरांनी केले कौतुक  (प्रतिनिधी) :    छत्रपती शिवाजी महाराज यांचे अत्यंत विश्वासू अंगरक्षक जिवाजी महाले यांच्या ३८८ व्या जयंती निमित्त सकल नाभिक समाज वतीने कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पंढरपूर - मंगळवेढा आमदार समाधान दादा आवताडे यांनी आपली लोकप्रियता आणि जनसामान्य जनते असणारी संवेदनशीलता दाखवून दिली आहे. माणसातला देवमाणूस कसा असतो हे आमदार साहेबांनी दाखवून दिले   हिंदवी स्वराज्य भुषण शिवाजी काशिद यांच्या जयंती निमित्त ऐन मिरवणुकीतच नाभिक समाजातील युवक कै.गणेश माने ह्या युवकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले .त्यामुळे कै.गणेश माने यांना सकल नाभिक समाज च्या वतीने त्यांच्या मुलीला आर्थिक मदत म्हणून सकल नाभिक समाजाच्या वतीने बंधू या नात्याने २५ हजार रुपये त्यांच्या मुलीच्या नावाने फिक्स डिपॉझिट करण्यात आली. त्यावेळी समाधान दादा आवताडे यांच्या हस्ते ती पुस्तक कू.अनुश्री गणेश माने यांना देण्यात आली नाभिक समाजाची आत्मियता पाहुन दादांनी स्वतः च्या जवळचे अजून रक्कम म्हणून २५ हजार रुपये त्याच्यात वाढवून सहकार्य क...

कौठाळी येथे शॉर्ट सर्किटमुळे १७ एकर ऊस जळाला

Image
 *कौठाळी येथे शाॅर्ट सर्किटमुळे १७एकर ऊस जळाला पंढरपूर (प्रतिनिधी)  पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथे ५ आँक्टोबर रोजी  अकरा शेतकऱ्यांचा एकूण १७ एकर ऊस  शॉर्टसर्किटमुळे जळाला आहे.      एम एस ई बी अधिकाऱ्यांच्या  हल गर्जीपणामुळे ऊस जळाल्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी पसरली आहे.    धुळा विठ्ठल वाघमोडे यांचा तीन एकर ऊस, सुरेखा अण्णा वाघमोडे यांचा दीड एकर ऊस, सदाशिव रामचंद्र धुमाळ यांचा दीड एकर ऊस, गणपत रामचंद्र धुमाळ यांचा दीड एकर , विनायक मारुती साबळे यांचा एक एकर,  चंद्रकांत अण्णा देशमुख यांचा एक एकर,अंकुश अण्णा देशमुख यांचा दीड एकर,  सोमनाथ ज्ञानेश्वर धुमाळ यांचा दीड एकर,प्रज्ञाराणी दत्तात्रय लोखंडे यांचा एक एकर,  बंडू वसंत धुमाळ यांचा एक एकर,  पांडुरंग  लोखंडे यांचा एक एकर ऊस अशा एकूण ११ शेतकऱ्यांचा १७ एकर ऊस जळून शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्या मुळे शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी पसरली आहे. संबंधीत शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन  मध्ये तक्रार दाखल केली आहे. कौठा...