मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी अभिजीत पाटील यांचे मोठे योगदान.


 मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी चेअरमन अभिजीत पाटील यांचे मोठ योगदान


कार्यकर्त्यांना सभेला जाण्यासाठी शेकडो वाहने अन् रस्त्यात अल्पोपहाराची केली होती सोय


पंढरपूर प्रतिनीधी/- 


मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे भव्य सभा आयोजीत केली होती. त्या सभेसाठी पंढरपूर आणि मंगळवेढा भागातून हजारो कार्यकर्ते गेले होते. त्या कार्यकर्त्यांना लागणाऱ्या वाहनासाठी डिझेलची व्यवस्था धाराशिव (उस्मानाबाद) येथील धाराशिव साखर कारखान्यावर आणि हजारो कार्यकर्त्यांच्या अल्पोपहराचीही व्यवस्था विठ्ठलचे चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्याचे धाडशी नेते अभिजीत पाटील यांनी केली होती.


चेअरमन  अभिजीत पाटील यांच्यावतीने धाराशिव साखर कारखाना येथे अंतरवली सराटी येथील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी या भागातून जाणाऱ्या जवळपास ५०हजार  कार्यकर्त्यांना चहा नास्था ची सोय करून दिली होती. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जवळपास 535 गाड्यांना डिझेल टाकून देण्याची भूमिकाही मराठा समाजाचा प्रतिनीधी म्हणून केली आहे. त्यामुळे पंढरपूर आणि मंगळवेढा भागातील मराठा समाजातून अभिजीत पाटील यांचे नाव प्राधान्याने घेतले जात आहे.


मागील काही वर्षापासून उद्योजक अभिजीत पाटील यांनी समाजकारण करत असताना आता थेट राजकारणात उडी घेतली आहे. त्यांच्याकडे दानत असल्याने राजकारणातही त्यांना मोठ्या प्रमाणात यश येत आहे. 


मागिल काही वर्षांपासून कोणत्याही सामाजिक कार्यात सढळ हाताने मदत करण्याचे कार्य जोमाने सुरू आहे. प्रत्येक समाजाच्या विविध कार्यक्रमासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन विविध कार्यक्रम भरवून जनमानसात अभिजीत पाटील यांची प्रतिमा उंचावली आहे. त्याचा फायदा त्यांना आगामी काळात नक्की होणार आहे. हे मात्र नक्की झाले आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

मो.९४०३८७३५२३.

९२२६२८२००५.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.