Posts

Showing posts from March, 2024

भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी २९लाख रूपये निधी मंजूर. आ. समाधान आवताडे.

Image
 भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी टंचाई मधून२९ लाख रुपये मंजूर - आ आवताडे प्रतिनिधी,पंढरपुर_ मंगळवेढा तालुक्यातील भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी टंचाई आराखडयामधून २९ लाख ४९ हजार ७९२ रुपये मंजूर केले असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली. सदर योजनेच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात कायमस्वरूपी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारेच या भागाची तहान भागत आहे परंतु या योजनेचे काम अतिशय निकृष्ट झाल्याने लोकांना पिण्यासाठी व्यवस्थित पाणी मिळत नाही सध्या या भागातील बोर विहिरींच्या पाण्याची पातळी खोलवर गेली असल्यामुळे दुसरा पाण्याचा स्त्रोत नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी खूप हाल होत आहेत या योजनेत असणाऱ्या गावांना टँकरही दिले जात नाहीत त्यामुळे तात्काळ या योजनेच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा तसेच ज्या ठिकाणी ही योजना पोहोचली नाही त्या वाड्या वस्त्यांवर टँकर मंजूर करावा अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी पत...

मंदिर समिति कर्मचारी कुलकर्णी यांचा हृदयविकाराने मृत्यू.

Image
 मंदिर समितीचे कर्मचारी चैतन्य कुलकर्णी यांचे दुःखद निधन प्रतिनिधि पंढरपूर           श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर मध्ये आस्थापना व लेखा विभागात कार्यरत असलेले कर्मचारी चैतन्य कुलकर्णी यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.  कुलकर्णी हे अत्यंत मनमिळावू कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहीण आहे. टाकळी रोड, पंढरपूर येथील रहिवाशी आहेत. मंदिर समितीमध्ये हंगामी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. संपादक. चैतन्य उत्पात.

स्वेरीत ई स्क्वेयर लॉजिक उपक्रम संपन्न.

Image
 स्वेरीत ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के २४’ हा तांत्रिक उपक्रम संपन्न ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग पंढरपूर:(प्रतिनिधी )गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’ व ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ या n N विभागांच्या संयुक्त विद्यमाने तसेच इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आय ट्रिपल इ), द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (आयइआय), सोलापूर या व्यावसायिक संस्थांच्या सहकार्याने राष्ट्रीय स्तरावरील ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के २४’ हा एक दिवशीय तांत्रिक उपक्रम संपन्न झाला.          कोग्नो सोल्युशन कंपनीचे वरिष्ठ अभियंता सर्वेश रत्नपारखी यांच्या हस्ते ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के २४’ या उपक्रमाचे  उदघाटन झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून एसईएस पॉलिटेक्निक, सोलापूर चे वरिष्ठ व्याख्याते प्रा.एस.एम.टीपे उपस्थित होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के २४’ या उपक्रमाच्या समन्वयक डॉ. नीता कुलकर्णी य...

नदी काठाच्या गावांचा वीज पुरवठा आजपासुन पूर्ववत ,_आ. समाधान आवताडे.

Image
 *नदीकाठच्या गावांचा वीजपुरवठा आज सायंकाळपासून सुरळीत होणार- आ समाधान आवताडे  पंढरपूर  (प्रतिनिधी) उजनी धरणातून सध्या पिण्यासाठी भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले असून पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचेपर्यंत नदीकाठच्या गावचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता हे पाणी सध्या हिळळी बंधाऱ्यात पोहोचले असून तात्काळ वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी सूचना आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिल्यानंतर कुमार आशीर्वाद यांनी आज सायंकाळपासून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले. सध्या नदीत पाणी असूनही वीज पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते,शेतात असलेली उभी पिके डोळ्यासमोर वीज नसल्याने जळून चालली होती,केवळ दोनच तास वीज पुरवठा सुरू असल्यामुळे शेतात पाणी येण्याअगोदर वीज बंद होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते,त्यामुळे नदीकाठचे शेतकरी वीज पुरवठा सुरळीत करण्या संदर्भात वारंवार मागणी करत होते त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना बोलून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या ...

माढा लोकसभेसाठी इच्छुक आहे - अभय सिंह जगताप.

Image
 माढा मतदासंघातून मी इच्छुक. २८ मार्चला म्हसवड येथे कार्यकर्त्याचा मेळाव्याचे आयोजन. अभयसिंह जगताप.  प्रतिनिधी पंढरपूर - माढा मतदारसंघात शिवसेना राष्ट्रवादी विभागल्याने महायुतीच्या आमदारांची आणि कार्यकर्त्यांची संख्या पाहता. निवडणूक लढवण्यासाठी कोणीही पुढे येण्याची शक्यता नसताना या मतदारसंघात परिवर्तन करण्यासाठी काम केले आहे. याबाबत मागील काही दिवसापूर्वी सोलापूर आणि सातारा येथील पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी अभयसिंह जगताप यांना माढ्याची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. मात्र काही दिवसापासून पक्षाबाहेरील उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू असल्याने आमचे कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत आहेत याबाबत आपण पक्षाचे पदाधिकारी आणि समर्थकांचा मेळावा २८ मार्च २०२४ रोजी म्हसवड येथे मेळावा आयोजित करणार आला असून येथे व्यक्त केलेल्या भावना वरिष्ठ नेते मंडळींपर्यंत पोहोचवणार असल्याचे जगताप यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत सांगितले. पुढे बोलताना अभयसिंह जगताप म्हणाले की राज्यात भारतीय जनता पार्टीकडून पक्ष फोडण्याचे काम झाले आहे. सरकारमध्ये दुसऱ्या पक्षाचे ताकदवान नेते सामील होत आहेत. मात्र या नेत्यां...

सृजनाचे रंग.

Image
 *सृजनाचे रंग*      ऋतुचक्र आता वसंताच्या उंबरठ्यावर उभे आहे. शिशिर आणि वसंताचा हा संधिकाल मनावर विलक्षण मोहिनी घालतो. नवसर्जनाचे मोहक रंग सृष्टीवर उमटतात आणि लक्षात येतं की ऋतू बदलतोय!! तनामनाला गारठवून टाकणारी थंडी संपली. परवापर्यंत एकेक पाने गाळीत खराटा झालेल्या निष्पर्ण झाडांना लालसर बाळपालवी फुटली आहे. लाल डोळ्यांचे काळे कोकिळ आम्रपालवीत, मोहरात दडून आर्त स्वरात कूजन करत आहेत. स्वर्णरंगी बहावा तटतटून फुलला आहे. इतका की झाडावर सोन्याची फुलेच फुले! एकही पान नाही!! कडुनिंबावर लाल चाॅकलेटी पानांबरोबर लोभस पांढरी फुलेही दिसू लागली आहेत. केशरी, लालभडक फुलांनी पळस पांगारे फुलले आहेत. त्यांच्या वर भुंगे, मुंग्या, पक्षी मध पिण्यासाठी गर्दी करायला लागले आहेत. मंद वासाच्या, अतिनाजूक पाकळ्यांच्या फुलांनी शिरीष फुलून आला आहे. संध्याकाळी त्याच्या खाली नाजूक फुलांचा खच पडलेला असतो. एक मंद सुवास दरवळत राहतो. कोपऱ्यात फुललेल्या मोगऱ्याच्या शुभ्र फुलांनी आणि मधुर गंधानी आठवणींची दुखरी कळ काळजात उमटवलेली असते. समोरच्या अंगणात लाल चाफा फुलांनी नुसता बहरला आहे.  एकही पान न...

उत्पात समाजाच्या लावणी महोत्सवास शासकीय अनुदान देण्याची मागणी.

Image
 उत्पात समाजाच्या लावणी महोत्सवास शासकीय अनुदान मिळावे, लावणीचे अध्यासन केंद्र विद्यापीठात स्थापन करण्यात यावे. उत्पात मंडळींची पत्रकार परिषदेत मागणी. प्रतिनिधि पंढरपूर - मागील गेल्या १५०वर्षांपासूनच पंढरपूर येथील श्री रुक्मिणी देवीचे पारंपरिक पुजारी होळी ते रंगपंचमी या काळात उत्तर पेशवाई काळातील बैठकीच्या लावण्या सादर करीत आहेत. या लावणी महोत्सवाला शासकीय अनुदान मिळावे राज्याच्या सांस्कृतिक खात्याने याची दखल घेऊन हा वारसा जतन करावा,  अशी मागणी उत्पत समाजातील सुप्रसिध्द लावणी गायकांनी केली. शनिवार दिनांक २३मार्च रोजी येथिल एकनाथ भवन येथे खास पत्रकार परिषद य मागणीसाठी आयोजीत करण्यात आली होती. यावेळी उत्पात समाजातील ज्येष्ठ लावणी गायक मनोहर उर्फ छबुराव उत्पात, श्याम उर्फ विनय उत्पात, हेमंत उत्पात, अनिल उत्पात, प्रसाद उत्पात,उत्पात समाजाचे अध्यक्ष अतुल उत्पात, वादक रवींद्र वनारे, भोलानाथ भोसले आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रमाणेच  राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ मध्ये दिवंगत लावणी सम्राट ज्ञानेश्वर विठ्ठल उत्पात (ज्ञानोबा उत्पात) यांच्या नावाने लोककला अध्यासन कें...

शेगाव दुमाला तेथे एक लाख रूपयांची गोवा बनावटीची दारू जप्त.

Image
 *शेगाव दुमाला येथे एक लाखाची गोव्याची दारू जप्त* पंढरपूर विभागाची कारवाई प्रतिनिधी पंढरपूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूरच्या पथकाने गुरुवारी शेगाव दुमाला (ता. पंढरपूर) येथून एक लाख आठ हजाराची गोव्याची दारु जप्त केली.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारूविरुद्ध छापे टाकण्यात येत आहे. याच मोहिमेंतर्गत पंढरपूर विभागाच्या दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला गावाच्या हद्दीत पाळत ठेवली असता बालाजी विश्वनाथ चवरे, वय २९वर्षे, रा. पेनुर ता.मोहोळ व आकाश राजकुमार बनसोडे, वय २४ वर्षे, राहणार बेंद वस्ती कासेगाव, ता. पंढरपूर हे दोघेही त्यांच्या मोटरसायकलींवर प्लास्टिक पोत्यात गोवा राज्यात विक्रीस असलेली व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईत दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा द...

संकट समयी मदतकार्य करण्यातून नेतृत्वाचा विकास.

Image
 संकटसमयी मदतकार्य करण्यातून नेतृत्वाचा विकास                                                                      - चेअरमन किशोरराजे निंबाळकर स्वेरीत ‘आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकास’ कार्यशाळेचे उदघाटन पंढरपूर (प्रतिनिधी)–‘कोणतीही आपत्ती ही सांगून येत नसते त्यामुळे आकस्मित येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनासाठी आपण  कायम सतर्क रहावे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे  आपत्तीचे दोन प्रकार आहेत. आपत्ती समयी  काम केल्यास आपल्या नेतृत्व गुणांचा विकास होतो. सर्वप्रथम आपण भारताचे नागरिक आहोत याचे भान ठेवले तर व्यवस्थापन कार्य करताना आपल्याला एक प्रकारची उर्जा येते आणि या आपत्ती समयी  मानवाचा जीव वाचवणे हे आपले महत्त्वाचे कर्तव्य असते. अशा संकट समयी मदत कार्य केल्यास आपल्या नेतृत्वाचा विकास होतो.’ असे प्रतिपादन एमपीएससी स्पर्धा परीक्षा आयोगाचे चेअरमन किशोरराजे निंबाळकर यांनी केले.     ...

पती पत्नी यांच्या भांडणात पडला, अन जीव गमावून बसला.

Image
 पती पत्नी च्या भांडणात मध्ये पडल्याने कोयत्याने वार करुन एकाची हत्या, नारायण चिंचोली येथील घटनेने तालुका हादरला. प्रतिनिधि पंढरपूर -पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे पती पत्नीचे भांडण सुरू असताना ते सोडविण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा पतीने कोयत्याने कमरेवर आणि डोक्यावर गंभीर वार करुन त्याची हत्या केली. याबाबत पंढरपूर शहर पोलिस ठाण्याकडून समजलेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक २१मार्च रोजी सकाळी ८: ४०वा नारायण चिंचोली येथे आपल्या राहत्या घरासमोर परमेश्वर गाडे हा आपल्या पत्नीशी वाद घालून जोरजोरात भांडत होता. हे पाहून त्याचा मित्र व शेजारी असणारा संतोष नाना चौगुले (वय४४, नारायण चिंचोली) हा हे भांडण सोडविण्यासाठी गेला असता , चिडलेल्या परमेश्वर याने तू आमच्या भांडणात का मध्ये येतो, असे म्हणून कोयत्याने संतोष याच्या कमरेवर आणि डोक्यात गंभीर वार करुन जखमी केले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.   पंढरपूर तालुका पोलिसांनी परमेश्वर गाडे यास ताब्यात घेतले असून कसून चौकशी करण्यात येत आहे. स पो नि विश्वास पाटील तपास करीत आहेत. संपादक. चैतन्य उत्पात.

बिल क्लिंटन यांना पंढरी दाखविली तेव्हाच गौरव व्हावा असे वाटत होते.- वेदाचार्य नंदकुमार कापसे.

Image
 बिल क्लिंटन यांना पंढरी दाखविली तेव्हाच गौरव व्हावा असे वाटत होते.  - वेदाचार्य नंदकुमार कापसे. प्रतिनिधी पंढरपूर -   बिल क्लिंटनना व्हाइट हाउस मध्ये १९९२साली ऑनलाईन पंढरपूर दाखवले, तेव्हापासून पंढरीत गौरव व्हावा असे वाटत होते ती आकांक्षा कलारत्न पुरस्कार देऊन कलासाधनाने पूर्ण केली. वेदाचार्य नंदकुमार कापसे     पंढरपूर येथे दि १७ मार्च रोजी पंढरपूर येथे कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने, कर्मयोगी सभागृहात आयोजित पंढरी कलारत्न व विशेष गुणवत्ता पुरस्कार वितरणाच्या प्रसंगी वेदाचार्य कापसे गुरूजी बोलत होते.   वेदाचार्यांनी आपल्या भाषणात पंढरपूर आदर्श प्राथमिक विद्यालय, लोकमान्य विद्यालय ते अमेरिका हा आपला आयुष्य प्रवास विषद केला.  या पुरस्काराने मी भारावून गेलो असून माझ्या देवघरात मी देवते प्रमाणे याची प्रतिष्ठापना करणार असल्याचे वेदाचार्यांनी विषद केले.             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण बडवे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून युटोपियन साखर कारखान्याचे चेअरमन उमेशजी परिचारक होते....

स्वेरी मधील शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो.

Image
 स्वेरीमधील शैक्षणीक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा  आत्मविश्वास वाढतो                                                                     - सहाय्यक व्यवस्थापक विजय पाटील स्वेरीत ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग’ विभागाचा पालक मेळावा संपन्न पंढरपूर-( प्रतिनिधी )‘सोलापूर जिल्ह्यात स्वेरी मधून मिळणारे तंत्रशिक्षण हे  वेगळे, शिस्तबद्ध आणि पालक या भुमिकेतून पाहिल्यास महत्वाचे वाटते. विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे आमच्या पाल्यामध्ये असणारे सुप्त गुण जागृत होतात. त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यामुळे साहजिकच आमचे पाल्य भविष्याच्या दृष्टीने करिअर करण्यासाठी सज्ज होऊ लागतात. या कारणांमुळे आम्ही पालक वर्ग आमच्या पाल्याबाबत निश्चिंत असतो. अभ्यासाबाबत स्वेरीतील प्राध्यापकांकडून सातत्याने जो पाठपुरावा होत असतो तो खरोखरच कौतुकास्पद आहे. यामुळे आमच्या पाल्याचा शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकास होतो. एकूणच स्वेरीत नियमित चालणाऱ्या शैक्...

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून चार कोटी रुपये निधी मंजूर. आ. समाधान आवताडे.

Image
 *प्रादेशिक पर्यटन विकास योजनेमधून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात चार कोटी निधी मंजूर* पंढरपूर प्रतिनिधी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सन २०२३-२४ मध्ये लोकप्रतिनिधीनी सूचित केलेल्या कामांना शासनाने मंजुरी दिली असून मंगळवेढा पंढरपूर मतदार संघासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी बोलताना दिली. यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथील भैरवनाथ मंदिरासमोर यात्री निवारा शेड उभारणे १० लाख,सलगर येथे हनुमान मंदिरासमोर निवाराशेड उभा करणे ०६ लाख,तामदर्डी येथील रंगसिद्ध मंदिरासमोर यात्री निवारा शेड उभारणे १० लाख, गुंजेगाव येथे सोमलिंग मंदिरासमोर यात्री निवारा शेड बांधणे १५ लाख,डोनज येथील महासिद्ध मंदिरासमोर सभा मंडप बांधणे १५ लाख, हुन्नूर येथे दत्ताश्रमासमोर सभा मंडप बांधणे १५ लाख, बठाण येथील बोधले महाराज मंदिर येथे सभामंडप बांधणे २० लाख,मारापुर येथील खंडोबा मंदिर समोर सभा मंडप बांधणे २० लाख, उचेठाण येथे मारुती मंदिरासमोर निवारा शेड बांधणे १० लाख,माचनूर येथील सिद्धेश्वर मंदिरासमोर सभामंडप बांधणे २०...

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यासाठी १० कोटी ५६ लाख रुपये मंजूर. आ. समाधान आवताडे.

Image
 *प्रधानमंत्री ग्राम सडक योजने मधून मंगळवेढा तालुक्यासाठी १० कोटी ५६ लाख रुपये मंजूर - आ आवताडे* पंढरपूर प्रतिनिधी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात सन २००० पासून राबविण्यात येत आहे.या योजनेची अंमलबजावणी ग्राम विकास विभागाच्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत करण्यात येते.  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा मुख्य उद्देश हा सन २००१ च्या जनगणनेनुसार सर्वसाधारण क्षेत्रात १००० पेक्षा जास्त पात्र लोकवस्तीची न जोडलेली गावे बारमाही रस्त्याद्वारे जोडणे हा आहे  सध्या केंद्र सरकारने न जोडलेल्या बिगर आदिवासी भागातील ५०० पेक्षा जास्त, आदिवासी भागातील २५० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आणि नक्षलग्रस्त जिल्हयातील १०० ते २४९ लोकसंख्या असलेल्या वाडया-वस्त्यांच्या प्रस्तावांना मान्यता दिलेली आहे. या योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यामध्ये रस्ते सुधारण्यासाठी दहा कोटी ५६ लाख १८ हजार रुपयाचा निधी मंजूर झाला आहे या मंजूर निधीमुळे ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे या प्रधानमंत्री ग्राम सडक योजने मधून मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी ते खुपस...

महाराष्ट्र राज्यात पाच टप्प्यात होणार लोकसभा निवडणुका.

Image
 महाराष्ट्र राज्यात ५ टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार. पंढरपूर (प्रतिनिधी) सर्व जनतेची उत्सुकता असणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून महाराष्ट्रात ५ टप्प्यात लोकसभेचे मतदान होणार आहे. आचारसंहिता लागू झाली आहे व दि.०७ मे ला सोलापूर, माढा, बारामती येथील मतदान होणार आहे.  सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे. लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली. पहिला टप्पा शुक्रवार दि.19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर दुसरा टप्पा - शुक्रवार, दि. 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी तिसरा टप्पा - मंगळवार, दि. 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले चौथा टप्पा - सोमवार, दि. 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड पाचवा टप्पा- सोमवार, दि. 20 ...

मतदार संघातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अडीचशे कोटींची कामे प्रस्तावित. आ. समाधान आवताडे.

Image
 मंगळवेढा येथील पाच तिर्थक्षेत्रांना दहा कोटीचा निधी मंजूर -आ आवताडे.  पंढरपूर -प्रतिनिधी ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस देवदर्शना साठी भाविक,यात्रेकरुंची संख्या मोठ्या प्रमाणांत सातत्याने वाढत आहे. अशा ठिकाणी भाविक यात्रेकरु यांना विविध सोयी-सुविधा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे पुरविणे शक्य होत नाही. म्हणून शासनाने ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी  तीर्थक्षेत्र विकास योजना राबवली असून सध्या शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना अमलात आणली आहे. सरकारने ब वर्गात असलेल्या देवस्थानांना दोन कोटी ऐवजी पाच कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील श्री क्षेत्र आरळी येथील नरसिंह देवस्थानसाठी पहिल्यांदाच चार कोटी 59 लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून या निधीतून देवस्थानच्या भौतिक विकासाची कामे करण्यात येणार आहेत अशी माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली मंगळवेढा तालुक्यातील आरळी,मुंढेवाडी,शिरनांदगी,हुलजंती, बोराळे असणाऱ्या तीर्थक्षेत्रांना दहा को...

मंगळवेढा येथील ५ तीर्थक्षेत्राना १० कोटी रुपये निधी मंजूर. आ. समाधान आवताडे.

Image
 मंगळवेढा येथील पाच तिर्थक्षेत्रांना दहा कोटीचा निधी मंजूर -आ आवताडे.  पंढरपूर -प्रतिनिधी ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस देवदर्शना साठी भाविक,यात्रेकरुंची संख्या मोठ्या प्रमाणांत सातत्याने वाढत आहे. अशा ठिकाणी भाविक यात्रेकरु यांना विविध सोयी-सुविधा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे पुरविणे शक्य होत नाही. म्हणून शासनाने ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी  तीर्थक्षेत्र विकास योजना राबवली असून सध्या शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना अमलात आणली आहे. सरकारने ब वर्गात असलेल्या देवस्थानांना दोन कोटी ऐवजी पाच कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील श्री क्षेत्र आरळी येथील नरसिंह देवस्थानसाठी पहिल्यांदाच चार कोटी 59 लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून या निधीतून देवस्थानच्या भौतिक विकासाची कामे करण्यात येणार आहेत अशी माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली मंगळवेढा तालुक्यातील आरळी,मुंढेवाडी,शिरनांदगी,हुलजंती, बोराळे असणाऱ्या तीर्थक्षेत्रांना दहा को...

पंढरी कलारत्न पुरस्कार वेदाचार्य नंदकुमार कापसे यांना जाहीर.

Image
 पंढरी कलारत्न पुरस्कार वेदाचार्य नंदकुमार कापसेंना जाहीर कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या विविध पुरस्कारांची महाजन-बडवेंकडून घोषणा प्रतिनिधी पंढरपूर- येथील विख्यात कलासाधना सांस्कृतिक मंडळाचा २०२४ चा ‘पंढरी कलारत्न’पुरस्कार यंदा अमेरिका स्थित वेदाचार्य संदीप कापसे गुरूजींना देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे प्रमुख श्रीकांत महाजन-बडवे यांनी आज पंढरपुरात केली.  सन्मान चिन्ह, महावस्त्र, रोख रक्कमेची थैली आणि गौरव असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येथील खवा बाजारातील दि पंढरपूर अर्बन बँकेच्या सभागृहात रविवारी दि १७रोजी  सायंकाळी ५-३०.. वाजता हा पुरस्कार दिमाखदारपणे प्रदान करण्यात येणार असल्याचेही  महाजन-बडवे यांनी यावेळी सांगितले. कलासाधना ही गत १६  वर्षांपासून तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या कला-साहित्य-संस्कृती या विश्‍वात कार्यरत आहे, असे स्पष्ट करून श्री. महाजन-बडवे म्हणाले, पंढरपुरात जन्मलेले परंतु येथून बाहेर जात विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या, करत असलेल्या मान्यवरांना ‘पंढरी कलारत्न’ हा पुरस्कार देऊन दरवर्षी गौरवण्यात येत असते. त्यानुसार यंदाचा पुरस्कार . काप...

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी, आ. आवताडे यांच्या प्रयत्नांना यश.

Image
 ...अखेर फडणवीस यांनी मंगळवेढेकरांना दिलेला शब्द पाळला,  बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी  आ आवताडेंच्या प्रयत्नांना यश /प्रतिनिधी पोट निवडणुकीमध्ये पंढरपूर मतदारसंघांमधून समाधान आवताडे यांना निवडून द्या महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून मी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी देतो असा शब्द तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथील सभेत मंगळवेढेकरांना दिला होता त्या शब्दावर विश्वास ठेवून मंगळवेढेकरांनी समाधान आवताडे यांना आमदार केले त्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी सरकारचा करेक्ट कार्यक्रम ही केला आणि अवताडे यांच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या पाठपुराव्याची दखल घेत बुधवार 13 मार्च 2024 च्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेस मंजुरी देऊन मंगळेकरांना दिलेला शब्दही फडणवीस सरकारने पूर्ण केल्याने मंगळवेढा तालुक्यातून पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.          मंगळवेढा उपसा सिंचन योजनेमध्ये लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव,शेलेवाडी,लेंडवे चिंचाळे,खुपसंगी,नंदेश्वर,गोणेवाडी, जुनोनी,खड...