बिल क्लिंटन यांना पंढरी दाखविली तेव्हाच गौरव व्हावा असे वाटत होते.- वेदाचार्य नंदकुमार कापसे.
बिल क्लिंटन यांना पंढरी दाखविली तेव्हाच गौरव व्हावा असे वाटत होते.
- वेदाचार्य नंदकुमार कापसे.
प्रतिनिधी पंढरपूर -
बिल क्लिंटनना व्हाइट हाउस मध्ये १९९२साली ऑनलाईन पंढरपूर दाखवले, तेव्हापासून पंढरीत गौरव व्हावा असे वाटत होते ती आकांक्षा कलारत्न पुरस्कार देऊन कलासाधनाने पूर्ण केली. वेदाचार्य नंदकुमार कापसे
पंढरपूर येथे दि १७ मार्च रोजी पंढरपूर येथे कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने, कर्मयोगी सभागृहात आयोजित पंढरी कलारत्न व विशेष गुणवत्ता पुरस्कार वितरणाच्या प्रसंगी वेदाचार्य कापसे गुरूजी बोलत होते. वेदाचार्यांनी आपल्या भाषणात पंढरपूर आदर्श प्राथमिक विद्यालय, लोकमान्य विद्यालय ते अमेरिका हा आपला आयुष्य प्रवास विषद केला. या पुरस्काराने मी भारावून गेलो असून माझ्या देवघरात मी देवते प्रमाणे याची प्रतिष्ठापना करणार असल्याचे वेदाचार्यांनी विषद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण बडवे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून युटोपियन साखर कारखान्याचे चेअरमन उमेशजी परिचारक होते. परिचारक आपल्या भाषणात म्हणाले की, एखादी संस्था सलग १६ वर्षे चालवणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे, पण हे शिवधनुष्य श्रीकांत दादा महाजन बडवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लीलया पेलल्याने अनेक अप्रकाशित हिरे समाजापुढे आले. मला या कार्यक्रमात सहभागी होण्याची खूप इच्छा होती व आज श्रीकांत दादांनी ती पूर्ण केली.
पंढरी कलारत्न पुरस्कार हा अत्यंत मानाचा समजला जाणारा पुरस्कार मानण्यात येतो. सन्मान चिन्ह, महावस्त्र, रोख रक्कमेची थैली आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कलासाधना ही गत १६ वर्षांपासून तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या कला-साहित्य-संस्कृती या विश्वात कार्यरत आहे, असे स्पष्ट करून महाजन-बडवे म्हणाले, पंढरपुरात जन्मलेले परंतु येथून बाहेर जात विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या, करत असलेल्या मान्यवरांना ‘पंढरी कलारत्न’ हा पुरस्कार देऊन दरवर्षी गौरवण्यात येत असते. दरम्यान, पंढरपूरसह आसपासच्या परिसरात ज्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले अशा मान्यवरांना कलासाधना विशेष गुणवत्ता पुरस्काराने कलासाधना संस्थेकडून गौरविण्यात येते. त्यानुसार यंदाचे विशेष गौरव पुरस्कार मा. उमेशजी परिचारक यांच्या हस्ते व सतीश जोरापूर व्हाईस प्रेसिडेंट सि. एम. एस. कंपनी बेंगलोर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरूवात विजय व्यवहारे व मंगला दळवी यांच्या गणेश वंदना व आचार्यांच्या आयुष्यावर केलेल्या पोवाड्यांनी झाली. उपस्थितांचे स्वागत राजेंद्र माळी यांनी केले. तर प्रास्ताविक श्याम चव्हाण सर यांनी केले, व पाहुण्यांचा परिचय ज्ञानेश मोरे गुरुजी यांनी करून दिला. संस्थेची मागील सोळा वर्षांची वाटचाल व भविष्यातील वाटचाल या विषयावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत महाजन बडवे यांनी विषद केले.
संस्थेमार्फत घेतलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्याच बरोबर विविध स्पर्धांचे परिक्षण केलेल्या सौ. मंजिरी देशपांडे, सौ. स्नेहल पाठक, सौ. प्रतिभा जाधव, कु. नेहा चिंचोलीकर, सौ. रेश्मा गुजर, सौ. ज्योती चव्हाण, अशोक कोर्टीकर सर, प्रा. सि. जी. जगताप, राजेश अंबिके, काठावर सर यांचा परिक्षक म्हणून आचार्यांच्या हस्ते रामल्लाची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सौ. मैत्रेयी केसकर व कु. सिध्दी केसकर या मायलेकींनी अत्यंत प्रभावीपणे केले तर आभार अभिराज बडवे यांनी मानले.
पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकुमार आटकळे, राजेंद्र माळी, अक्षय बडवे, ज्ञानेश्वर मोरे, डॉ. किरण बहिरवाडे, अमरसिंह अनंत नाईकनवरे, रणजीत पवार, अरिहंत कोठाडिया, महेश अंबिके, अनिरुद्ध बडवे पाटील, राजकुमार शहा, महेश देशपांडे, सौ. मंजिरी देशपांडे, सौ. आरती बोरखेडकर, सौ प्रतिभा यादव, धनंजय मनमाडकर यांच्यासह कलासाधना संस्थेचे सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
---
चौकट
---
‘कलासाधना’ विशेष गुणवत्ता पुरस्काराचे मानकरी
कोविड या जीवघेण्या आजाराची पहिली चाचणी लस घेतल्याबद्दल रोहन परिचारक, आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन ही स्पर्धा जिंकलेल्या तसेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन गिनीज वल्ड बुकमध्ये तीन वेळा नाव आलेल्या सौ. प्रीती मस्के, अध्ययन व अध्यापान भरीव कार्याबद्दल प्रा. मंदार परिचारक, दुर्मीळ पक्षांच्या प्रजातींच्या संशोधनाबद्दल डॉ. अभिजित माचणूरकर, ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल डॉ. संतोष वलगे, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सुपरवायझरपदी निवड झाल्याबद्दल वैभव विद्याधर बडवे, ज्योतिष शास्त्रात पीएच.डी. केल्याबद्दल विष्णुप्रिया वाडेकर.
---
चौकट 2
---
‘पंढरी कलारत्न’पुरस्काराचे यापूर्वीचे प्राप्तकर्ते
ज्येष्ठ साहित्यिक (कै.) द. मा. मिरासदार, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, अभिनेत्री तथा दिग्दर्शक मधुगंधा कुलकर्णी, शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर,अष्टपैलू लेखक, पत्रकार संजयजी पाठक, रेखांकार श्रीपाद सावळे, चित्रकार प्रकाश कोर्टीकर, मूर्तिकार (कै.) हरिश्चंद्र सावंत, सिनेदिग्दर्शक तानाजी घाडगे, , जयसोनिक या विविध ताल वाद्याचे जनक जयवंत उत्पात, संगणक व कॅनव्हास दोन्हीवर सारखेच प्रभुत्व असणारे चित्रकार डॉ. सुभाष पवार
संपादक.
चैतन्य उत्पात.
.jpg)
Comments
Post a Comment