Posts

Showing posts from September, 2025

ऐन सणासुदीत शासकीय धान्याचा काळाबाजार. जिल्ह्यात पूर परिस्थिती असतानाही धान्याची हेराफेरी.

Image
 ऐन सणासुदीत रेशनच्या धान्याचा काळाबाजार ;  जिल्ह्यात पूरग्रस्त स्थिती असताना धान्याची कमतरता भासत असूनही शासकीय धान्याचा काळाबाजार  प्रतिनिधी पंढरपूर  :- पंढरपुरात शासकीय धान्याचा काळाबाजार सुरू असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते साईनाथ बडवे यांनी धाडं टाकली आहे. कराड रोडवरील सिंहगड कॉलेजच्या जवळच्या मोकळ्या मैदानात रेशनचे धान्य वितरण करणाऱ्या सहा ट्रक उभ्या होत्या. या ट्रक मधून खाजगी पिकअप मध्ये रेशनचा गहू आणि तांदूळ भरला जात होता. शासकीय नियमानुसार रेशनचे धान्य हे शासकीय गोदामातून शासकीय गाडीमध्ये भरूनच रेशन दुकानापर्यंत पोहोचवले जाते. मात्र काळाबाजार करण्याच्या हेतूनेच शहराच्या बाहेर निर्जन ठिकाणी रेशनचे धान्य खाजगी गाडीत भरले जात होते. सदरची घटना उघडकीस आल्यानंतर पंढरपूरचे नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड आपल्या पथकासह दाखल झाले. पंढरपूर शहर आणि पंढरपूर ग्रामीणचे पोलीस देखील या ठिकाणी तात्काळ हजर झाले. सदरच्या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. यावर नायब तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी बालाजी पुदलवाड यांनी शासकीय गोदामाच्या बाहेर धान्याचे वितरण करणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट ...

पंढरपूर येथे गणेशोत्सव मध्ये चोरलेल्या दुचाकी जप्त,चोरटे जेरबंद

Image
 पंढरपुर शहरातुन मोटार सायकल चोरी करणाऱ्या चोराकडुन पाच मोटार सायकली जप्त.  पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपुर शहरामधुन गणेश विसर्जना दिवशी दिनांक ६ सप्टेंबर रोजी दोन मोटार सायकली चोरीस गेल्या होत्या त्याचा मागोवा घेत पंढरपुर शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे तपास करीत सांगली येथे गेले होते. त्यानंतर ,  गोपनीय माहिती नुसार संशयीत आरोपी फिरोज नबीलाल मुल्ला, वय २९ वर्षे, रा. जुळेवाडी ता. तासगाव जि. सांगली (२) उध्दव प्रताप मिले, वय ५५ वर्षे, रा. तांदुळवाडी ता. माळशिरस जि. सोलापुर याने माहे फेब्रुवारी व सप्टेंबर मध्ये एकुण ०४ मोटार सायकली चोरल्या आहेत. ही बाब तपासात समोर आली त्याअनुषंगाने सदर आरोपीस काल दिनांक २९सप्टेंबर रोजी ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांने पंढरपुर शहर पोलीस ठाणे कडील एकुण ०४ गुन्हयाची कबुली दिल्याने खालील नमुद गुन्हे उघडकीस आले आहेत. सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक  अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधिक्षक  प्रितमकुमार यावलकर,. सहा. पोलीस अधिक्षक,  . प्रशांत डगळे, , वरिष्ठ पोलीस निरीक्षक,  विश्वजी...

पंढरीच्या शिक्षणक्षेत्रातील आधुनिक द्रोणाचार्य श्री व्ही डी परिचारक सर.

Image
 पंढरीच्या शिक्षणक्षेत्रातील आधुनिक द्रोणाचार्य_श्री व्हि.डी परिचारक सर पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरीच्या शिक्षण क्षेत्रातील द्रोणाचार्य अशी ओळख असणारे श्री विनायक परिचारक सर यांचा आज वाढदिवस दि.२७सप्टेंबर १९६१रोजी त्यांचा जन्म झाला. सर लहानपणी पासूनच स्वाभिमानी आणि स्वावलंबी स्वभावाचे यामुळे  परिचारक यांच्यासारख्या राजकीय घराण्यात जन्म घेऊन समाजसेवेचा मोठा वारसा असूनही त्यांनी कुणाचाही फायदा घेतला नाही, माजी आमदार स्व सुधाकर पंत परिचारक यांचा कायमच वरदहस्त होता, सरानी मनात आणले असते तर एखादी मोठी शिक्षणसंस्था, कॉलेज उभे करून आरामात जीवन सहज जगू शकले असते, मात्र मुळातच पिंड लढवय्या असल्याने व्हि डि परिचारक सरानी कधीही सोपा मार्ग किंवा यश मिळवण्यासाठी शॉर्टकट वापरला नाही, स्वतःच्या हिंमतीवर आणि हुशारीवर कोल्हापूर येथे एम एम सी, फिजिक्स, एम एस सी मॅथेमॅटिक्स, बी एड  असे शिक्षण घेतले, महाविद्यालयीन जीवनात माजी आमदार शहाजी बापू पाटील, पंढरपूर येथील माजी आमदार स्व भारत नाना भालके, कासेगाव येथील श्री पांडुरंग साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन, माजी जिप सदस्य वसंत नाना देशमुख, सांगोला च...

उत्कंठावर्धक आणि रहस्यमय वेब सिरीज" बापूची गोष्ट "सोशल मीडियावर होत आहे लोकप्रिय

Image
 सोलापूर जिल्ह्यातील "बापूची गोष्ट, ही वेबसिरीज होत आहे सोशल मीडियावर लोकप्रिय, पुढच्या भागाची उत्कंठा, पंढरीतील उत्तम दिग्दर्शक तानाजी घाडगे यांच्या दिग्दर्शनाने सोने पे सुहागा, पंढरीतील कलाकाराचा दमदार अभिनय  चैतन्य उत्पात, पंढरपूर _राजकारणात कोणी कुणाचा सदैव मित्र असत नाही, तसेच शत्रू देखील त्यात गावपातळीवरील राजकारण म्हणजे कोणतेही टोक गाठणारे, आजच्या धावपळीच्या जीवनातील सामान्य माणसाची जगण्याची धडपड, राजकीय मंडळींचा स्वार्थ,धूर्तपणा, गावकी भावकीतील नातेसंबंध, हरवत चाललेली माणुसकी, संशय, धूर्त चाली या साऱ्या  बाबींचा आढावा घेऊन सुरू असलेली उत्कंठावर्धक वेबसिरीज म्हणून "बापूची गोष्ट, सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथील जाणकार,मुरब्बी दिग्दर्शक तानाजी घाडगे हे ही वेबसिरीज करत आहेत. माळशिरस,वेळापूर, अकलूज पिलीव या परिसरात वेबसिरीज चे चित्रीकरण सुरू आहे, अगदी पहिल्या भागापासून रसिक प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी उत्कंठावर्धक, रहस्यमय अशी ही वेबसिरीज आहे. तालुक्याचा राजकारणात आमदारकीचे इलेक्शन लागलेले असते, तीन दिग्गज न...

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.

Image
 कॉरिडॉर च्या पैशावरून वाद,चुलता-चुलतीवर पुतण्याने केले चाकूने वार!  पंढरपूर  (प्रतिनिधी ) _पंढरपूर येथे कॉरिडॉर मध्ये मिळणाऱ्या पैशावरून एका कुटुंबात कडाक्याची भांडणे होऊन पुतण्याने आपल्याच काका काकू वर धारधार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले आहे. ही घटना बुधवार दि२४रोजी रात्री साडे बारा वाजता  महाद्वार परिसरात असणाऱ्या प्रासादिक साहित्याचे दुकानात घडली. या हल्ल्यात        ज्ञानेश्वर वसंतराव सुर्यवंशी व अनिता ज्ञानेश्वर सुर्यवंशी या चुलता-चुलतीवर प्रशांत उर्फ नारायण पांडुरंग सुर्यवंशी नामक पुतण्याने पंढरपूर येथे महाद्वारातील दुकानात ते झोपले असताना जाऊन रात्री १२ :३० चाकूने सपासप वार करुन रक्तबंबाळ केल्याची घटना उघडकीस आली आहे.           याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर येथील महाद्वारात ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांचे प्रासादिक दुकान आहे. ते त्यांच्या दुकानी दि.२४ रोजी सपत्नीक झोपले असताना, रात्री १२:३० वाजता उभयतांवर त्यांचा पुतण्या प्रशांत उर्फ नारायण पांडुरंग सुर्यवंशी याने चाकूने सपासप वार करुन रक्तबंबाळ केले आहे. ज्...

स्वेरी कॉलेज मध्ये बी फार्मसी आणि एम फार्मसी प्रवेश प्रक्रिया सुरू.

Image
 प्रथम वर्ष बी.फार्मसी आणि एम.फार्मसी प्रवेशासाठी कॅप राऊंड-१ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया सुरु दि. २७ सप्टेंबर पर्यंत चालणार ही प्रक्रिया पंढरपूरः(प्रतिनिधी )'शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रथम वर्ष बी.फार्मसी आणि एम.फार्मसी प्रवेशाची पहिली फेरी (फर्स्ट कॅप राऊंड)चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवार, दि. २५ सप्टेंबर २०२५ पासून ते शनिवार, दि. २७ सप्टेंबर २०२५ पर्यंत म्हणजेच एकूण तीन दिवस चालणार आहे. या कालावधीत स्वेरी फार्मसीच्या स्क्रूटिनी सेंटर (एस.सी. क्रमांक ६३९७) मध्ये ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय करण्यात आली आहे. या पहिल्या प्रवेश फेरीची अलॉटमेंट यादी अधिकृत संकेतस्थळावर गुरुवार, दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे. ज्यांनी पदवी आणि पदव्युत्तर फार्मसी प्रवेशासाठी कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन केले आहे त्यांना या प्रवेश फेरीचा लाभ घेता येईल', अशी माहीती संस्थेचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.        शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये पदवी आणि पदव्युत्तर फार्मसी प्रवेशाकरीता दि. ०७ जुलै २०२५ ते दि. ०२ सप्टेंबर २०२...

रूपरम्य शरद.

Image
 *रूपरम्य शरद* निसर्ग अमर्याद आहे.. त्याचं नित्यनूतन रूप मन मोहवून टाकतं.. प्रत्येक ऋतूची एक वेगळीच खासियत असते.. वेगवेगळे विभ्रम असतात.. सरत्या भाद्रपदात अश्विन मिसळूनच येतो. अत्यंत तरल सीमारेषा असते दोघांच्या मध्ये.. फारच सुंदर दिवस असतात हे.. पावसाच्या वर्षावाने पोसलेली, परिपक्व झालेली शेतं.. ओल्या पिकांचा, गवताचा वास हवेत भरून राहिलेला असतो.. पाऊस कमी होऊन सोनेरी पिवळ्या उन्हाचे दर्शन होतं.. आणि निसर्गाचं ऐश्वर्यसंपन्न रूप मन आणि डोळे सुखावून टाकतं..    कालिदासाने ऋतुसंहारात शरदाचं फार सुंदर वर्णन केलं आहे.. *काशांशुका विकचपद्म मनोज्ञवक्रा।* *सोन्मादहंसरूतनूपुरनादरम्या।* *आपक्वशालिललितानतगात्रयष्टिः रूचिरानतगात्रयष्टिः।* *प्राप्ताशरन्नववधूरिवरम्यरूपा।।*    शरदाला त्याने धवलवस्त्र नेसलेली रूपरम्य नववधू म्हटले आहे..महामूर पाऊस पडून झाल्यावर गढुळपणा टाकून संथ झालेल्या नद्या. त्यात पोहणाऱ्या मासोळ्या. काठावरचे पक्षी.. तुडुंब भरलेली तळी..त्यात विहरणारे हंस.. स्वच्छ झालेले आकाश.. आकाशातील धवल चंद्र चांदणे असं मनमोहक निसर्ग चित्र रेखाटले आहे..     तो...

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने नवरात्र उत्सव निमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन.

Image
 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती वतीने  श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाचे आयोजन, कलापिनी कोमकली, पं.आनंद भाटे, पं.शौनक अभिषेकी, मधुरा किरपेकर, सानिका कुलकर्णी, ज्ञानेश्वर मेश्राम, श्रृती देशपांडे, सीमा जोशी दिग्गजांची उपस्थिती पंढरपूर दि.20:- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सन्मा सदस्य यांचे मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखाधिकारी मुकेश अणेचा यांचे उपस्थितीत  दिनांक 23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या कालावधीत 7 दिवस दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत श्री संत तुकाराम भवन येथे दुपारी 5.30 ते 7.00 आणि रात्री 7.30 वा. या दोन सत्रांमध्ये श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.  दि.23 सप्टेंबर रोजी दुपारी स्नेहल देशपांडे भरतनाट्यम व रात्री कुमार गंधर्व यांच्या कन्या विदुषी कलापिनी कोमकली,  दि. 24 सप्टेंबर रोजी दुपारी भरतनाट्यम "परब्रह्मा" सीमा जोशी व रात्री भिमसेन जोशी यांचे शिष्य पं.आनंद भाटे यांचे गायन, दि.25 सप्...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व योजनेअंतर्गत तेरा रस्ते अतिक्रमणमुक्त.

Image
 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तालुक्यातील १३ शिव- पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त       -तहसीलदार सचिन लंगुटे पंढरपूर (दि.२०) – छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा राबवला जात आहे. या सेवा पंधरवडा मध्ये तालुक्यातील तालुक्यातील गावागावातील शिवमानंद रस्त्याचे प्रश्न मार्गी लावण्याची मोहीम सुरू असून, तालुक्यातील वरील १३अतिक्रमित शिव रस्ते ,पाणंद रस्ते खुले करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.  या  अभियानांतर्गत   तालुक्यातील पाणंद रस्ते गाव नकाशावर चिन्हांकित करणे, शिव-पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, रस्ता अदालत आयोजित करुन शेतरस्त्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, तसेच शेत रस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे आदी कामे केली जात आहेत. पंढरपूर तालुक्यातील १३ अतिक्रमित ११.५ कि.मी लांबीचे शिव-पाणंद रस्ते खुले करण्यात आले आहेत.        यामध्ये रोपळे, आंबे, पटवर्धन...

खैराव विकासापासून वंचीत ठेवणार नाही._आ. अभिजीत पाटील.

Image
 *खैराव विकासापासून वंचित ठेवणार नाही* - आमदार अभिजीत पाटील *राजकारण बाजूला ठेवून खैराव गावचा विकास करूया*- आमदार अभिजीत पाटील *(खैराव येथे व्यायामशाळा उभारणीचे भूमिपूजन आमदार पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न)* पंढरपूर  (प्रतिनिधी) माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या स्थानिक विकास निधी २०२४-२५ तून माढा तालुक्यातील खैराव येथे ग्रामपंचायत जागेत व्यायामशाळा उभारणीसाठी एकूण रु. १०लक्ष रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच जानकाबाई मस्के, माजी सरपंच विलासराव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य समाधान नागटिळक, वैभव पाटील, ज्ञानेश्वर सुतार, जयसिंह देशमुख, महादेव शेळके, संजय शेळके, बी. आर. पाटील, विजय नागटिळक, किशोर कदम, ब्रह्मदेव शेळके, अर्जुन शिरसागर, कल्याण चव्हाण, अरुण सुतार, गणेश नागटिळक, किरण नागटिळक, आण्णा सरवदे, खंडेराव नागटिळक, कुलदीप नागटिळक, कृष्णा शिरसागर, योगेश पांढरे, कृष्णराज देशमुख, दीपक देशमुख, योगेश रणपिसे, सोमनाथ शिंगाडे, राहुल नागटिळक, संदिपान नागणे, नितीन नागणे, अशोक ...

मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त आ. अभिजीत पाटील यांची उपस्थिती.

Image
 कोर्टी येथे मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त आमदार अभिजीत पाटील यांची उपस्थिती (पंढरपूर तालुक्यात आमदार पाटील यांची कार्यक्रमाला उपस्थित राहून जिल्हा परिषद,पंचायत समितीसाठी साखर पेरणी सुरू) पंढरपूर  (प्रतिनिधी)' श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील हे पंढरपूर तालुक्यातील कार्यक्रमानिमित्त गावांमध्ये हजेरी लावत असल्याने येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक मध्ये साखर पेरणी सुरू असल्याची कुजबूज पंढरपूर तालुक्यामध्ये होताना दिसत आहे. माढा विधानसभा मतदारसंघात आमदार अभिजीत पाटील यांनी तीस वर्षाची सत्ता उलथून विजयाचा झेंडा रोवला असताना पंढरपूर तालुक्यात देखील आमदार अभिजीत पाटील हे विविध कार्यक्रमाला उपस्थित असतात. कोर्टी येथे मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जुलूस यात्रेत आमदार अभिजीत पाटील यांनी उपस्थित राहून ईद-ए-मिलाद उन-नबी या पवित्र सणा सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फा...

अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमावर पोलिसांची कारवाई.

Image
 अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इसमावर पंढरपूर तालुका पोलिसांकडून कारवाई.  पंढरपूर(प्रतिनिधी )_ सोलापुरातून पंढरपुरातील ग्रामीण भागामध्ये स्कुटीवर खताच्या पोत्यामध्ये मोटारीच्या ट्यूबमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्या  आरोपीला, पंढरपूर तालुका  पोलिसांनी  पकडले.  दि. १८ सप्टेंबर  रोजी पंढरपूर तालुका पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोलापुरातील एक व्यक्ती स्कुटीगाडीवर खताच्या पोत्यामध्ये आतील बाजूस मोटारीचे ट्यूबमध्ये दारू भरून पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये आणून, विक्री करणार असल्याची माहिती मिळाल्याने , पंढरपूर तालुका  मौजे देगाव रोडवर जाणाऱ्या स्कुटी चालकाला थांबून विचारपूस केली असता, आपले नाव आप्पा नारायण राहणार मार्डी रोड रोड  उत्तर तालुका सोलापूर असे सांगितले.  त्याच्या ताब्यात एक स्कुटी गाडी मिळुन आली. या गाडीच्या मध्यभागी एक खताचे कव्हर असलेले होते. त्याच्या आतमध्ये मोटार जे ट्यूब त्यामध्ये उग्र वासाची दारू भरलेले  एकूण शंभर लिटर दारू असून , सदर व्यक्तीने दारूची वाहतूक करण्यासाठी आताच्या पोत्यामध्ये मोटारीच...

सेवा पंधरवड्याचे आ. अभिजीत पाटील यांच्या वतीने आयोजन.

Image
 *सेवा पंधरवड्याचे आमदार अभिजीत पाटील यांची बैठक* प्रांताधिकारी, तहसीलदार,  *छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत व ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमाचा शुभारंभ पंढरपूर तालुक्यात उत्साहात* प्रतिनिधी/-  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवस दि. १७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दि. २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून समाजातील सर्व घटकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवणे, लोकसहभाग वाढवणे आणि सेवाभावाची भावना रुजवणे हा उद्देश आहे. पंढरपूर तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या पुढाकाराने माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या शुभहस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.  यावेळी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे, भूमी अभिलेख विभागाच्या पूजा अवताडे, अ गटविकास अधिकारी विकास काळुंगे, अरुण भुजबळ, सरपंच सोमनाथ झांबरे, संचालक भागवत चौगुले, संजय खरात, नवनाथ नाईकनवरे, संदीप पाटील, विकास पाटीलशआदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीतषविवादग्रस्त अविवादग्रसत नोंदी नि...

आ. अभिजीत पाटील यांनी केली नीरा नदीच्या काठी पूरपरिस्थितीची पाहणी.

Image
 *आमदार अभिजीत पाटील यांच्याकडून सीना नदी काटच्या गावाच्या पूरपरिस्थितीची केली पाहणी* *शासकीय यंत्रणाना दिले सरसकट पंचनामे करण्याचे आदेश* आमदार अभिजीत पाटील *मुख्यमंत्री यांना भेटून माढा, पंढरपूर सह सोलापूर जिल्ह्यातील झालेल्या पूर परिस्थिती नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याचे दिले पत्र* (तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांचे सोबत केली पाहणी) पंढरपूर  (प्रतिनिधी) राज्यासह सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे अतिवृष्टी होत माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावांमध्ये पूर आल्याने पुराचे पाणी पिकात शिरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनास तत्काळ सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश देऊन निमगाव-माढा , दारफळ, राहुलनगर, उंदरगाव- केवड , वाकाव आदी गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आज माढा तहसीलदार संजय भोसले साहेब, तालुका कृषी अधिकारी चांदने साहेब यांना सोबत घेऊन पाहणी आमदार अभिजीत पाटील यांनी केली. सदर माढा तालुक्यातील रांझणी, रोपळे कव्हे , म्हैसगाव कुर्डवाडी या ४ मंडलात ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. बर्‍याच भागात शेतात पुराचे पाण्याबर...

स्वेरी मध्ये अभियंता दीन आणि ऑलम्पस २के २५, चे उद्घाटन

Image
 आपल्या स्वभावातून आपल्या भविष्याला आकार मिळत असतो                                                                                              -दास ऑफशोअर लिमी.चे डॉ. अशोक खाडे स्वेरीमध्ये ‘अभियंता दिन’ साजरा व ‘ऑलम्पस २ के २५’ चे उदघाटन पंढरपूरः(प्रतिनिधी )‘डॉ. रोंगे सरांच्या प्रत्येक शब्दातून विद्यार्थ्यांबद्दल, संस्थेबद्दल असणारी तळमळ व्यक्त होते. पंढरपूरच्या पवित्र भूमीत आणि स्वेरीच्या एका आदर्श शिक्षण संकुलात शिक्षण घेण्याची संधी मिळाल्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात. स्वेरीबद्दल मला एक वेगळी आत्मीयता वाटते.  आपल्याला आयुष्यात पुढे जायचे असेल तर बऱ्याच बाबींची काळजी घ्यावी लागते. आपल्या स्वभावातूनच आपल्या भविष्याला आकार मिळत असतो.' असे प्रतिपादन दास ऑफशोअर लिमी., मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक खाडे यांनी केले.         ...

सोलापूर जिल्ह्यात धार्मिक पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटनाला मोठी संधी.

Image
 सोलापूर जिल्ह्यात धार्मिक पर्यटना प्रमाणेच कृषी पर्यटनाला मोठी संधी, आ.सुभाष देशमुख . पंढरपूर (प्रतिनिधी )-- सोलापूर जिल्हात पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने अनेक ग्रामपंचायतींना या दृष्टीने प्रयत्न करण्याची संधी मिळणार आहे. चिंचणी येथे सात दिवस पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने पर्यावरण दिंडी, महिलांसाठी पारंपरिक खेळ, बाल चित्रपट महोत्सव, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान,आध्यात्मिक कार्यक्रम, वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.  सोलापूर जिल्हात धार्मिक पर्यटनाबरोबरच कृषी  पर्यटनामुळे स्थानिक व्यवसायाला अधिक चालना मिळण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने पर्यटन महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी  पंढरपुरात पत्रकार परिषदेत केले.यामुळे स्थानिक लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.  सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात पर्यटन महोत्सव साजरा केला जाणार आहे.पर्यटन महो...

माढा, श्रीपूर महाळुंग नमो उद्यानासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर.

Image
 *माढा व श्रीपुर महाळुंग नगरपंचायतीला नमो उद्यानासाठी २कोटी निधी मंजूर. *आमदार अभिजीत पाटील यांनी मांडले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पालकमंत्री यांचे आभार. पंढरपूर  (प्रतिनिधी) माढा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत माढा नगरपंचायतसाठी १ कोटी तसेच श्रीपुर महाळुंग नगरपरिषदेसाठी १ कोटी असा एकूण २ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या मंजूर निधीतून दोन्ही शहरांमध्ये भव्य, आधुनिक व पर्यावरणपूरक असे “नमो उद्यान” उभारण्यात येणार असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.  माढा व महाळुंग-श्रीपुर येथे आधुनिक व हिरवाईने नटलेले उद्यान नागरिकांना विश्रांतीसाठी, सकस जीवनशैलीसाठी आणि पर्यावरणपूरक वातावरणासाठी एक सुंदर व सुसज्ज जागा मिळेल. लहान मुलांसाठी खेळाची साधने – लहान मुलांना शारीरिक व मानसिक विकासासाठी विविध खेळणी व उपक्रम उपलब्ध होतील. माढा मतदारसंघांमध्ये भरीव निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नग...

शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी योग्य शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी.

Image
 शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती त्वरित करा. युवा शैक्षणिक व सामाजिक  संघटनेची मागणी : ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना दिले निवेदन दिले. पंढरपूर (प्रतिनिधी)जि.प. शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी गावातील शिक्षकासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रताधारक तरुणांची नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्र राज्य  व गावातील विद्यार्थी व जागरूक नागरिक यांच्यातर्फे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना बुधवारी (दि. १७) दिलेल्या निवेदनातून केली आहे. पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे बुधवारी विषेश ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी दिलेल्या निवेदनातून जि.प. शाळा म्हणजे अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी एकमेव शैक्षणिक आधार आहे. मात्र जि.प. शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तर काही ठिकाणी अपात्र अथवा तात्पुरत्या स...

कासेगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे लोकार्पण माजी जिपसदस्य श्री वसंतनाना देशमुख यांच्या हस्ते संपन्न.

Image
 कासेगाव मधील जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण मा. श्री. वसंत नाना देशमुख यांच्या हस्ते . पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील     ‌‌ कासेगाव येथील दाते मंगल कार्यालयाच्या पाठीमागील श्री. भुवनेश्वरी जलकुंभ पाण्याच्या टाकीचा जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल योजनेच्या शुभारंभ सोमवारी मा. श्री.वसंत नाना देशमुख यांच्या हस्ते, करण्यात आला.यावेळी विलास मस्के. पाणीपुरवठा समिती अध्यक्ष  नितीन करवते उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांच्या अध्यक्षतेखाली, शाखा अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा सदाशिव पुजारी, सरपंच शोभा भोसले , उपसरपंच संग्राम भैय्या देशमुख वार्ड चे ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच दाजीप्पा देशमुख व‌ सर्व ग्रामपंचायत सदस्य , ग्राम विकास अधिकारी सौ. सुजाता भोसले व भारतीय जनता पार्टीचे किशोर धोत्रे. प्रमोद देशमुख साहेब. भिकाजी जाधव व सदाशिव आबा जाधव या सर्वांच्या उपस्थितीत पाण्याचे वाल चे पूजन करून , नारळ फोडून  पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आला. व पाणी चालू करण्यात आले.        यावेळी मा. जिल्हा परिषद सदस्य वसंत ना...

आ. अभिजीत पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियान उद्घाटन,

Image
 आमदार अभिजीत आबा पाटील यांच्याकडून 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' उद्घाटन करून ग्रामसभेस उपस्थित पंढरपूर तालुक्यातील तुंगत, पांढरेवाडी, देवडे येथील ग्रामसभेत आमदारांची पाटील यांची उपस्थिती. गटतट बाजूला ठेवून गावाच्या सर्वांगाने विकासासाठी एकत्र येणे गरजेचे-   आमदार अभिजीत पाटील ग्रामसभेला पहिल्यांदाच आमदार अभिजीत पाटील उपस्थित राहिल्याने गावकऱ्यांमधून आनंदाचा वातावरण. पंढरपूर  (प्रतिनिधी) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्य साधून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तुंगत, पांढरेवाडी, देवडे या म्हाडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेऊन कामाचा पंधरवडा याबाबत सुचना केल्या.. अभियान १७सप्टेंबर ते २ऑक्टोबपर्यंत प्रत्येक गावांमध्ये अनेक योजना राबवून गावाचा सर्वांगीण विकास करून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोचवाव्यात अशी भूमिका मांडली. लोकसहभागातून ग्रामविकासाला नवी दिशा मिळते. "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतरा...

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

Image
 शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल प्रा. व्ही. डी. परिचारक सरांचा गौरव पुणे येथे डी वाय पाटील विद्यापीठाकडून "आदर्श शिक्षक"पुरस्काराने सन्मानित. पंढरपूर(प्रतिनिधी ): शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पंढरपूर येथील नामांकित परिचारक क्लासेसचे ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. व्ही. डी. परिचारक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार समारंभ पुणे येथे अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, लोहगाव आणि क्रिपोन एज्युटेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात विद्यापीठाचे रजिस्ट्रार सुधाकर शिंदे तसेच ऑल इंडिया प्रायव्हेट स्कूलचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यांच्या हस्ते परिचारक सरांना सन्मानित करण्यात आले.  प्रा.परिचारक सर गेले ४२ वर्षे पंढरपूर मध्ये इयत्ता ११ वी व १२ वी सायन्स तसेच NEET व JEE या परिक्षांसाठी अत्यंत अवघड असे Physics व Mathematics हे विषय शिकवीत आहेत. सरांची Physics व Mathematics हे दोन्ही विषय अत्यंत सोपे करून शिकविण्याची पद्धत, गेल्या ४२ वर्षांमध्ये सरांनी घडवलेले शेकडो डॉक्टर, इंजिनियर, तसेच विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असले...

टाटा प्रोजेक्ट चे विनायक पै यांची स्वेरी इंजिनियरिंग कॉलेज मध्ये सदिच्छा भेट.

Image
                                                                                               टाटा प्रोजेक्ट चे विनायक पै यांची स्वेरीला सदिच्छा भेट पंढरपूर- जगविख्यात टाटा ग्रुपच्या, टाटा प्रोजेक्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक विनायक पै यांनी गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला अलीकडेच सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी इंजिनिअरिंग आणि एमबीए च्या विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.              मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक पै हे विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘भारतीय अर्थव्यवस्थेची जगामध्ये चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर सरशी झालेली आहे आणि त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर पायाभूत क्षेत्रांमध्य...

स्वेरी मध्ये ऑलम्पस २के २५ही तांत्रिक परिषद दि १५व १६सप्टेंबर रोजी होणार.

Image
                                                                           स्वेरीत ‘ऑलम्पस २ के २५’ तांत्रिक स्पर्धेच्या पोस्टरचे उदघाटन स्वेरीत राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा ‘ऑलम्पस २ के २५’ १५ व १६ सप्टेंबरला होणार  पंढरपूर -(प्रतिनिधी )स्वेरीमध्ये सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आपली सुप्त प्रतिभा आणि कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होत असते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळून तांत्रिक बाबींच्या सखोल अभ्यासाची वृत्ती अधिक दृढ होत आहे. या उपक्रमांच्या यशस्वी परंपरेचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारी ‘ऑलम्पस २ के २५’ ही राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा येत्या १५ व १६ सप्टेंबर रोजी स्वेरी मध्ये आयोजित करण्यात आली आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून नुकतेच या तंत...

स्वेरी मध्ये ऑलम्पिक टू के २५ ही तांत्रिक परिषद दि.१५व १६सप्टेंबर रोजी संपन्न होणार.

Image
                                                                                   स्वेरीत ‘ऑलम्पस २ के २५’ तांत्रिक स्पर्धेच्या पोस्टरचे उदघाटन स्वेरीत राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा ‘ऑलम्पस २ के २५’ १५ व १६ सप्टेंबरला होणार  पंढरपूर - स्वेरीमध्ये सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आपली सुप्त प्रतिभा आणि कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होत असते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळून तांत्रिक बाबींच्या सखोल अभ्यासाची वृत्ती अधिक दृढ होत आहे. या उपक्रमांच्या यशस्वी परंपरेचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारी ‘ऑलम्पस २ के २५’ ही राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा येत्या १५ व १६ सप्टेंबर रोजी स्वेरी मध्ये आयोजित करण्यात आली आहे. शिक्षक दिनाचे औचित्य सा...

खग्रास चंद्रग्रहण.

Image
 *ग्रहण* आज खग्रास चंद्रग्रहण! एक खगोलीय घटना! आपल्याकडे पूर्वापार या खगोलीय घटनेला धार्मिक अधिष्ठान आहे. अनेक मिथक कथा जोडलेल्या आहेत. चंद्र किंवा सूर्य ग्रहण असले की माई म्हणायची आज राहू केतू चंद्राला, सूर्याला गिळणार आहेत. मी का म्हणून विचारल्यावर माई त्याची कथा सांगायची. समुद्र मंथनातून निघालेले अमृत पिण्यासाठी देवतांच्या रांगेत राहू हा राक्षस चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येऊन बसला. हा देव नसून राक्षस आहे हे सूर्य चंद्राच्या लक्षात आले. त्यांनी भगवान विष्णूंना हे सांगितले. विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला. आणि शरिराचे दोन भाग झालेले पण त्याने अमृताचा घोट घेतला होता म्हणून ते दोन भाग अमर झाले. त्याचे शिर राहू झाले.  आणि धड केतू!! या घटनेचा सूड म्हणून वर्षातून एक दोन वेळा राहू केतू चंद्र सूर्याला काही वेळ गिळतात. आणि ग्रहण होते. हे ऐकून मला वाटायचे की हा राहू किती बलवान आहे! मग मी या राहू केतूचा शोध सुरू केला. ते छायाग्रह आहेत. ते सौरमालेत दिसत नाहीत.  असे पुढे शाळेच्या भूगोलाच्या पुस्तकातून कळाले. तरीही ग्रहण आले की माईनी सांगितलेले खरे वाटायचे. ग्रहण लागाय...

यशस्वी व्हायचे असेल तर सरावात सातत्य असणे आवश्यक._प्रकाश खोडके.

Image
 यशस्वी व्हायचे असेल तर सरावात सातत्य आवश्यक                                                             - एमएसबीटीई चे माजी संचालक डॉ प्रकाश खोडके  स्वेरी मध्ये‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा पंढरपूरः(प्रतिनिधी )‘जर आपल्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपण ज्या गोष्टींचा सराव करत असता त्याच्यात सातत्य जपले पाहिजे. आपण कुठे चुकतो हे सरावातून समजते आणि ते दुरुस्त करता येते. यातून मिळणारे यश हे पूर्णपणे तुमच्या कृतीवर अवलंबून असते. तुम्ही काय विचार करता, तुम्ही वेळप्रसंगी काय निर्णय घेता, तुम्हाला काय वाटते यावर आपल्या कार्याची दिशा अवलंबून असते. कारण आपले मन म्हणजे एक कारखाना आहे. ज्यामध्ये अनंत विचारांची प्रक्रिया चालते.’ असे प्रतिपादन एमएसबीटीई चे माजी संचालक डॉ प्रकाश खोडके यांनी केले.         गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट मध्ये मध्यवर्ती असलेल्या भव्य खुल्या...

खग्रास चंद्रग्रहण मुळे नित्योपचारात बदल, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची माहिती.

Image
 खग्रास चंद्रग्रहणामुळे श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या नित्योपचारात बदल पंढरपूर (प्रतिनिधी):- खग्रास चंद्रग्रहण दि.७ सप्टेंबर रोजी  असल्याने श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या नित्योपचारामध्ये बदल करण्यात येणार  आहे. यादिवशी रात्री ९.५७ वा.ते १.२७वाजेपर्यंत  ग्रहणाचा कालावधी आहे. ग्रहणाचे वेध दुपारी १२.३७ वाजले पासून सुरू होत असल्याने दुपारचा पोशाख व धुपारतीच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही.   रात्री ९.५७ वाजता ग्रहण स्पर्श झाल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस व मंदिरातील इतर परिवार देवतेस चंद्रभागा नदीचे पाणी आणून  स्नान घालण्यात येणार आहे. तसेच ग्रहण सुटेपर्यंत म्हणजे रात्री १.३७ वाजेपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सुरू राहणार आहे. ग्रहण सुटल्यानंतर ग्रहण सुटल्याचे स्नान चंद्रभागे नदीचे पाणी आणून घालण्यात येणार असून, मोक्ष झाल्यानंतर रात्री २ वाजेपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सुरू राहील व रात्री २ वाजेनंतर शेजारती करण्यात येणार आहे. शेजारतीनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची विश्रांती पहाटे ५ वाजेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे दिनांक ८ सप्टेंबर र...