पंढरीच्या शिक्षणक्षेत्रातील आधुनिक द्रोणाचार्य श्री व्ही डी परिचारक सर.


 पंढरीच्या शिक्षणक्षेत्रातील आधुनिक द्रोणाचार्य_श्री व्हि.डी परिचारक सर पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरीच्या शिक्षण क्षेत्रातील द्रोणाचार्य अशी ओळख असणारे श्री विनायक परिचारक सर यांचा आज वाढदिवस दि.२७सप्टेंबर १९६१रोजी त्यांचा जन्म झाला.

सर लहानपणी पासूनच स्वाभिमानी आणि स्वावलंबी स्वभावाचे यामुळे 

परिचारक यांच्यासारख्या राजकीय घराण्यात जन्म घेऊन समाजसेवेचा मोठा वारसा असूनही त्यांनी कुणाचाही फायदा घेतला नाही,

माजी आमदार स्व सुधाकर पंत परिचारक यांचा कायमच वरदहस्त होता,

सरानी मनात आणले असते तर एखादी मोठी शिक्षणसंस्था, कॉलेज उभे करून आरामात जीवन सहज जगू शकले असते, मात्र मुळातच पिंड लढवय्या असल्याने व्हि डि

परिचारक सरानी कधीही

सोपा मार्ग किंवा यश मिळवण्यासाठी शॉर्टकट वापरला नाही,

स्वतःच्या हिंमतीवर आणि हुशारीवर कोल्हापूर येथे एम एम सी, फिजिक्स, एम एस सी मॅथेमॅटिक्स, बी एड 

असे शिक्षण घेतले,

महाविद्यालयीन जीवनात माजी आमदार शहाजी बापू पाटील, पंढरपूर येथील माजी आमदार स्व भारत नाना भालके, कासेगाव येथील श्री पांडुरंग साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन, माजी जिप सदस्य वसंत नाना देशमुख,

सांगोला चे माजी आमदार दीपक आबा साळुंखे असे दिग्गज राजकीय मित्र असूनही कोणाचाही गैरफायदा घेतला नाही,

कॉलेज जीवनात एन एस यु आय या संघटनेचे ते सक्रिय सदस्य होते, अनेक शिबिरे त्यांनी घेतली होती, काँग्रेस पक्षातीलअनेक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नेत्यांची याकाळात त्यांची चांगली ओळख झाली होती.काँग्रेस पक्षाची ही विद्यार्थी संघटना असल्याने काँगेस मध्ये प्रवक्ते पद सहज मिळाले असते,

परंतु सरानी शिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व लक्ष शिक्षणक्षेत्रात घेऊन झोकून दिले.

१९८३साली चौफळा येथील बडवे यांच्या जागेत अकरावी, बारावी सायन्स शिकवणी सुरू केली.

सरांच्या वडीलांना त्यांचा हा निर्णय मान्य नव्हता.

पहिल्या महिन्यात केवळ ८०रुपये फी मिळाली,

वडिलांनी विचारले तेव्हा सरांनी वडीलांना वाईट वाटेल म्हणून ७००रु असे सांगितले, तरीही सरांच्या वडीलांनी नाराजी व्यक्त केली, कारण सरांचे शिक्षण, योग्य क्षमता याची त्यांना कल्पना होती,

पण दिवस काही सारखे राहत नसतात, अल्पावधीतच फिजिक्स आणि मॅथ्स या विषयात सायन्स च्या विद्यार्थ्यांना गोडी वाटून हे अवघड, क्लिष्ट विषय सोपे वाटू लागले, त्याकाळात सायन्स शिकवणी कोणी घेण्याचे धाडस करत नव्हते,

ज्ञानप्रसाद अकॅडमी हे नाव केवळ पंढरपूर तालुकाच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात गाजू लागले, गावातील अरुण, अकबर या सिनेमा टॉकीज मध्ये १९८०व ९०च्या दशकात स्लाईड झळकू लागल्या,

प्राध्यापक व्हि डी परिचारक सर यांचा विद्यार्थी हा प्रेस्टिज पॉईंट होऊ लागला.

शहरातील नामवंत, प्रतिष्ठित घराण्यातील मुले, मुली ज्ञान प्रसाद अकॅडमी 

मध्ये शिकवणी साठी येत होती, सकाळ, सायंकाळ तेव्हा चौफाळात एखाद्या कॉलेज सारखी गर्दी होत असे, दिवसेंदिवस सरांची प्रसिद्धी वाढत जात होती,

सांगोला,आटपाडी, मंगळवेढा, विटा, जत या तालुक्यातील विद्यार्थी सुद्धा 

पंढरपूर येथे सरांच्या क्लास साठी येत होते, हे आमच्या पिढीने डोळ्याने पाहिले आहे, हजारो गरीब आणि होतकरू मुलांना सरांनी मोफत शिक्षण दिले, एवढेच नव्हे तर त्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली,

ट्युशन क्लास मध्ये प्रथमच प्रयोगशाळा आणण्याचा उपक्रम सरांनी राबवला. 

त्यांची व्हिजन पुण्या मुंबई मधील कोचिंग क्लास सारखी होती,

आज भारतातील मुंबई, बेंगलोर, नागपूर, पुणे सारख्या मेट्रो सिटीत सरांचे हजारो विद्यार्थी डॉक्टर आणि इंजिनियर झाले आहेत. मोफत शिक्षण घेऊन कृषी अधिकारी, आय ए एस, आय पी एस अधिकारी बनले आहेत,

सरांची नेत्रदीपक प्रगती समकालीन प्रतिस्पर्धी शिक्षकांना बघवत नव्हती म्हणून सर्वजण एकत्र येऊन त्यांनी स्वतःचे क्लासेस सुरू केले,

ज्युनिअर कॉलेज आणि कॉलेज मधील स्वतःच्या विद्यार्थ्यांना धाकधपटशा 

दाखवून स्वतःच्या क्लास ला यायला भाग पाडले, पण, व्हि डि परिचारक सरांना कुरुक्षेत्रातील अभिमन्यू सारखे घेतले,

पण हा अभिमन्यू चक्र व्यूहातून सुटण्याची कला अवगत होता, त्यामुळे काही काळानंतर पुन्हा विद्यार्थी ज्ञानप्रसाद अकॅडमी कडेच वळले,

शेवटी तळपता सूर्य तो सूर्य 

त्याची बरोबरी करणे येड्या गबाळ्याचे काम नाही, हे कळून चुकल्यावर या लोकांनी सरांनाच आमच्या क्लास मध्ये या अशा ऑफर दिल्या,

प्रा. विनायक परिचारक सर मुळातच शांत, सहिष्णू स्वभावाचे त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून चालत राहिले, आज तब्बल ४२वर्षे झाली तरीही या क्लासची उंची कोणीही गाठू शकले नाही,

नुकताच व्हि डी परिचारक सराना पुणे येथील डॉ डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, संपूर्ण राज्यातून ही निवड करण्यात आली होती, त्यांचेच मार्गदर्शन घेऊन सरांचे लाडके चिरंजीव मंदार परिचारक क्लास यशोशिखरावर नेत आहेत,

श्री व्हि डी परिचारक यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा माय रूक्मिणी आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य देवो हीच रूक्मिणी चरणी प्रार्थना.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.