Posts

Showing posts from April, 2024

पंढरपुर तालुक्यात भा ज प चा घोंगडी बैठकांवर जोर.

Image
 पंढरपूर तालुक्यात भा ज प च्या वतीने घोंगडी बैठकांवर जोर प्रतिनिधी पंढरपूर  , भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे सोलापूरचे उमेदवार श्रीराम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय  समाधान  अवताडे यांच्या नेतृत्वाखाली शिरगाव, एकलासपूर ,तावशी, तन्हाळी या गावांमध्ये घोंगडी बैठकांचा आयोजन करण्यात आलं होते . यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केलं यावेळी  समाधान आवताडे यांनी सांगितलं की मोदी यांनी देशातील शेतकरी, युवा महिलांच्या करता जास्तीत जास्त योजना दिलेली आहेत पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लावला आहे. आणि भविष्य काळामध्ये पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अनेक चांगल्या योजना आपल्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचणार आहेत यासाठी आपण सर्वजणांनी एक दिलाने काम करून पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्याकरता  राम सातपुते यांना मतदान करावे या वेळी भारतीय  जनता पार्टी महिला मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्षा, डॉ प्राजक्ता बेणारे, फादर बॉडी च्या उपाध्यक्ष अपर्णा तारके, जिल्हा उपाध्यक्ष सुजाता ...

भा ज पा महीला पदाधिकाऱ्यांनी साधला महीला भाजी विक्रेत्यांशी संवाद.

Image
 भा ज प महीला पदाधिकाऱ्यांनी साधला महीला भाजी विक्रेत्यांशी संवाद. पंढरपूर (प्रतिनिधी) भा ज प महीला पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी बुधवार दिनांक २४ रोजी नवी पेठ येथील जुन्या भाजी मंडई मध्यें जाऊन संवाद साधला. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी व शहर कार्यकारणी च्या वतीने पंढरपुरातील जुने भाजीपाला मार्केट , पुढे नवी पेठ  ठिकाणी सर्व शेतकरी भाजीविक्रेत्या महिला यांच्याशी संवाद साधला . त्यांच्यासोबत पोळी भाजी भाकरी ठेचा त्याचबरोबर भत्ता कलिंगड कैरी या पदार्थांचा आस्वाद घेतला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी बोलताना अनेक महिलांनी उस्फूर्तपणे मोदी साहेबांनी काय काय दिले हे आपल्या बोली ग्रामीण भाषेत सांगितले कार्यक्रमाला अनेक भाजी विक्रेत्या महिला या उपस्थित होत्या हा यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सोलापूर ग्रामीण, डॉ  प्राजक्ता बेणारे यांनी मोदी साहेबांच्या महिलांसाठीच्या योजना अतिशय सोप्या भाषेत समजून सांगितल्या, तसेच यावेळी शहर उपाध्यक्ष सौ शिल्पा म्हमाणे, यांनी महिलांना तुम्हाला जी काही अडचण येईल ती तुम्ही माझ्याकडे या मी माझ्या पद्...

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भा ज पा पक्षाच्या वतीने साजरी.

Image
 महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भा ज पा च्या वतीने अभिवादन. प्रतिनिधी पंढरपूर -पंढरपूर येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पक्षाच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड, आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी   सोलापूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष डॉ प्राजक्ता बेणारे , शहराध्यक्ष डॉ जोती शेटे, जिल्हा उपाध्यक्ष ज्योती कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष जयश्री क्षीरसागर, जिल्हा सरचिटणीस सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया काकडे, जिल्हा सरचिटणीस सरिता माने, फादर बॉडी च्या उपाध्यक्ष अपर्णा तारके, जिल्हाचिटणीस अंजना जाधव, भारतीय जनता पार्टी किसान प्रदेश महिला मोर्चाच्या प्रमुख विश्रांती भुसनर, शहर सरचिटणीस प्रतिभा गानमोटे, शहर संघटन सरचिटणीस मेघा मोळक, शहर उपाध्यक्ष शिल्पा म्हमाणे,  शहर उपाध्यक्ष सुवर्णा कुरणावळ, शहर सरचिटणीस संगी ता कुरणावळ, जिल्हा उपाध्यक्ष सुजाता वगरे आदि महीला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थीत होत्या. यावेळी महीला मोर्चा जिल्हाध्यक्षा डॉ प्रा...

टेंभू चे पाणी मंगळवेढा साठी मिळविण्याचा प्रयत्न सुरू.- आ. समाधान आवताडे.

Image
 टेंभुचे पाणी मंगळवेढ्याला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू- आ समाधान आवताडे पंढरपूर प्रतिनिधी- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच टेंभू योजनेच्या पाण्याची पाळी आमदार आवताडे यांनी मिळवून देऊन माण नदीकाठच्या शेतकऱ्यांना कृष्णामाईच्या पाण्याची ऐतिहासिक भेट घडवली होती सध्याही सदर योजनेतून पाणी पाळी सोडण्यात आले असून या भागातील जनतेला पाणी मिळवून देण्यासाठी आ. समाधान आवताडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन निश्चितपणे टेंभूमधील पाणी मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी गावभेट दौऱ्यात दिली. मंगळवेढा तालुक्यातील पाणीप्रश्न हा केवळ राजकीय भांडवलाचा विषय न ठेवता याकडे संवेदनशील दृष्टीकोनातून पाहत आ समाधान आवताडे यांनी शनिवारी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व टेंभू अधीक्षक गुणाले यांच्याशी संपर्क करून या भागातील पाण्याविना शेतकऱ्यांनी झालेली परिस्थिती कथन केली असता लवकरच या योजने अंतर्गत पाणी सोडण्याचे आ आवताडे ...

पंढरपूर येथे भा ज पा पक्षाच्या वतीने स्थापना दीन उत्साहात साजरा.

Image
 पंढरपूर येथे भा ज प पक्षाचा स्थापना दिन संपन्न. प्रतिनिधी पंढरपूर - 'सौगंध मुझे इस मिट्टी की मै देश नही मिटने दुंगा' या विचाराने प्रेरित होऊन ४४ वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. आज ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन संपूर्ण भारतामध्ये उत्साहाने साजरा करण्यात आला.  त्याचबरोबर आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये पंढरपूर या ठिकाणी क्र.८२ व ८३ बुथ मध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे, भारतीय जनता पार्टीचे  आमदार .समाधान दादा अवताडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयात आदरणीय .दिनदयाळ उपाध्याय, .श्यामाप्रसाद मुखर्जी व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय जनता पार्टीच्या ध्वजाचे पूजन करण्यात आले.  यावेळी यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा-महिला मोर्चा कार्यकारणी त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर व पंढरपूर तालुका महिला मोर्चा कार्यकारणी,युवा मोर्चा त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सोलापूर महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ.प्राजक्ता बेणारे यांनी वर्धापन दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्...

इंटरनेट या प्लॅटफॉर्म चा उपयोग संशोधनासाठी करणे आवश्यक.-डॉ उदय.निरगुडकर

Image
 इंटरनेट या प्लॅटफॉर्मचा उपयोग संशोधनासाठी करणे आवश्यक.                                                                -जेष्ठ पत्रकार व विचारवंत डॉ. उदय निरगुडकर स्वेरीत ‘भारत @ २०४७’ हे मार्गदर्शन सत्र संपन्न पंढरपूर-(प्रतिनिधी )‘देशाला मोठे करायचे असेल तर सर्वप्रथम देशातील प्रत्येक नागरिक मोठा झाला पाहिजे. नागरिकच समाजाला मोठे करतो. त्यामुळे साहजिकच देश मोठा होतो. हिरोशिमा व नागासाकीवर झालेल्या अणुबाँब हल्ल्यानंतर 'जपान' खचून न जाता पुढे आर्थिक दृष्ट्या संपन्न झाला. हल्ल्यानंतर जपान हा देश सर्व आघाड्यांवर रसातळाला गेला होता. जपानमध्ये गेल्यानंतर जाणवले की, तेथील नागरिक हे कमालीचे देशभक्त आहेत. जपानी जीवन पद्धतीत ‘साहस’ ही बाब मूलभूत आहे. आपला देश साहसापासून वंचित राहतो. वैचारिक जीवन जगताना आपण स्वार्थी बनतो. त्या ठिकाणी प्रथम देश, नंतर व्यक्ती हे अंगभूत धोरण आहे. कारण जपानमध्ये तेथील नागरिक एका ध्येयाने प्रेरित होऊन कार्य ...

हुलजंती, मंगळवेढा येथे अभिजीत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत इफ्तार पार्टी.

Image
 *दुष्काळ,शेतीमालाचा व दुधाचा कमी दर, हटवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी केलेली दुॅवा अल्ला कबूल करेल* :- अभिजीत पाटील. (हुलजंती, तसेच मंगळवेढा शहरात इफ्तार पार्टी अयोजन करण्यात आले)  पंढरपूर प्रतिनिधी/-  मंगळवेढा तालुक्यातील तालुक्याच्या वाटणीला आलेला दुष्काळ, शेतीमालाचा व दुधाचा कमी दर, हटवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी केलेली दुॅवा अल्ला कबूल करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे नेते तथा श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला.   पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये सामाजिक कार्यात अभिजीत पाटील हे नेहमीच अग्रेसर राहिलेले दिसून येतात. सर्वधर्म समभाव हा त्यांच्या कार्याचा स्थायीभाव आहे, हे पुन्हा एकदा त्यांच्या या उपक्रमातून सिद्ध झाले. मंगळवेढा येथील गैबीपीर दर्गा परिसरामध्ये अभिजीत पाटील यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी मतदार संघ अध्यक्ष मुज्जमील काझी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, शहराध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी, संतोष रणदिवे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत, शहराध्यक्...

नदी काठच्या गावांना सहा तास वीज मिळणार, आ. आवताडे यांची मागणी मान्य.

Image
 *नदीकाठच्या गावांना सहा तास वीज मिळणार.. *जिल्हाधिकाऱ्यांकडून आमदार आवताडेंची मागणी मान्य* प्रतिनिधी पंढरपूर - दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच असून लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी ही धावा धाव करावी लागत आहे अशा परिस्थितीमध्ये भीमा नदीमध्ये पिण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले आहे मात्र त्या नदीकाठचा विद्युत पुरवठा फक्त दोनच तासच सुरू असून त्या दोन तासांमध्ये शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळत नाही अनेक शेतकऱ्यांच्या पाच ते दहा किलोमीटर अंतर पाईपलाईन आहेत दोन तासांमध्ये त्या पाईपलाईन मधून पाणीही बाहेर पडेनासे झाले आहे त्यामुळे रोज दोन तास वीज पुरवठा सोडण्याऐवजी किमान एक दिवसाआड आठ तास तरी वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती, त्यांचबरोबर दूरध्वनी वरून चर्चा करून चर्चेअंती मार्ग काढत  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दररोज सहा तास वीज पुरवठा सुरू करण्याचे मान्य करत तशा सूचना महावितरण विभागास दिल्या असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले. आमदार समाधान आवताडे यांनी जिल्...

नदी काठच्या गावांना एक दिवसाआड तरी आठ तास वीज द्या. आ. समाधान आवताडे.

Image
 *नदीकाठच्या गावांना एक दिवसाआड तरी आठ तास वीज द्या. आमदार आवताडे यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी*  पंढरपूर ( प्रतिनिधी) भीमा नदीमध्ये सध्या पिण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले आहे मात्र त्या नदीकाठचा विद्युत पुरवठा फक्त दोनच तास केला असून त्या दोन तासांमध्ये शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळत नाही अनेक शेतकऱ्यांच्या पाच ते दहा किलोमीटर अंतर पाईपलाईन आहेत दोन तासांमध्ये त्या पाईपलाईन मधून पाणीही बाहेर पडेनासे झाले आहे त्यामुळे रोज दोन तास वीज पुरवठा सोडण्याऐवजी एक दिवसाआड आठ तास वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात आमदार अवताडे यांनी असे म्हटले आहे की उन्हाची दाहकता वाढत असून नागरिक व जनावरांचे पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत प्रशासनाने काही भागात दोन तास तर काही भागात चार तास विद्युत पुरवठा चालू ठेवलेला आहे मात्र या दोन व चार तासाच्या कालावधीमध्ये पुरेसा विद्युत प्रवाह उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे...

श्री माताजी निर्मलादेवी प्रशालेत मतदार जागृती अभियान संपन्न.

Image
 श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिर शाळेत* मतदान जागृती अभियान अंतर्गत पालकांना पत्र* *पंढरपूर :(प्रतिनिधी)- श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिर पंढरपूर शाळेत मतदान केंद्र आहे. या शाळेच्या केंद्रावर मतदान जागृती अभियान राबविण्यात आले. आपल्या भारतीय लोकशाहीच्या उत्सवात कुटुंबातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या नागरीकांना पत्रलेखन करून ७ मे सोमवार रोजी मतदान करण्याचे आवाहन  केले. यावेळी ४ थी च्या बालमित्र चि. अर्णव, श्लोक,आरोही, संचिता व तेजस्विनी यांनी आपले पत्र वाचून माहिती दिली.*       *याप्रसंगी श्री रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर संस्थापिका सचिवा मा.सौ. सुनेत्राताई पवार सो यांनी मुलांना व पालकांना म्हणाल्या  "लोकशाही बळकट व समृद्ध करण्यासाठी आपले एक मत महत्त्वाचे आहे.आपले मतदान, हा आपला पवित्र हक्क आहे. तो बजावणे आणि भारताची लोकशाही जिवंत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे."*     *तसेच यावेळी मुलांना मतदान यंत्रा बद्दल व मतदान का करावे ? याबद्दल माहिती मुख्याध्यापक श्री संतोष कवडे सर व श्री  टापरे सर यांनी मतदान य...

प्रत्येक क्षेत्रात कठोर परिश्रमाची गरज. डॅनिअल बाबू

Image
 प्रत्येक क्षेत्रात कठोर परिश्रमाची गरज                                                    - भाभा अणुसंशोधन केंद्राचे डॅनीअल बाबू ‘भाभा अणुसंशोधन केंद्र  व स्वेरी’ यांच्यात दुसऱ्यांदा सामंजस्य करार पंढरपूर- (प्रतिनिधी)‘विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन पुढे नोकरीबरोबरच उद्योग व्यवसायामध्ये करिअर करावे. उद्योग- व्यवसाय करताना त्याला बुद्धी कौशल्याची जोड द्यावी. अभियांत्रिकी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बौद्धिक उर्जा अधिक प्रमाणात मिळत असते. व्यावसायिक उद्योगधंद्याच्या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकीचे शिक्षण हे सर्वात सरस असून यातील ज्ञानाचा व्यवहारात विशेष उपयोग होतो. म्हणून अभियांत्रिकी शिक्षणाचा फायदा हा भविष्यात नोकरी व उद्योगाच्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्रात होतो. यासाठी करिअर करताना अडचणी आल्यानंतर त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा आणि हे करताना कठोर परिश्रमाची देखील नितांत गरज आहे.’ असे प्रतिपादन मुंबईच्या भाभा अणुसंशोधन के...

विस्थापित नगर येथे मिक्सर चा स्फोट होऊन महीला ठार.

Image
 विस्थापित नगर येथे मिक्सर चा स्फोट होऊन महीला ठार. पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथील भक्ती मार्ग परिसरातील विस्थापित नगर येथे एका बेकायदेशीर घरात शोभेच्या दारूचा स्फोट होऊन एका विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झाला. हि भयानक व दुर्दैवी घटना मंगळवार दिनांक २एप्रिल रोजी विस्थापित नगर येथे सायंकाळी सहा वाजता घडली. या स्फोटात मयुरी अक्षय मेनकुदळे(वय २४, रा. विस्थापित नगर,भक्ती मार्ग)  ही महिला जागीच ठार झाली. या ठिकाणी मागील ६ महिन्यापासून बेकायदेशीर  शोभेच्या दारूचा कारखाना सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. ही महिला मिक्सर मध्ये शोभेची घट्ट झालेली दारू बारीक करीत असताना अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटात या महिलेचा हात उडून दूर पडला. यानंतर लगेच काही मिनिटातच सदर महिलेस उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच मयुरी मेनकुदळे यांचं मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. हे जोडपे एक वर्षापूर्वी राहण्यास आले   होते .तसेच ६महिन्यापासून घरा शेजारील पत्रा शेड मध्ये बेकायदेशीर शोभेच्या दारूचा कारखाना चालवीत होते. याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार...

स्वेरी कडून मृदासंवर्धन, जलजनजागृती गोपाळपूर व ओझवाडी येथे उपक्रम.

Image
 'स्वेरी'कडून मृदासंवर्धन आणि जलसंवर्धनाबाबत जनजागृती गोपाळपूर आणि ओझेवाडी येथे उपक्रम पंढरपूर-(प्रतिनिधी )गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी गोपाळपूर आणि ओझेवाडी (ता.पंढरपूर) मध्ये जाऊन मृदासंवर्धन आणि जलसंवर्धनाबाबत जनजागृती केली. या मार्गदर्शनामुळे शालेय विद्यार्थ्यांना जमीन, माती आणि पाण्याचे महत्व समजले.         सध्या एकीकडे कडक उन्हाळा जाणवत आहे तर दुसरीकडे पाण्याचे स्रोत कमी होत आहेत. काही ठिकाणी तर दुष्काळी परिस्थिती देखील जाणवत आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे. तसे केले तरच भविष्यात पिण्यासाठी आणि  वापरण्यासाठी आपल्याला पाणी उपलब्ध होऊ शकते. आपण जसे धरणे बांधून पाणी साठवतो त्याचप्रमाणे आपण जमिनीत पाणी जिरवून पाण्याची जमिनीतील पातळी वाढवू शकतो. धरणे बांधण्यास खूप आर्थिक खर्च येतो त्यासाठी भरपूर जागा देखील लागते, पण पाणी जिरविण्यासाठी आपल्याला उपलब्ध जमिनीचा उपयोग करुन तांत्रिकदृष्ट्या बंडिंग करुन पाणी जिरवता येते. 'स्वेरी'चे संस...