पंढरपुर तालुक्यात भा ज प चा घोंगडी बैठकांवर जोर.


 पंढरपूर तालुक्यात भा ज प च्या वतीने घोंगडी बैठकांवर जोर

प्रतिनिधी पंढरपूर  , भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे सोलापूरचे उमेदवार श्रीराम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय  समाधान  अवताडे यांच्या नेतृत्वाखाली शिरगाव, एकलासपूर ,तावशी, तन्हाळी या गावांमध्ये घोंगडी बैठकांचा आयोजन करण्यात आलं होते .

यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केलं यावेळी  समाधान आवताडे यांनी सांगितलं की मोदी यांनी देशातील शेतकरी, युवा महिलांच्या करता जास्तीत जास्त योजना दिलेली आहेत पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लावला आहे. आणि भविष्य काळामध्ये पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अनेक चांगल्या योजना आपल्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचणार आहेत यासाठी आपण सर्वजणांनी एक दिलाने काम करून पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्याकरता  राम सातपुते यांना मतदान करावे

या वेळी भारतीय  जनता पार्टी महिला मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्षा, डॉ प्राजक्ता बेणारे, फादर बॉडी च्या उपाध्यक्ष अपर्णा तारके, जिल्हा उपाध्यक्ष सुजाता वगरे, जिल्हा  चिटणीस अंजना जाधव, भारतीय जनता पार्टी किसान प्रदेशच्या पदाधिकारी विश्रांती भूसनर , युवा मोर्चाचे अनुप देवधर,  युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन दादा यादव, व सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.