स्पंदन दगडी घरांचे.
*स्पंदन दगडी घराचे* सध्या पंढरपुरात देवळाजवळच्या प्रत्येक गल्लीबोळात काॅरिडाॅरची अखंड चर्चा सुरू आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारने हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामध्ये कित्येक लोकांची पिढ्यानपिढ्याची घरे उध्वस्त होणार आहेत. असा प्रसंग देवळाजवळच्या रहिवाश्यांनी एकोणीसशे ऐंशी साली, मास्टर प्लॅन झाला होता त्यावेळी देखील अनुभवला होता. आता परत दुसऱ्यांदा काही घरांवरून वरवंटा फिरणार आहे. माणसे हताश झाली आहेत. राजानं मारलं अन् पावसानं झोडपलं तर दाद मागायची कुणाला? अशी अवस्था झाली आहे. पंढरपुरात भरणाऱ्या चैत्री, आषाढी, कार्तिकी, माघी या चार मोठ्या वाऱ्यांपैकी आषाढी, कार्तिकी या जास्त मोठ्या वाऱ्या आहेत. या दोन वाऱ्यांच्या गर्दीच्या चार पाच दिवसांसाठी पिढ्यानपिढ्याची नांदती घरे उधवस्त करायची का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. वर्षानुवर्षे पंढरपुराने वारीला आपल्यात सामावून घेतले आहेच की..कधीच कुठली कुरकुर न करता...तरीही अजून ही शिक्षा का??? या प्रकल्पाअंतर्गत आता आमचंही घर बाधित होणार असा काल भावाचा फोन आला आणि मन व्यथित झालं.. प्रत्येक माहेरवाशीण सासरी जरी नां...