भाजप पक्षाच्या वतीने ४५वा वर्धापनदिन उत्साहात साजरा.
आज भारतीय जनता पार्टीचा ४५ वा वर्धापन दिन जिलेबी वाटून उत्साहात साजरा.
पंढरपूर(प्रतिनीधी) पंढरपूर येथे भाजप पक्षाच्या वतीने रविवार दि.
६ एप्रिल २०२५ रोजी
भारतीय जनता पार्टीचा ४५ वा वर्धापन दिन छत्रपती श्री.शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जिलेबी वाटून उत्साहात साजरा झाला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य आदरणीय श्री.बाबासाहेब बडवे,जे पंढरपूरच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारणीच्या मूळ वटवृक्षाची एक फांदी म्हणून ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून काम केलेल होत.
आदरणीय बाबासाहेबांनी यावेळी भारतीय जनता पार्टीच्या ध्वजाचं पूजन त्याचबरोबर आज रामनवमीचा योग असल्यामुळे रामध्वजाचे पूजन करून श्री.विठ्ठल रुक्मिणीला जिलेबीचा नैवेद्य दाखवून जिलेबीचे वाटप केले.
यावेळी २००४ च्या कार्यकाळातील माजी तालुकाध्यक्ष,पंढरपूर पंचायत समिती उपसभापती,महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ मा.अध्यक्ष व सध्याचे विद्यमान जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री.प्रशांत भैय्या देशमुख,
तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती श्री संतोष घोडके,
सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष
डॉ.प्राजक्ता बेणारे,
पंढरपूर शहराध्यक्ष डॉ.ज्योती शेटे
जिल्हा सरचिटणीस व जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सौ.सुप्रिया काकडे,
शहर उपाध्यक्ष सौ.सुवर्णाताई कुरणावळ,
शहर उपाध्यक्ष सौ.शिल्पा म्हमाने.
संपादक.
चैतन्य उत्पात.
यांनी सर्व नागरिक आणि भाविक भक्तांना जिलेबी वाटून पक्षाचा वर्धापन दिन जोरात व आनंदात साजरा केला.

Comments
Post a Comment