बॅगा चोरणारे दोन आरोपी गजाआड.
*अंतरराज्य टोळीतील बॅग लिफ्टींग करणारे दोन आरोपी पंढरपुर शहर पोलीसांकडुन गजाआड.* पंढरपूर शहर पोलीस ठाणे ठाणे गु.र.नं.७३०/२०२४ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दाखल आहे. सदरचा गुन्हा हा पंढरपुर शहरातील सरगम चौक येथे असलेल्या एच.डी.एफ.सी. बँकेच्या बाहेर घडला असुन यातील फिर्यादीची पैशाची बॅग ही चोरीला गेली होती. त्याप्रमाणे तपास केला असता सदरचा गुन्हा करणारे आरोपी हे कपारलाटिप्पा पोस्ट बिटरगुंटा ता कावली नि वेल्लोर राज्य आंध्र प्रदेश येथील असल्याची खात्री झाली होती. सदर आरोपींतांच्या मागावर पोलीस होते. त्या टोळीतील काही आरोपी हे आंध्र प्रदेश मधुन निघाले असुन ते सोलापुर जिल्हयात येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली असल्याने त्याअनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सापळा रचुन गुन्हयातील दोन संशयीत आरोपींना गुन्हा करते वेळी वापरलेले दोन्ही मोटार सायकलीसह ताब्यात घेतले आहे. त्यांचेकडुन चोरी करण्या करीता वापरले जाणारे काही संशयीत वस्तु मिळुन आले आहेत. तसेच गुन्हयात चोरीस गेलेल्या रकमेपैकी ३,००,०००/- रू जप्त करण्यात आलेले आहे. मिळुन आलेल्या दोन्ही आरोपींना अटक केली असुन त...