पावणे तीन लाख रुपयांचा बारा किलो गांजा जप्त, शहर पोलिसांची कारवाई.


 पावणे तीन लाख रुपये किमतीचा 

सव्वा बारा किलो गांजा जप्त.


शहर पोलिसांची कारवाई


 पंढरपूर(प्रतिनिधी)- पंढरपूर येथे अवैधरित्या विक्रीसाठी आलेला सुमारे २ लाख ४५ हजार रूपये किंमतीचा एकूण १२.२७२ किलो गांजा आणि ८ लाख रूपये किंमतीची अर्टिगा कार असा दहा लाख ५ हजार ४४० रूपयांचा मुद्देमाल शहर पोलिस पथकाने जप्त केला. अवैध गांजा विक्री करणाऱ्या  दोघांना अटक करण्यात आली असून गुरूवारी (दि.१३) रात्री सव्वादहा

वाजण्याच्या सुमारास येथील जुना अकलूज रोडवर  जवळ डी मार्ट शॉप समोर ही कारवाई करण्यात आली.


रोहन शंकर चव्हाण (वय २१) व रोहीत प्रकाश कांबळे (वय २५, दोघे रा. बावडा, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. गुरूवारी रात्री शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे

सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश गोसावी,  शरद कदम, हवालदार हेम्बाडे, गोडसे, औटी, निलेश कांबळे, मंडले, माने, बिचुकले यांचे पथक गस्त घालत होते. यादरम्यान, जुना अकलूज रोडवर डी-मार्टकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंधारात संशयास्पदरित्या एक अर्टिगा कार (एम.एच.

०७ / एस. ३६९९) थांबलेली पोलिसांना

दिसली. पोलिसांचा सुगावा लागताच या कारमधून रोहन चव्हाण व रोहीत कांबळे हे दोघे पळून जाऊ लागले. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी तपासणी केली असता कारमध्ये खाकी कागदात गुंडाळून चिकटपट्टी लावलेले गांजाचे ६ बॉक्स दिसून आले. दोन लाख ४५ हजार ४४० रूपये किंमतीचा हा १२.२७२ किलो गांजा आणि

८ लाख रूपये किंमतीची कार पोलिसांनी जप्त केली. तसेच कारमधील दोघांना अटक करण्यात आली. शुक्रवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीनी गांजा कोठून आणला? गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे? याबाबींचा तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती पोलिसांन यावेळी न्यायालयाला केली. न्यायालयाने दोघांनाही १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावलीअसुन अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोसावी हे करीत आहेत.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.