Posts

Showing posts from June, 2025

पंढरपूर एम आय डी सी मध्ये उद्योग करण्यासाठी उद्योजकांनी प्रस्ताव पाठवावेत. आ. समाधान आवताडे.

Image
 पंढरपूर एम.आय.डी.सी मध्ये उद्योग करण्यासाठी  उद्योजकांनी प्रस्ताव पाठवावे - आमदार समाधान आवताडे कासेगाव हद्दीत एमआयडीसी होणार; उद्योजक क्षेत्रासाठी उद्योजकांनी मागणी करावी  पंढरपूर (प्रतिनिधी:)- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीत खाजगी २१.५१ हे.आर क्षेत्रामध्ये लघु ,मध्यम व इतर उद्योजकांसाठी लागणारी जमीन मागणी बाबतचा प्रस्ताव शासनाकडे जास्तीत जास्त उद्योजकांनी पाठवावेत आपण उद्योगासाठी मागणी केल्यानंतरच पंढरपूर तालुक्यातील अनेक दिवसापासून चे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे. यासाठी उद्योजकांनी प्रस्ताव पाठवावे असे आवाहन पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे. आ आवताडे यांच्या माध्यमातून साकार होत असलेल्या एमआयडीसी मुळे प्रगतशील व बागायत शेती क्षेत्र असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील द्राक्षे, डाळिंब व इतर फळे, पीके उत्पादन मालास आयात-निर्यात तसेच प्रकिया माध्यमातून मोठी व्यावसायिक व उद्योग बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर मोदी सरकार कालखंडात रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाल्याने पंढरीत येणाऱ्या वार...

वारीची चाहूल.

Image
 वारीची चाहूल लागली की पंढरपुरात देवळाभोवतलची माणसं देवाला लोड लागला, पलंग निघाला असं आपापसात सांगू लागले की समजावं वारी आता जवळच्या टप्प्यात आली आहे..  आता देवाला लोड लागला आहे.  त्याचे सारे नित्योपचार बंद झाले आहेत. आता फक्त भक्तांची गाठभेट घेणं!! बाकी देवाला दुसरं काही सुचत नाही!! नित्य स्नान आणि भोजन सोडून सारे उपचार बंद झाले आहेत.  रूक्मिणी मातेच्या पाठीमागे सुद्धा तक्क्या ठेवला आहे.       जसे देवाचे नित्योपचार बंद होतात त्याप्रमाणे रूक्मिणी मातेचे पण नित्योपचार बंद होतात..मातेचं दर मंगळवारी आणि  शुक्रवारी न्हाणं म्हणजे वासाचं तेल उटणं हळद, सुवासिक द्रव्यांनी अभ्यंग स्नान असतं. ते आता प्रक्षाळपूजा होईपर्यंत बंद होतं. फक्त नित्य स्नान आणि भोजन एवढं सोडून ती पण विठ्ठलाच्या बरोबरीने रात्रंदिवस उभं राहून भक्तांना दर्शन देते. शयन करत नाही. पलंग काढून शेजारच्या ओवरीत ठेवला जातो.त्याला स्थानिक भाषेत पलंग निघाला असं म्हणतात. देव आणि आईसाहेब भक्तांसाठी तिष्ठत उभे राहतात. तुम्ही नीट पाहिलं तर देवाच्या आणि आईसाहेबाच्या चेहऱ्यावर थकवा दिसतो..अनादी क...

आषाढस्य प्रथमदिवसे.

Image
 *आषाढस्य प्रथमदिवसे* पावसाचा नवथरपणा जाऊन आता प्रगल्भता आली आहे. ज्येष्ठातलं आडवंतिडवं कोसळणं संपून संथलयीचा नाद ऐकू येतो आहे. उन्हाळ्यातलं उंच गेलेले आभाळ आता मेघांनी ओथंबून अगदी खाली वाकलं आहे. इतकं खाली की हात लावला तर कवेतच येईल. अगदी माथ्याला टेकलेलं.. जलद भरलेलं आभाळ पाहून किती आनंदून जातं आपलं मन..  मग विरहावस्थेत असलेल्या कालिदासाच्या मेघदूतातील यक्षाला हे भरलं आभाळ किती आनंद देऊन गेलं असेल.. या अतीव आनंदानेच एक युगातीत महाकाव्य कालिदासाच्या संपन्न प्रतिभेतून निर्माण झालं. मेघदूत..    मेघदूतासह सात साहित्यग्रंथ लिहिणारे महाकवी. 'कविकुलगुरू' असे ज्यांना गौरवले जाते ते संस्कृत भाषेतील श्रेष्ठतम महाकवी कालिदास..यांचा जन्म आषाढातील प्रतिपदेला झाला असे मानतात.. खरं तर  त्यांच्या जन्म काळासंबंधी विद्वानांमध्ये एकवाक्यता नाही. इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन सहावे शतक या काळात कधीतरी कालिदास होऊन गेले.. त्याच्या जन्म स्थळाबाबतही निर्णायक मत नाही. बंगाल, काश्मीर, विदीशा, उज्जैन अशा अनेक प्रदेशांचा उल्लेख कालिदासांची जन्मभूमी म्हणून केला जातो. तरीपण उज्जैन शह...

रस्त्यावर कचरा टाकल्यास होणार दंडात्मक कारवाई._मुख्याधिकारी डॉ महेश रोकडे.

Image
 रस्त्यावर कचरा टाकल्यास होणार दंडात्मक कारवाई                                               -मुख्याधिकारी महेश रोकडे पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूरात आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक, वारकरी येतात. सोहळ्यानिमित्त भाविकांचे, वारकऱ्यांचे दशमी, एकादशी व व्दादशी असे तीन दिवस वास्तव्य असते. त्यामुळे वारकरी, भाविकांचे आरोग्य चांगले राहणे गरजेचे आहे. याकरीता पंढरपूर नगरपालिका स्वच्छता मोहिम राबवत आहे. मात्र, शहरातील व्यक्ती, दुकानदार, व्यावसायिक, मठधारक, किरकोळ विक्रेते हे रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे, तसेच उघड्यावर लघुशंका करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर मलविष्ठा, मुत्रविष्ठा करणे, उघड्यांवर शौच करणे टाळावे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा सुचना मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिल्या आहेत.  पंढरपूर नगरपरिषदेने जाहीर सूचनेद्वारे आवाहन केले आहे की, केंद्र शासनाने अधिसूचना क्रमांक एस.ओ. १३५७ (3) दि. ...

पंढरीत भाजपा आणि ज्योतिर्मय योग यांच्या वतीने योगदीन उत्साहात साजरा.

Image
 पंढरीत भाजपा आणि ज्योतिर्मय योग यांच्या वतीने  यमाई तलाव येथे योगदीन उत्साहात साजरा. पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथे जागतिक योग दिना निमित्त, शनिवार दि.२१जून रोजी भारतीय जनता  पक्ष व   ज्योतिर्मय योग् व निसर्गोपचार केंद्र यांच्या वतीने  योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. पंढरपूर येथील यमाई तलावाच्या निसर्गरम्य हिरवाईने बहरलेल्या वातावरणात योगसाधना घेण्यात आली. प्रमुख योगशिक्षिका ज्योती शेटे यांनी महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी अशी विविध आसने  घेतली, आसनाचे प्रात्यक्षिक करून  याचा फायदा कसा होतो, योगासना मुळे विविध आजार कसे टाळले जातात आणि निरोगी आयुष्य जगता येते, याची माहिती ज्योती शेटे यांनी दिली. भाजपा जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे यांनी   संपूर्ण मोलाचे सहकार्य करीत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  प्रयत्न केले. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शहराध्यक्ष डॉ सौ जोती शेटे यांनी या योग दिनाच्या  कार्यक्रमाचे आयोजन केले या निमित्ताने अनेक योग साधिका यांनी योग व  योगाचे महत्व साांगणाऱ्या    रॅलीचे आयो...

पंढरीत महा स्वच्छता अभियान संपन्न, कॉरिडॉर सर्वांच्या संमतीनेच होणार._पालकमंत्री जयकुमार गोरे.

Image
 *पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025..... महास्वच्छता अभियानातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचवण्याचे क्रांतिकारी कार्य झाले         - पालकमंत्री जयकुमार गोरे  *पंढरपूरचा कॉरिडॉर सर्वांच्या संमतीनेच होणार.. * आषाढी सोहळ्यात पंढरपूर येथे सर्व पालख्या, दिंड्या, वारकरी व भाविक यांची सर्वोच्च व्यवस्था करणार  * महास्वच्छता अभियानात 42 ठिकाणी अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक व नागरिक यांनी स्वच्छता मोहीम राबवून बहुतांश पंढरपूर शहर स्वच्छ केले, सर्वांच्या कामांचे खूप कौतुक आहे *आज या स्वच्छता अभियानातून 148 टन कचरा गोळा करण्यात आला पंढरपूर/सोलापूर, दिनांक 22(जिमाका):- पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025 अंतर्गत एकाच वेळी सकाळी सात ते दहा या कालावधीत 42 ठिकाणी स्वच्छता मोहीम राहुल 148 कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेत सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक, विविध सामाजिक संघटना, पंढरपूर शहरातील नागरिक यांनी सक्रिय सहभाग घेऊन ही विठुरायाची नगरी बहुतांश स्वच्छ केली आहे. या मोहिमेतून पंढरपूर शहर व येथे येणाऱ्या हजारो भाविकांच्या घर...

जिल्हा न्यायालय येथे जागतिक योगदिन संपन्न

Image
 *जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे जागतिक योग दिन कार्यक्रम संपन्न* पंढरपूर-पंढरपूर तालुका विधी सेवा समिती व पंढरपूर अधिवक्ता संघ यांचे संयुक्त विद्यमानाने माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, यांचे निर्देशानुसार शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी जिल्हा न्यायालय पंढरपूर आवारामध्ये माननीय श्री एस. बी. देसाई, प्रभारी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती  तथा जिल्हा न्यायाधीश  पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली व माननीय श्रीमती एस एस पाखले, दिवाणी न्यायाधीश व स्तर पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक योग दिन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.       प्रथम कार्यक्रमाची प्रास्ताविक न्यायाधीश श्रीमती एस एस पाखले  यांनी केले तर सूत्रसंचालन पंढरपूर अधिवक्ता संघाचे सचिव अड श्री.ए. एम. देशमुख यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून श्री समीर बिडकर सर , तसेच योग गुरु श्री राधे मंडल हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थिताना योगाचे महत्व सांगून योग प्रशिक्षण दिले.        कार्यक्रमाच्या शेवटी न्यायाधीश ...

भारत विकास परिषदेच्या वतीने जागतिक योगदान उत्साहा साजरा त

Image
 भारत विकास परिषदेच्या वतीने जागतिक योग दिन साजरा.  पंढरपूर(प्रतिनिधी )_ पंढरपूर येथे  भारत विकास परिषदेच्यावतीने शनिवार २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त.. रघुकुल सोसायटी राम मंदिर, कराड रोड, पंढरपूर* येथे योग शिक्षिका सौ शीतल गुंडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने घेण्यात आली. तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात योगासनाचे महत्व सांगण्यात आले.अध्यक्ष सौ. रोहिणी कोर्टिकर, सचिव मंदार केसकर, खजिनदार  सुनील परळीकर, मंदार लोहकरे,  डॉ. सुरेंद्र काणे, डॉ. वर्षा काणे, राजीव कुलकर्णी, डॉ. समाधान माने, रत्नाकर देशपांडे, सौ. सीमाताई कुलकर्णी, सतीश कोर्टिकर, विवेक परदेशी, सौ. निलम माळी, सौ. मोनिका शहा, सौ. शिल्पा चौंडावार, सौ. राजश्री कुलकर्णी, सौ. अनुराधा हरिदास, सौ मंजुषा गदगे  सौ. भाग्यश्री लिहिणे, सौ. श्रिया शिरगावकर, सौ. प्रीती वाघ यांच्या उपस्थितीत *योग दिन* साजरा करण्यात आला. सर्वप्रथम भाविपच्या प्रथेप्रमाणे वंदे मातरम ने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. योगशिक्षिका सौ. शितल गुंडेवार, व सौ. संध्या खिस्ते यांनी उपस्थित सर्व सदस्यांना योगाची व आसनांची माहिती अतिशय उ...

पंढरपूर शहरात दी२२जून रोजी महा स्वच्छता मोहीम, ४२ठिकाणी होणार स्वच्छता मोहीम.

Image
 पंढरपूर शहरात 22 जून रोजी महास्वच्छता अभियान स्वच्छतेसाठी शहरातील 42 ठिकाणे निश्चित                       पंढरपूर दि.(20) :- आषाढी यात्रेच्या  अनुषंगाने  ग्रामविकास  व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या मार्गदशनाखाली पंढरपूर शहरात आषाढी  पूर्वतयारी म्हणून महास्वच्छता अभियान सकाळी ७ ते १० या कालावधीत राबवले जाणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले.          सदर महास्वच्छता अभियान सकाळी 7 ते 10 या कालावधीत राबवले जाणार असून त्याकरिता पंढरपूर शहरातील 42 ठिकाण निश्चित करण्यात आली आहे. महास्वच्छता अभियाना करीता नेमून दिलेल्या ठिकाणी पथकांनी  सकाळी 7. 00 ते 10. 00 वेळेत  आपले काम पूर्ण करायचे आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या अभियानाची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंढरपूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार  असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली.       संपाद...

सद्गुरू श्री बेलापूरकर महाराज यांच्या स्मरणार्थ शालेय साहित्याचे वाटप.

Image
 श्री सद्गुरू बेलापूरकर महाराज संस्थान पंढरपूर तर्फे शालेय  साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न . पंढरपूर ( प्रतिनिधी)  श्री सद्गुरु बेलापूरकर महाराज संस्थान पंढरपूर त्यांच्यातर्फे आर्थिक दृष्ट्या मागास, अनाथ तसेच वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप हा कार्यक्रम बेलापूरकर महाराज मठामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गुंडा महाराज संस्थान चे उत्तराधिकारी हरिभक्त परायण चक्रीनाथ महाराज सिद्धरस तर प्रमुख पाहुणे श्री. प्रणव परिचारक हे होते कार्यक्रम हरिभक्त परायण श्रीकांत महाराज हरिदास तसेच पंढरपुरातील प्रमुख उद्योजक श्रीराम बडवे यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना स्वरज्ञ महाराज बेलापूरकर यांनी केली. त्यांनी संस्थानाचे माध्यमातून साजऱ्या  केल्या जाणाऱ्या अनेक  उपक्रमांची माहिती दिली, त्याचप्रमाणे गतवर्षी हा कार्यक्रम कोणत्या पद्धतीने साजरा करण्यात आला हे  उपस्थितांना सांगितले. त्यानंतर श्रीराम बडवे यांनी पांडुरंगाचे प्रतिनिधी म्हणून कार्याला शुभाशीर्वाद दिले. हरिभक्त परायण श्रीकांत महाराज हरीदास यां...

आ. समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून पाच बस दाखल.

Image
 आ समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा आगाराच्या ताब्यात नव्या ५ बसेस दाखल   पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्यातून आणि महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून मंगळवेढा आगारात नव्या ५ बसेस दाखल करण्यात आल्या असून या बसेसचे लोकार्पण आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार आवताडे यांनी मंगळवेढा परिवहन पदाधिकारी व इतर मंडळींच्या सोबत या नव्या बसमधून आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव घेतला. ग्रामीणभागाची जीवनवाहिनी म्हणून एसटी महामंडळ महत्त्वाची भूमिका बजावत असून या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार सातत्याने करत आहे. मंगळवेढा आगारास मिळालेल्या या नव्या बसमुळे मंगळवेढेकरांना निश्चितच दिलासा मिळणार असून आरामदायी आणि सुरक्षित प्रवास होणार आहे. मंगळवेढा तालुक्याला दिलेल्या या ५ नव्या बसेसबद्दल मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांचे मनापासून  यावेळी प्रकाश गायकवाड, जिल्हा अध्यक्ष...

पंढरीत शिक्षणपद्धतीवर भाष्य करणाऱ्या, बिकमिंग यु द बेस्ट, या पुस्तकाचे उत्साही वातावरणात प्रकाशन.

Image
 पंढरीत शिक्षणपद्धतीवर   भाष्य करणाऱ्या" बिकमिंग यु द बेस्ट "या पुस्तकाचे उत्साही वातावरणात प्रकाशन. पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथील पंढरपूर अर्बन बँकेच्या सभागृहात बिकमिंग यू द बेस्ट, या  आगळ्यावेगळ्या शिक्षण पद्धतीवर भाष्य करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले मूळ भारतीय व पंढरपूर येथील शिरीष पारिपत्यदार यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. यावेळी व्यासपीठावर डॉ अनिल जोशी, प्रमुख पाहुणे डॉ प्रकाश दीक्षित,  सौ उज्वला दीक्षित, आदी मान्यवर उपस्थित होते.   मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे डॉ प्रकाश दीक्षित म्हणाले , विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक संवाद रुपी हे पुस्तक असून  शहाणे करून सोडावे सकल जन, हा साने गुरुजींचा विचार अंमलात आणला आहे.   पालक,शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी असणारे हे मॅन्युअल आहे. भाषा इंग्रजी आहे, पण सोपी आहे चिंतनशील आशय, चित्रे समर्पक आहेत.  जीवनात गुरूचे, आईचे संस्कार महत्वाचे असतात. हे पुस्तक म्हणजे अजोड,मौल्यवान, अनुकरणीय ठेवा आहे.  नरसिंह जोशी मनोगत व्यक्त करताना म्...

भारत विकास परिषदेचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न, सौ रोहिणी कोर्टीकर यांची नूतन अध्यक्षपदी निवड.

Image
 पंढरपूर येथे भारत विकास परिषदेचा पदग्रहण उत्साहात सोहळा संपन्न. पंढरपूर (प्रतिनिधी)भारत विकास परिषद या सेवाभावी संस्थेच्या वतीने शनिवार दि.१४जून रोजी दायित्व ग्रहण सोहळ्याचे (शपथविधी)आयोजन  केबीपी चौक येथील हॉटेल राधेश येथे करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते रवींद्र मंकणी, सौ सुनेत्रा मंकणी , पश्चिम महाराष्ट्र प्रांत महासचिव शिरीष कुलकर्णी  आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे रवींद्र मंकणी म्हणाले, पंढरपूर सारख्या अध्यात्मिक शहरात भारत विकास परिषद आपल्या विविध कार्यक्रमांनी समाजसेवे बरोबरच उच्च दर्जाचे संस्कार विद्यार्थ्यांना  देत आहे, येथे येऊन खूप आनंद झाला. नूतन अध्यक्ष सौ रोहिणी कोर्टीकर यांनी निवडीबद्दल ऋण व्यक्त करीत आपण घेतलेली जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडू अशी ग्वाही दिली. संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेंद्र काणे यांच्या मार्गदर्शनाखाली शपथविधी, पदग्रहण सोहळा संपन्न झाला. नूतन अध्यक्ष म्हणून सौ. रोहिणी (स्मिता) कोर्टीकर यांची निवड करण्यात आली तर नूतन सचिव मंदार केसकर यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्...

भारत विकास परिषदेचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न, सौ रोहिणी कोर्टीकर यांची नूतन अध्यक्षपदी निवड.

Image
 पंढरपूर येथे भारत विकास परिषदेचा पदग्रहण उत्साहात सोहळा संपन्न. सौ रोहिणी (स्मिता) कोर्टीकर यांची अध्यक्षपदी निवड. पंढरपूर (प्रतिनिधी)भारत विकास परिषद या सेवाभावी संस्थेच्या वतीने शनिवार दि.१४जून रोजी दायित्व ग्रहण सोहळ्याचे (शपथविधी)आयोजन  केबीपी चौक येथील हॉटेल राधेश येथे करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते रवींद्र मंकणी, सौ सुनेत्रा मंकणी , पश्चिम महाराष्ट्र प्रांत महासचिव शिरीष कुलकर्णी  आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे रवींद्र मंकणी म्हणाले, पंढरपूर सारख्या अध्यात्मिक शहरात भारत विकास परिषद आपल्या विविध कार्यक्रमांनी समाजसेवे बरोबरच उच्च दर्जाचे संस्कार विद्यार्थ्यांना  देत आहे, येथे येऊन खूप आनंद झाला. नूतन अध्यक्ष सौ रोहिणी कोर्टीकर यांनी निवडीबद्दल ऋण व्यक्त करीत आपण घेतलेली जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडू अशी ग्वाही दिली. संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेंद्र काणे यांच्या मार्गदर्शनाखाली शपथविधी, पदग्रहण सोहळा संपन्न झाला. नूतन अध्यक्ष म्हणून सौ. रोहिणी (स्मिता) कोर्टीकर यांची निवड करण्यात आली तर नूतन...

भारत विकास परिषदचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न सौ रोहिणी कोर्टीकर यांची नूतन अध्यक्षपदी निवड..

Image
 पंढरपूर येथे भारत विकास परिषदेचा पदग्रहण उत्साहात सोहळा संपन्न. सौ रोहिणी (स्मिता) कोर्टीकर यांची अध्यक्षपदी निवड. पंढरपूर (प्रतिनिधी)भारत विकास परिषद या सेवाभावी संस्थेच्या वतीने शनिवार दि.१४जून रोजी दायित्व ग्रहण सोहळ्याचे (शपथविधी)आयोजन  केबीपी चौक येथील हॉटेल राधेश येथे करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते रवींद्र मंकणी, सौ सुनेत्रा मंकणी , पश्चिम महाराष्ट्र प्रांत महासचिव शिरीष कुलकर्णी  आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे रवींद्र मंकणी म्हणाले, पंढरपूर सारख्या अध्यात्मिक शहरात भारत विकास परिषद आपल्या विविध कार्यक्रमांनी समाजसेवे बरोबरच उच्च दर्जाचे संस्कार विद्यार्थ्यांना  देत आहे, येथे येऊन खूप आनंद झाला. नूतन अध्यक्ष सौ रोहिणी कोर्टीकर यांनी निवडीबद्दल ऋण व्यक्त करीत आपण घेतलेली जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडू अशी ग्वाही दिली. संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेंद्र काणे यांच्या मार्गदर्शनाखाली शपथविधी, पदग्रहण सोहळा संपन्न झाला. नूतन अध्यक्ष म्हणून सौ. रोहिणी (स्मिता) कोर्टीकर यांची निवड करण्यात आली तर नूतन...

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी युवकाचे उपोषण.

Image
 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या गैरकारभार  विरोधात युवकाचा उपोषणाचा इशारा, समिती बरखास्त करण्याची मागणी.  पंढरपूर (प्रतिनिधी)_ शासन निर्णय तसेच मंदिर अधिनियमाचे उल्लंघन करुन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अवैध रित्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग केल्यामुळे संबधित मंदिर समिती सदस्य, सह अध्यक्ष व मंदिर कर्मचारी यांच्या वर तात्काळ कायदेशीर कारवाई करणे तसेच मंदिरे समितीच्या कारभाराची चौकशी होऊन ती बरखास्त करण्याची मागणी पंढरपूर येथील सागर बडवे यांनी केली आहे. यासंदर्भात  .... न्याय मिळवण्यासाठी लोकशाही मार्गाने उपोषण करणार असल्याचे त्यांनी निवेदन देऊन सांगितले आहे. पंढरपूर येथील तक्रारदार सागर बडवे यांनी वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही, दि.१४मार्च रोजी घडलेल्या गैर कारभाराची निरपेक्ष,निःपक्षपाती तपासणी होत नसल्याने सोमवार दि२३जुन रोजी बडवे हे सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत.  न्याय मिळवण्यासाठी लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  आमरण उपोषण करणार आहे.  असे सांगण्यात आले आहे. संदर्भीय अर्जानुसार तक्र...

आषाढी यात्रा कालावधीत समितीने भाविकांच्या सुलभ दर्शन व्यवस्थेची काळजी घ्यावी._पालकमंत्री जयकुमार गोरे.

Image
 आषाढी यात्रा कालावधीत मंदिर समितीने  भाविकांच्या  सुलभ दर्शनाला प्राधान्य द्यावे                                                                                 -पालकमंत्री जयकुमार गोरे        *शासकीय महापुजेवेळी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन राहणार सुरु पंढरपूर (प्रतिनिधी)-  आषाढी शुद्ध एकादशी सोहळा ६ जुलै  रोजी असून, आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीने आवश्यक सुविधा पुरविण्याबरोबरच सुलभ व सुखकर दर्शन व्हावे, यासाठी आवश्यक नियोजन करावे. तसेच आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सूरू असतानाही .भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन व्हावे यासाठी आषाढी एक...

अर्बन बँकेचे पिग्मी एजंट अरविंद केशव उत्पात यांचे निधन.

Image
 अरविंद उत्पात यांचे अपघाती निधन. पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर अर्बन बॅंकेचे पिग्मी एजंट अरविंद  केशव उत्पात (वय,७२)यांचे अपघाती निधन  झाले, तीन महिन्यापूर्वी  पंढरपूर येथील भोसले चौक परिसरात दुचाकी धडकल्याने मेंदूला मार लागला होता, तेव्हापासून ते आजारी होते, सोलापूर येथील सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ सचिन कासेगावकर यांच्या हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते, गुरूवारी सकाळी अचानक रक्तदाब कमी झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अरविंद उत्पात यांचा स्वभाव मनमोकळा व आनंदी होता, गावात अनेकांशी त्यांचे उत्तम नाते होते, माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांचे खास विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती, गावातील अनेक राजकीय घडामोडींची माहिती त्यांना होती, त्यांचे राजकीय अंदाज सहसा चुकत नसत, ४०वर्षापेक्षा जास्त वर्षे त्यांनी पंढरपूर अर्बन बँकेत पिग्मी एजंट म्हणून काम पाहिले, पण कधीही एक रुपयांची देखील घोटाळा झाला नाही. त्यांच्या  पश्चात एक मुलगा,मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. आज सायंकाळी ७: ३०वा. वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  गोफण परिवार दुःखात सहभागी आह...

आषाढी वारी साठी पाच हजार २००बस सोडणार. __ राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Image
 *आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार २००  विशेष बसेस सोडणार.              -परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक  *ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर  पर्यंत बस मिळणार.     पंढरपूर(प्रतिनिधी ) :-आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून  यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती  परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.        आषाढी यात्रा नियोजनासाठी चंद्रभागा बस स्थानक,पंढरपूर येथे  एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर व एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.     यावेळी परिवहन मंत्री प्रतापसरनाईक म्हणाले,  यंदा राज्यातील कोण...

राज्य परिवहन मंत्री सरनाईक यांची अचानक राज्य महामार्गावरील ढाब्यांना भेट .

Image
 *परिवहन मंत्रांची महामार्गावरील हॉटेल थांब्यांना अचानक भेट* पंढरपूर : ( प्रतिनिधी )परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक पंढरपूर दौऱ्यावर असताना पुणे -सोलापूर महामार्गावरील एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना अचानक भेट दिली. तेथील प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला त्यांना मिळणारे अन्नपदार्थ ताजे आहेत का, अन्नपदार्थ वाजवी दरात मिळतात का, तसेच महामंडळाची नाश्ता योजना चालू आहे का याची चौकशी केली. याबरोबरच तेथील प्रसाधनगृहाची देखील त्यांनी आवर्जून पाहणी केली. यावेळी महिला प्रवाशांनी प्रसाधनगृहाच्या अस्वच्छते बाबत तक्रार नोंदवली. त्याची तातडीने दखल घेत मंत्री सरनाईक यांनी सदर प्रसाधनगृहे तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधित हॉटेल मालकाला दिले. तसेच  आढळलेल्या इतर त्रुटी बाबत संबंधित मालकाला  विहीत वेळेत त्या दूर करण्याचे निर्देश दिले. अन्यथा सदर हॉटेल थांबा नाईलाजाने रद्द करण्याचे निर्देश देऊ, असे सांगितले. दरम्यान हे हॉटेल थांबे ज्या पुणे विभागात येतात त्या विभाग नियंत्रक यांना  संपर्क साधून या हॉटेल थांब्यांच्या त्रुटीची पूर्तता पुढील एक महिन्या...

चिंचोली भोसे येथे वाळू तस्करांच्या होड्या जाळून मोठी कारवाई, तालुका पोलीस स्टेशनची कामगिरी.

Image
 तालुका पोलीस व महसूल ची संयुक्त कारवाई, चिंचोली भोसे येथे वाळू तस्करांच्या होड्या जाळून  मोडले कंबरडे. पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुका पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करीत चिंचोली भोसे नदी काठावर वाळू तस्करांच्या होड्या जाळून मोठी कोंडी केली. मंगळवार दि. १० जून रोजी  माननीय उपविभागीय अधिकारी सचिन  इथापे , उपविभागीय पोलीस अधिकारी  अर्जुन भोसले  तहसीलदार सचिन  लंगोटे  यांच्या मार्गदर्शनाखाली भीमा नदी पात्रात मौजे चिंचोली भोसे या ठिकाणी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे व महसूल प्रशासनाचे संयुक्त कारवाईत भीमा नदी पात्रातील बोटी कापून जाळून नष्ट करण्यात आल्या.  मागील काही वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांनी सर्वत्र धुमाकूळ माजवून भीमा नदीचे पात्र पोखरले आहे, पंढरपूर येथे नदीत मोठमोठे खड्डे पडल्याने एकाच महिन्यात चार भाविकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाळू चोरीने गबरगंड झालेले माफिया कुणालाच जुमानत नाहीत अनेकदा शासकिय अधिकाऱ्यांच्या  अंगावरच वाहने घालण्याचे प्रकार घडले आहेत, या मोठ्या कारवाईने मुजोर झालेल्या वाळू माफियांवर प...

आषाढी वारी, होडी चालक, मालक यांनी दि.१५जुन पर्यंत नोंदणी करावी._जिल्हाधिकारी आशीर्वाद.

Image
 आषाढी यात्रा: होडी चालक, मालकांनी १५ जून पर्यंत होड्यांची नोंदणी करावी                                                                 जिल्हाधिकारी - कुमार आशिर्वाद * आसनक्षमतेपेक्षा जास्त जलप्रवासी वाहतुक करु नये  सुर्यास्तानंतर जलप्रवास वाहतुक बंद ठेवावी                     पंढरपूर ( प्रतिनिधी):- आषाढी शुध्द एकादशी दि.०६ जुलै २०२५ रोजी असून, यात्रा कालवधी २६ जून ते १० जुलै असा आहे. या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. वारकऱ्यांसाठी चंद्रभागा स्नान फार मानले जाते. चंद्रभागा स्नानासाठी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. तसेच येणारे भाविक चंद्रभागा नदीत नौका विहार करतात. या कालावधीत कोणतीही अनुचित घडना घडू नये तसेच भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व होडी मालकांनी व चालकांनी होड्याची नोंदणी कराव...

जिथे आहे अमृताची गोडी, ती आमची नरसोबाची वाडी.

Image
 ओढ...... जिथे आहे अमृताची गोडी ती आमुची नरसोबाची वाडी             नृसिंहवाडी नाव असल तरी वाडी, नरसोबाची वाडी ह्या नावानेच ओळखले जाणारे कोल्हापूर जिल्ह्यातील श्री नृसिंह सरस्वती यांचे मंदिर  असणारे छोटेसे गाव .नरसोबाची वाडी कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. येथे पंचगंगा नदी कृष्णा नदीचा संगम झाला आहे.माझे आजोळ असल्यामुळे, जन्म स्थान असणारे वाडी. त्यामुळे ह्या जगात आल्यानंतर पहिल्यांदा ज्या देवाचे दर्शन घेतले ते देव म्हणजे श्री.दत्त महाराज ,पहिले देवस्थान म्हणजे वाडी. त्यामुळेच वाडी बद्दल ची ओढ मनातून काही कमी होत नाही. लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी चालू झालं की एक दोन दिवस झाले की तयारी सुरू असायची वाडीला जायची.वाडीला जायचा आनंद काही निराळाच असायचा. पंढरपूर येथून मिरज पर्यंत रेल्वे असायची ती रेल्वे पाणी देणारी रेल्वे म्हणून ओळखली जायची. म्हणजे ती रेल्वे सोलापूरहून येत येत आसपासच्या छोटया छोटया खेडेगावात पाणी देण्यासाठी थांबायची. दिवसभर रेल्वे प्रवास सुरू असायचा त्यामुळे ह्या उन्हाळ्यात दोनच तासात मिरज आल्यामुळे तो आनंद काही लुटता आला नाही तो आनंद ...

आषाढी यात्रेत दि.२७जून पासून २४ तास दर्शन.

Image
 आषाढी यात्रेत दिनांक २७ जून पासून २४ तास दर्शन, भाविकांना अत्याधुनिक व पुरेसा प्रमाणात सोई सुविधा, जतन व संवर्धनाची हाती घेतलेली कामे अंतिम टप्प्यात, टोकन दर्शन प्रणालीची दिनांक १५ जून रोजी पहिली चाचणी, ---- गहिनीनाथ महाराज औसेकर पंढरपूर (प्रतिनिधी)- आषाढी यात्रा ही पंढरीतील महायात्रा म्हणून ओळखली जाते. यावर्षी आषाढी एकादशी दिनांक ६जुलै रोजी आहे. या दिवशी पहाटे २:२० वाजता मा.मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य व मानाचे वारकरी यांचे शुभहस्ते सपत्नीक श्रीची शासकीय महापुजा केली जाणार आहे. यात्रेचा कालावधी दि.२६जून ते दि.१० जुलै असा आहे. या यात्रा कालावधीत येणा-या वारकरी भाविकांना अत्याधुनिक व पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, दिनांक २७ जून पासून २४ तास दर्शन असणार आहे. याशिवाय, यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर जतन व संवर्धनाची सध्या सुरू असलेली सर्व कामे अंतिम टप्प्यात असून, टोकन दर्शन प्रणालीची दिनांक 15 जून रोजी पहिली चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. मंदिर समितीची बैठक सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औस...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंढरपूर येथे भारत विकास परिषदेच्या वतीने वृक्षारोपण.

Image
 *जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंढरपूर येथे भारत विकास परिषद यांच्या वतीने  वृक्षारोपण* पंढरपूर (प्रतिनिधी) वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, म्हणजे झाडे झुडपे, हेच आपले पाहूणे. पावसाळा सुरू झाला की सर्वत्र झाडे लावण्याचा उपक्रम सुरू होतो. आज  गुरुवार दिनांक  दि.५ जून रोजी असलेल्या  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारत विकास परिषद यांच्या वतीने दोन ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. वेगवेगळ्या जातीची रोपे प्रकल्प प्रमुख सौ. भाग्यश्री लिहिणे व सौ. रेखाताई टाक सौ. सीमाताई कुलकर्णी यांच्या सहकार्याने पंढरपूर येथील इसबावी परिसरातील सह्याद्री नगर मधील महादेव मंदिर पटांगणात  तसेच नवीन कराड नाका परिसरात रघुकुल सोसायटी मधील श्री राम मंदिर येथे झाडे लावण्यात आली. वड, पिंपळ, बकुळ, औदुंबर, करंजा अशा विविध वृक्षांची लागवड करून योग्य संवर्धन होण्यासाठी ट्री गार्ड बसविण्यात आले. यावेळी भारत विकास परिषद चे संस्थापक, अध्यक्ष डॉ सुरेंद्र काणे, अध्यक्षा सौ रोहिणी कोर्टीकर, डॉ. वर्षा काणे, सचिव मंदार केसकर, मंदार लोहोकरे, डॉ. अनिल पवार, डॉ. माने, सतीश कोर्टीकर, सौ. संध्या साखी, मिलिंद वाघ...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंढरपूर येथे भारत विकास परिषदेच्या वतीने वृक्षारोपण.

Image
 [५/६, ५:२३ म.उ.] kortikarsmita: *जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंढरपूर येथे भारत विकास परिषद यांच्या वतीने  वृक्षारोपण* पंढरपूर (प्रतिनिधी) वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, म्हणजे झाडे झुडपे, हेच आपले पाहूणे. पावसाळा सुरू झाला की सर्वत्र झाडे लावण्याचा उपक्रम सुरू होतो. आज  गुरुवार दिनांक  दि.५ जून रोजी असलेल्या  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारत विकास परिषद यांच्या वतीने दोन ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. वेगवेगळ्या जातीची रोपे प्रकल्प प्रमुख सौ. भाग्यश्री लिहिणे व सौ. रेखाताई टाक सौ. सीमाताई कुलकर्णी यांच्या सहकार्याने पंढरपूर येथील इसबावी परिसरातील सह्याद्री नगर मधील महादेव मंदिर पटांगणात  तसेच नवीन कराड नाका परिसरात रघुकुल सोसायटी मधील श्री राम मंदिर येथे झाडे लावण्यात आली. वड, पिंपळ, बकुळ, औदुंबर, करंजा अशा विविध वृक्षांची लागवड करून योग्य संवर्धन होण्यासाठी ट्री गार्ड बसविण्यात आले. यावेळी भारत विकास परिषद चे संस्थापक, अध्यक्ष डॉ सुरेंद्र काणे, अध्यक्षा सौ रोहिणी कोर्टीकर, डॉ. वर्षा काणे, सचिव मंदार केसकर, मंदार लोहोकरे, डॉ. अनिल पवार, डॉ. माने, सतीश कोर्ट...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारत विकास परिषदेच्या वतीने वृक्षारोपण.

Image
 *जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंढरपूर येथे भारत विकास परिषद यांच्या वतीने  वृक्षारोपण* पंढरपूर (प्रतिनिधी) वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, म्हणजे झाडे झुडपे, हेच आपले पाहूणे. पावसाळा सुरू झाला की सर्वत्र झाडे लावण्याचा उपक्रम सुरू होतो. आज  गुरुवार दिनांक  दि.५ जून रोजी असलेल्या  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारत विकास परिषद यांच्या वतीने   वृक्षारोपण करण्यात आले. वेगवेगळ्या जातीची रोपे प्रकल्प प्रमुख सौ. भाग्यश्री लिहिणे व सौ. रेखाताई टाक सौ. सीमाताई कुलकर्णी यांच्या सहकार्याने पंढरपूर येथील इसबावी परिसरातील सह्याद्री नगर मधील महादेव मंदिर पटांगणात  तसेच नवीन कराड नाका परिसरात रघुकुल सोसायटी मधील श्री राम मंदिर येथे झाडे लावण्यात आली. वड, पिंपळ, बकुळ, औदुंबर, करंजा अशा विविध वृक्षांची लागवड करून योग्य संवर्धन होण्यासाठी ट्री गार्ड बसविण्यात आले. यावेळी भारत विकास परिषद चे संस्थापक, अध्यक्ष डॉ सुरेंद्र काणे, अध्यक्षा सौ रोहिणी कोर्टीकर, डॉ. वर्षा काणे, सचिव मंदार केसकर, मंदार लोहोकरे, डॉ. अनिल पवार, डॉ. माने, सतीश कोर्टीकर, सौ. संध्या साखी, मिलिंद वा...

पंढरपूर येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ शीतल शहा उत्कृष्ठ बालरोगतज्ज्ञ या पुरस्काराने सन्मानित.

Image
 पंढरीचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ शीतल शहा उत्कृष्ठ बालरोग तज्ञ या पुरस्काराने सन्मानित, कोल्हापूर येथे पार पडला सत्कार सोहळा. पंढरपूर (प्रतिनिधी)केवळ सोलापूर जिल्ह्याच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात बालरुग्णांचे देवदूत अशी ओळख असलेले पंढरपूर येथील डॉ शीतल शहा यांना कोल्हापूर येथे शुक्रवार दि.३०मे रोजी उत्कृष्ठ बालरोग तज्ज्ञ या सर्वोच्च मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ शीतल शहा हे ४५वर्षापासुन पांडुरंगाच्या पावन नगरीत बालरुग्णांची सेवा करीत आहेत, आजपर्यंत त्यांनी हजारो बालकांना जीवदान दिले आहे, अनेक अतिशय अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करुन अक्षरशः बालकांना मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले आहे, इतकेच नव्हे तर पैसा नसेल तरीही सामाजिव कर्तव्य म्हणुन मोफत उपचार करुन रुग्णसेवा केली आहे, नुकतेच त्यांनी अकलूज येथील चिमुकलीस क्लिष्ट अशा त्वचारोगातून बरे केले होते. शिवसेना वैद्यकीय कक्ष व श्रीकांत दादा शिंदे फाऊंडेशन आयोजित हा सन्मान सोहळा संपन्न झाला. या सन्मान सोहळ्यास कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली,सोलापूर, जिल्ह्यातील सर्व तालुका वैद्यकीय सहाय्यक पदाधिकारी,...