भारत विकास परिषदेच्या वतीने जागतिक योगदान उत्साहा साजरा त
भारत विकास परिषदेच्या वतीने जागतिक योग दिन साजरा.
पंढरपूर(प्रतिनिधी )_ पंढरपूर येथे
भारत विकास परिषदेच्यावतीने शनिवार २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त.. रघुकुल सोसायटी राम मंदिर, कराड रोड, पंढरपूर* येथे योग शिक्षिका सौ शीतल गुंडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने घेण्यात आली.
तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात योगासनाचे महत्व सांगण्यात आले.अध्यक्ष सौ. रोहिणी कोर्टिकर, सचिव मंदार केसकर, खजिनदार सुनील परळीकर, मंदार लोहकरे, डॉ. सुरेंद्र काणे, डॉ. वर्षा काणे, राजीव कुलकर्णी, डॉ. समाधान माने, रत्नाकर देशपांडे, सौ. सीमाताई कुलकर्णी, सतीश कोर्टिकर, विवेक परदेशी, सौ. निलम माळी, सौ. मोनिका शहा, सौ. शिल्पा चौंडावार, सौ. राजश्री कुलकर्णी, सौ. अनुराधा हरिदास, सौ मंजुषा गदगे सौ. भाग्यश्री लिहिणे, सौ. श्रिया शिरगावकर, सौ. प्रीती वाघ यांच्या उपस्थितीत *योग दिन* साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम भाविपच्या प्रथेप्रमाणे वंदे मातरम ने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. योगशिक्षिका सौ. शितल गुंडेवार, व सौ. संध्या खिस्ते यांनी उपस्थित सर्व सदस्यांना योगाची व आसनांची माहिती अतिशय उत्कृष्ट, सोप्या भाषेत समजावून सांगून योगासने घेतली.
त्यानंतर पंढरपुरात गेल्या २५ वर्षांपासून महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या हास्य क्लबच्या वतीने क्लब प्रमुख सौ. क्षितिजा देवधर, सौ. अर्चना माणकेश्वर यांनी हास्यांच्या विविध प्रकारांनी हास्य निर्मिती करून हसण्याचा व्यायाम करवून घेतला . याप्रसंगी हास्यक्लबच्याही अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.
व्यायामाचा भाग असलेल्या झुंबा डान्स हा व्यायामप्रकारही भाविपच्या सदस्या सौ. निलम माळी यांनी माहिती देऊन संगीताच्या तालावर करवून घेतला. योगदिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रघुकुल सोसायटीच्या सदस्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले.
याप्रसंगी योगशिक्षिका, हास्यक्लब महिला सदस्यांचा गुलाबपुष्प देऊन आभार भाविपच्या महिला सदस्यांनी मानले. या कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक, सूत्रसंचालन, आभार सचिव मंदार केसकर यांनी व्यक्त केले.
संपादक.
चैतन्य उत्पात.


Comments
Post a Comment