सावरकर वाचनालय येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानमाला संपन्न.
सावरकर वाचनालय येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानमाला संपन्न. पंढरपूर (प्रतिनिधी)स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची पुण्यतिथी व्याख्यानमाला सावरकर प्रेमी मंडळ आणि सावरकर वाचनालय यांच्या वतीने साजरी करण्यात आली. सावरकरांच्या विचाराने प्रेरित झालेली ही व्याख्यानमाला गेली ६० वर्ष त्यांच्या विचारांचा, कार्याचा आणि साहित्याचा प्रचार विविध व्याख्यानमालेच्या माध्यमातून करीत असते. यावर्षी मंगळवार दिनांक २४ ते गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी दरम्यान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. सावरकर पुण्यतिथी व्याख्यानालाचे पहिले पुष्प पुण्याचे युवा व्याख्याते श्री मयूर भावे यांनी "महायोगी अरविंद" या विषयावर गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मोहन मंगळवेढेकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि व्याख्या त्यांचा परिचय डॉ. श्री मिलिंद जोशी यांनी करून दिला. व्याख्याते श्री मयूर भावे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत महायोगी अरविंद यांचे जीवनचरित्र सांगितले. योगी अरविंद यांच्या जीवनातील अ...