शिवजयंती निमित्त बालचमुंचा कलाविष्कार.


 शिवजयंती निमित्त पंढरीत बाल चमुंचा कलाविष्कार... प्रतिनिधी _

पंढरपूर:- कर्नल भोसले चौक शिवजन्मोत्सव समिती व नागेश भोसले मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

 छत्रपती शिवरायांच्या ३९६ व्या  जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ उद्यान,पंढरपूर येथे दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक/अध्यक्ष मा.  शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर,यांच्या प्रमुख उपस्थिती पंढरपूर चे तहसीलदार सचिन लंगोटे साहेब,पंढरपूर नगरपरिषद चे मुख्याधिकारी  महेश रोकडे , माजी उपनगराध्यक्ष  नागेश भोसले, प्रमुख मार्गदर्शक श्री किरण आप्पा भोसले,पंढरपूर शहर युवा सेना अध्यक्ष श्री विश्वजीत भोसले व जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष  पृथ्वीराज भोसले हे उपस्थित होते.

    सदर स्पर्धा ही तीन गटात घेतली गेली असून यामध्ये  १ ली 2 रिव 3 री  ४ थी रंग भरण करणे. तसेच दिलेल्या विषयावर आपल्या कल्पकतेने  चित्र रेखाटने यामध्ये   ५ वी ते ७ वी हा गट होता. सदर स्पर्धेसाठी पंढरपूर शहर व काही ग्रामीण भागातील हौसी विद्यार्थ्यांनी  सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी जवळ जवळ १२०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझी शिक्षक आ.श्री दत्तात्रय  सावंत सर म्हणाले की " मुलांनी मोबाईल पासून दूर राहण्यासाठी मैदानी स्पर्धा  त्याचबरोबर कलाविष्कार यात सहभाग घेऊन यशस्वी व्हावे. "तसेच  मुख्याधिकारी  महेश रोकडे  यांनी आपल्या मनोगतात " लहान मुलांनी सुंदर चित्र रंगभरण  काम केल्याबद्दल खूप आनंद वाटत आहे. मन उत्साही ठेवण्यासाठी  पुस्तक वाचन, संगीत, चित्रकला हे गुण स्वीकारल्यास  जीवनात निरसता  येणार नाही व जीवन उत्साही,आनंदी होईल ".

      या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र, व खाऊ  देण्यात आले. या भव्य चित्रकला,व रंगभरन स्पर्धेचे परीक्षण पंढरपूर कला मंचचे सदस्य  अमित वाडेकर सर,  रमेश देवमारे सर व  पांडुरंग शिंदे यांनी केले. स्पर्धेनंतर

बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष  विश्वंभर पाटील ( जिल्हाध्यक्ष कर सल्लागार संघटना ),  शैलेश भोसले, युवा सेना अध्यक्ष  विश्वजीत भोसले व मान्यवर परीक्षकांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस प्रथम,द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ या प्रमाणे  बक्षीस वातपकरण्यात  आले. बक्षीस म्हणून  चित्रकलेचे साहित्य,रंगीत खडू पेटी, पॅड ट्रॉफी ( सन्मानचिन्ह ) प्रमाणपत्र  देण्यात आले.

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  काशिनाथ गोगाव,  चंद्रकांत देसाई सर,  राजेंद्र ढवळे सर, सुहास मासाळ सर, सतिश चंद्रराव ,  पंकज गुरमे सर,  तुकाराम खंडाडे , पंढरपूर शहरातील बहुसंख्य शिक्षक शिक्षिका तसेच समिती अध्यक्ष प्रमुख मार्गदर्शक   महेश भोसले यांनी परिश्रम घेतले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.