Posts

Showing posts from September, 2026

कर्मयोगी च्या आविष्कार मध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला नवे व्यासपीठ.समाजोपयोगी प्रकल्पांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना मिळाली चालना.

Image
 कर्मयोगीच्या ‘आविष्कार’मध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला नवे व्यासपीठ. समाजोपयोगी प्रकल्पांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना मिळाली चालना. पंढरपूर (प्रतिनिधी) आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्जनशील वापर करून समाजातील सर्वसामान्य घटकांचे जीवन अधिक सुलभ, सुरक्षित आणि सुखकर करणारे नाविन्यपूर्ण प्रकल्प विद्यार्थ्यांनी साकारावेत, असे आवाहन श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘आविष्कार’ प्रकल्प स्पर्धेचे महाविद्यालयीन स्तरावरील आयोजन कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथे करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, संशोधन वृत्तीला आणि नवोन्मेषी विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करून आपल्या कल्पनाशक्तीचे दर्शन घडविले. त्यापैकी १२ प्रकल्पांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती कर्...

पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनी ची स्थापना,_श्री उमेश परिचारक.

Image
 पंढरपूर तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांच्या हितासाठी फार्मर प्रोड्यूसर कंपनी, युटोपियन शुगर चे चेअरमन उमेश परिचारक यांची माहिती.   पंढरपूर(प्रतिनिधी )_ पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या विविध फळबागा, आणि त्यांचे उत्पादन घेताना योग्य मार्गदर्शन आणि सुयोग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी  सुधाकर फार्मर प्रोड्युसर कंपनी ची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती उमेश परिचारक यांनी दिली,नाशिक येथील सह्याद्री ऍग्रो ,आणि सुधाकर फॉर्मर प्रोड्यूसर  कंपनी लिमिटे ड यांच्या वतीने युटोपियन शुगर्स चे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी बुधवार दिनांक २३सप्टेंबर रोजी कऱ्हाड रोड येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालयात फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते, यावेळी   नाशिक येथील सह्याद्री ऍग्रो चे संस्थापक, अध्यक्ष मंगेश भास्कर युटोपियन शुगर्स चे कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक, ऋषिकेश परिचारक, प्रदीप शिंदे,प्रगतिशील शेतकरी, उद्योजक सी एन देशपांडे, उद्धव बागल,प्रभारी कृषी अधिका...

रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांचे वतीने मुख्याध्यापक काशिनाथ गोगाव, यांचा "नेशन बिल्डर अवॉर्ड"ने गौरव.

Image
 रोटरी क्लब पंढरपूरतर्फे मुख्याध्यापक काशिनाथ गोगाव यांचा ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ने गौरव ३० वर्षांच्या शैक्षणिक सेवेला मानाचा मुजरा; शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर उल्लेखनीय कार्याचा सन्मान पंढरपूर (प्रतिनिधी): शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात गेल्या तीन दशकांपासून सातत्याने कार्यरत असलेले अक्षरनंदन प्राथमिक विद्यामंदिर, इसबावी येथील मुख्याध्यापक श्री. काशिनाथ गोगाव यांचा रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्या वतीने ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ प्रदान करून गौरव करण्यात आला. शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देणारा व्यक्ती नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणारा, संस्कार घडविणारा आणि समाजाच्या भावी पिढीला दिशा देणारा घटक आहे. या भूमिकेची जाणीव ठेवून श्री. काशिनाथ गोगाव यांनी मागील ३० वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात सातत्याने योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबतच शिस्त, संस्कार, सामाजिक जाणीव, आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा या पुरस्काराच्या निमित्ताने गौरव करण्यात आला. शिक्षक दिन हा देशाच्या शैक्षणिक वाटचालीत शिक...

पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील युवकाचा गोव्यात अपघाती मृत्यू.

Image
 पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील युवकाचा गोव्यात अपघाती मृत्यू. नादुरुस्त कंटेनरला बुलेट ची धडक; मित्र अभिषेक धावरे गंभीर जखमी.  पंढरपूर (प्रतिनिधी)_ पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील उद्धव कोळी या युवकाचे गोव्यात दुर्दैवी अपघाती निधन झाले. उद्धव आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. शुक्रवार  ता. १८  रोजी राज्यातील गोवा कुर्टी- खांडेपार महामार्गावर केरये येथे कंटेनर आणि मोटारसायकलची  भीषण धडक झाली. या अपघातात भोसे (करकंब, ता. पंढरपूर) येथील उद्धव बाळासाहेब कोळी (वय २५) याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला मित्र अभिषेक भीमराव धावरे (वय २५) हा गंभीर जखमी झाला. शुक्रवारी (ता. १८) दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. राजस्थानहून माल घेऊन गोव्यातील फोंडा येथे आलेला आरजे ०६ जीसी ९९८९ क्रमांकाचा कंटेनर केरये येथे अचानक नादुरुस्त झाला. त्यामुळे तो महामार्गाच्या कडेला थांबवून दुरुस्तीचे काम सुरू होते. दरम्यान, महाराष्ट्रातून फोंड्याकडे भरधाव जाणाऱ्या एमएच १३ एफबी ५०१९ क्रमांकाच्या बुलेट मोटारसायकलची मागून कंटेनरला जोरदार धडक झाली. या धडकेत मोटारसायकल चालक उद्धव कोळी याचा...

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने संगीत महोत्सव.

Image
 श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने गणेशोत्सव संगीत महोत्सवाचे आयोजन. नामवंत गायक-गायिकांच्या सुरेल गायनाने रंगणार सहा दिवसीय संगीत महोत्सव पंढरपूर, दि. १५(प्रतिनिधी ): श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांच्या वतीने श्री गणेशाच्या आगमनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सहा दिवसीय गणेशोत्सव संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा संगीत महोत्सव श्री संत तुकाराम भवन, पंढरपूर येथे सायंकाळी ७.३० वाजता होणार असून, नामवंत गायक-गायिकांच्या सुरेल गायनाची मेजवानी पंढरपूरकर कलारसिकांना मिळणार आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सर्व सन्माननीय सदस्य, कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव व व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्या मार्गदर्शनाखाली या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत महोत्सवामध्ये मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी भजनसम्राट शंकरराव वैरागकर (नाशिक) यांचा ‘स्वरविठ्ठल’, बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम गायक जयतीर्थ मेऊंडी (हुबळी) यांचा ‘अभंगरंग’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी स्वाती र...

मूर्ती लेपन प्रक्रियेसाठी दि.२३ते २५सप्टेंबर तीन दिवस दर्शन बंद राहणार.

Image
 मूर्ती लेपन प्रक्रियेसाठी दि.२३ते २५सप्टेंबर तीन दिवस  दर्शन बंद,  पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे संवर्धन,   सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती.  पंढरपूर (प्रतिनिधी)  : श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), राज्य पुरातत्त्व विभाग तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली व सल्ल्याने तसेच मे. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ कोल्हापूर यांच्या आदेशानुसार दि.२३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे संवर्धनाबाबत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण यांचे मार्फत तसेच मंदिर समिती व सल्लागार परिषद सदस्य यांच्या उपस्थितीत काम करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.  या संदर्भात पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्या समवेत मंदिर समितीची दि.१३ सप्टेंबर रोजी दु.३ वा. दुरदृष्यप्रणालीद्वारे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औ...

श्री गजानन बिडकर आणि बाळकृष्ण वाडेकर यांना याज्ञवल्क समाज भूषण पुरस्कार.

Image
 *सामाजिक कार्याची मानाची पावती! गजानन बिडकर व बाळकृष्ण वाडेकर यांना ‘याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्कार’* *पंढरपूर, दि. 12 (प्रतिनिधी)* समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय, विधायक आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ, नारायण पेठ, पुणे यांच्या वतीने पंढरपूर येथील श्री. गजानन बिडकर आणि श्री. बाळकृष्ण वाडेकर यांना मानाचा *"याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्कार"* प्रदान करून गौरविण्यात आले. शनिवार, दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता श्री याज्ञवल्क्य आश्रम, याज्ञवल्क्य पथ, पंढरपूर येथे हा पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संस्थेच्या कार्याचा परिचय तसेच मान्यवरांचे स्वागत श्रीकांत जोशी, कार्यवाह, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन मध्यवर्ती मंडळ, पुणे यांनी केले. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध प्रवचनकार व कीर्तनकार श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी पुरस्कारार्थींच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले. > "ब्राह्मण समाजासाठी गजानन बिडकर...

माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मागणीनंतर पालकमंत्र्यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक , वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत केल्या सूचना.

Image
 माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मागणीनंतर पालकमंत्र्यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक. वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत केल्या सूचना. पंढरपूर(प्रतिनिधी ): आधीच पावसाने दिलेली ओढ आणि त्यामध्ये पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्यानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे हा प्रश्न मांडला. यावर पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली आहे. पंढरपूर माढा, सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सलग आठ-आठ दिवस वीजपुरवठा खंडित राहणे, कमी-अधिक दाबाने वीज मिळणे तसेच जळालेले ट्रान्सफॉर्मर (डीपी) वेळेत बदलले जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. तसेच रात्रीच्या वेळी महावितरणकडून कधीही अचानक लाईट घालवली जाते आणि कधीही सोडली जाते, या अनियंत्रित वेळापत्रकामुळे रात्रीच्या वेळी शेताला पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत असून त्यांचा जीव धोक्यात येत आहे. शेतकऱ्यांची ही समस्या प्रशांत परिचारक यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या...

विद्यार्थी आणि शिक्षक यांनी पाठीचा कणा ताठ ठेवावा._योगेश सोमण.

Image
 विद्यार्थी व शिक्षकांनी आपला कणा ताठ ठेवावा.                                                                 -महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण स्वेरीत ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा पंढरपूर-(प्रतिनिधी )‘माझ्या आईने मला योग्य वेळी योग्य दिशा दिली. वेळप्रसंगी तिने कान धरले. जर त्यावेळी तिने योग्य कडकपणा घेतला नसता तर आज मी आपल्या समोर उभा राहिलो नसतो, एवढी प्रगती झाली नसती. म्हणून आपली सर्वात प्रथम शिक्षक म्हणजे आई असते. साहित्य, नाटक, कलाकारी, पत्रकारीता आदी क्षेत्रात भूमिका निभावत असताना मला मनस्वी आनंद होतो. आपल्याला मनापासून जिथे आणि ज्यावेळी काम करण्याची संधी मिळते तेंव्हा अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. अभिनय ही एक प्रकारची साधना असते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीतून आपल्याला शिक्षण मिळत असते. म्हणून विद्यार्थी व शिक्षकांनी आपला कणा ताठ ठेवावा व आपले कार्य निरंतर करत रहावे’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ...

स्वेरीच्या वतीने, पालवी, मध्ये रक्षाबंधन.

Image
                                                                                                                       स्वेरीच्या वतीने ‘पालवी’मध्ये ‘रक्षाबंधन’ संपन्न ‘मेसा’ व 'रासेयो' मधील विद्यार्थ्यांचा उपक्रम पंढरपूर(प्रतिनिधी ): रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून प्रेम, आपुलकी, संरक्षण, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची भावना जपणारा सण आहे. याच भावनेतून गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागाअंतर्गत असलेल्या ‘मेसा’ अर्थात मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने कोर्टी रोड लगत असलेल्या ‘पालवी’ येथे ‘रक्षाबंधना’चा कार्यक्रम उत्साहपूर्ण...