नगरपालिका निवडणुक प्रशासन सज्ज.
पंढरपूर नगरपरिषद निवडणूक : मतदानासाठी प्रशासन सज्ज *नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी फिकट गुलाबी रंगाची मतपत्रिका * ईव्हीएम मतदान यंत्र सील ;अतिरिक्त ३६ राखीव मशीन पंढरपूर दि:-(29)- पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता 2 डिसेंबरला मतदान व 3 डिसेंबर मतमोजणी होणार आहे. पंढरपूर नगर परिषदेमध्ये एकूण 18 प्रभागात 95 हजार 559 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी ईव्हीएम मतदान यंत्र सील करण्याची प्रक्रिया शुक्रवारी पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पार पडली असून, प्रशासनाने शांत, पारदर्शक व सुरळीत निवडणुकीसाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा सज्ज केल्या असल्याचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. पंढरपूर नगरपालिका निवडणूकसाठी एकूण ९७ मतदान केंद्रासाठी यंत्रे सज्ज करण्यात आले असून, प्रभाग क्रमांक ०१, ०२, ०३, ०६, ०७.०८, १०, ११ ,१२,१५, १६, १७,१८ या प्रभागासाठी दोन मशीन असतील तर प्रभाग क्रमांक ०४,०५,०९,१३,१४ या प्रभागात उमेदवारांची संख्या कमी असल्याने एकच मशीन राहणार आहे. तसेच प्रत्य...