नगरपालिका निवडणुकीत प्रचारात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या गंगेकर कुटुंबीयांची प्रचारात जोरदार मुसंडी.
पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन येथे डॉ प्रणिता भालके यांच्या उस्फुर्त रॅलीने गंगेकर कुटुंबाचा विजय निश्चित.
पंढरपूर (प्रतिनिधी)तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रमुख नेत्या प्रणिती भालके यांच्या आगमनाने मतदारात नव उत्साह निर्माण झाला,
सध्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रचारात भालके गट आघाडीवर असून सायंकाळी प्रभाग क्रमांक ३ अ आणि ३ब येथे ढोल ताशाच्या गजरात हलग्यांच्या कडकडाटात जल्लोषात रॅली काढण्यात आली यावेळी नागरिकांच्या उस्फुर्त आणि आनंददायी
स्वागताने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता भालके या भारावून गेल्या, त्या म्हणाल्या जनतेचा एवढा अप्रतिम प्रतिसाद पाहून या निवडणुकीत आपला विजय हा आता निश्चित झाला आहे.
या भागातील तीर्थक्षेत्र विकास आघाडी चे उमेदवार अक्षय गंगेकर आणि त्यांच्या मातोश्री सौ राजश्री गंगेकर यांनी यावेळी प्रभागातील लोकांशी विविध विषयावर चर्चा करून विकासकामे करू असे आश्वासन दिले आहे.
मागील अनेक वर्षांपासून गंगेकर कुटुंब हे पंढरपूर नगरपालिकेत गोरगरीब जनतेच्या सेवेला धावून येत असल्याने तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सौ राजश्री गंगेकर आणि अक्षय गंगेकर यांचा विजय निश्चित असून नगराध्यक्षा पदी डॉ सौ प्रणिता भालके या निवडून येणार असा विश्वास जनतेतून व्यक्त केला जात आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात

Comments
Post a Comment