Posts

Showing posts from January, 2024

म्हैसाळ योजनेतील १९ गावच्या शेतकऱ्यांची सलगर येथे बैठक.- आ. समाधान आवताडे.

Image
 म्हैसाळ योजनेतील १९ गावच्या शेतकऱ्यांची सलगर येथे अधिकाऱ्यांसोबत बैठक- आ आवताडे . पंढरपूर/प्रतिनिधी  मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ योजनेत समावेश असलेल्या १९ गावांपैकी काही गावांना पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत केवळ ऑफिस मध्ये बसून अधिकारी कागदावर बोलत असल्याने म्हैसाळ योजनेच्या सर्व अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष गावात शेतकऱ्यांसमोर बैठक लावली असून वंचित सर्व शेतकऱ्यांनी लेखी तक्रारीसह 3 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता सलगर (बु) गावात उपस्थित राहण्याचे आवाहन आ समाधान आवताडे यांनी केले आहे.  म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद, पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर बु, सलगर खु, बावची, पौट, आसबेवाडी, लवंगी, शिवणगी, येळगी, सोड्डी, हुलजंती या १९ गावांना १२७० एमसीएफटी एवढे पाणी मंजूर असताना केवळ ८० एमसीएफटी म्हणजेच फक्त ६ टक्के पाणी या गावांना आजपर्यंत देण्यात आले आहे. या योजनेतील पूर्ण पाण्याची मागणी केली असता केवळ वेळोवेळी विविध तांत्रिक कारणांचा आधार घेऊन पाणीवाटपात एकदुसरेपणा करण्...

सूर्या कन्स्ट्रक्शन चे उद्घाटन मा. आ. प्रशांत परिचारक यांच्या हस्ते संपन्न.

Image
 सुर्या कन्स्ट्रक्शनच्या ऑफीसचे उद्घाटन मा.प्रशांत  परिचारक यांचे शुभहस्ते संपन्न. पंढरपूर (प्रतिनिधी)    सत्यम दत्ताजीराव पाटील यांनी नवीन सुरू केलेल्या सुर्या कन्स्ट्रक्शनच्या ऑफीसचे उद्घाटन मा.प्रशांतराव परिचारक, मा.कल्याणराव पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले, सदर प्रसंगी मा.प्रशांतराव परिचारक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दत्ता पाटील यांनी सुरूवातीच्या काळात प्रिटींग प्रेसचा व्यवसाय केला.त्यावेळी प्रिटीगची कामे हाताने करावी लागत असत,त्याकाळात छोटी मोठी कामे करून व्यवसायात आपली प्रगती दाखवून ते स्थिर स्थावर झाले वरचेवर व्यवसायात अनेक बदल होत गेले त्याप्रमाणे त्यांनी आपल्या व्यवसायात अनेक बदल केले,आधुनिक तंत्रज्ञान आले,कॉम्प्टुटर प्रिटींग आले, तात्काळ कामे होऊ लागली त्याप्रमाणे त्यांनी बदल करून प्रवाहाबरोबर आपला व्यवसायात बदल केला. डिजीटल प्रिटींग ही त्यातलाच भाग आहे तोही त्यांनी आपला मोठा मुलगा शिवम याला याच व्यवसायात आणून डिजीटल युगात पदार्पण करून पंढरपूरात याही व्यवसायाचा प्रारंभ करून दत्त डिजीटलचे  नाव नांवारूपाला आणले .  खरे तर आज अन्न,वस्त्र,निवारा ...

अनवली येथे विशेष श्रमसंस्कार शिबिरराचे स्वेरी कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीने आयोजन.

Image
 स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने अनवलीमध्ये ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’चे उदघाटन पंढरपूर–(प्रतिनिधी )पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने अनवली (ता. पंढरपूर) मध्ये विशेष श्रमसंस्कार शिबिराचे नुकतेच उदघाटन करण्यात आले.      प्रारंभी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमा पूजन सरपंच वल्लभ घोडके यांच्या हस्ते करून या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’चे उदघाटन करण्यात आले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे व कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. मिथुन मणियार यांनी दि.२३ जानेवारी पासून ते दि. २९ जानेवारी २०२४ पर्यंत चालणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या या शिबिराची संपूर्ण रूपरेषा व यासंबंधी सविस्तर माहिती दिली. पोलीस पाटील तौफिक शेख यांनी स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्म...

स्वामींची साथ असेल तर कोणतेही कार्य अवघड नाही.- श्री दादा महाराज दामले.

Image
 स्वामींची साथ असेल तर कोणतेही कार्य अवघड नाही.- श्री दादा महाराज दामले. पंढरपूर (प्रतिनिधी)आयुष्याचा हा रस्ता खूप अवघड आहे,पण स्वामींची साथ आपल्या सोबत असेल तर कोणतेही कार्य अवघड नाही फक्त कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नका स्वामी सूक्ष्म रुपात अजूनही आहेत असे प्रतिपादन श्री दादा महाराज दामले यांनी केले. पंढरपूर येथे श्री स्वामी समर्थ आरती सेवा मंडळ पुणे शाखेचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त श्री मोहन कुलकर्णी(मंगळवेढेकर) यांच्या बंगल्यात साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रबोधन करीत होते. यावेळी व्यासपीठावर श्री मोहन कुलकर्णी, सौ रेखाताई कुलकर्णी, सौ ताई माऊली दामले उपस्थित होते. पुढे बोलताना दादासाहेब दामले म्हणाले, अध्यात्मिक केंद्र सुरू करणे सोपे आहे पण ते सुरू ठेवण महत्वाचं आहे. याबद्दल येथील सेवेकरांचे कौतुक वाटते. अभिमान वाटावा अशी कामगिरी सौ रेखाताई व श्री मोहनराव यांनी केली आहे.कलियुगात तारक नाव हे स्वामींचे असणार आहे. यावेळी त्यांनी श्री नृसिंह अवतार व त्याची आख्यायिका सांगितली.  पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावचे देव मामलेदार यशवंत राव कुलकर्णी  यांना मिळालेली स्वामींच...

मंगळवेढा शहरात होणारा टाऊन हॉल म्हणजे संतनगरीचे प्रतीक -आ. समाधान आवताडे.

Image
 मंगळवेढा शहरामध्ये साकार होणारा टाऊन हॉल म्हणजे वैभवशाली संतनगरीचे प्रतीक-  आ समाधान आवताडे  पंढरपूर  प्रतिनिधी - अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंगळवेढा संतनगरीमध्ये साकार होणारा टाऊन हॉल म्हणजे मंगळा संतनगरीचे वैभवशाली प्रतीक असल्याचे प्रतिपादन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे. मंगळवेढा तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. त्याचबरोबर मंगळवेढा शहरात साकार होत असलेल्या टाऊन हॉलचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे. त्याप्रसंगी आमदार आवताडे हे बोलत होते. आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून निधी मंजूर झालेल्या मंगळवेढा शहरातील मुरलीधर चौक ते शनिवार पेठ नगरपालिका हद्दीपर्यंत रस्ता व जुनी बँक ऑफ इंडिया बँकेच्या इमारती पासून मुद्गुल ऑफिस पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे १ कोटी, मंगळवेढा नगरपरिषद अंतर्गत मंगळवेढा नगरपरिषद सुधारित विकास योजना आराखड्यातील आरक्षण क्रमांक १७ मधील बहुउपयोगी हॉल बांधकाम करणे ७ कोटी २४ ला...

मंगळवेढा येथे आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन.

Image
 आ.समाधान आवताडे यांच्या हस्ते मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांचे आज भूमिपूजन पंढरपूर (प्रतिनिधी):  पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा शहरातील मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते व जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. आ आवताडे यांच्या हस्ते  मंगळवेढा शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी मंगळवेढा शहरातील सिटी सर्व्हे २७१ या जागेमध्ये साकार होणाऱ्या  दिव्यांग भवनचे भूमिपूजन ९.३० वाजता, त्यानंतर सकाळी १०.०० वाजता मंगळवेढा नगरपरिषद अंतर्गत मंगळवेढा नगरपरिषद सुधारित विकास योजना आराखड्यातील आरक्षण क्रमांक १७ मधील बहुउपयोगी हॉल बांधकाम करणे, मंगळवेढा शहरातील मुरलीधर चौक ते शनिवार पेठ नगरपालिका हद्दीपर्यंत रस्ता व जुनी बँक ऑफ इंडिया बँकेच्या इमारतीपासून मुद्गुल ऑफिस पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, साठे नगर येथील सिटी सर्व्हे क्रमांक २७१ मधील आरक्षण क्रमांक ५६ मधील जागेस संरक्षण भिंत बांधणी व सुशोभीकरण करणे, मंगळवेढा नगरप...

भगिनींचा आनंद हाच आशीर्वाद, चेअरमन अभिजीत पाटील.

Image
 *भगिनींचा आनंद हाच आशीर्वाद मानतो* चेअरमन अभिजीत पाटील. (मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे 'खेळ पैठणीचा' कार्यक्रम उत्साहात संपन्न) प्रतिनिधी/-  'खेळ पैठणीचा' कार्यक्रम मोठ्या आनंदात आणि माता भगिनींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. यातून त्यांना मिळणारा आनंद हाच मी आशीर्वाद मानतो, असे प्रतिपादन 'विठ्ठल सहकारी'चे चेअरमन अभिजित पाटील यांनी केले. मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वतीने  'खेळ पैठणीचा' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बक्षीस वितरण समारंभात विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील बोलताना म्हणाले.... संसाराची जबाबदारी पेलून अविरत कर्तव्य पार पाडणाऱ्या माता भगिनींना विरंगुळ्याचे आणि एकत्रित आनंदाचे काही तास मिळावे यासाठी या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यास मिळणाऱ्या उस्फुर्त प्रतिसाद आणि सर्व वयोगटातील सहभाग यामुळे प्रत्येक गावात हा कार्यक्रम यशस्वी होत आहे. 'खेळ पैठणीचा' या कार्यक्रमाला मरवडे येथे उस्फुर्त प्रतिसाद.. शेकडो महिलांनी विविध खेळांमध्ये स...

भाळवणीच्या सरपंचपदी रणजित जाधव यांची निवड.

Image
 ,भाळवणी च्या सरपंचपदी रणजित जाधव यांची निवड. अटीतटीच्या लढतीत विजय. प्रतिनिधी पंढरपूर -  पंढरपूर तालुक्यातील एक महत्वाचे गाव मोठी बाजारपेठ असलेल्या भाळ वणी चे सरपंच राजकुमार पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर काळे गटाचे रणजित जाधव यांची बिनविरोध निवड होणे अपेक्षित होते. मात्र  इच्छुक उमेदवारांची संख्या वाढल्याने निवडणूक घेण्याचा निर्णय झाला. शुक्रवार दी १९ रोजी शिवसेना(शिंदे गट)तालुका प्रमुख शिवाजी बाबर आणि सहकार शिरोमणी चे संचालक सुनील पाटील व तिसऱ्या आघाडीचे प्रमुख विजय शिंदे यांनी चांगल्या विचारांच्या लोकांची मोट बांधून विजयश्री खेचून आणली. व रणजित जाधव यांना सरपंच केले. काळे गटाचे रणजित जाधव यांनी ९ विरुद्ध ८अशा फरकाने परिचारक गट, शिवसेना (ठाकरे गट), संभाजी शिंदे यांच्या गटाच्या सविता शिंदे यांचा पराभव केला या विजयाने भाळवणीत नवीन पर्वाला सुरुवात झाली . यामध्ये आर पी आय चे सचिन भोसले, धैर्य सिंह नाईक निंबाळकर, जयराम शिंदे अमोल लिंगे, भोजलिंग बाबर, किशोर खराडकर, यांनी विजय मिळविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच निहाल शेख, सागर चौगुले, जावेद शेख , दीपक गवळी ग्राम पंचायत ...

श्री राम जन्मभूमी आंदोलनात कारावास भोगलेले प्रकाशदादा उत्पात.

Image
 श्री राम मंदिर आंदोलनात कारावास भोगलेले प्रकाश दादा उत्पात. पंढरपूर (प्रतिनिधी) श्री राम जन्मभूमी साठी प्रत्यक्ष कारावास भोगला ते लोहपुरुष कै प्रकाश पांडुरंग उत्पात उर्फ दादा यांना आज हे स्वप्न साकारत असलेले पाहून स्वर्गतही मोठा आनंद होत असेल. प्रकाश दादा यांचे घराणे पक्के काँग्रेस पक्षाचे, त्याचे वडील काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष होते,  अनेक दिग्गज नेते घरी येत असत, ते काँग्रेस पक्षात असते तर सहज नगरसेवक आणि ईतर लाभ मिळाले असते, त्यांच्या धाडसी स्वभावामुळे त्यांना १९८० साली शिवसेनेची ऑफर होती, तेव्हा शिवसेना शहर प्रमुखास एक अँब्युलन्स देत असत,पण हे केले तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांशी ती प्रतारणा होईल म्हणून दादा कायम हिंदू महासभा या पक्षातच राहिले. १९६५ साली ते म्हणायचे एक दिवस या देशात हिंदुत्ववादी लोकांचे सरकार येणार, तेव्हा लोक हसत. सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी तमाम हिंदुत्ववादी लोकांचे स्वप्न साकार होणार आहे. अयोध्या येथे श्रीरामाचे भव्य मंदिर साकारत आहे. पण हे मंदिर व्हावे यासाठी जीवाची पर्वा न करता थेट अयोध्येपर्यंत धडक मारलेले पंढरपूर चे कै. प्रकाश पांडुर...

ज्येष्ठ हिंदू महासभा नेते कै. प्रकाश दादा उत्पात यांचे अयोध्येतील श्री राम मंदिर निर्मितीत अनमोल योगदान.

Image
 ज्येष्ठ हिंदू महासभा नेते, कारसेवक कै. प्रकाश दादा उत्पात यांचे श्री राम मंदिर आंदोलनातील अमूल्य योगदान. पंढरपूर (प्रतिनिधी) श्री राम जन्मभूमी साठी प्रत्यक्ष कारावास भोगला ते लोहपुरुष कै प्रकाश पांडुरंग उत्पात उर्फ दादा यांना आज हे स्वप्न साकारत असलेले पाहून स्वर्गतही मोठा आनंद होत असेल. सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी तमाम हिंदुत्ववादी लोकांचे स्वप्न साकार होणार आहे. अयोध्या येथे श्रीरामाचे भव्य मंदिर साकारत आहे. पण हे मंदिर व्हावे यासाठी जीवाची पर्वा न करता थेट अयोध्येपर्यंत धडक मारलेले पंढरपूर चे कै. प्रकाश पांडुरंग उत्पात यांचे योगदान आणि तळमळ विसरता कामा नये. १९९२ साली प्रकाश दादा उत्पात यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन या आंदोलनात उडी घेतली. पंढरपूर येथील गौतम विद्यालयात एन डी एस, शारीरिक शिक्षणाचे शिक्षक असणारे प्रकाश दादा यांनी कुटुंबाचा कोणताही विचार न करता अगदी मृत्यू च्या दाढेत जायचं निर्णय घेतला. १९९२ साली देशात राम मंदिरावरून अतिशय तंग वातावरण होते. तरीही कारसेवेत ते गेले, सरकारी नोकरीचा राजीनामा दिल्यावर पंढरपूर येथे विक्रम सावरकर हे टिळक स्मारक मंदिर येथील अधिवेशना...

पत्रकारांच्या घरकुलाचे प्रश्न सोडविणार. आ. समाधान आवताडे.

Image
 पत्रकार हा समाजाबरोबरच लोकप्रतिनिधींचा आरसा असतो : आ.समाधानदादा आवताडे पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार : समाधानदादा आवताडे   पंढरपूर येथे आमदार समाधान आवताडे यांच्या वतीने पत्रकार बांधवांचा सन्मान. पंढरपूर/प्रतिनिधी पत्रकार हा समाजाबरोबरच लोकप्रतिनिधींचा आरसा असतो. समाजात घडणाऱ्या विविध घटना पत्रकार सातत्याने समोर आणतो. याचबरोबर लोकप्रतिनिधींचे विविध प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्याचे काम सातत्याने करत असतो.  या दरम्यान अनेक घटकांशी सामना पत्रकारांन करावा लागतो. मात्र पत्रकारांचे मूलभूत प्रश्न  कायम आहे.  पंढरपूर येथील पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न सातत्याने मांडला जात आहे.  काही दिवसातच बैठक घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास पत्रकारांना आमदार आवताडे यांनी दिला. आमदार समाधान आवताडे यांच्यावतीने पंढरपूर येथील पत्रकारांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन येथील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विलास उत्पात हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ प...

पंढरीत नाट्य संमेलनाच्या आयोजनासाठी कलाकारांची बैठक संपन्न .

Image
 पंढरपुरात नाट्य संमेलनाच्या निमित्ताने कलाकारांची बैठक. पंढरपूर (प्रतिनिधी)    अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने स्थानिक कलाकारांची बैठक आयोजित करण्यात आली होती   २०जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान पंढरपुरातील रसिकांना मिळणार विविध कार्यक्रमाची मेजवानी दिनांक २० जानेवारी २०२४रोजी पंढरपुरातील स्थनिक कलाकार या संमेलनाच्या निमित्ताने आपला कलाविष्कार दाखविणार असून पंढरपुरातील जुन्या आणि नव्या पिढीतील नाटय कलाकार ,शाहिरी कलाकार, लोक कलाकार, गायक कलाकार, नृत्य कलाकार, भारुड कलाकार,लावणी,भजन, कीर्तन पथनाट्य अश्या विविध कलाकारांच सादरीकरण या १०० व्या नाट्य सम्मे लनाच्या निमित्ताने होणार आहे   कलाकारांच्या बैठकीचे आयोजन पोलीस संकुल रखुमाई सभागृह या ठिकाणी करण्यात आले होते या बैठकीस जेष्ठ कलाकार  नटसम्राट विनय महाराज बडवे, रेडिओ स्टार दिलीप टोमके, भारुडकार चंदाताई तिवारी, संध्या साखी, भा ज पा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा डॉ. प्राजक्ता बेणारे, शिवराज सरणाईक,  विजय व्यवहारे, नाटय कलाकार शाम सावजी, संतोष शिरगिरे ,रविंद्र शेवडे, दिलीप सुरवसे, ,अजित व्यवहारे ...

एम बी ए व एम सी ए च्या सी ई टी २०२४ करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू.

Image
 ‘एमबीए व एमसीए च्या सीईटी २०२४’ करिता ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा पंढरपूर–(प्रतिनिधी )शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमबीए व एमसीए प्रवेशाकरिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या  एमबीए-सीईटी २०२४  या प्रवेश परीक्षेसाठी  ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.११ जानेवारी २०२४ पासून ते बुधवार, दि.३१ जानेवारी २०२४ पर्यंत आणि एमसीए-सीईटी- २०२४ या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.११ जानेवारी २०२४ पासून ते गुरुवार, दि.०१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. पदवी उत्तीर्ण झालेल्या व पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एमएएच एमबीए-सीईटी २०२४ व एमएएच एमसीए-सीईटी २०२४ साठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा स्वेरीतील एमबीए व एमसीए विभागात उपलब्ध करण्यात आली  आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.          पदव्युत्तर पदवी असल...

स्वेरी कॉलेज आणि बी व्हीं जी इंडिया लिमिटेड कंपनीचा करार.

Image
 स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या कंपनी सोबत सामंजस्य करार पंढरपूर: (प्रतिनिधी)‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज  कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा पुणे येथील ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीची २००० कोटींच्या वर  उलाढाल आहे. या बीव्हीजी उद्योग समुहाच्या विविध क्षेत्रात सध्या ७० हजार पेक्षा जास्त कर्मचारी नोकरी करतात. प्रायोरिटी प्लेसमेंट पार्टनर म्हणून स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीशी सामंजस्य करार  करण्यात आलेला आहे’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.          यावेळी बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड म्हणाले की, ‘विविध कौशल्यप्राप्त भारतीय युवक युवतींना जगभरातून मागणी वाढत आहे. युवकांनी नियमित अभ्यासक्रमासोबतच जागतिक मागणीप्रमाणे छोटे छोटे कॉर्सेस करुन स्वतःला अद्ययावत ठेऊन या संधीचा फायदा घेणे गरजेचे आहे. या प्रक्रियेमध्ये बीव्हीजी इंडिया लिम...

क्रेडाई पंढरपूर यांच्या वतीने दि १९ ते २१ जानेवारी रोजी गृह उत्सव २०२४ चे आयोजन .

Image
 क्रेडाई पंढरपूरच्या वतीने १९ ते २१ जानेवारी रोजी गृह उत्सव २०२४ चे आयोजन. पंढरपूर( प्रतिनिधी ) क्रेडाई पंढरपूर या संस्थेच्या वतीने पंढरपूर शहरातील रेल्वे मैदानावर दिनांक १९ ते २१ जानेवारी दरम्यान 'गृह उत्सव २०२४' या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या गृह उत्सवाचे उ‌द्घाटन राज्याचे उच्च तंत्रज्ञान मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री  आ. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी दि.१९ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. याप्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक व क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रमोद खैरनार हे  मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती  क्रेडाई पंढरपूरचे अध्यक्ष अमित शिरगांवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली  या गृह उत्सव प्रदर्शनामध्ये पंढरपुरातील सर्व बांधकाम व्यवसायिकांचे गृह प्रकल्प, फ्लॅट्स, रो हाऊस, ओपन प्लॉट्स यांची माहिली ही एकूण ८० स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शित केली जाणार आहे.  तसेच बांधकाम क्षेत्राला आवश्यक असणारे सळई, सिमेंट, रंग, सॅनिटरी वेअर आदी साहित्य व गृहकर्ज पुरवठा करणाऱ्या वित्त संस्था या सर्वाची माहिती एकाच ठिकाणी उपल...

पंढरपूर क्रेडाई यांच्या वतीने दी १९ ते २१ जानेवारी रोजी गृह उत्सव २०२४ चे आयोजन.

Image
 क्रेडाई पंढरपूरच्या वतीने १९ ते २१ जानेवारी रोजी गृह उत्सव २०२४ चे आयोजन. पंढरपूर( प्रतिनिधी ) क्रेडाई पंढरपूर या संस्थेच्या वतीने पंढरपूर शहरातील रेल्वे मैदानावर दिनांक ११ ते २१ जानेवारी दरम्यान 'गृह उत्सव २०२४' या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या गृह उत्सवाचे उ‌द्घाटन राज्याचे उच्च तंत्रज्ञान मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री  आ. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी दि.१९ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. याप्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक व क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रमोद खैरनार हे  मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती  क्रेडाई पंढरपूरचे अध्यक्ष अमित शिरगांवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली  या गृह उत्सव प्रदर्शनामध्ये पंढरपुरातील सर्व बांधकाम व्यवसायिकांचे गृह प्रकल्प, फ्लॅट्स, रो हाऊस, ओपन प्लॉट्स यांची माहिली ही एकूण ८० स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शित केली जाणार आहे.  तसेच बांधकाम क्षेत्राला आवश्यक असणारे सळई, सिमेंट, रंग, सॅनिटरी वेअर आदी साहित्य व गृहकर्ज पुरवठा करणाऱ्या वित्त संस्था या सर्वाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्...

दर्शनमंडप येथे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याची सुविधा.

Image
 दर्शनमंडप येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड घेण्याची व्यवस्था;  मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री.औसेकर महाराज व जिल्हाधिकारी श्री.कुमार आशिर्वाद यांची होती सुचना   - श्री.राजेंद्र शेळके यांची माहिती.*  पंढरपूर ( प्रतिनिधी) :- आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' राबविली जात आहे. योजनेतून लाभार्थ्याला ५ लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. त्यासाठी ' *आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड'* घेणे आवश्यक असल्याने मंदिर परिसरामध्ये स्टॉल उभारण्यात यावा अशी सुचना मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर व जिल्हाधिकारी श्री.कुमार आशिर्वाद यांची केली होती.  त्या अनुषंगाने उक्तकामी श्री.संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथे जागा उपलब्ध करून देण्याची विनंती तालुका आरोग्य अधिकारी, पंढरपूर यांनी मंदिर समितीला केली होती. त्यानुसार दर्शनमंडप येथे स्टॉल उभारण्यात आला आहे. त्यामध्ये पंचायत समिती पंढरपूर व मंदिर समितीचे कर्मचारी तसेच आरोग्य मित्र नियुक्त करण्यात आले असून, सदर योजने अंतर्गत लाभ घ...

उजनी धरणातून कालव्यातून एक आवर्तन सिंचनासाठी द्यावे.- पालकमंत्री चंद्रकांत पाटील.

Image
 उजनी धरणातून कालव्याद्वारे एक आवर्तन सिंचनासाठी देण्यात यावे                                                       -पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची पुणे येथे बैठक संपन्न   सोलापूर,दि.११:- ११ जानेवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत उजनीतून कालव्याद्वारे शेतीसाठी एक सिंचन आवर्तन देण्यात यावे, तसेच पिण्यासाठी पाणी पुरविण्यास प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचे अत्यंत सुक्ष्म नियेाजन करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले.   उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, मोहोळचे आमदार यशवंत माने, करमाळाचे आमदार संजय शिंदे, पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जल...

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मुख्यमंत्र्यांची मान्यता.- आ. समाधान आवताडे.

Image
 *मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मान्यता -आ.समाधान आवताडे यांची माहिती*  पंढरपूर/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील २४ गावच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार असून सर्वच पक्षाचा राजकीय अजेंडा बनलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मान्यता दिली असून काही विभागाच्या परवानग्या घेऊन लवकरच हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर जाईल व निधी मंजूर होऊन निविदा प्रक्रिया पार पडेल अशी माहिती आ समाधान आवताडे यांनी दिली. ते पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांनी प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला होता त्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असून या प्रस्तावामध्ये भीमा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून ९५ किलोमीटर मधून पोहोच कालव्याद्वारे योजनेसाठी आवश्यक २.०४ अघफु(५७.७६४ दलघमी) पाणी उचलून बंदिस्त नलिका प्रणाली द्वारे मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतील २४ गावातील १७१८६ हेक्टर दुष्काळी क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी वापरण्यात येणार आहे अशा या प्रस्तावास शासन निर्णय २३ नोव्हेंबर २०१६ मधील...

विद्यापीठस्तरीय आविष्कार २०२३, या स्पर्धेत स्वेरी चे चार विद्यार्थी यशस्वी.

Image
 विद्यापीठ स्तरीय ‘अविष्कार २०२३’ या स्पर्धेत स्वेरीचे चार विद्यार्थी यशस्वी पंढरपूर(प्रतिनिधी)– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर तर्फे  विद्यापीठामध्ये आयोजित  करण्यात आलेल्या ‘अविष्कार- २०२३’ या संशोधन स्पर्धेत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व कॉलेज ऑफ फार्मसी मधील एकूण चार विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. या यशामुळे स्वेरीतील संशोधन विभागाला अजून बळकटी आली आहे तसेच या यशामुळे  पंढरपूर पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.         पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर तर्फे प्रत्येक वर्षी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांसाठी  ‘अविष्कार संशोधन महोत्सव’ हा स्पर्धात्मक संशोधन उपक्रम राबविला जातो. यंदा हा ‘अविष्कार महोत्सव’ सोलापूर विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत विद्यापीठाशी संलग्नित  महाविद्यालयांतील विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. इंजिनिअरींग मधील  पदवी विभागासाठी असल...

अभिजीत पाटील यांनी घेतली पत्रकारांची मुलाखत.

Image
 *अभिजीत पाटलांनी मुलाखत घेऊन रंगवली पत्रकारांची मैफील* (निर्भीड आणि प्रामाणिक पत्रकारिता ही आजच्या काळाची व समाजाची मुख्य गरज :- अभिजीत पाटील. *पत्रकार दिन विशेष “एक अक्षर संवाद” मुलाखत गाजली*   *७ विविध वृत्तपत्रांच्या पत्रकारांची चेअरमन अभिजीत पाटील यांनी घेतली दिलखुलास मुलाखत*   प्रतिनिधी/-  पत्रकार दिनाचे औचित्य साधून पंढरपूर परिसरातील पत्रकारांची मुलाखत - “एक अक्षर संवाद” हा एक आगळावेगळा उपक्रम मोठ्या आनंदात संपन्न झाला. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत (आबा) पाटील दर वर्षी पत्रकार बांधवांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करत असतात. पण तो कार्यक्रम कायम अनौपचारिक स्वरूपाचा असतो. या वर्षीचा कार्यक्रम म्हणजे एक अभिनव प्रयोग होता. एका राजकीय क्षेत्रातील कार्यरत व्यक्तीने पत्रकारांची मुलाखत घेणे हे अपेक्षेप्रमाणे उत्कंठावर्धक ठरले. ज्येष्ठ पत्रकार श्री.बाळासाहेब बडवे यांच्यासह श्री.प्रशांत आराध्ये, श्री.अभय जोशी, श्री.राजाभाऊ शहापूरकर, श्री.महेश खिस्ते, श्री.सिद्धार्थ ढवळे, श्री.प्रशांत मोरे आदी मान्यवर पत्रकार बां...

स्वेरीत ,ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इन जावा स्पेशलायझेशन विषयावर कार्यशाळा.

Image
 स्वेरीत ‘ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इन जावा स्पेशलायझेशन' यावर कार्यशाळा संपन्न दहा दिवसाच्या या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद पंढरपूर-(प्रतिनिधी )गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागात ‘ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इन जावा स्पेशलायझेशन' या विषयावर तब्बल दहा दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.          स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या कार्यशाळेत उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून पुण्यातील सॉफ्टेक सोल्युशन अँड ट्रेनिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिवकुमार स्वामी हे होते. आय. टी.क्षेत्रामध्ये आवश्यक असणाऱ्या जावा या भाषेमधील जावा आणि स्ट्रिंग्सच्या मूलभूत गोष्टींवर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ‘ऑ...

पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी श्री विरेंद्र उत्पात.

Image
 महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीच्या पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी विरेंद्र उत्पात,  पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी रविंद्र शेवडे सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी दत्ताजीराव पाटील           पंढरपूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीची कार्यकारिणीची बैठक सोलापूर येथे पार पडली. यावेळी संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार, कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे  उपस्थित होते.         यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी विरेंद्र उत्पात, सोलापूर जिल्हा संघटक रविंद्र शेवडे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी दत्ताजीराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  आज पत्रकार दिनाच्या दिवशी श्रीसंत दामाजी मठ येथे त्यांचा सत्कार शाल, श्रीफळ देऊन  करण्यात आला. दत्ताजीराव पाटील यांचा सत्कार प्रदेशाध्यक्ष रामभाऊ सरवदे यांच्या हस्ते, रविंद्र शेवडे यांचा सत्कार पंढरपूर शहर अध्यक्ष चैतन्य उत्पात यांनी केला. तर विरेंद्र उत्पात यांचा सत्कार प्रदेशाध्यक्ष रामभाऊ सरवदे यांचे वतीने केला. (सदर सत्कार चैतन्य उत्पात ...