एम बी ए व एम सी ए च्या सी ई टी २०२४ करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू.


 ‘एमबीए व एमसीए च्या सीईटी २०२४’ करिता ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू


स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा


पंढरपूर–(प्रतिनिधी )शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमबीए व एमसीए प्रवेशाकरिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या  एमबीए-सीईटी २०२४  या प्रवेश परीक्षेसाठी  ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.११ जानेवारी २०२४ पासून ते बुधवार, दि.३१ जानेवारी २०२४ पर्यंत आणि एमसीए-सीईटी- २०२४ या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.११ जानेवारी २०२४ पासून ते गुरुवार, दि.०१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. पदवी उत्तीर्ण झालेल्या व पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एमएएच एमबीए-सीईटी २०२४ व एमएएच एमसीए-सीईटी २०२४ साठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा स्वेरीतील एमबीए व एमसीए विभागात उपलब्ध करण्यात आली  आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

         पदव्युत्तर पदवी असलेल्या एमबीए च्या प्रवेशाकरीता अत्यंत महत्वपूर्ण समजली जाणारी एमएएच-एमबीए-सीईटी २०२४ ही परीक्षा शासनाच्या दिलेल्या वेळापत्रकानुसार साधारण ९/१० मार्च या दोन दिवशी होणार आहे. तर एमएएच-एमसीए-सीईटी २०२४ ही परीक्षा साधारण १४ मार्च २०२४ च्या दरम्यान होणार आहे. एकूणच एमबीए व एमसीएच्या या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.११ जानेवारी २०२४ पासून ते गुरुवार, दि.०१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत चालणार आहे. या प्रवेश परीक्षेच्या संदर्भात अधिक माहीतीसाठी शासनाच्या https://mbacet2023.mahacet.org या संकेत स्थळावर तसेच स्वेरी अभियांत्रिकीच्या एमबीएचे विभागप्रमुख प्रा.करण पाटील (मोबा. नंबर–९५९५९२११५४) व एमसीएचे विभागप्रमुख प्रा.मनसब शेख (९०२८९०७३६७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.