जगाची दिशा पाहून डॉ रोंगे सर जे कार्य करतील त्याला सहकार्य असेल._उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील.
जगाची दिशा पाहून शिक्षणासाठी डॉ. रोंगे सर जे कार्य करतील त्यास सदैव सहकार्य असेल -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील स्वेरीमध्ये लॉ कॉलेज व भव्य क्रीडांगणाचे उदघाटन आणि मुलींच्या नूतन वसतीगृहाची पायाभरणी हे कार्यक्रम संपन्न पंढरपूर(प्रतिनिधी)- ‘आज जागतिक स्तरावर भारताला क्रीडा क्षेत्रात पदके मिळत आहेत ही बाब अभिमानास्पद आहे. एशियायी आणि राष्ट्कुल स्पर्धेमध्ये भारताने पदके मिळविली असून आता ऑलम्पिक स्पर्धेचे ध्येय आहे म्हणून जे ध्येय बाळगतात ते काहीतरी करायचे ठरवितात. पुढे ध्येयवेडी माणसं धाडसी बनतात. त्याप्रमाणे डॉ. रोंगे सरांनी धाडसाने स्वेरी या शिक्षणसंकुलाची उभारणी केली. जग हे ज्ञानावर आणि संशोधनाच्या जोरावर श्रीमंत झाले आहे. म्हणून जगाची दिशा पाहून शिक्षणासाठी डॉ. रोंगे सर जे कार्य करतील त्यास सदैव सहकार्य असेल’ असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. ‘स्वेरीमध्ये स्वेरीज् लॉ कॉलेज पंढरपूर, नवीन बहुउद्देशीय इमारत व विद्युत प्रकाशझोताच्या सुविधेने सुसज्ज भव्य क्रीडांगण यांचे उदघाटन आ...