अभागी भगिनीचे रक्षा बंधनानिमित्त अनावृत्त पत्र.
*"अभागी भगीनीचे रक्षा बंधनानिमित्त अनावृत्तपत्र"* . हे दयाघना, करूणाकरा तू करूणेचा सागर आहेस, ज्याप्रमाणे नारायणाने मगरीच्या तावडीतून गजेंद्राची सुटका केली तद्वतच तू नांदणी (कोल्हापूर) येथील माधुरी हत्तीणीची आणि कोल्हापूर येथील जनतेची कणव येऊन वनतारा जंगलातून परत कोल्हापूर येथे पाठवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली.दादर येथील कबूतरखाना उठवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला असून आणि.कबूतराच्या विष्ठेतील जंतू संसर्गामुळे जीवघेणा श्वसनाचे आजार होतो हे माहित असताना देखील कबूतरावर दया दाखवताना आपल्यातील शांतीदूत जागा झाला खरोखरच आपण करूणेचा सागर आहात आपण लाडक्या बहिणीची काळजी घेताना केवळ बहीणीनाच नव्हे तर भावना देखील ओवाळणी घातली .
जे जे भेटे भूत त्यासी मानले भगवंत या नीतीने आपण वागत आहात प्रत्येक जीव मात्राची आपण काळजी घेत आहात यामुळे आम्हाला खूप आनंद वाटत आहे.
पंढरपूर आषाढी एकादशी साठी खरा वारकरी दोनशे कीलोमीटर हून अधिक अंतर पायी चालत येतो चंद्रभागेत स्नान करून कळसाचे दर्शन घेऊन नगर प्रदक्षिणा घालून आपल्या गावी परत जातो.वारकरी संप्रदायाने तथाकथित काँरीडाँर ची कींवा मंदिराभोवती तीनशे मीटर समृध्दि महामार्ग असावा अशी मागणी केलेली नाही.असे असताना देखील मंदिर परिसरातील रहिवासी लोकांची घरेदारे पाडण्याचा घाट शासनाने घातला आहे.पिढ्यान् पिढ्या मंदिर परीसरात राहणारे विठ्ठल रखुमाई चे भक्त नाहीत काय? त्यांची राहती घरी उध्वस्त करून त्यांना ऐतिहासिक (?) मोबदला देऊन संस्कृती नष्ट करून पुनर्वसन म्हणजे कोणती भूतदया म्हणता येईल.आम्ही राहत असलेल्या घर हे केवळ राहण्याचे निवास नसून एक मंदिर आहे माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आठवणी या वास्तू साठी निगडित आहेत.कुटूंबातील सदस्यांचे विवाह,जन्म अशा अनेक घटनांचे त्याचे मोल कितीही मोठा मोबदला दिला तर नुकसान भरून निघणार नाही .आमचा एकच दोष म्हणजे आमच्यातील पिढ्यान् पिढ्यांना त्या सावळ्या विठ्ठला ने वेड लावले आहे.त्याची एवढि कठोर शिक्षा आम्हाला झेपणार नाही.कृपया काँरीडाँर कींवा विकास आराखडा राबवताना घरें दारे पाडू नका आम्हाला आमच्याच घरा दाराची ओवाळणी या रक्षा बंधनाचे निमित्ताने घालून आमच्या माहेर आणि सासरचे रक्षण कराल अशी आशा आहे.नांदणीयेथील हत्तीणीला आणि दादर येथील कबूतरखाना वाचवण्यासाठी आपल्या हृदयाला पाझर फुटला तसाच पाझर अभागी बहीणीचे घर वाचवताना फुटावा ही श्री रूक्मिणी पांडुरंग चरणी प्रार्थना
आपली अभागी बहीण
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment