पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन घेतले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन प्रतिनिधी पंढरपूर, - राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार समाधान आवताडे, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रणव परिचारक, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच मोहन डोंगरे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहिल्या टप्प्यातील सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी मंदिर समितीचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासनाकडून ७३ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर झाला अ...