श्री माताजी निर्मलादेवी प्रशालेत बालसभा संपन्न.


 श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक प्रशालेत चौथी वर्गाची 'बालसभा '


पंढरपूर (प्रतिनिधी)- श्री  माताजी निर्मलादेवी प्राथमिक प्रशालेत संस्थेच्या सचिवा . सौ सुनेत्रा पवार  यांच्या संकल्पनेतून  प्रशालेत इयत्ता चौथीच्या वर्गाची 'बालसभा'झाली. बाल सभा म्हणजे बालकांचा अधिराज्य असणे.या सभेचा चिमुकला अध्यक्ष चि. आयान मुलाणी हा होता. या बाल सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री विनय उपाध्ये व प्रशालाचे मुख्याध्यापक श्री संतोष कवडे सर, सर्व शिक्षक, पालक वर्ग  उपस्थित होते.

          प्रथम कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. चि.श्लोक पतंगे यांनी छत्रपती शिवरायांचा पोवाडा जोश पूर्ण वातावरणात सादर केला. या पोवाड्यावर मुलांनी नाट्यकरण सादर केले. चि. श्लोक व अर्णव यांनी विनोदी बातम्या विनोदी प्रसंग सादर केले. पर्यावरण पूरक शपथ कु.रिया ओव्हाळ हिने सर्वांना दिली. इंग्रजी, मराठी कविता  हावभाव युक्त गाण्याच्या तालावर सादर करण्यात आल्या. मातीचे महत्त्व सांगणारी एकांकिका कु. रिया, सई,जीत व विराज यांनी सादर केली.

             प्रमुख पाहुणे श्री विनय उपाध्ये म्हणाले 'मुलांनी जागरूक ग्राहक होऊन प्रत्येक वस्तू विकत घेताना बील पावती घेणे.खुप खेळा,शिका व आनंदी रहा.'त्यांनी अनेक विषयावर मुलांशी संवाद साधला. अध्यक्षीय भाषणात चि. आयान मुलाणी म्हणाला 'आमची शाळा खुप छान आहे. शिक्षक चांगले शिकवत आहेत. रोज प्रशालेत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.आम्ही खुप शिकून आमच्या आई -बाबाचे व शाळेचे नाव मोठे करू.'

              कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्गशिक्षक श्री महेश भोसले सर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  कु. आरोही खंकाळ  व कु. तेजस्विनी कांबळे यांनी केले. आभार प्रदर्शन  चि. श्लोक पतंगे यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट महाराष्ट्र गीताने करण्यात आला

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.