मंगळवेढा उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली.
मंगळवेढा उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी अभिजीत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट *मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकांसाठी मागितला भरघोस निधी* *उपसा सिंचन योजनेची जबाबदारी घेतली अभिजीत पाटील यांनी खांद्यावर* पंढरपूर(प्रतिनीधी) मंगळवेढ्यातील ३५ गावच्या उपसा सिंचन योजना गेले अनेक वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित आहे. पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्याच्या मागण्यांसाठी श्री विठ्ठल सहकरी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दि.३१ ऑगस्ट२०२३ रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृह येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री.अजितदादा पवार यांना भेटून उपसा सिंचन तात्काळ मार्गी लावण्याची विनंती केली तसेच मंगळवेढातील महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी निधी मागणीचे निवेदन ही दिले आहे. मंगळवेढातील ३५ गावांपैकी २४ गावांची उपसा सिंचन योजना अंतिम टप्प्यात असून उर्वरित गावे तांत्रिक बाबींमुळे शासनाच्या लाल फितीत अडकल्या असल्याने उपसा सिंचन योजनातील त्रुटी पूर्ण करून अर्थमंत्री या नात्याने उपसा सिंचन योजनेसाठी भरघोस निधी मंजूर करावा अशी मागणी अभि...