आधीक महिन्यात मंदिर समितीला ७ कोटी १९ लाख रुपयांचे उत्पन्न.- कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके.




 अधिकमासात भाविकांकडून मंदिर समितीस रू.7.19/- कोटीचे दान.


 *कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके यांची माहिती.* 



पंढरपूर ( प्रतिनिधी) :- अधिकमास दि.१८ जुलै ते दि.१६ ऑगस्ट या कालावधीत संपन्न झाला. या कालावधीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यांना मंदिर समितीकडून पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या अधिकमासात मंदिर समितीस विविध माध्यमांतून रक्कम रू.7,19,43,037/- इतके उत्पन्न मिळालेले आहे. सन 2018 मध्ये रू.2,32,51,924/- इतके उत्पन्न मिळाले होते. सन 2018 च्या तुलनेने यावर्षीच्या अधिकमासाच्या उत्पन्नात रू.4,86,91,113/- इतकी वाढ झाली असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके यांनी दिली.



          तसेच या कालावधीत 6,39,917 भाविकांनी पदस्पर्शदर्शन व सुमारे 5,00,000 भाविकांनी मुखदर्शनाचा लाभ घेतला आहे. श्रींच्या चरणाजवळ, नित्यपुजा, लाडूप्रसाद, अन्नछत्र, देणगी, महानैवेद्य, भक्तनिवास, तुळशीपूजा, मोबाईल लॉकर इत्यादी माध्यमांतून सदरचे उत्प्नन मिळालेले आहे.


           अधिकमासात सोने-चांदीच्या वस्तू दान करण्याची प्रथा असून, रक्कम रू.2,49,8,890/- किंमतीचे सोने व रू.8,18,859/- किंमतीचे चांदीच्या वस्तू भाविकांकडून प्राप्त झालेल्या आहेत. या सर्व प्राप्त देणगीतून भाविकांना अत्याधुनिक व पुरेसा प्रमाणात सोई सुविधा देण्याचा प्रयत्न मंदिर समितीचा राहणार असल्याचे सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगीतले.

संपादक

चैतन्य विलास उत्पात.

मो.९४०३८७३५२३.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.