लग्न करून देत नाही, म्हणून मुलाची वडिलांना बेदम मारहाण.

लग्न करून देत नाही, म्हणून मुलाची वडिलांना बेदम मारहाण. 

पंढरपूर 

(प्रतिनिधी )- पंढरपूर  येथील एका युवकाने वडील आपले लग्न लावून देत नाहीत या कारणावरून चिडून बेदम मारहाण केली. या प्रकरणी मुलास अटक करण्यात आली आहे. याबाबत पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भुजबळ यांनी माहिती दिली.

गोपीचंद उर्फ जितू हुकूम कदम( वय,२८ , रा. भगवाननगर,पंढरपूर) या युवकाने रविवार दि२७ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास वडील हुकूम माणिक कदम( वय,५६ रा. भगवाननगर,पंढरपूर) यांना, तुम्ही माझे लग्न करून देत नाही, तुम्हाला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत शहाबादी फरशी तुकड्याने व लाकडी फळीने बेदम मारहाण केली. यात त्यांच्या डोक्यात आणि तोंडावर जबर मार लागला असून उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पंढरपूर शहर पोलिसांनी  मुलगा गोपीचंद कदम यास अटक केली असून सोमवारी कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी  कलम ३०७ लावण्यात आले असून हत्येचा प्रयत्न अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

पुढील तपास स पो नि प्रकाश भुजबळ करीत आहेत.

 संपादक.

चैतन्य उत्पात.

मो.९४०३८७३५२३.

९२२६२८२००५.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.