पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार
पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे भीषण अपघात, बापलेक जागीच ठार.
पंढरपूर(प्रतिनिधी )_पंढरपूर अहमदनगर रोडवरील गुरसाळे या गावाजवळ बिगर नंबरच्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टँकर ने समोरून जोरदार धडक दिल्याने बाप आणि मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
हा दुर्दैवी अपघात शनिवार दि.२०डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता झाला,
माढा तालुक्यातील उजनी गावातील रघुनाथ उत्तम लोकरे (वय ४२, रा.उजनी, ता. माढा) आणि त्यांचा मुलगा नरसिंग रघुनाथ लोकरे(वय १३)हे आपल्या गावाकडे एम एच ४५, ए एच ०२५४या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून जात असताना साखर कारखान्याकडून भरघाव वेगाने येणाऱ्या टिपर ने त्यांना धडक देऊन चिरडले या अपघातात दोघा बाप लेकरांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात झाल्यावर शाळेत शिकत असलेल्या मुलाचे पुस्तके रस्त्यावर पडली होती हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते.
अपघातानंतर टिपर चालक गाडी सोडून पळून गेला आहे. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तैय्यब मुजावर अधिक तपास करीत आहेत.
संपादक.
चैतन्य उत्पात.


Comments
Post a Comment